Skip to main content

मला आवडलेली ५० पुस्तके

लेखक हेमंत लाटकर यांनी सोमवार, 29/08/2016 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येकाने एकदा तरी वाचली पाहिजेत अशी मराठी पुस्तके - १) मी कसा झालो? प्र. के. अत्रे २) कर्हेचे पाणी, प्र. के. अत्रे ३) पानिपत, विश्वास पाटील ४) महानायक, विश्वास पाटील ५) झाडाझडती, विश्वास पाटील ६) युगंधर, शिवाजी सावंत ७) छावा, शिवाजी सावंत ८) मृत्युंजय, शिवाजी सावंत ९) स्वामी, रणजित देसाई १०) श्रीमान योगी, रणजित देसाई ११) पावनखिंड, रणजित देसाई १२) व्यक्ती आणि वल्ली, पु. ल. देशपांडे १३) बटाट्याची चाळ, पु. ल. देशपांडे १४) असा मी असामी, पु. ल. देशपांडे १५) पुर्वरंग, पु. ल. देशपांडे १६) आहे मनोहर तरी, सुनीता देशपांडे १७) पडघवली, गो. नी. दांडेकर १८) पवनाकाठचा धोंडी, गो. नी. दांडेकर १९) मृण्मयी, गो. नी. दांडेकर २०) राऊ, ना. सं. इनामदार २१) मंत्रावेगळा, ना. सं. इनामदार २२) शहेनशहा, ना. सं. इनामदार २३) बनगरवाडी, व्यंकटेश माडगूळकर २४) माणदेशी माणसे, व्यंकटेश माडगूळकर २५) पार्टनर, व. पु. काळे २६) वपुर्झा, व. पु. काळे २७) रणांगण, विश्राम बेडेकर २८) ययाती, वि. स. खांडेकर २९) श्यामची आई, साने गुरुजी ३०) माझी जन्मठेप, वि. दा. सावरकर ३१) सुदाम्याचे पोहे, श्री. कृ. कोल्हटकर ३२) प्रकाशवाटा, प्रकाश आमटे ३३) झोंबी, डॉ. आनंद यादव ३४) मुसाफिर, अच्युत गोडबोले ३५) कोसला, भालचंद्र नेमाडे ३६) इडली आॅर्किड आणि मी, विठ्ठल कामत ३७) चाकाची खुर्ची, नसीमा हुरजूक ३८) पंचतारांकित, प्रिया तेंडुलकर ३९) रहाट गाडगं, चिं. वि. जोशी ४०) रानवाटा, मारूती चितमपल्ली ४१) राशीचक्र, शरद उपाध्ये ४२) गारंबीचा बापू, श्री. ना. पेंडसे ४३) तुंबाडचे खोत, भाग १, २, श्री. ना. पेंडसे ४४) युगांत, इरावती कर्वे ४५) गोट्या, एन. डी. ताम्हणकर ४६) शाळा, मिलिंद बोकील ४७) एक होता कार्व्हर, वीणा गवाणकर ४८) अग्निपंख, अे.पी.जे. अब्दुल कलाम ४९) दुनियादारी, सुहास शिरवळकर ५०) माझा प्रवास, विष्णुभट गोडसे
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 57189
प्रतिक्रिया 140

प्रतिक्रिया

In reply to by बोका-ए-आझम

आणी तुमच्यामुळे हि आवड अजून वाढली. आधी फक्त चेतन भगत वाचणारा मी, तुमच्या सकॅरेक्रोव आणि mosaad च्या अनुवाद मालिकेत पुढे काय होईल या उत्सुकतेमुळे 2 हि इंग्रजी पुस्तके वाचून काढली.

In reply to by आदूबाळ

गले मिलो भाई लोक्स!! उच्चतम कोटीचा इंग्लिश विनोद वूडहाऊस सोडून पूर्ण आकार घेऊ शकत नाही! ती परंपरा खास अश्या टीव्ही सिरीज "येस मिनिस्टर" मध्ये सुद्धा जाणवते :) अवांतर :- आबासाहेब, बेनी हिल ला फिरंगी दादा कोंडके म्हणावे काय ? =))

शशी भागवत - रत्नप्रतिमा, रक्तरेखा, मर्मभेद (रहस्यमय पुस्तक आवडणाऱ्यांसाठी) आनंद यादव - झोंबी, नांगरणी, घरभिंती, काचवेल विश्वास पाटील - झाडाझडती शांता शेळके - चौघीजणी (अनुवादित) पर्व - एस. एल. भैरप्पा आनंदी गोपाळ - श्री ज जोशी एक होती आजी - श्री ना पेंडसे

१-नातिचरामी- मेघना पेठे ( भारतीय व एकंदरीत विवाहसंस्थेवरील मार्मिक भाष्य करणारी कादंबरी ) २-ऑपरेशन यमु- मकरंद साठे ( आधुनिक माणसाच्या अस्थिरतेचा भयाचा तुटत जाण्याचा आलेख अनोख्या शैलीत मांडणारी कादंबरी ) ३-गौतमची गोष्ट- लेखकाचे नाव विसरलो दामले आहे बहुधा ( हि गौतमबुद्धावर नाही ) ४-आतंक- विलास सारंग चा कथासंग्रह ( याची प्रस्तावनाही अत्यंत मार्मिक आहे एक एक कथा हादरवुन सोडणारी मात्र ही शिर्षकावरुन कदाचित गैरसमज होऊ शकतो तशी रेग्युलर दहशतवाद या विषयावरील कथा यात नाहीत) ५-के फाइव्ह-- अनंत सामंत ( टेरीफीक शैली ) ६-अघोरी- बाबुराव बागुल ७-मंद्र- भैरप्पा मराठी अनुवादीत कादंबरी ( कलाकार आणि माणुस यातील विरोधाभासाचा मुलगामी वेध घेणारी ) ८-रीटा वेलीणकर- शांता गोखले काही नॉन फिक्शन १- मानव आणि मार्क्स- प्रभाकर पाध्ये ( मार्क्सवरील मराठीतील सर्वात प्रगल्भ टीका ) २- दास-शुद्रांची गुलामगिरी- शरत पाटील ३- हिंदु धार्मिक परंपरा आणि सामाजिक परीवर्तन- मे.पु. रेगे ४- आयडियाज आर डेंजरस- राजु परुळेकर ५- जी.ए. चा पत्रसंग्रह ( सर्वात आवडता दुसरा खंड ज्यात सुनिताबाइंनी लिहीलेल्या दिर्घ पत्रांचा समावेश आहे तो ) सध्या इतकच आठवतय.

