गणेशचित्रमाला

रंगभूषा मंडळ's picture
रंगभूषा मंडळ in लेखमाला
5 Sep 2016 - 9:02 am

.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
}

नमस्कार मंडळी,

मिपागणेशचित्रमालेतील पहिले पुष्प गणेशचरणी अर्पण करताना अत्यंत आनंद होत आहे. मिपाकरांमध्ये असलेल्या विविध कला, कलेच्या सादरीकरणात असलेला त्यांचा उत्साह पाहता अशा कित्येक चित्रमाला मिपावर येऊ शकतील, हा विश्वास आहे.

g1

विविध कलांचा स्वामी गणाधिदेव गणेशाचे हे प्रथमरूप आहे ओरिगामीतील. कागदाला केवळ घड्या घालून साकारलेली ही त्रिमित शिल्पे बनवण्यात आपले मिपाकर सुधांशुनूलकर ह्यांचा हातखंडा आहे. त्यांनी ओरिगामीत साकारलेला हा गणेश व मोदक समुच्चय. आपल्या मिपाच्या विशेषांकांच्या मुद्रितशोधनात सुधांशूदादांचा सिंहाचा वाटा आहे. कीटक/पक्षी/निसर्गनिरीक्षण ह्या त्यांच्या निस्सीम छंदांबद्दल मिपाकरांना माहीत आहेच.
-------
०६/०९/२०१६
.
1
.
पारदर्शक काचेवर मेहंदीसारख्या दाट रंगाने बाह्यरेषा रेखाटून त्यात पारदर्शक रंग भरणे म्हण्जे ग्लास पेंटिंग. हा छंद जोपासलाय आपल्या मिपाकर सूड ने. प्रभावी व अनवट शब्दकळा लाभलेल्या ह्या मिपाकराची गती स्वयंपाकघरातही चालते. अनेक लेख, कविता, विडंबने आणि पाककृती मिपावर सादर करतानाच ग्लास पेंटिंग मध्ये सूडने साकारलेला हा गणेश तितकाच अप्रतिम आहे यात शंका नाही.
--------

०७/०९/२०१६
1

रंगीत कागदाच्या पट्ट्यांना गुंडाळ्यांचा आकार देऊन त्यांनाच विविध आकारात बसवायचे. पेपर क्विलिंग असे नाव असलेल्या या तंत्राने विविध आकारातून,रंगातून साकारलेल्या गणेशचित्रकृतीला सादर केलेय आपल्या मिपाकर कलावंत नूतन यांनी. लहानपणापासूनच निसर्गरंगांशी गोडी लागली की प्रत्येक कृती कशी कलाकृती बनत जाते हे जाणवून देणारा अनोखा बाप्पा. पेपरक्विलिंग बाप्पा.
--------

०८/०९/२०१६
.
मिपा बाप्पा मोरयाच्या ह्या उपक्रमात अगदी नवीन/अपरिचित आयडींनी पण उत्साहाने आपल्या कलाकॄती पाठवल्यात. भिंतीवर लावण्यासाठी केलेले हे बाप्पाचे सुंदर म्युरल बनवले आहे आपले मिपाकर झुमकुला यांनी. एकदम साध्या भौमितिक आकारांचा, आकर्षक रंगाचा व पोताचा (टेक्ष्चर) वापर केलेले हे म्युरल नजर वेधून घेतेय एवढे मात्र नक्की.

---------

०९/०९/२०१६
.

