न्यु यॉर्क "सफर"!
म्हात्रे काकांनी न्यु यॉर्क सफरीला सुरवात केली आहेच.काकांच्या विमान प्रवासापेक्षा थोsssडासा वेगळा माझा प्रवास होता. आमचीही सफरच, फक्त हा "सफर" वेगळ्या अर्थाने आहे! भावना अगदी ओथंबुन वहात आहेत म्हणुन ही वीट धागा म्हणुन वेगळी काढत आहे. ;)
अर्थातच ही वीट म्हात्रे काकांच्या चरणी अर्पण!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वीट पहिली!
कधी कधी माणसाचं नशिबच जोरात असतं. मागच्या वर्षी माझंही होतं. नवरा अमेरिकेला आल्याने मलाही २ महिने अमेरिका पहायला मिळाली. दोन महिने शुद्ध तुपातली निव्वळ ऐश!!
पण त्याहुनही महत्वाचं म्हणजे नवरा!!! गेले पाच महिने आम्ही भेटलो नव्हतो. अखेर "लालाला लाला..." करत पळत पळत येऊन गळ्यात पडुन फिल्मी होऊन रोमँटिक डायलॉग मारत भेटायची वेळ आली होती. =))
व्हिजा डिपेंडंट असल्याने तसा काही प्रॉब्लेम येणार नाही असं सगळेच म्हणत होते. आणि तसंही माझा जॉब चालु असल्याने रिजेक्शनचा प्रश्न नव्हता. तरीही मी लग्नाच्या अल्बम पासुन सगळं काही घेऊन गेले.
आमचं बायोमेट्रिक शुक्रवारी आणि मुलाखत सोमवारी होती! अबीरला न्यायची गरज नव्हती पण आदल्या रात्री समजलं की मुलाचा फोटो २ बाय २ अशाच साईझचा लागतो. मग सकाळी पोरालाही बखोटिला मारलं. त्याचा मुंबईत हवा तसा फोटो काढला. बायोमेट्रिक मोजुन ५ मिनिटात झाले. सातव्या मिनिटाला अबाऊट टर्न आणि पुणे!
सोमवारी मात्र अभुतपुर्व गर्दी!!! ११ च्या मुलाखतीला आम्ही अतिकाळजीवाहु लोक ७.३० लाच पोहचलो =)) आणि आत जायला १२ वाजले. नुकताच काही दिवसांपुर्वी अमेरिकेचा सर्व्हर डाऊन झाल्याने जास्तीच्या अपॉईंट्मेंट्स दिल्या होत्या म्हणे. आत जाऊन अजुन १ तास बसुन राहिले. मग नंबर आला.
समोरच्या काकुंनी सुहास्य वदनाने "नवरा आधीच अमेरिकेत आहे का?" असं विचारलं. मी मान डोलावली. म्हणे काही प्रुफ आहे का? आय १९४ फॉर्म वगैरे. मी दिला.
पुढची ३० सेकंद मला माझ्या हृदयाचे ठोके कानात जोरजोरात ऐकु येत होते.
"तीन दिवसांनी व्हिजा स्टॅम्प करुन मिळेल, धन्यवाद!" काकु वदल्या.
मी सुद्धा चारदा धन्यवाद म्हणून निघाले, पण तरीही जाताना सुरक्षारक्षकाला "पासपोर्ट परत दिला नाही म्हणजे मिळाला ना व्हिजा? जाऊ ना आता घरी??" असं विचारुन विचारुन मगंच बाहेर पडले!
पण खरं सांगु का?! मला अजिबात आनंद झाला नाही. त्या काकुंनी मला जरा ३-४ तरी प्रश्न विचारायला हवे होते. मग जमत नाही ब्वॉ असा चेहरा करायला हवा होता. मग मी त्यांना पटवलं असतं की कसा तुम्ही मला व्हिजा द्याच. मग त्या पटल्या असत्या आणि मग व्हिजा दिला असता तर मला कसं, व्हिजा "कमावल्या" सारखं वाटलं असतं.
पण असो.. थ्रिल पेक्षा व्हिजा जास्त महत्वाचा होता!
जाण्याच्या दिवशी दुपारी ५ ला निघायचं होतं. कसा कोण जाणे फोन सायलेंटवर गेला. सहज म्हणुन ३ ला फोन पाहिला तर सगळ्यांच्या फोनवर भरपुर मिसकॉल्स. गडबडीने कॉल केले तर आमचा ड्रायव्हर आणि माझी मावस बहीण फोन करुन सांगायचा प्रयत्न करत होते की मुंबई - पुणे महामार्गावर दरड कोसळली आहे. संपुर्ण जाम लागला आहे. ड्रायव्हर म्हणे तुमचा फोन लागेना म्हणुन मी सरळ निघालोच. आता घराजवळ आलोय. १० मिनिटात बॅगा पॅक करुन आम्ही गाडीत बसलो होतो. धो धो पाऊस. शिस्तीत घाटात अडकलो. गाडी इंचभरही हलत नव्हती. पुढे जिथवर दिसत होतं तिथवर ब्रेक लाईट्स लावुन उभ्या गाड्या! ड्रायव्हर काकांचा एक मित्र पुढे अडकला होता. त्याला विचारुन विचारुन काका निर्णय घेत होते. शेवटी त्यांनी महामार्ग सोडला आणि गावातुन गाडी घातली. मला वाटत होतं की गेलं विमान. घरुन बहीण विमानतळावर फोन लावत होती. विमान १.३० चं होतं. त्यामुळे ते लोक म्हणत होते की किमान ११ पर्यंत आले तर ठिक. नाही तर आम्ही काही करु शकत नाही. काकांनी गाडी पळवली आणि ११ ला विमानतळावर आणुन टाकलं. पुढच्या सेकंदाला मी सामान ट्रॉलीवर टाकुन आत पळत सुटले. तर अमेरिकेचा सर्वर पुन्हा ठप्प झाला होता आणि बोर्डींग पासेस बनतच नव्हते. =)) तिथे मी चक्क १२:३० पर्यंत उभी होते. तासाभराने मला शेवटी हाताने लिहुन दिलेला पास मिळाला आणि त्याचक्षणी सिस्टीम परत सुरु झाली!! मग हाताने दिलेला पास परत घेऊन तो छापुन देण्यात आला.