In reply to by मारवा

गौतमची गोष्ट- अनिल दामले. भैरप्पांचं 'मंद्र' हेच एकमेव न आवडलेलं पुस्तक. खूप कंटाळवाणं आहे. अनंत सामंत एक फॅण्टास्टिक लेखक आहेत.

In reply to by महासंग्राम

या कधीपण घरी. ३००/४०० पुस्तके आहेत फक्त. हजारच्या वर पुस्तकांचा संग्रह असणारे दोन तीन मिपाकर माहिती आहेत मात्र. खरंतर त्यांच्याकडे धाड टाकायला हवी. :)

In reply to by महासंग्राम

वल्लींनी कधीतरी गोनीदांची एक-दोन रेअर पुस्तकं असल्याचा उल्लेख केलेला. ती लुटा मिळाली तर आणि पीडीएफ करा अपलोड.

In reply to by प्रचेतस

बरोबर अनिल दामले अनंत सामंत उत्कृष्ठ लेखक आहेत मला कोणीतरी सांगितल के फाइव्ह नावाचा मराठी सिनेमाही आलाय पण तो याच कादंबरीवरील आहे की या नावाचा आहे काहीच माहीत नाही. एमटी आयवा मारु सारख्या कादंबर्‍यांनी नविन विश्व मराठीत आणुन मराठी साहीत्य समृद्ध केलं. भैरप्पांच आत्मचरीत्रही सुंदर आहे. फार आवडलं. भैरप्पाचे मराठी अनुवादच सुंदर आहेत एकदा चुकुन पर्व चा साहीत्य अकादमीने प्रकाशित केलेला इंग्रजी अनुवाद घेतला होता तेव्हा फ्रस्ट्रेशन आलेलं होत. नंतर मराठीत वाचल्यावर तब्येत सुधारली. महाभारतावरच वाचायला आवडत किरण नगरकरांचं बेडटाइम स्टोरी हे अफाट नाटक आहे. हे जेव्हा अनेक वर्षापुंर्वी आल तेव्हा त्याला प्रचंड विरोध झाला अनेको ठिकाणी सेन्सॉर कट मारण्यात आले. नुकताच एक युट्युब वर व्हिडीयो मिळाला यात किरण नगरकर व सोनाली कुलकर्णी यांनी बेडटाइम स्टोरी च काही वाचन केलेलं आहे. आहे. एक्स्ट्रीमली इंटरेस्टींग एकदा बघा https://www.youtube.com/watch?v=GqKct_lT6tA आणि अरुण कोलटकरांचा त्यांच्या निधनानंतर त्यांचा पुस्तक संग्रह आवरतांना अशोक शहाणे व इतर च्या गप्पांचे पण हे दोन व्हीडियो इथे आहेत. मस्त आहेत जर कोणाला रस असेल तर https://www.youtube.com/watch?v=DrImA6b5BBw https://www.youtube.com/watch?v=gvrwKkmsQCQ

In reply to by मारवा

सामंतांचीच जहाजाच्या पार्श्वभूमीवर आधारीत अजून दोन कादंबर्‍या आहेत. लिलियनची बखर (ही ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आहे) आणि त्रिमाकासी मादाम (ही कुठे मिळत नाही पण संग्रही आहे). त्यांची लांडगा ही एक वेगळ्या धर्तीची कादंबरी आहे. छान आहे ती पण. भैरप्पांच्या जवळपास सर्वच कादंबर्‍या मराठीत उमा कुलकर्णींनी आणल्या. अत्युकृष्ट अनुवाद आहेत ते.

In reply to by प्रचेतस

आता सामंतांच्या या कादंबर्‍या वाचायलाच हव्या. उमा विरुपाक्ष कुलकर्णी ( विरुपाक्ष लय भारी नाव आहे शंकराच आहे का ?) यांचे अनुवाद अत्युत्कृष्ठ आहेत. उमाजींमुळे कन्नड साहित्याची गंगा मराठीच्या अंगणात आली. त्या नसत्या तर आपल्याला भैरप्पा कुठे वाचायला मिळाले असते. त्यांनी इतरही अनेक दर्जेदार कन्नड साहित्यातील रत्ने मराठीत आणलेली आहेत. एक गंमत आहे केवळ एका दर्जेदार अनुवादकामुळे व त्यांच्या परीश्रमामुळे आपल्या भाषेत किती सुंदर साहित्य आल. असे एकेक भाषेचे अजुन मिळायला हवेत काय छान होइल. कारण भारतीय इतर भाषातील साहीत्य सहसा इंग्रजीत नसत वा इतर ठिकाणी नसत. ( साहित्य अकादमीचा अनुवादीत ग्रंथाचा सन्माननीय उपक्रमाचा अपवाद वगळता ) सहज उपलब्ध होत नाहीत. शिवाय साहित्य अकादमीच सिलेक्शन हे सहसा जुन्या लेखकांच वा त्यांच्या जुन्या साहित्याच असत. तरीही हे ही नसे थोडके. कधी कधी साहित्य अकादमीच्या अ‍ॅन्थॉलॉजीज कलेकशन्स (सहसा मराठी कवि लेखकांची चांगली असतात- खानोलकर-रेगे छान कव्हर केलेत.) तर उमाजी सारखे एक एक भारतीय भाषेचे मराठी शिलेदार असले तर काय बहार येइल. कितीतरी कसदार साहित्य आपल्याला भाषेच्या अडचणीमुळे मिळतही नाही.