कुलाबा (अलीबाग) किल्ल्यातील उजव्या सोंडेचे गणेश पंचायतन. आपण सहसा विष्णूपंचायतन बघीतलेले असते पण गणेश पंचायतन कमी आहेत. हे किल्ल्यातील गणेश मंदीराच्या गाभार्‍यात आहे आणि हे मंदीर रघुजी आंग्रे (कान्होजी आंग्र्यांचा नातु) यांनी १८व्या शतकात बांधले आहे. हा फोटो टिपलाय आपला भटकंतीचा ज्ञानकोष असलेल्या स्वच्छंदी_मनोज ने. डोळस भटकंती आणि अफाट माहितीचा खजिना हा मिपावरच्या अनेक लेख व प्रतिसादातून कायम दिसतो.
त्याचे ह्या फोटोसोबतच मांडलेले विचार वाचायला हरकत नाही.
..................................
"गणेश चित्रमालेची मिपावर घोषणा झाली आणि आपल्या जवळील गणपतीची चित्रे, फोटो पाठवण्याची विनंती झाल्यावर माझ्या मनात विचार आला की आपण काय पाठवू शकतो. मग असे सुचले की आपण एवढे ट्रेक करतो आणि इतक्या वर्षात अनेक वेळा अनेक ठिकाणी गणपतीच्या मुर्ती बघीतल्या आहेत, मग त्या किल्ल्यावर असोत, कि कुठल्या घाटवाटेत असोत, की कुठल्या लेण्यात असोत की कुठल्या गावातल्या मंदीरात, मग त्याच पाठवायला काय हरकत आहे.

सध्या आजूबाजूला वर्षागणीक वाढत जाणारा गणपती उत्सवाचा आनंद बघितला की वाटून जाते की एखाद्या मुर्तीलापण मिरवून घ्यायला तिचे स्वतःचे नशीब लागत असावे. कोणे एके काळी (फार नाही हो फक्त काहीशे वर्षेच झाली असतील) ह्या किल्ल्यांवरच्या, आडवाटेवरच्या, कुठल्यातरी गुहेतल्या, दुर्गम आणि कोपर्‍यातल्या गावातल्या मंदीरातल्या ह्या गणेशमुर्ती पुजल्या जात होत्या, नवस बोलल्या जात होत्या. पण जशी जशी माणसांची गळती गावातून शहराकडे होऊ लागली तशी ही गणेश मंदीरे ओस पडू लागली. एके काळी ज्यांच्या समोर दिपमाळा लागल्या, नैवैद्य ठेवले गेले, आरत्या म्हटल्या गेल्या, नवस बोलले/फेडले गेले, गावातल्या पोरापासून थोरापर्यंत ज्यांनी त्याला तुच आमचा रक्षणकर्ता, तुच आमचा कर्ता-धर्ता, भाग्यविधाता असे म्हटले त्या गणाधीशाला असे वर्षभर भक्तांच्या दर्शनापासून वंचीत बघीतले की वाईट वाटते. ज्या मंदीरांनी विजयगाथा ऐकल्या, ज्या गणेशाने विघ्नहर्ता आणि सुखकर्ता अशी भुमीका बजावली, ज्याच्यात तिथे मंत्रानी प्राणप्रतिष्ठा करून देवत्व फुंकले त्याच गणपतीला तिथेच त्याच जागी असे भक्तवंचीत बघून वाईट वाटते.

शहरातल्या डिजेंच्या कोलाहालात, खिशातल्या पैश्यांच्या वजनावर भक्त जोखणारा, आमचाच राजा कसा श्रेष्ठ असे हिरीरीने ओरडणार्‍या कार्यकर्त्यांमधे हरवलेला गणपती उत्सव त्याला तरी आवडेल काय याची शंका वाटते. गणेशोत्सव हा सण न गणेश केंद्रीत न राहाता सत्ता आणि पैसा केंद्रीत झालाय किंवा होतोय की काय अशी शंका शहरातले उत्सव बघून वाटते.

शेवटी देव हा देखील भक्तांचा भुकेला असतो हे खरे, पण न जाणे का पण माझे हात ह्या शहरातल्या मंदीरांपेक्षा त्या दुर्लक्षीत मंदीरातल्या एकदंताला जास्तच भक्तीभावाने जोडले जातात."
-----------

१०/०९/२०१६
.
हरिश्चंद्रगडावरचा हा बाप्पा राकट, कणखर, दगडाच्या देशाचा बाप्पा वाटतो कि नाही? अगदी त्याच्या ह्या शेंदूरमाखल्या रुपाला कॅमेर्‍यात उतरवलेय आपला मिपाकर मंदार भालेराव याने. सोबत कुणा अनामिक भक्ताने लावलेल्या अगरबत्तीचा दरवळ दिसतोय ह्या प्रकाशचित्रात. मंदारचे अनेक सुंदर अनुवाद मिपावर वाचायला मिळतात. प्रतिसादातून अन लेखनातून नवीन मिपाकराच्या पिढीचे प्रतिनिधित्व तो करतोय असे म्हणायला हरकत नाही.
------------

११/०९/२०१६
.

