Skip to main content

सम्राट अशोकाची तिरन्ग्यावर अशोकचक्राच्यारुपाने सन्मान देण्याची योग्यता आहे का?

लेखक सिद्धेश
सोमवार, 02/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 991
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

सम्राट अशोकाची तिरन्ग्यावर अशोकचक्राच्यारुपाने सन्मान देण्याची योग्यता आहे का? अशोकरावांबद्दल फारशी काही माहीत नाही त्यामुळे मत देऊ शकत नाही. तिरंग्याच्या मधोमध कुठले चित्र द्यावे हे ठरवण्याचे जर माझ्या हातात असते तर मी शहीद भगतसिंग अथवा तात्याराव सावरकरांचे चित्र लावले असते.. धन्यवाद.. आपला, आंतरजाल सम्राट, सम्राट तात्या!

एक नमुद करावे वाटते कि जर तुम्चे पुण्य स्मरण व्हायला हवे असेल तर तुम्चे पाप पण मोट्टे पाहिजे अनंतफंदि

जेवढा इतिहास शिकायला मिळाला त्यातुन काढलेल्या अर्थाप्रमाणे मुळीच नाही! साम्राज्य लालसे पोटी, अस्तित्वात असलेल्या राज्यान्वर हल्ले करुन, प्रचण्ड जिवित व वित्त हानी घडवून आणून नन्तर (सौ चुहे खाके बिल्ली हज को चली या चालीवर) अहिन्सावादी बौद्ध धर्म स्विकारलेल्या(?) याच्या राज्यकारभारामुळे, नन्तर एकन्दरीत हिन्दुराष्ट्राचे कधीही न भरुन येणारे नुकसान झाले! ते येणेप्रकारे की १. सबल सत्ताकेन्द्रे नष्ट झाली २. बौद्ध धर्माच्या अनुनयामुळे क्षात्रतेज नष्ट झाले ज्यामुळे नन्तर आलेल्या परचक्रास आत्यन्तिक यशस्वीपणे तोन्ड न देता येवुन तब्बस साताठशे वर्शे परकियान्चे राज्य या देशावर स्थापिले गेले, ज्याचे दु:ष्परिणाम आजही २६/११ च्या निमित्ताने व अन्य प्रकारे भोगावे लागताहेत! आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

In reply to by limbutimbu

सम्राट अशोकाचा काळ इ.पू. दुसरे शतक. भारतावर झालेले इस्लामी आक्रमण १०व्या शतकात. मधला काळ सुमारे १२०० वर्षे. यात बौद्ध धर्माचा र्‍हास होऊन क्षात्रतेजाने तळपणार्‍या जाज्वल्य अशा वैदिक धर्माची पुनर्स्थापना. तरीही दोषारोप अशोकावर. चालू दे!!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

जेवढा इतिहास शिकायला मिळाला त्यातुन काढलेल्या अर्थाप्रमाणे मुळीच नाही! कौल सुरू करणार्‍यांनी 'सखोल अभ्यास' अपेक्षिला होता. खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

अशोकाचे हे धम्मचक्र आहे आणि ते प्रगतीचे द्योतक आहे. गती आणि प्रगतीसाठी भारतीय परंपरेतले स्वास्तिक हे चिन्ह असायला हवे होते. परंतु हिटलरच्या मूळे नकळतच हे चिन्ह डागाळले गेले. अशोकाचे जीवन हे नक्कीच प्रगतीचे जीवन आहे. त्यामूळेच अशोकचक्र हे निर्विवादपणे हे राष्ट्रीयचिन्ह आहे.

तिरंग्यावर काय ठेवुन कुनाला मान द्यायचा ह्यापेक्षा आपण १६ ऑगस्ट किंवा २७ जानेवारीला तिरंग्याचा किती मान ठेवतो ह्यावर विचार व्हायला हवा. आदल्या दिवशी (दाखवण्यापुरता) अभिमानाने आम्ही जो तिरंगा हातात, खिशावर लावुन फिरतो त्यालाच दुसर्‍या दिवशी इतर कस्पटाप्रमाणे पायदळी तुडवताना आम्हाला काहीही वाटत नाही . विचार ह्यावर व्हावा. देशप्रेम हे १ दिवसापुरते नसावे. त्यामुळे ह्या कौलाला माझ्या मते काहीही किंमत नाही त्यामुळे कुठल्याही पर्यायाला मत दिले नाही. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

In reply to by सुक्या

मान्नीय सुक्याशेठ, तुम्ही ह्ये आसलं कायतरी बोचरं लिवून पाठिवता म्हनूनच तुमच्या गावाला अजून पोष्टहापीस मिलालेलं नाय!!!! =)) (बाकी तुमच्या मताशी सहमत!!) -पिवला डांबिस