In reply to by मारवा

विरुपाक्ष हे शंकराचंच नाव :) मजकडे साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केलेल्या काही कन्नड कादंबर्‍यांचे मराठी अनुवाद आहेत. रा. शं. लोकापूर, मीना वांगीकर हे अजून काही अनुवादक. मल्ल्याळीतले मान्यवर लेखक तकझी (तकळी) शिवशंकर पिल्ले ह्यांच्या कादंबर्‍या देखील छान आहेत. चेम्मीन आणि दोन शेर धान. सुंदर कादंबर्‍या आहेत ह्या.

In reply to by प्रचेतस

यांनी मास्ती वेंकटेश अय्यंगार यांच्या चिक्कवीर राजेंद्र या पुस्तकाचा अनुवाद केलाय. पण तो मिळत नाही कुठे.

In reply to by मारवा

मारवा यांस.... जळगावला आजन्म वास्तव्य केलेले जगप्रसिध्द फोटोग्राफर म्हणजे केकी मूस. त्यांची फोटोग्राफीक फिलॉसॉफी अनंत सामंतांनी मांडली आहे “ओश्तोरीज” या कादंबरीत. भन्नाट पुस्तक आहे.जरूर वाचावे.

In reply to by अलका सुहास जोशी

ओश्तोरीज वाचलेय मी. कव्हर बहुधा चंद्रमोहन कुळकर्णीनी केलेलं. जरा अ‍ॅबसर्ड वाटले. पण ओकेटोके. भन्नाट वगैरे वाटलेले नाही.

In reply to by अलका सुहास जोशी

अहो मला या माणसाविषयी फार कुतुहल आहे. हे ४० वर्षे एकाच घरात स्वतःला यांनी स्वतःहुन कोंडुन घेतलेल होत. यांच्यावरील एक अदभुत कॅलेंडर मी औरंगाबादेत बघितलेल होत. कुठल्याशा कंपनीच रेग्युलर कॅलेंडर आहे मात्र ते पुर्ण केकी मुस यांच्यावर बनवलेल आहे. त्यात या माणसाचे काही अदभुत फोटोग्राफ्स बघितलेले आहेत. त्यांच्या विषयी पुर्ण कॅलेंडर आहे. त्यांचे कोट्स त्यांचे दुर्मिळ फोटोज व त्यांच्याविषयीचा मजकुर आहे. मला वाटत १९३५ ची एक जागतिक फोटोग्राफी स्पर्धेत त्यांनी पहील पारीतोषिक मिळवलेल होत. त्यानंतर ते मुंबईहुन काहीतरी चाळीसगावला आले आणि जे घरात गेले ते कधी बाहेर पडलेच नाहीत बहुधा. मार्क्वेझ च्या एका कादंबरीच नाव आहे वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्युड मला केकी मुस आठवले की हे शीर्षक आठवत. त्या कॅलेंडर मध्ये एक फोटो आहे एक घोडा तळ्यात पाणी पित असल्याचा एक सायकलच्या चाकातुन आरपार दाखवलेला फोटो अदभुत विलक्षण आहे. केकी मुस सितारही वाजवायचे काय असेल हा माणुस अस्स्ल संत अस्सल प्रतिभावंत त्यांच चाळीसगाव येथील म्युझियम बघण्याचीही इच्छा आहे. अनेक धन्यवाद या माहीतीसाठी अनंत सामंतांची ही कादंबरी मिळवुन वाचणारच. ते कॅलेंडरही मिळवायचय एकदा.

In reply to by प्रचेतस

लांडगा वाचलीय मी. भारीय. बाकी मी पुस्तके डोक्यात ठेवतो. संग्रहात एकही नाही. ठेवणारही नाही आयुष्यात कधी.

In reply to by मारवा

हरिभाऊ मोटे यांनी संपादन केलेलं आहे. मराठी लेखकांनी एकमेकांना लिहिलेली पत्रे आहेत. वाचताना एक वेगळाच काळ डोळ्यांसमोर उभा राहतो.

In reply to by बोका-ए-आझम

खरय तुम्ही म्हणता ते एका वेगळ्या काळात आपण जातो. बोकोबा या सायटी बघितल्यात का तुम्ही अप्रतिम सुंदर सायटी आहेत इंग्रजी साहीत्यावरील इंग्रजी पुस्तकांवरील आणि विशेष म्हणजे ब्रेनपिकींग वर लहान मुलांच्या अनेक सुंदर पुस्तकांची छानच ओळख आहे. https://www.brainpickings.org http://www.theparisreview.org

खूप सगळे धागे दिसतात मिपा वर पण कुणी पुस्तक परीक्षण सुरु करेल तर छान वाटेल. बुक क्लब सारखे, पुस्तक वाचले असल्यास बाकीचे लोक पण त्याबद्दलचे मत मांडू शकतील. चांगली चर्चा होऊ शकेल. अजून एक, मराठी पुस्तके pdf / e-book स्वरूपात कुठे कुठे उपलब्ध आहेत याच्या हि लिंक्स मिळाल्या तर उत्तम !

In reply to by सप्तरंगी

तेवढ्यात जाहिरात करुन घेतो: http://misalpav.com/node/25607 - गुडबाय मि. चिप्स http://misalpav.com/node/16149 - शाळा माझ्या लिस्ट मधल्या २ पुस्तकांचे (मी लिहिलेले ;) ) परीक्षण

In reply to by सप्तरंगी

त्या दिवशी मी कट्टा करीन! अट्टल मिपाकर कुठलीही गोष्ट कट्टा करुन साजरा करतो असे आमचे तात्याराव अभ्यंकर ठाणेवाले म्हणायचे. ती परंपरा चालू ठेवावीच लागेल!

