Skip to main content

विकसन करारनामा विषयावर माहिती हवी आहे

लेखक alokhande यांनी शनिवार, 03/09/2016 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे तरी काही चूक अढळ्यास क्षमा करावी. आमची सातार्यात 22.5 गुंठे म्हणजेच आर्धा एकर जमीन आहे. (सातारा - सोलापूर रोड लगत). आता ह्या रोड ला राष्ट्रीय महामार्ग म्हणुन विकसित करण्यात येणार आहे. आम्ही आमची ही जमीन बिल्डर ला विकसन साठी देणार आहोत. त्या संदर्भात विकसन करारनामा करावयाचा आहे. हा करारनामा करताना कोणती काळजी घ्यावी या विषयी मार्गदर्शन हवे आहे. या विषयावरील जाणकारांनी मार्गदर्शन करावे. तसा एखादा धागा असल्यास सांगावे. आपला मिपाकर अक्षय लोखंडे

वाचने 8750
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

फक्त घाई करू नये. व्यवस्थित माहिती काढून, बऱ्याच विकसकांशी बोला, चांगल्या व अनुभवी वकिलांचा सल्ला घ्या. मगच विकसन करारनामा करा. जास्तीत जास्त फायदे पदरात पाडून घ्या.

In reply to by कपिलमुनी

हा ना, चारेक गुंठे मिपाला द्यायला हरकत नव्हती. केली असती आम्ही पण डेव्हलपमेंट तिथे. आहेत भरपूर सातारकर. ;)

In reply to by कपिलमुनी

एवढं मोठं डिल करण्यासाठी आम्ही वकिलांचा रितसर सल्ला घेतला आहे पण सेकंड ओपिनियन म्हणून आणि नवीन काही माहिती मिळते का या साठी मी माझे विचार इथें मांडले आहेत. आणि हो या जगात फुकट मात्र काहीच मिळत नाही

हा करारनामा करताना कोणती काळजी घ्यावी या विषयी मार्गदर्शन हवे आहे
चांगला वकिल शोधावा. कायदेशीर बाबी वा वैद्यकिय समस्या यांबद्दल पुर्ण माहिती असल्याशिवाय कोणतेही सल्ले मागणेही योग्य नव्हे, देणेही.

एवढं मोठं डिल करण्यासाठी आम्ही वकिलांचा रितसर सल्ला घेतला आहे पण सेकंड ओपिनियन म्हणून आणि नवीन काही माहिती मिळते का या साठी मी माझे विचार इथें मांडले आहेत. आणि हो या जगात फुकट मात्र काहीच मिळत नाही