नारळीपौर्णिमेनिमित्त घरात बरेच नारळ आलेले असतात. मग सर्वांच्या आवडत्या नारळाच्या वड्या केल्या जातात. भरपूर दूध घालून मऊसूत अशा 'फज'सारख्या वड्या आमच्याकडे खूप आवडतात. नेहमीसाठी वेलदोडा (इलायची) घातलेली असतेच. पण मी कधी बदल म्हणून केशर, जायफळ, आमरस घालूनही बनवते. एकदा एका लग्नात आईने गुलकंद घालून केलेली नारळाच्या वड्या पाहिल्या आणि घरी आल्यावर त्याची फारच स्तुती केली. गुलकंद आणि नारळ हे दोन्ही अगदीच आवडते असल्यामुळे त्या करून पाहायची इच्छा होतीच. तसेच मध्ये एकदा रुह-अफ्जा घालून केलेले नारळाचे लाडू याची पाककृती पाहिली होती. त्या पाककृतीत मिल्कमेड घातलेले होते. मी नेहमीप्रमाणेच दूध घालून केली आणि त्यात गुलकंदही घातले. चव तर छान लागलीच, तसंच दिसायलाही फारच आकर्षक!
साहित्य:
दोन वाट्या नारळाचा चव
दीड वाटी दूध
दीड वाटी साखर (आवडीनुसार कमी/जास्त घेऊ शकता.)
चार टे.स्पून रुह-अफ्जा / रोझ सिरप
दोन टे.स्पून तूप
गुलकंद
कृती:
सजावटीसाठी एक-दोन टे.स्पून नारळाचा चव वेगळा काढून घ्या.
तूप गरम करून त्यात उरलेला नारळाचा चव एक-दोन मिनिटे परतून घ्या.
त्यात दूध घालून मध्यम आचेवर अधूनमधून ढवळत राहा.
दूध आटत आले की साखर घाला.
आणखी थोडा वेळ मिश्रण हलवत राहा.
मिश्रण थोडे घट्ट होत आले की रुह-अफ्जा घालून नीट हलवून घ्या.
सगळ्या मिश्रणाला एकसारखा रंग आला की गॅस बंद करा.
आता या मिश्रणाच्या वड्या/ लाडू/ रोल्स जे आवडेल ते बनवा.
वड्या बनवण्यासाठी मिश्रण ताटात पसरवून वड्या पाडून घ्या.
लाडू:
लाडू बनवण्यासाठी मिश्रण थोडे गार होऊ द्या.
थोडेसे मिश्रण तळहातावर घ्या. छोट्याशा पारीसारखा आकार देऊन एक छोटासा गुलकंदाचा गोळा त्यात भरा. वरून आणखी नारळाचे मिश्रण लावून लाडू वळून घ्या.
असे सगळे लाडू वळून शेवटी वेगळ्या काढलेल्या चवामध्ये घोळवून घ्या.

रोल्स:
एका बटरपेपरवर / अॅल्यु. फॉईलवर साधारण दोन-अडीच इंच रुंदी होईल असे मिश्रण पसरवून एक थर बनवून घ्या.
त्या थरावर रुंदीच्या मधोमध बोटभर रुंदीचा गुलकंदाचा थर द्या.
रोल्स बनल्यावर गुलकंद मध्ये येईल अशा तर्हेने पेपर/ फॉईल एका बाजूने मिश्रणासहित अलगद उचलून दुसर्या बाजूकडे नेऊन हलकासा दाब देऊन बंद करा.
थोडा वेळ तसेच फ्रीजमध्ये ठेवा.
जरा घट्ट झाल्यावर बाहेर काढा. पेपर/ फॉईल पुन्हा अलगद उघडून साधारण बोटभर जाडीचे रोल्स कापा.
मागच्या वर्षीच्या कणकेचा शिरा या बाप्पाच्या नैवेद्यात "प्रशाद को दात नही लगाते" वाचले होते. हे रोल्स असेच जिभेवर ठेवले की विरघळतात.

मिसळपाव
प्रतिक्रिया
यमी!
यमी! बाप्पा स्वतः येऊन फस्त करील नक्की!
भारी! नक्की करून बघणार हे!
भारी! नक्की करून बघणार हे!
मस्त आहे पाकृ.फोटो बघून लाडू
मस्त आहे पाकृ.फोटो बघून लाडू तोंडात टाकावासा वाटतोय!
मस्त ! लाडू खरोखरच गोजिरवाणे
मस्त ! लाडू खरोखरच गोजिरवाणे झालेत.
करेक्ट! "गोजिरवाणे" च झालेत
In reply to मस्त ! लाडू खरोखरच गोजिरवाणे by सपे-पुणे-३०
करेक्ट! "गोजिरवाणे" च झालेत अगदी!!
पटकन उचलुन तोंडात टाकावेत असे!!