In reply to by बोका-ए-आझम

त्यांचं अॅप्लीकेशन (रीडर) डाऊनलोड केलंत का? त्या रीडरवरच वाचता येतात. पुस्तक सेव्हही त्या रीडरमधेच होते, वेगळे नाही.डेस्कटाॅप आणि टॅब (अँड्राॅईड आणि ios) अशी वेगवेगळी रीडर आहेत.

In reply to by बोका-ए-आझम

मराठी इ-बुक्स साठी Daily Hunt हे अँड्राँईड अँप अतिशय उपयुक्त आहे. इथे व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, वपु, वि.स.खांडेकर यांसारख्या दिग्गज लेखकांची आणि इतर बरीचशी पुस्तकं उपलब्ध आहेत. आणि इ-बुक्सची साईजही केबी मध्ये आहे. बर्याचदा इ-बुक्स भरपूर सवलतीत मिळतात. मला रणजित देसाईंंचं 'श्रीमान योगी' इबुक रुपात केवळ ५९ रूपये मध्ये मिळालं.(हार्ड काँपी किमंत ५९0 ₹) मला कट्ट्याला बोलवायला विसरु नका.☺

फक्त नावे लिहितो: १. हिमालयाचा कुशीत मी २. गुडबाय मि. चिप्स ३. तिसरा ध्रुव ४. मृत्युंजय ५. स्वामी ६. राऊ ७. शाळा ८. हॅरी पॉटर - ७ ही भाग ९. सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक मराठी कथा - १० खंड १०. युगांत ११. रारंग ढांग १२. इस्त्रायलची मोसाद १३. अर्थात १४. प्रकाशवाटा १५. ब्लडलाइन १६ डूम्स डे कॉन्स्पिरसी १७. समिधा १८. आहे मनोहर तरी १९. खंडाळ्याच्या घाटासाठी २०. पानिपत २१. टाटायन २२. हा तेल नावाचा इतिहास आहे २३. एका तेलियाने २४. व्यक्ती आणि वल्ली '२५. अपुर्वाई २६. पुर्वरंग २७. हसवणूक २८ जावे त्यांच्या देशा २९ पार्टनर ३०. आपण सारे अर्जुन ३१. ओमेर्ता ३२. द दाविन्ची कोड ३३. एंजल्स अँड डेमोन्स ३४. ययाती ३५. पंचतारांकित ३६. दुर्योधन ३७. पर्व ३८. रुट्स ३९. टाइमलाइन ४०. गुलाम ४१. वाघ सिंह माझे सखे सोबती ४२. काउंट ऑफ मॉण्टे क्रिस्टो ४३. स्मृतिचित्रे ४४. सत्तर दिवस ४५. बाराला दहा कमी ४६. नाझी भस्मासूराचा उदयास्त ४७. नो कम बॅक्स ४८. युगंधर ४९. राधेय ५०. पावनखिंड ५१. देवळातला वाघ ५२. कुमाउचे नरभक्षक ५३. मिरासदारी ५४. भोकरवाडीच्या गोष्टी ५५. धिंड ५६. माझा प्रवास ५७. फाळणीचे दिवस ५८. देव? छे. परग्रहावरील अंतरावीळ ५९. बर्म्युडा ट्रँगल ६०. शेरलॉक होम्स

१३. झुलवा - उत्तम बंडू रूपे बहुधा तुपे असावे.. वाखु साठवली आहे, पुण्यात नॅशनल बुक ट्रस्टची अधीकृत शाखा आहे काय? कन्येसाठी अनुवादीत पुस्तके घ्यायची आहेत.

टागोर, ताराशंकर बंद्योपाध्याय, विभूतिभूषण बंद्योपाध्याय, यशपाल, मुल्कराज आनंद, अमृता प्रीतम, दोस्तोव्हस्की, टॉल्स्टॉय, डिकन्स, चेखोव, मार्क ट्वेन, अनेक....

यातील बर्‍यांच याद्यामधली काही पुस्तकं वाचली आहेत. माझं एक स्वप्न आहे की आपल्या रहात्या घरी स्वताचा एक बूक शेल्फ असावा, वेळ मीळाला की निवांत आराम खुर्चीवर बसुन एक एक पुस्तक चाळावं. जे समाधान हार्ड कॉपी वाचताना मीळतं ते सॉफ्ट कॉपीत मीळत नाही. कुणाकडे जुनी बालभारती ची पुस्तके आहेत का? साधारण ८० - ९० च्या दशकातली. पुन्हा वाचायची आहेत. असल्यास जरुर कळवा.

In reply to by रघुनाथ.केरकर

स्वतःच मोठं पुस्तकाचं कपाट आणि बाजूला एक आराम खुर्ची पुस्तकं वाचण्यासाठी. या लेखातील बरीच पुस्तके आहेत माझ्याकडे. थोडी माझ्याकडची लिस्ट- १. यक्षाची देणगी - जयंत नारळीकर २. राजा रवी वर्मा वर्मा - रणजित देसाई ३. नाथ हा माझा - कांचन घाणेकर ४. वॉल्ट डिस्ने - यशवंत रांजणकर ५. हाती ज्यांच्या शून्य होते - अरुणा शेवते ६. नॉट विदाऊट माय डॉटर - महमुदी बेटी ७. हसरे दुःख - भा. द. खेर ८. दास डोंगरी राहतो - गो नी दांडेकर ९. गाडगेबाबा - गो नी दांडेकर या लेखातील बरीच पुस्तके आहेत माझ्याकडे. थोडी माझ्याकडची लिस्ट १. यक्षाची देणगी - जयंत नारळीकर २. राजा रवी वर्मा वर्मा - रणजित देसाई ३. नाथ हा माझा - कांचन घाणेकर ४. वॉल्ट डिस्ने - यशवंत रांजणकर ५. हाती ज्यांच्या शून्य होते - अरुणा शेवते ६. नॉट विदाऊट माय डॉटर - महमुदी बेटी ७. हसरे दुःख - भा. द. खेर ८. दास डोंगरी राहतो - गो नी दांडेकर ९. गाडगेबाबा - गो नी दांडेकर १०. सर्व सु शि पुस्तके ११. सर्व रत्नाकर मतकरी पुस्तके

इंग्लिश पुस्तकांच्या याद्या काढा! इथे फार लायब्रर्‍या आहेत.. पण कोणतं पुस्तक घ्यावं हे समजत नाही. मला फार वर्णनं असणारी रटाळ पुस्तकं आवडत नाहीत. क्लासिक असली तरीही.. वेगवान कथा आवडते. काय सुचवाल?

