सद्ध्या सर्वत्र रानभाज्यांची चर्चा सुरु आहे. त्यातलीच ही "गारभेंड्यांची भाजी".
इतकी वर्षं जांभळी नाक्यावर जातेय पण कधी ही भाजी विकायला दिसली नव्हती. हिची ओळख झाली एका येऊरच्या ट्रेकमध्ये. ट्रेक संपला तेव्हा आमच्या बरोबर आलेल्या आदिवासी वाटाडयाची पोतडी भरपूर रानभाज्यांची भरली होती. अळू (तेरं), बांबूचे कोंब याबरोबर होती ती लाल लाल देठांची गारभेंडी. दिसायला पटकन लाल माठ वाटते पण याची जातकुळी वेगळी. पानं फुलं यायच्या आधी लाल मोठा कोंब उगवतो तो तोडायचा. उकडून साल काढून आणि मीठ लावून पण ही खातात. आमच्या कामवाल्या मावशी पण येऊरच्याच असल्यानं त्यांनी मला ही भाजी आणून दिली.
तर त्यांनी सांगितलेल्या कृतीत थोडाफार बदल करून केलेली भाजी.
साहित्य
१० -१२ गारभेंड्यांचे कोंब
दोन वाट्या मोड आलेले कडधान्य ( मी मसूर घेतले.)
२ कांदे बारीक चिरून
५-६ पाकळ्या लसूण
१ वाटी नारळाचा रस ( optional) मी नारळाचा रेडिमेड रस घातला.)
फोडणीसाठी तेल, हिंग , मोहरी , हळद आणि तिखट
मीठ
१ आधी आपण अळूच्या देठांची जशी साल काढतो तशी हाताने छोटे छोटे (एक दीड इंचाचे ) तुकडे करत गारभेंडीची साल काढायची. (या भाजीला बिलकुल खाज नसते.)
२ भाजी आणि कडधान्य वाफवून घ्यायचे. ( मी स्टीम इट मध्ये वाफवले पण कुकरला लावले तरी चालेल. )
३ कढईत तेल तापवून , हिंग मोहरीची फोडणी करायची. त्यावर चिरलेला कांदा, लसूण आणि हळद, तिखट घालून चांगलं परतायचं.
४ त्यावर वाफवलेलं कडधान्य आणि गार भेंडी घालून जरा परतायची.
५ मग त्यात मीठ आणि थोडे पाणी घालून झाकण ठेवून दरदरून वाफ काढायची. ( दरदरून हा शब्द सर्व आज्ज्या मावश्या ई सुग्रणींकडून उधार घेतलाय.)
६ शेवटी नारळाचा रस घालायचा. ( रस घातल्यावर भाजी उकळायची नाही.) जरा भाजी हलवून गॅस बंद करायचा .
लुसलुशीत शिजलेल्या शेंगांची भाजी पोळ्यांबरोबर किंवा भाताबरोबर छान लागते.
(बऱ्याच रानभाज्यांना आपापला एक विशिष्ट गंध किंवा स्वाद असतो. सवय नसेल तर तो उग्र वाटू शकतो. गूळ किंवा नारळ वापरला की तो कमी होतो. मी यावेळी नारळ वापरला. पण तो न घालताही भाजी चांगलीच लागेल कारण या भाजीला मला तरी उग्र वास जाणवला नाही. )

वाचने
9481
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो दिसत नाहीत!
हो, सासं ना सांगितलेय.
फोटो जोडल्याबद्दल धन्यवाद._/\
In reply to हो, सासं ना सांगितलेय. by प्राची अश्विनी
फोटो दिसताहेत. नवीन प्रकार
हो का? आम्ही स्थानिक
In reply to फोटो दिसताहेत. नवीन प्रकार by कंजूस
चविष्ट. तोंपासु. येऊरला जायला
धन्यवाद!
In reply to चविष्ट. तोंपासु. येऊरला जायला by एस
अनवट भाजीची पाकृ आवडली.आमचा
__/\__
In reply to अनवट भाजीची पाकृ आवडली.आमचा by अजया
गारभेंड्या म्हणजे ferns चे
हो का? कुणी यातील तज्ञच
In reply to गारभेंड्या म्हणजे ferns चे by कैलासवासी सोन्याबापु
माफ करा ताई मी तज्ञ नाही
In reply to हो का? कुणी यातील तज्ञच by प्राची अश्विनी
मस्त पाकृ!
रान भेंडी?
ही रानभेंडी नाहीत. आमच्या इथे
In reply to रान भेंडी? by राही
मी तरी ही भाजी कधी खाल्ली
बरोबर, चिकट असते असं मीपण
In reply to मी तरी ही भाजी कधी खाल्ली by पिंगू
मावशीला सांगून भाजी मिळवायचा
In reply to बरोबर, चिकट असते असं मीपण by प्राची अश्विनी