साहित्य :
खवा अर्धा किलो.
भुरा साखर : अर्धी वाटी + थोडी वरून लावण्यासाठी.
वेलची पावडर : १ मोठा चमचा (टेबलस्पून)
साजूक तूप : १ मोठा चमचा (टेबलस्पून)
दूध : १ वाटी
भ्रुरा साखर बनविण्याची कृती :
एका कढईत दीड वाटी साखर घेऊन त्यात पाऊण वाटी पाणी घालावे आणि मध्यम आचेवर तापवून तीनतारी पाक बनवून घ्यावा. पाक तयार झाला की आच बंद करून सतत ढवळत राहावे. हळूहळू पाक घट्ट होत जातो. पांढरी साखर दिसू लागते. सतत ढवळत राहावे. जसजसा पाक थंड होईल, तसतशी साखर घट्ट होऊ लागेल. साखर संपूर्णपणे थंड आणि कोरडी झाली की मिक्सरमधून दळून ध्यावी. आवश्यकता वाटल्यास चाळूनही घ्यावी. ही झाली भुरा साखर.
पेढे बनविण्याची कृती:
पुन्हा एका कढईत खवा घालून मध्यम किंवा त्याहून कमी आचेवर तापवावा. परतत राहावे. हळूहळू खवा पातळ होत जातो. सतत परतत राहावे, म्हणजे तळाला लागून जळणार नाही. हळूहळू त्यातील पाणी आटून खवा मिळून यायला लागतो. खवा अशा प्रकारे कोरडा झाला की पाव वाटी दूध त्यात मिसळून ढवळावे. परतत राहावे. ही कृती दर थोड्या थोड्या वेळाने करत राहून (खवा कोरडा झाला की) सतत परतत राहावे. खव्याचा रंग बदलून तपकिरी होऊ लागतो. सर्व दूध संपल्यावर वेलची पावडर घालावी, एक मोठा चमचा (टेबलस्पून) साजूक तूप घालून सर्व मिसळावे. नीट मिसळले गेले की अर्धी वाटी (किंवा त्याहून कमी) भुरा साखर त्यात मिसळून घ्यावी.
आच बंद करून सर्व मिश्रण ताटात काढून घ्यावे आणि थंड होऊ द्यावे. (दोन ते तीन तास)
एका बशीत भुरा साखर घेऊन थंड झालेल्या खव्याचे पेढे बनवून साखरेत घोळवून एका ताटलीत नीट मांडून ठेवावेत. हे पेढे जरा मऊसर असतात, पण ते जसजसे थंड होत जातील (रात्रभरानंतर) तसतसे घट्ट होत जातील.
आकाराने ओबडधोबड असले तरी चवीला मस्त असतात.
हे पेढे बनविण्यासाठी संयमाची खूप गरज असते. मध्य किंवा मंद आचेवर खवा परतताना हात दुखून येतो, पण अंतिम पेढ्यांची चव चाखल्यावर सर्व त्रास सार्थकी लागल्याचा आनंद होतो.
हे पेढे शीतकपाटात १५ दिवस, पण नजरेसमोर २-३ दिवसच टिकतात.
शुभेच्छा...!
टीप :
धारवाडी पेढ्यांसाठी खवा भाजताना गडद तपकिरी रंगावर येईपर्यंत भाजावा लागतो. पण हलका रंग आल्यावर मिळून आलेल्या खव्यात दुधात खललेले केशर, साखर आणि वेलची पूड घालून गोल आणि जरा चपटे केशरी पेढे बनवितात. तसेच केशर न घालता पिवळा रंग आणि जायफळ पूड घालून (वेलची पूड ऐच्छिक) आकाराने लहान पिवळे पेढे बनवितात. दुधाऐवजी खव्यात ताजी साय (फ्रेश क्रीम) घालून मलई पेढे बनतात (खव्याचा रंग बदलू द्यायचा नाही). आपल्या कल्पकतेनुसार मँगो पेढे, बदाम पेढे वगैरे बनविता येतील.
वाचने
28210
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
अ प्र ति म!
खरंच अप्रतिम!!!!!!!
In reply to अ प्र ति म! by पैसा
खरंच अप्रतिम!!!!!!!
In reply to अ प्र ति म! by पैसा
अहाहा !
In reply to खरंच अप्रतिम!!!!!!! by पिलीयन रायडर
जबरदस्त
झकास
सुरेख पाककृती.
विकतची भुरा साखर घेऊन प्रयोग
वर लावलेल्या साकरेने जास्त
भारी.
वावा!
फोटोच बघत बसले.पाकृहि मस्त.
फोटोच बघत बसले.पाकृहि मस्त.
मस्त!
हुब्बळीला मिश्राच आहे.
In reply to मस्त! by संत घोडेकर
मला असले खमंग पेढेच आवडतात
फफेबंधुंकडे
हवीच होती मला याची कृती
तोंपासू फोटो.
वाह! अप्रतिम दिसताहेत पेढे.
पेढे मस्तच दिसतायत काका..
मस्तं ! पेढे आवडता प्रकार आहे
मस्त पाकृ व फोटो
वाह!!
भारदस्त देव, भारदस्त लेखक आणि भारदस्त पाकृ
धारवाडी पेढे खूप मस्त लागतात.
व्वा! आम्हा गोडघाशांना ही
सुरेख दिसतायत पेढे
सुरेख फोटो नि पाककृतीही.
सुंदर दिसत आहेत पेढे. छान
सुंदर पाककृती. रच्याकने खवा
क्या बात हे !!!
वाह किती मस्त
वाह!! मस्त
मस्त पाक्रु !!!
सुंदर!
छानच,
वाह, मस्त !!
एबीपी माझाच्या कार्यक्रमात आज
वा वा
:)
In reply to वा वा by सामान्य वाचक
म्हणतात बै
In reply to :) by पैसा
मौन बाळगते
In reply to म्हणतात बै by सामान्य वाचक
धारवाडी पेढ्यांची पाकृ फार
मधुर गोड.
आहे नं पर्याय....
In reply to मधुर गोड. by शिव कन्या
हो, हे बरे! धन्स.
In reply to आहे नं पर्याय.... by प्रभाकर पेठकर
पेढे-बर्फी यामध्ये आवडणारा हा
मस्त!!!!
क्लास रेसीपी