In reply to by पिलीयन रायडर

फ्योदोर डोस्टोव्हस्कीचं द ब्रदर्स कारामाझाॅव्ह आणि क्राईम अँड पनिशमेंट. डोस्टोव्हस्की हा पात्रनिर्मिती आणि त्यांच्या मानसिक स्थितीतून घडणाऱ्या आणि त्या पात्रांचं आयुष्य उलटसुलट फिरवणा-या घटना यांचा बादशहा आहे. विनोदात वुडहाऊस, रहस्यात पो, का‌ॅनन डाॅईल आणि आगाथा ख्रिस्ती; थ्रिलर्समध्ये फोर्साईथ, काॅनेली आणि ग्रिशॅम - हे सगळे आहेत पण कादंबरीमध्ये एकमेवाद्वितीय म्हणजे डोस्टोव्हस्की.

माझी यादी. (इंग्रजीमधे अनुवादित किंवा मुळ इंग्रजी) ०१. माईन कान्फ. ०२. मास्टर ऑफ द गेम. ०३. शेरलॉक होम्स (सगळी. भाषांतरीत आणि मुळ दोन्ही. मुळ भाषेचा टेचं अनुवादात जाणवत नाहित.) ०४. गॉडफादर. ०५. कॉन-टिकी अक्रॉस द पॅसिफिक बाय राफ्ट. ०६. द अल्केमिस्ट. ०७. द पेट सिमिटरी. ०८. द ग्रीन माईल. ०९. गोल्डन र्‍हांदेवु (चायला rendezvous शब्दाचा अचुक उच्चार लै प्रयत्न करुनही जमत नै राव). १०. मिडलमार्च ११. थ्री मेन इन अ बोट (द.मा.मिरासदारांनी ह्याचं लघुभाषांतर केलेलं पुस्तकही आहे.) १२. द ब्रॅम स्टोकर्स ड्रॅक्युला. १३. बॅग ऑफ बोन्स (एका अत्यंत हलकट संभावित मिपाकराने १५ दिवसात परत करतो असं सांगुन दिड-दोन वर्षापुर्वी घेतलयं हे. परत करा साहेब.) १४. द हॉबिट १५. लॉर्ड ऑफ द रिंग्ज १६. ब्राईट फॉल्स (लहानपणी वाचलेलं आवडलेलं शोधतोय सद्ध्या), १७. सान अँड्रिआस (अ‍ॅलिस्टर मॅक्लिन) १८. रेझ द टायटॅनिक. १९. द विचर सिरिज बाकी वेळ मिळेल तशी टंकिन.

1. वॉल्ट डिस्नी - द अल्टिमेट फँटसी (यशवंत रांजणकर) 2. आकाशाशी जडले नाते - डॉ जयंत नारळीकर 3. यक्षांची देणगी - डॉ जयंत नारळीकर 4. वामन परत न आला - डॉ नारळीकर 5. शॉर्ट स्टोरीज - गुरुदेव रवींद्रनाथ टागोर 6. रुद्रप्रयागचा नरभक्षक चित्ता- जिम कॉर्बेट

(संस्क्रुती बाह्या) धागा प्रतिसाद शताब्दीनिमित्त लाटकरसाहेबंचा पुण्यात अक्षरधारा,अत्रे सभागृह्,मजेस्टीक बुक गॅलरी याठिकाणांचे नेमके पत्ते,आत्मुदांनी पुण्यात सापड(व)लेल्या खादाडीच्या अनवट २५ जांगाची माहीती (नकाशासह) व पुणेरी श्रीफळ देऊन करण्यात येत आहे. स्वागताध्यक्ष :आदूबाळ (पुण्यात असल्यास) प्रमुख पाहुणे : वपाडाव (उबलब्ध असल्यास) हस्ते: दस्तुर्खुद्द आत्मुदा. (कारेक्रमाची वेळ यांच्या सोईने ठरेल ती दोन यजमानांच्या कार्याच्या मधली विश्रांतीवेळ असू शक्ते. अखिल मिपा धागा सत्कार समिती व नियमित मिपा वाचक संघ सर(क)चिटणीस नाखु

आवडलेली पुस्तके - १) वंशवृक्ष - एस.एल भैरप्पा. २)पारखा - एस.एल भैरप्पा. ३)आवरण -एस.एल भैरप्पा. ४)पर्व -एस.एल भैरप्पा. ५)तंतु - एस.एल भैरप्पा. ६) माझ नाव भैरप्पा -एस.एल भैरप्पा. ७)अंताजीची बखर,बखर अंतकाळची,सांप्रती - नंदा खरे. १०)युद्ध जिवांचे, हा तेल नावाचा इतिहास, अधर्म युद्ध - गिरीश कुबेर १३)नातिचरामी -मेघना पेठे १४) पार्टनर -वपु काळे १५) तांडव- महाबळेश्वर सैल १६) वाचणार्‍याची रोजनिशी - सतिश काळसेकर १७)अबकडई....- संपादित पुस्तक १८) सात सक्क त्रेचाळीस , प्रतिस्पर्धी,-- किरण नगरकर २०)ब्रेडविनर,, शोजीया,परवाना -ले. डेबोरा एलीस..अनु.- अपर्णा वेलणकर २३)आम्ही भगिरथाचे पुत्र - गोनीदा. २४)हत्या- श्री.ना. पेंडसे २५)प्रकाशवाटा - प्रकाश आमटे २६) नेगल भाग १ आणी २ -अरुण मनोहर २८) चार आदर्श खलीफा - शेषेराव मोरे २९)शोध - मुरलीधर खैरनार ३०) वनवास्,शारदा संगीत - प्रकाश नारायण संत ३२)द्रोहपर्व -अजेय झणेकर ३३) जोहड -सुरेखा शाह ३४) काबुल ब्युटी स्कुल -डेबोरा रॉड्रीग्ज ३५ ) ब्लडब्रदर्स - एम जे अकबर ३६) मेळ घाटावरील मोहोर ३७)संभाजी - विश्वास पाटील.. ३८) भटाच्या वाड्यातील भुतावळ -भारा भागवत ३९)अ‍ॅट एनी कॉस्ट - अभिराम भडकमकर ४०) हंगर जेम्स - सुझान कॉलीन्स .क्रमश..

