श्रीगणेश लेखमाला : प्रस्तावना

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in लेखमाला
5 Sep 2016 - 12:29 am

.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
}

नमस्कार मंडळी!

सालाबादप्रमाणे श्रीगणरायाचे आगमन घरोघरी झाले आहे. काही जणांकडे पूजा-आरती आटोपूनही झाली असेल. बाकी सगळ्यांची धांदल गडबड सुरू असेल.

विघ्नहर्ता गजानन बुद्धिदाता मानला आहे. त्याचा उत्सव साजरा करण्यासाठी आपण मिपावर गेली ४ वर्षे सातत्याने बुद्धीला खाद्य पुरवणार्‍या उत्तमोत्तम लेखांनी सजलेली श्रीगणेश लेखमाला सादर करत आहोत. यंदाचे वर्ष या मालिकेचे पाचवे वर्ष. रसिक या वर्षीही अशाच उत्तमोत्तम लेखांची वाट पाहत असतील!

गेल्या वर्षी या लेखमालेसाठी 'करियर' हा विषय निवडला होता. ती लेखमाला वाचकांना खूप आवडली होती. या वर्षी तेच सूत्र पुढे चालवत आपला व्यवसाय/करियर सांभाळून जोपासलेला छंद किंवा छंदातून निर्माण झालेला व्यवसाय या विषयावर मिपा सदस्यांनी लिहिलेले उत्तमोत्तम लेख आणि काही जणांच्या मुलाखती आपल्याला वाचायला मिळतील.

छंद हा कोणाचा आयुष्यभराचा ध्यास होऊन बसतो आणि त्यासाठी कोणी आपला फुरसतीचा क्षण न् क्षण वेचतो. तर नंतर हीच फुरसत कशी तयार करता येते, याबद्दल आपण या वर्षीच्या श्रीगणेश लेखमालेमध्ये वाचणार आहोत. या मालिकेत काही भटक्यांची मनोगते आहेत. तसे मोडी आणि इतिहास प्रेमींचेही हे छंद कसे आयुष्याला व्यापणारे आहेत याबद्दलचे विचार आहेत. कोणी लेखक तर कोणी वाचक, कोणी निसर्गात रमलेले, तर कोणी नाना छंदांनी आयुष्य समृद्ध बनवणारे. काहींनी तर अगदी जगावेगळे छंद जोपासलेले आहेत. त्यांची ओळख येत्या काही दिवसातच आपल्याला होईल. तेव्हा त्याबद्दल जास्त काही लिहीत नाही.

सर्व वाचकांनी या 'छंदोपनिषदाचा' वाचनानंद जरूर घ्या, आयुष्य समृद्ध करणारा असा एखादा तरी छंद जरूर जोपासा. न जाणो, कधीतरी निव्वळ आनंद देणारा छंद आपल्या उपजीविकेचे साधन व्हायचा! व्यवसाय सांभाळून छंद हे छानच, पण छंद हाच व्यवसाय झाला तर क्या कहने! तसे झाले तर त्याच्यासारखा सुखी माणूस तोच!

सर्व लेखक-वाचकांना, मिपा सदस्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना श्रीगणेश चतुर्थीच्या आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

गणपती बाप्पा मोरया!

प्रतिक्रिया

उत्तमोत्तम लेखांचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Sep 2016 - 8:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शुभेच्छा. लेखमालिकेसांठी मेहनत घेण्यार्‍यांचं सालं मला नेहमीच कौतुक वाटतं.

-दिलीप बिरुटे

नावातकायआहे's picture

5 Sep 2016 - 9:15 am | नावातकायआहे

+११

इल्यूमिनाटस's picture

5 Sep 2016 - 9:18 am | इल्यूमिनाटस

+१

नाखु's picture

5 Sep 2016 - 9:19 am | नाखु

आणि सर्व ज्ञात-अज्ञात मेहनती हातभार लावणार्या मिपाकरांचे आभार्+अभिनंदन

ही लेखमालाही मागील वर्षापरमाणे संस्मरणीय होईल यात जराही शंका नाही.

मिपा वाचक नाखु

मोदक's picture

5 Sep 2016 - 6:28 pm | मोदक

सहमत..

+११११११

प्रभाकर पेठकर's picture

5 Sep 2016 - 9:27 am | प्रभाकर पेठकर

वाचनोत्सुक.

बाबा योगिराज's picture

5 Sep 2016 - 9:35 am | बाबा योगिराज

ह्या मेजवानीसाठी तयारीत आहे. लेख लिहिणाऱ्या आणि ते लेख आमच्या समोर आणणाऱ्या सर्वांचे धन्यवाद.