मिपाकरांच्या वाढत्या अन उत्साही प्रतिसादाने आज मात्र मिपाचित्रमालेचे रूपांतर एका चित्रगॅलरीत झाले आहे. आज या गॅलरीत तीन सुंदर चित्रे विराजमान झाली आहेत. डावीकडून पहिले जे गणेशचित्र आहे, ते पाठवले आहे amol gawali यांनी. राजकारणावर आणि सामाजिक कार्टून्स काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. मध्यभागीचे जे चित्र आहे ते रेखाटले आहे ज्येष्ठ मिपाकर राजेश घासकडवी यांनी. उत्क्रांतीविषयक अभ्यासपूर्ण लेखमाला लिहिणार्‍या घासकडवी गुरुजीकडून ही सरप्राईज गिफ्ट म्हणायला हरकत नाही. उजव्या बाजूचा झेंटँगल या चित्रकला शैलीतला गणेश आहे मिपाकर मोक्षदा यांचा. रासायनिक प्रदूषण टाळून नैसर्गिक गोष्टींचा पुरस्कार करणार्‍या चित्रकर्तीकडूनच गणेशाचे हे रूप आलेले आहे.

-------------

१२/०९/२०१६
.

उत्तराखंड राज्यामध्ये, रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये, मंदाकिनी आणि अलकनंदा नद्यांच्या खोऱ्यामध्य १२,०७३ फूट उंचीवर तुंगनाथाचे शिखर उभे आहे. शिखराच्या माथ्यावर पंच- केदारांपैकी तिसरेे म्हणून गणले जाणारे १००० वर्षांचे जुने शिवमंदिर आहे. त्या शिवमंदिराच्या गाभाऱ्याबाहेरील हा द्वारपाल गणराया.
ह्या अप्रतिम गणेशाला आपल्या भेटीसाठी आणलेय मनाने हिमालयातच मुक्काम ठोकून असलेल्या मिपाकर यशोधरा यांनी.

-------------
१३/०९/२०१६
.

आजचे प्रकाशचित्र कुणी पाठवले असावे ते सांगायची गरज नसावी. अर्थातच प्रचेतस. लेण्या, मंदीरे आणि इतिहासावर अत्यंत अभ्यासू लेखांचा धनी असणार्‍या प्रचेतसला भुलेश्वराने पाडलेली भूल मिपाकरांना परिचयाची आहे. पुणे-सोलापूर रोडवरील यवतनजिक असलेल्या भुलेश्वर मंदिरातील हे अप्रतिम वैनायकी/गणेशिनी शिल्प. जशा मातृका ह्या त्यांच्या पुरुष रुपाच्या शक्ती असतात तशी ही गणेशाची शक्ती शाक्त वा तंत्र पंथीयाकडून मानली जाते.

--------------
१४/०९/२०२१६
.
ह्या रॉकस्टार गणेशाला फोटोशॉप वापरुन सजवलेय मिपाकर कलावंत नीलमोहर यांनी. नेहमीच्या रंगीत माळांच्या उजेडात असणारा बाप्पा आज निऑनग्लो मध्ये स्टार बनलाय.

--------------
१५/०९/२०१६
.

आज समारोपाचे हे बॅनर देताना मला अतिशय समाधान वाटतेय. आपल्या मिपाचा हरहुन्नरी कलाकार स्पा याने खास मिपासाठी वेळात वेळ काढून ही गणेशाची प्रतिमा पाठवली आहे. प्रोफेशनल फोटोग्राफर, थ्रीडी मॉडेलर आणि भयकथा लेखक म्हणून स्पा यांची मिपाला ओळख आहेच. सोबतच ह्या चित्रात ज्या काव्यमाला दिसताहेत त्या आहेत आपल्या मिपाकर साहित्यिक माधुरी विनायक यांच्या. जडणघडण सारख्या प्रांजळ लेखमालेतून आपला एक ठसा उमटवणार्‍या माधुरी विनायक यांनी ह्या भक्तीपूर्ण ओळी खास मिपाचित्रमालेसाठी लिहिल्यात हे विशेष.