In reply to by जेपी

या गेल्या पाच वर्षांतल्या जबरदस्त कादंबऱ्या आहेत. शोध अस्सल मराठी थ्रिलर आणि तांडव जबरदस्त ऐतिहासिक कादंबरी.

In reply to by बोका-ए-आझम

कित्येक दिवस पुस्तक चा आकार आणि उगीचच, हे आवडणार नाही, अशी शंका, यामुळे हातात घेतले नव्हते काल आणले आणि आत्ता 400 पाने वाचून झाली आहेत रात्रीपर्यंत संपवेन खरच खूप वेगवान आणि बांधीव प्लॉट आहे तुमचे आभार एक चांगले पुस्तक वाचायला प्रवृत्त केल्याबद्दल

हा सुंदर धागा पुनरुज्जीवित केल्याबद्दल धन्यवाद. मी सुद्धा यातील बरीच पुस्तके वाचलेली आहेत. सध्या माझ्याकडे सिडने शेल्डन, जॉन ग्रिशॅम, डॅन ब्राऊनची इंग्रजी पुस्तके pdf रूपात व अवघ्या १ ते २ mb साईझ मध्ये उपलब्ध आहेत. हवी असल्यास कायप्पा किंवा ईमेल वर पाठवू शकेन. एखाद्या शास्त्रीय अथवा इंजिनियरिंग मधील एखादे पुस्तक कुणाला हवे असल्यास मदत करू शकतो. बाय द वे मी जॉन ग्रिशमच्या शैलीचा दिवाना आहे.

माझी लिस्ट १) द पार्टनर - जॉन ग्रिशम २) द पेलिकन ब्रिफ - जॉन ग्रिशम ३) द क्लायंट - जॉन ग्रिशम ४) द असोसिएट - जॉन ग्रिशम ५) द फर्म - जॉन ग्रिशम ६) द चेंबर - जॉन ग्रिशम ७) रमलखुणा - जी. ए. ८) डोहकाळिमा - जी. ए. ९) निळासावळा - जी. ए. १०) पिंगळावेळ - जी. ए. ११) काजळमाया - जी. ए. १२) सांजशकुन - जी. ए. १३) हिरवे रावे - जी. ए. १४) रानं , शिवार गाव - जी. ए. १५) रानातील प्रकाश - जी. ए. (मु. ले. Conrad Richte ) १६) लॉर्ड ऑफ दी फ्लाईज - जी. ए. (मु. ले. William Golding) १७) सोन्याचे मडके - जी. ए.(मु. ले. James Stephens) १८) कोसला - नेमाडे १९) बिढार - नेमाडे २०) झूल - नेमाडे २१) देखणी - नेमाडे २२) टीकास्वयंवर - नेमाडे २३) सोलेदाद - विलास सारंग २४) शिबा राणीच्या शोधात - दिलीप चित्रे २५) रात्र काळी घागर काळी - चिं . त्र्य खानोलकर २६) कोंडुरा - चिं . त्र्य खानोलकर २७) गणुराय आणि चानी - चिं . त्र्य खानोलकर २८) सोन्याचा पिंपळ - श्रीनिवास विनायक कुलकर्णी २९) माणसे अरभाट आणि चिल्लर - जी. ए ३०) बोर्न आयडेंटिटी - लुडलुम ३२) बोर्न सुप्रीमसि - लुडलुम ३३) बोर्न अल्टिमेटम - लुडलुम ३४) शेरलोक्स होम्स ३५) रुद्रप्रयागचा नरभक्षक चित्ता - जिम कॉर्बेट ३६) कुमाऊंचे नरभक्षक - जिम कॉर्बेट ३७) इंदिरा - पुपुल जयकर ३८) वंशवृ़क्ष - उमा कुलकर्णी (मु. ले. एस एल भैरप्पा ) ३९) पर्व - उमा कुलकर्णी (मु. ले. एस एल भैरप्पा ) ४०) आवरण - उमा कुलकर्णी (मु. ले. एस एल भैरप्पा ) ४१) काठ - उमा कुलकर्णी (मु. ले. एस एल भैरप्पा ) ४२) धागे आडवे उभे - अनिल अवचट ४३) द डे ऑफ जॅकल - फोरसेथ ४४) द ओडिसा फाईल - फोरसेथ ४५) द डॉग्ज ऑफ वॉर - फोरसेथ ४६) द फिस्ट ऑफ गॉड - फोरसेथ ४७) अ फाईन बॅलन्स - रोहिन्तोन मिस्त्री ४८) सच लॉंग जर्नी - रोहिन्तोन मिस्त्री ४९) फॅमिली मॅटर - रोहिन्तोन मिस्त्री ५०) मॅटर ऑफ टाइम - शशी कुलकर्णी ५१) संपूर्ण पु.ल. ५२) भयकथा, गूढकथा - नारायण धारप, रत्नाकर मतकरी

'तराळ-अंतराळ' हे शंकरराव खरातांचं आत्मचरित्र. 'तिसरी क्रांती' हे अरूण साधूंचं पुस्तक. 'धागे अरब जगाचे' हे विशाखा पाटील यांचं पुस्तक. 'भय इथले' हे आतिवास याचं पुस्तक. 'माझे विद्यापीठ' हा नारायण सुर्वे यांचा काव्यसंग्रह. 'फकिरा' ही अण्णाभाऊ साठे यांची कादंबरी. वरील याद्यांमध्ये नसलेली ही काही पुस्तके माझी आवडती आहेत. अजून आठवतील तशी टाकतो.

