काही तोंडी लावणी
जर घरात पोळी आणि भाताशी काहीही खायला नसेल तर खालील पदार्थ करता येतील.
स्वतःच्या जबाबदारीवर हे पदार्थ करावेत. मी केले तेव्हा मला आवडले. ते तुम्हाला आवडतीलाच अस काही नाही.
लोणचे+दाणे
भाताबरोबर खायला उत्तम. साधे शेंगदाणे भाजून घ्यायचे मग त्यावर लोणच्या चे तेल घालायचे. सगळे एकदम मिक्स करा. मग आनंदाने खाणे.
दाणेकूट+ तूप + साखर
ह्याचे प्रमाण २:१:१ असे आहे. दोन चमचा दाणे कूटला १ चमचा तूप आणि एक चमचा पिठी साखर. मिक्स करा आणि मस्त खा पोळी बरोबर
अजून काही ऑपशनल तोंडी लावणी दिली आहेत त्याची कृती मला माहित नाही.
१- पोहा डांगर
२- सांडगी मिरची [ दही भातात बरोबर कोथिंबीर घालून खावी]
३- कॉर्न फ्लेक्स
४- बटाटा भरीत [ दही + उकडलेले बटाटे + तिखट + दाणे कुटं + मीठ + साखर]
बाकी मिपाकर अनाहिता सुगरणी आहेत त्या अजून सुचवू शकतील.
पाककृती सदरात टाकलेले हे माझे पहिलेच पाऊल आहे जरा सांभाळून घ्या :-)
वाचने
7676
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
तिखट, मीठ आणि गोडा मसाला यावर
च्यायला मला वाटले लावणीचे
In reply to च्यायला मला वाटले लावणीचे by अभ्या..
हाव ना राव.
भुरका, घट्ट वरण फोडणी टाकुन,
मुगडाळ/उडिदडाळ/चणाडाळ भिजवून
चमचमीत तोंडी लावणे...
भूर्का....अहाहा...हा एक