प्रतिक्रिया

पैसा's picture

5 Sep 2016 - 9:41 am | पैसा

गणेश चित्रमालेची झकास सुरुवात! सुधांशु नूलकर, मस्त कलाकृती आणि रंगभूषामंडळाने केलेल मस्त फिनिशिंग! वा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Sep 2016 - 9:50 am | डॉ सुहास म्हात्रे

चित्रात ओरिगामी पाहिल्यावर मनात नूलकर साहेबांचे नाव आले !

कागदाला किमान घड्या घालून पूर्ण परिणाम साधण्याचे अप्रतिम कौशल्य श्रीगणेश आणि मोदक यांच्या कलाकृतींतून व्यक्त होत आहे. त्याशिवाय त्या कलाकृतींना महिरप आणि इतर सजावटीच्या मखरात अप्रतिमरित्या बसवले आहे. पार्श्वभूमीही ओरिगामीचीच वाटावी ही कल्पना भन्नाट आहे ! एकंदर परिणाम एक नंबर !

गणेश चित्रमालेची सुरुवात सुंदर झाली आहे. रोज नवनवीन मेजवानी मिळण्याची लक्षणे दिसत आहेत ! ब्राव्हो !!

चांदणे संदीप's picture

5 Sep 2016 - 10:02 pm | चांदणे संदीप

प्रतिसादातल्या पहिल्या ओळीशी बाडिस!

ते म्हणतात ना, जे सरळ-सोपे असते तेच जास्त अवघड असते! तसंच आहे हे ओरिगामी प्रकरण! ;)

गणपती छानच पण मोदक जाम आवडले! पण तेही अवघडच वाट्टय क्रायला!

Sandy

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Sep 2016 - 9:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सकाळीच मुख्यपृष्ठ पाहिलं आणि आनंद झाला. खूप सुंदर. मिपावर सतत कुठल्याही लेख मालिका असू द्या. सुधांशु नुलकर साहेब मुद्रितशोधनाच्या कामासाठी हजर असतात. लेख आला की लेख वाचून लेखनावर शुद्धलेखनाचा हात फिरवून लेख तयार. त्यांचा ओरिगामीचा छंद आपण सर्वांना माहितच आहे. अभ्या आणि त्याच्या रंगभुषामंडळातील सदस्यांना धन्यवाद देतो की त्यांनी श्रीगणेशचित्रमालेत नुलकरसाहेबांचा यथोचित गौरव केला आहे, आभार दोस्त हो...

-दिलीप बिरुटे

जव्हेरगंज's picture

5 Sep 2016 - 9:56 am | जव्हेरगंज

ग्रेट !!!

यशोधरा's picture

5 Sep 2016 - 10:04 am | यशोधरा

मस्त!

नावातकायआहे's picture

5 Sep 2016 - 10:21 am | नावातकायआहे

सही!

किसन शिंदे's picture

5 Sep 2016 - 10:47 am | किसन शिंदे

जबरदस्त मुखपृष्ठ!!

सानिकास्वप्निल's picture

5 Sep 2016 - 11:19 am | सानिकास्वप्निल

नूलकर काकांची कलाकृती अप्रतिम!!

चौकटराजा's picture

5 Sep 2016 - 11:47 am | चौकटराजा

ओरिगामी हा एक अत्यंत कल्पकतेला वाव देणारा छन्द आहे. त्यात जगात अनेकानी अत्यन्त अवघड अशा कलाकृति केल्या आहेत.पण मिपात असा कलाकार असल्याचे पाहून आनन्द वाटला ! सुरेख गणपति !

नाखु's picture

5 Sep 2016 - 2:23 pm | नाखु

किमान साधनांतून कमालीची कलाकृती म्हणजे ओरिगामी..

लवून कुर्नीसात...

प्रचेतस's picture

5 Sep 2016 - 11:50 am | प्रचेतस

सुंदर आणि कल्पक.

पियुशा's picture

5 Sep 2016 - 11:59 am | पियुशा

मस्त !

श्रीगुरुजी's picture

5 Sep 2016 - 12:26 pm | श्रीगुरुजी

सुंदर! खूप आवडले. फारच छान सुरूवात झाली.