ईसाहित्य डॉट कॉम यावर भेट द्यावी. भरपुर पुस्तके पीडीएफ फॉर्मेट मध्ये विनामुल्य ऊपलब्ध आहेत.

डिस्क्लेमर : खालील सगळी पुस्तके माझ्या वैयक्तिक संग्रहातली असल्याने आणि माझी २ पुस्तके ढापल्याचे शल्य अद्यापही माझ्या हृदयात असल्याने, मी कुणालाच पुस्तक घराबाहेर घेवून जायला परवानगी देत नाही. इथे प्रश्र्न पैशाचा नाही, पण मराठी पुस्तकांच्या फार आवृत्त्या निघत नाहीत."सुदाम्याचे पोहे" हे पुस्तक मी १९८३ ते २००३ पर्यंत शोधत होतो. तस्मात, कधीही माझ्या घरी या.हवे तितके दिवस माझ्या घरी रहा.मस्त पैकी जेवा आणि पुस्तके वाचा...पण कृपा करून घरी पुस्तक न्यायची परवानगी, मागू नका. आता परत एकदा एखाद्या पुस्तकासाठी वर्षानुवर्षे वाट बघायची माझी मानसीक स्थिती नाही. =================================== दरवर्षी मी गणपती-दिवाळी आणि इतर सणवार, तसेच इतरांची लग्नकार्ये आणि मुंजी वगैरे ह्या समारंभाना न जाता, ते पैसे पुस्तके विकत घ्यायला वापरतो. शिवाय मला ४ शर्ट आणि २ पँट्स. ४ वर्षे आरामात पुरतात.त्यामुळे कपड्यांचा पण जास्त खर्च होत नाही. दरवर्षी साधारण एक १०-१२ हजाराची पुस्तक खरेदी होते.सध्या जवळपास २५००च्या आसपास मासिके (दिवाळी अंक) आणि पुस्तके आहेत. ह्या वर्षी मात्र पुस्तक खरेदी जास्त केलेली नाही.पुढच्या वर्षी पासून परत सुरु होईल. ============================================= १. निवडक आवाज (तसे मी १९९२ पासून आवाज, जत्रा, किस्त्रीम, शतायुषी असे २०-२५ दिवाळी अंक विकत घेतो.) २. निवडक कालनिर्णय ३. मीना प्रभू यांची सर्व प्रवासवर्णने ४. कौटिल्याचे अर्थशास्त्र (मूळ संस्कृत पुस्तक २३०० वर्ष जुने असून, आजच्या काळाला पण ते तितकेच लागू होते.) उदा. परवा एका गडा संबधीच्या व्याख्यानाला गेलो होतो.त्यात त्यांनी १३व्या शतकातल्या एका पुस्तकाचा आधार घेवून, गडांचे एकूण प्रकार ८ असे सांगीतले.चाणक्याच्या २३०० वर्ष जूने असलेल्या पुस्तकात ("कौटिल्याचे अर्थशास्त्र") पण तेच ८ प्रकार आहेत. ५. अन्नपुर्णा. ६. स्मृतीचित्रे. ७. अँड द ऑस्कर गोज टू..... (शैलजा देशमूख..मध्यंतरी ह्यांना फोन केला होता.त्या आता चित्रपट ह्याच विषयावरचे अजून एक पुस्तक लिहित आहेत.) ८. गिरिश कुबेर ह्यांची सगळीच पुस्तके...(पण हा तेल नावाचा इतिहास आहे आणि एका तेलीयाने, ही पुस्तके आखाती देशात काम करत असतांना फार उपयोगी पडली.) ९. रुचिरा भाग १ आणि भाग २ (वयाच्या १०व्या वर्षापासून स्वयंपाक करतांना रुचिरा भाग १ उपयोगी पडले.) १०. भय इथले.... (लेखिका, आपल्याच मिपाकर,अतिवास ताई....अफगणिस्थान ह्या देशा विषयी फार उत्तम माहिती.) ११. केल्याने होत आहे रे , लेखक श्री.अ. दाभोलकर (शेती विषयक तशी बरीच पुस्तके माझ्याकडे आहेत, पण ह्या पुस्तकाचे वैशिष्ट असे की, केवळ १० गुंठ्यात शेती कशी करावी? ह्याचे फार उत्तम मार्गदर्शन ह्या पुस्तकात आहे.) १२. रिच डॅड, पुअर डॅड ( रॉबर्ट टी. कियोसाकी, अर्थकारणा वरचे उत्तम मार्गदर्शक पुस्तक) १३. संपूर्ण फास्टर फेणे (अजूनही वाचतो.जुने दिवस आठवतात.) १४. संपूर्ण ज्यूल व्हर्न (अजूनही वाचतो.जुने दिवस आठवतात.) १५. संपूर्ण हॅरी पॉटर (मुलांच्या आणि प्रौढांच्या मानस शास्त्रावरचे एक जादूगारीय पुस्तक) १६. दासबोध (ह्या विषयी माझ्यापेक्षा, आपले एक मिपाकर श्री. विटेकर जास्त उत्तम लिहू शकतील.) १७. श्री. अवधूतानंद उर्फ श्री. जगन्नाथ कुंटे ह्यांची सगळीच पुस्तके. (नर्मदे हर हर आणि पुन्हा नर्मदे हर हर,मलातरी ही दोन्ही पुस्तके आवडली.) १८. बोर्डरूम (प्रबंधक म्हणून काम करतांना उपयोगी पडले आणि माझ्या सारख्या मारून मुटकून अभियंत्या पासून शेतीकडे वळवायला, उपयोगी पडले.) १९. अर्थात (कधी कधी मुड लागला तर वाचतो. पण अद्यापही संपुर्ण पुस्तक वाचून व्हायचे आहे.) २०. मनात (कधी कधी मुड लागला तर वाचतो. पण अद्यापही संपुर्ण पुस्तक वाचून व्हायचे आहे.) २१. द अल्केमिस्ट ("तुझे आहे तूजपाशी"चा इंग्रजी अवतार) २२. संन्यासी ज्याने आपली फेरारी विकली ("द माँक व्हू सोल्ड हिज फेरारी"चा मराठी अनुवाद.