बाबा योगीराज.

ह्या मेजवानीसाठी तयारीत आहे. लेख लिहिणाऱ्या आणि ते लेख आमच्या समोर आणणाऱ्या सर्वांचे धन्यवाद.

...असेच म्हणते.

स्वाती दिनेश's picture

5 Sep 2016 - 6:26 pm | स्वाती दिनेश

म्हणते.
एक एक लेख वाचते आता..
स्वाती

जेपी's picture

5 Sep 2016 - 9:44 am | जेपी

+1

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Sep 2016 - 10:14 am | डॉ सुहास म्हात्रे

अजून एका वार्षिक लेखमालेचा आस्वाद घेण्यास सज्ज आहे.

"लेखमाला" "उत्तम" असेल असे म्हणणे म्हणजे द्विरुक्ती होते हे वारंवर सिद्ध झाले आहेच !!!

या मालिकेसाठी कष्ट घेणार्‍या साहित्य संपादकांचे खूप कौतुक आणि धन्यवाद!

एस's picture

5 Sep 2016 - 1:22 pm | एस

+१.

स्मिता_१३'s picture

6 Sep 2016 - 3:00 pm | स्मिता_१३

+१११११

मुक्त विहारि's picture

5 Sep 2016 - 1:29 pm | मुक्त विहारि

लेखमाला एकदम जोरदार होणार ह्याची खात्री...

अविनाशकुलकर्णी's picture

5 Sep 2016 - 6:59 pm | अविनाशकुलकर्णी

खुन्नस गणपती..
ज्या प्रमाणे समुहातील सभासदांचे विचार न जमल्याने नवीन विद्रोहि समूहाची स्थापना झाल्याचे आपण पहातो..
समूहाला काही नाव असले तरी तो "खुन्नस समूह " असतो वा असू शकतो...
पूर्वी गणेश मंडळा मध्ये मतभेद असायचे खास करून बाल चमूला डावलले गेल्याने त्याचा राग येऊन हे बाल गोपाल "खुन्नस गणपती.." बसवायचे..
अर्थात यांचे बजेट लहान व सभासद पण कमी असल्याने.लहानशी टपरी तैप मांडव घालून लहान गणपती बसवायचे..
मात्र जागा मंडळाच्या गणपतीच्या जवळ वा एक दम"तेरे घरके सामने "असायची व हौस पुरवून घ्यायचे...
मागे एक बाल गोपाल मंडळ वर्गणी साठी आले असताना त्याना १० रु देत विचारले .."कि मोठ्या मंडळाला वर्गणी दिली आहे तुम्ही त्यांच्यात का जात नाही??"
त्या वर एक धिटुकले म्हणाले ते आम्हाला विचारत नाहीत...
पूर्वी गणपती बघावयास जायचो त्या वेळी खुन्नस गणपतीला आवर्जून भेट द्यायचो ..

बॅटमॅन's picture

6 Sep 2016 - 7:51 am | बॅटमॅन

खुन्नस गणपती लोल

खुन्नस गणपती संज्ञा आवडली!! =))

पिलीयन रायडर's picture

6 Sep 2016 - 4:35 am | पिलीयन रायडर

नेहमीप्रमाणेच ह्याही वर्षी एकाहुन एक सरस लेख वाचायला मिळातील ह्याची खात्री आहे!

लेखमालेसाठी काम करणार्‍या सर्वांनाच धन्यवाद!!

सस्नेह's picture

6 Sep 2016 - 12:36 pm | सस्नेह

सरस लेखांच्या प्रतिक्षेत...

अनन्न्या's picture

6 Sep 2016 - 3:11 pm | अनन्न्या

जसे जमेल तसे

या मालिकेसाठी कष्ट घेणार्‍या साहित्य संपादकांचे आणि लेखकांचे खूप कौतुक आणि धन्यवाद! सर्व लेख एकसे बढकर एक आहेत !!

लेखमाला छान चालली आहे. आपापले व्याप सांभाळून लेख देणारे सदस्य आणि इतके व्यवस्थित आयोजन करणारे साहित्य संपादक या सर्वांचे आभार!

चित्रमालेत रोज एकेक चित्र जोडत आहेत तसे जमल्यास येथेच सर्व लेखांचे दुवे देता आले तर? शिवाय शक्य असेल तर मागच्या लेखमालेंचेही दुवे द्यावेत ही विनंती :)