मदनबाण's picture

5 Sep 2016 - 12:27 pm | मदनबाण

झकास्स्स्स्स... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माझा गणपती... :- मी येतोय

अतिशय सुंदर! पुनःपुन्हा पहात रहावे असे.

पद्मावति's picture

5 Sep 2016 - 1:20 pm | पद्मावति

सुरेख!

सस्नेह's picture

5 Sep 2016 - 2:41 pm | सस्नेह

अत्यंत सुरेख आणि कल्पक !
नूलकरकाकांना हॅट्स अॉफ !

दिपक.कुवेत's picture

5 Sep 2016 - 2:45 pm | दिपक.कुवेत

अतिशय सुरेख झालय....निव्वळ अप्रतिम.

सानझरी's picture

5 Sep 2016 - 3:39 pm | सानझरी

मस्त ओरिगामी.. खूप सुंदर.
ओरिगामी कार्यशाळेच्या प्रतिक्षेत. :)

नीलमोहर's picture

5 Sep 2016 - 3:53 pm | नीलमोहर

अत्यंत सुंदर आणि कल्पक..

कंजूस's picture

5 Sep 2016 - 3:57 pm | कंजूस

छान!

पाटीलभाऊ's picture

5 Sep 2016 - 4:38 pm | पाटीलभाऊ

अतिशय सुंदर..आणि कल्पक..!

स्वाती दिनेश's picture

5 Sep 2016 - 6:28 pm | स्वाती दिनेश

सुरूवात झकास! असेच उत्तमोत्तम गणराय सर्व दिवस दर्शन देतील ह्याची खात्री आहे.
स्वाती

अजया's picture

5 Sep 2016 - 6:35 pm | अजया

अप्रतिम _/\_

अभिजीत अवलिया's picture

5 Sep 2016 - 6:43 pm | अभिजीत अवलिया

अप्रतिम. मिपा खूप सुंदर दिसतेय आज. धन्यवाद रंगभूषा मंडळ.

कविता१९७८'s picture

5 Sep 2016 - 6:47 pm | कविता१९७८

छानच

सुधांशुनूलकर's picture

5 Sep 2016 - 8:06 pm | सुधांशुनूलकर

सर्व प्रतिसादकांचे आभार. श्रीगणेशाच्या चरणी अर्पण केलेलं त्याचं हे ओरिगामी रूप सर्वांना आवडलं, ही त्या कलेच्या देवतेची - श्रीगणेशाचीच कृपा. मूळ कलाकृतींना रंगभूषा मंडळाने अत्यंत उत्तम, समर्पक पार्श्वभूमी दिल्यामुळे एकूणच बॅनर फार भन्नाट झाला आहे.
ओरिगामी गणेशाच्या या रूपाचे अभिकल्पक (Designer) आहेत मुंबईचे कमलेशभाई मेहता आणि मोदकाच्या अभिकल्पक आहेत डहाणूच्या करंदीकर मावशी.

येत्या डिसेंबर महिन्यात मुंबईला ओरिगामी प्रदर्शन होणार आहे. त्या निमित्ताने काही सोप्या ओरि-कलाकृतींचे व्हिडिओ मिपावर टाकायचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे मिपाकरांनाही सोप्या ओरि-कलाकृती करून बघता येतील (आणि ओरिगामी ही किती सोपी कला आहे, हेही कळेल). माझी ही मनीषा पूर्ण व्हावी, ही श्रीगणेशाचरणी प्रार्थना.

@ सानझरी - ओरिगामी कार्यशाळा : कुणीतरी पुढाकार घेऊन दिवस, जागा आणि खानपान वगैरे इतर व्यवस्था करू शकलं, तर एक झकास ओरिगामी कट्टा होऊ शकतो. त्यासाठी लागणारे कागद मी आणीन. मी केव्हाही तयार आहे. यापूर्वी एक-दोनदा असे कट्टे केलेही होते.

छान. गणपती खूपच सुंदर बनवला आहे.

निशाचर's picture

6 Sep 2016 - 2:25 am | निशाचर

चित्रमालेची खूपच सुंदर सुरूवात! गणपती आणि मोदकांबरोबर पिटुकला उंदिरमामाही आवडला.