यशस्वी होण्यासाठीची एका वाक्यातली ७ सुत्रे) २३. मिरासदारांची सगळी पुस्तके (त्यातही भोकरवाडीच्या गोष्टी, मिरासदारी) २४. चि.वि.जोशी ह्यांची सगळी पुस्तके २५. सुदाम्याचे पोहे (अतिशयोक्त्ती विनोदाचे अप्रतिम उदाहरण) २६. सुत्रे चाणक्याची, सुत्रे गव्हर्ननसची २७ मुसाफिर (एकदा वाचायला उत्तम) २८ किमयागार (कधी कधी मुड लागला तर वाचतो. पण अद्यापही संपुर्ण पुस्तक वाचून व्हायचे आहे.) २९. प्रविण दवणे ह्यांचे सावर रे (सगळे भाग) ३० कार्यशैली (लेखक अनिल शिदोरे) ३१. अंजली पेडसे ह्यांचे देहबोली (प्रबंधक म्हणून काम करतांना उपयोगी पडले.) ३२. निवडक अबकडइ ३३. जयंत नारळीकर ह्यांचे चार नगरातील माझे वास्तव्य. ३४. मराठीत अनुवादित असलेले "कुराण" (ह्याची पी.डी.एफ. आहे.) ३५. राजेंद्र बर्वे ह्यांची पुस्तके (तरतरीत दिवसांसाठी हे एक आणि दुसरे प्रसन्न विचारांसाठी) ३६ चौदा मिनिटात स्वैपाक (आखाती देशात, कमीत-कमी वेळांत, स्वतः सैपाक बनवण्यासाठी उपयोगी पडले.) ३७. गांधींनी आणि काँग्रेसने फाळणी का स्वीकारली? हे शेषराव मोरे ह्यांचे पुस्तक (गेली ४ वर्षे हे पुस्तक वाचत आहे.अद्यापही हे संपूर्ण पुस्तक वाचून झालेले नाही.मध्यंतरी शेषराव मोरे ह्यांच्याशी बोलतांना, ह्या गोष्टीचा उल्लेख, त्यांच्या पाशी केला.म्हणालो, एका बैठकीत किंवा सलग हे पुस्तक वाचणे, माझ्या आकलनशक्तीच्या बाहेर आहे.त्या काळातील घटनांचा अर्थ ह्या काळाशी सुसंगत रित्या लावत आणि मागील प्रकरणांचा आढावा घेत वाचायला, माझ्या तरी बुद्धीला फार कष्ट पडतात.) ३८. इडली, आर्किड आणि मी (लेखक विठ्ठल कामत...विठ्ठल कामतांचे "उद्योजक होणारच मी" हे पण पुस्तक मस्त आहे.) ३९ बाराला दहा कमी (सुसाट पुस्तक.....आल्फ्रेड नोबेल ते जे. ओपनहायमर ह्या शास्त्रज्ञांचा आणि संहारक शस्त्रांबाबत (विशेषतः अणू बाँब विषयीची ) उत्तम माहिती. ४०. संस्कृती रंग (वैशाली करमरकर, कुठल्याही देशात स्वतःला विरघळून टाकायचे असेल तर, हे पुस्तक तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. विशेषतः जर्मनी.) ४१. ही तर श्रींची इच्छा (लेखक श्री. श्रीनिवास ठाणेकर.....दुर्दम्य इच्छा आणि अहोरात्र कष्ट कारायची तयारी असेल तर एका सामान्य परिस्थितला मनुष्य पण आपले ध्येय गाठू शकतो,) ४२. ऑस्कर पिस्टोरियस ड्रीमरनर (एखादी अपंग व्यक्ती देखील, दुर्दम्य इच्छा आणि अहोरात्र कष्ट कारायची तयारी असेल तर आपले ध्येय गाठू शकते,) ४३. जोकर इन द पॅक (आय.आय.एम. विषयावरचे पुस्तक) ४४. बॅरिस्टरचे कार्ट, लेखक हिम्मतराव बावस्कर ४५. सुसंवाद सहकार्‍यांशी (लेखक अविनाश भोमे.... आपल्या सहकार्‍यांशी कसे वागावे? ह्यासाठी उपयुक्त) ४६ नवा विजयपथ (लेखक अविनाश धर्माधिकारी, आय.ए.एस.च्या अभ्याक्रमासाची जुजबी तोंड ओळख. तुम्ही जरी ह्या परीक्षेला बसणार नसाल तरी, एकदा तरी नक्की वाचा.) ४७.रॉबिन्सन कृसो. ४८ टॉम सॉयर. ४९ नॉट विदाउट माय डॉटर (लेखिला बेट्टी मेहमुदी....आखाती देखात जेंव्हा पहिल्या नौकरीत फसवल्या गेलो, त्यावेळी हे पुस्तक आधीच वाचल्याचा फायदा झाला.) आणि ५०. तुम्ही आणि तुमची मुले (लेखक श्री.अविनाश भोमे.....आमच्या घरात कुणाचे बारसे असेल तर मी हे पुस्तक आवर्जून भेट देतो.मी ज्यांना ज्यांना हे पुस्तक भेट दिले किं॑वा सुचवले आहे, त्या प्रत्येकाने व्यक्तीशः मला धन्यावाद दिले आहेत.)