लैच्च भारी :)
लैच्च भारी :)
अहाहा काय देखणे झालेत!
पटकन उचलून खावासा वाटतोय, पुढच्या गणपतीला नक्की करणार.
वाह! मस्तं लाडू. रंग किती
वाह! मस्तं लाडू. रंग किती सुंदर आहे.
फिक्का अबोली कलर भारी आलाय
फिक्का अबोली कलर भारी आलाय (खरबुजी पण म्हणता येईल)
गुल्कंद बिल्कंद असलेने टेस्ट भारीच असणार.
वाह! मस्तं
वाह! मस्तं
फोटो दिसत नाहीत.
फोटो दिसत नाहीत.
मागे कुठेतरी वाचले होते की
In reply to फोटो दिसत नाहीत. by किसन शिंदे
मागे कुठेतरी वाचले होते की गूगल फोटोज पब्लिक असले तरी आता दिसायला तुमच्या गूगल अकाऊंट मध्ये लॉग-इन करावे लागते. तसे मला लॉग-इन न करताही दिसत आहेत, पण एकदा तसा प्रयत्न करुन पहा.
व्वा!
खूप छान दिसत आहेत हे लाडू. अगदी टेप्टिंग!
स्वाती
वा, फारच सुरेख दिसतायेत. मी
वा, फारच सुरेख दिसतायेत. मी मागे असे गुलकंद वापरून गुलबहार रसगुल्ले बनवले होते.
छान पाकृ. इथे गुलकंद मिळत
छान पाकृ. इथे गुलकंद मिळत नाही, पण माझ्याकडे रोझ सिरप आहे. ते वापरुन काहितरी ट्राय करते.
ते मॅप्रोचे स्ट्रॉबेरी फलेरो
In reply to छान पाकृ. इथे गुलकंद मिळत by Mrunalini
ते मॅप्रोचे स्ट्रॉबेरी फलेरो असतात तसे आत ठेवले तर चालतील काय? जेली टैप.
लिचीचे फलेरो असतात का? मला
In reply to ते मॅप्रोचे स्ट्रॉबेरी फलेरो by अभ्या..
लिचीचे फलेरो असतात का? मला वाटते लाडू गोड असल्यामुळे आत स्ट्रॉबेरी कदाचित आंबट लागेल, कदाचित लिचीचे जास्त छान असतील. पण पसंद अपनी अपनी :)
मृणालिनी, नुसतं रोज सिरप घालूनही नक्की करुन बघ, तसेही छान लागतात :)
सुरेख दिसताहेत लाडू.रुहअफजाची
सुरेख दिसताहेत लाडू.रुहअफजाची कल्पना छानच आहे.
ठार वारलो!
ठार वारलो!
नारळाचा चव म्हणजे ओलं की कोरडं खोबरं?
ओलं खोबरं !!
In reply to ठार वारलो! by आदूबाळ
ओलं खोबरं !!
बाकी वारले मी पण. कहर दिसतायेत लाडु. आणि ही कल्पनाच फार भारी आहे. नारळ + गुलकंद !!
अगदीच गोंडस दिसणारा प्रसाद
अगदीच गोंडस दिसणारा प्रसाद आहे.
काय सुंदर रंग आलाय.मस्तच!
काय सुंदर रंग आलाय.मस्तच!
काय सुंदर रंग आलाय.मस्तच!
काय सुंदर रंग आलाय.मस्तच!
मस्त
मस्त
किती मस्त दिसतायत हे गुलाबी
किती मस्त दिसतायत हे गुलाबी लाडू!! लगेच फस्त होतील..... :-)
सुरेख रंग आलाय लाडवांना.
सुरेख रंग आलाय लाडवांना. पाककृती ही स्वादिष्ट.
सर्वांना धन्यवाद :)
सर्वांना धन्यवाद :)
मिपावर मी पहिल्यांदाच पाकृ दिली आहे, प्रोत्साहनासाठी धन्यवाद!
मी ओले खोबरे वापरले आहे. पण सुक्या खोबर्याचा कीस वापरूनपण करता येतील बहुतेक. तसे लवकरही होतील. इशाच्या पाकृमध्ये चॉकलेट आहे, त्याऐवजी रोज सिरप घालून बघू शकता.
खाल्ला....
खाल्ला....
वाह सुंदर
खत्रा कलर आलाय लाडवांना....ओल्या पेक्षा सुख्या नारळ (डेसीकेटेड कोकोनट) घेतल तर लाडु जास्त चांगले टिकतील.
__/\__
__/\__
स्ल्र्प.
आता करुन पाहते
कल्पना करून च
वारल्या गेले आहे. राजस दिसतायत लाडु अगदी
सुरेख लाडू झाले आहेत. खाताना
सुरेख लाडू झाले आहेत. खाताना जबरी गुलकंदी चव लागेल..