प्रीत-मोहर's picture

6 Sep 2016 - 8:58 am | प्रीत-मोहर

आजचा ब्यानरवाल चित्र कुणाच आहे?

पैसा's picture

6 Sep 2016 - 9:13 am | पैसा

सूड खूप सुंदर झालंय ग्लास पेंटिंग. ही कलाही आहे तुझ्याकडे हे माहीत नव्हते!

स्मिता_१३'s picture

6 Sep 2016 - 9:14 am | स्मिता_१३

सुंदर आणि कल्पक असे दोन्ही बॅनर्स !!!

यशोधरा's picture

6 Sep 2016 - 9:17 am | यशोधरा

सूड, फारच सुरेख पेंटींग!

महासंग्राम's picture

6 Sep 2016 - 9:18 am | महासंग्राम

ग्लास गणेश एकदम भारी

संदीप डांगे's picture

6 Sep 2016 - 9:44 am | संदीप डांगे

का कुणास ठाऊक, पण हा गणपती सूडनेच काढला असावा अशी शंका आली, इथे येऊन त्यांचेच नाव बघून दणदणीत आश्चर्याचा धक्का बसला राव! मला सूडराव असंही काही करतात माहित नव्हते, गणपती बाप्पा छान!

प्रमोद देर्देकर's picture

6 Sep 2016 - 9:54 am | प्रमोद देर्देकर

मस्त आवडले.

संत घोडेकर's picture

6 Sep 2016 - 9:56 am | संत घोडेकर

आवडले!

रातराणी's picture

6 Sep 2016 - 10:06 am | रातराणी

दोन्ही बॅनर अप्रतिम आहेत!! ओरिगामी गणपती आणि ग्लास पेंटिग अफलातून!!

नावातकायआहे's picture

6 Sep 2016 - 10:29 am | नावातकायआहे

अप्रतिम! आवडले.
मुजरा!!

बबन ताम्बे's picture

6 Sep 2016 - 11:24 am | बबन ताम्बे

दोन्ही कलाकृती खूप आवडल्या.

प्रीत-मोहर's picture

6 Sep 2016 - 11:26 am | प्रीत-मोहर

भारी!! वाटलच होत ही सुड ची कलाकारी आहे!!

सस्नेह's picture

6 Sep 2016 - 11:47 am | सस्नेह

ग्लास-पेंटिंगचे कलर्स अगदी झळाळते आहेत..compliments to सूड !

सपे-पुणे-३०'s picture

6 Sep 2016 - 11:47 am | सपे-पुणे-३०

वा ! ओरिगामी आणि ग्लास पेंटिंग दोन्हीही अप्रतिम !!

चांदणे संदीप's picture

6 Sep 2016 - 1:38 pm | चांदणे संदीप

ग्लास पेंटींग, ट्रान्सपेरेंट कलर्स हे न झेपणेबल प्रकार असल्याने सूड्रावांचे खास कवतिक!!

गणपती बाप्पा मोरया!

Sandy

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Sep 2016 - 1:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

आजची कलाकृतीही तोडीस तोड आहे ! सूडरावांचा एक नवीन पैलू समजला !

ज्ञान व कलेच्या देवतेच्या उत्सवात या प्रकल्पाच्या निमित्ताने होणारी ही कलेची उधळण अगदी समयोचीत आणि आनंददायी आहे !

नाखु's picture

6 Sep 2016 - 1:49 pm | नाखु

फंटाष्टीक काम..जियो अभिनंदन

नंदन's picture

6 Sep 2016 - 1:54 pm | नंदन

सुधांशूद्वयीला -कर जोडून नमस्कार! :)

फारच छान. ग्लास पेंटिंगमध्ये रंगछटांच्या व्हेरिएबल शेड्स दाखवणे कौशल्याचे काम असते. यात रंग लवकर वाळणे आणि चुका सुधारण्याची फारशी संधी नसणे इ. आव्हाने असतात. त्यामुळे सूडरावांचे हे ग्लासपेंटिंग फारच आवडले आहे. झकास!

सुधांशुनूलकर's picture

7 Sep 2016 - 3:37 pm | सुधांशुनूलकर

ग्लास पेंटिंग... हे तर 'क्लास' पेंटिंग आहे.