सिक्युरिटी तर ठिकच. पण मला उगाच इमिग्रेशनचं फार टेन्शन. मी आपली पोराला कडेवर घेऊन, पाठीवर सॅक टाकुन उभी. तिकडुन सुटाबुटात एक गंभीर माणुस आला आणि नुसती मागे येण्याची खुण केली. ९९% जनता मागे लाईन मध्ये सोडुन जिकडे लोकांनी जाऊ नये म्हणुन चेन्स लावल्या होत्या अशा भागात आम्ही जात होतो. मी तर जाम टरकले होते. त्या माणसाने मला बिझिनेस क्लासच्या लाईन मध्ये नेऊन २ मिनिटात आम्चे काम करुन दिले! अबीरने इमिग्रेशनच्या माणसाला का कोण जाणे "तुम्हाला कुंग फु पांडा माहितीये का?" असा प्रश्न विचारुन हैराण केले!!
तोवर इतका उशीर झाला होता की मी सरळ चाल्त जाऊन विमानातच बसले. लाऊंज वगैरे काही नाही. एयर इंडीयाच्या लाल पिवळ्या विमानात पाय टाकल्यावर मला नाही म्हणलं तरी धक्का बसला होता! सीट्स, खालचा गालीचा, एयर होस्टेसचे गणवेष, सगळं काही लाल-पिवळं!
१० मिनिटात ते हळदी कुंकु विमान निघालंच. पहिल्यांदाच एवढ्या लांब जात होते. "नवर्याला खुप महिन्यात पाहिलेलं नाही, तेव्हा जिवंत पोहचु दे रे अमेरिकेला" अशी देव जाणे कुणाला तरी प्रार्थना केली! (नास्तिक असुन असं बोलायची सवय आहे मला मनातल्या मनात!!)
विमान उडालं. झोप आली होती. गपागप डोळे मिटत होतेच. अबीर केव्हाच माझ्या मांडीवर डोकं ठेवुन झोपला होता. मी पण झोपुन घेतलं. आणि पाचच मिनिटात मला गदागदा उठवुन जेवण देण्यात आलं! मी झोपेतच ते घेतलं. ट्रॅफिकच्या भानगडीत जेवण केलेलं नसल्याने झोपेतच ते खाल्लं सुद्धा. परत झोपायचा प्रयत्न चालु केला.
मी शप्पथ सांगते ह्या पेक्षा एस्टी बरी हो. लेग स्पेस नावाची काही गोष्ट नव्हतीच. अबीरसाठी मांडी घालणं आवश्यक होतं. महामुश्किलीने ती घातली. भुत म्हणुन आपण लोकांना घाबरवायला डोक्यावरुन जशी चादर घेऊ तशी चादर टाकली. जिथे जिथे काही तरी रुततय असं वाटत होतं, तिथे तिथे उशा खुपसल्या. अजुन फक्त १३ च तास असं म्हणुन डोळे मिटले.
सकाळी उठले म्हणण्यात काही अर्थ नाही कारण झोपच कुणाच्या बापाला लागली होती इथे? अबीर रावही निवांत उठले. त्यांच्या मते विमान थांबलं होतं. मी कितीही पटवायचा प्रयत्न केला की विमान आकाशात जात आहे म्हणुन आपल्याला कळत नाही, तरी ते त्याला मान्य नव्हतं. खिडकी उघडुन दाखव नाही तर चला खाली उतरु ह्यावरच तो अडुन बसला होता. पण अशावेळेसच टिव्ही कामाला येतो. तातडीने त्याला एक कार्टुन चॅनल लावुन दिलं. जागरुक पालकत्वाच्या आयचा घो!
आता पुढचं मिशन होतं बाथरुमला जाणं. बाकीच्या लोकांना आधीच एयर इंडियाच्या आदरातिथ्याची कल्पना असल्याने सकाळ पासुनच रांगा लागल्या होत्या. आता तर बाथरुम्सच्या बाहेर पाणी आणि टिश्यु पडलेले दिसत होते. माझ्या अंगावर काटा येत होता पण जाणं तर आवश्यक होतं. मुख्य प्रश्न खरं तर अबीर होता. त्याला कार्टुन लावुन देऊन बसवलं होतंच. म्हणलं आलेच हं दोन मिनीटात. जाऊ नकोस कुठे. आणि त्याला काही कळायच्या आत पटकन बाथरुममध्ये घुसले. अक्षरशः एका मिनिटात बाहेर येऊन पाहिलं तर अबीर सीट वरुन गायब.. माझ्या तर काळजाचा ठोकाच चुकला. मी फारसा काही विचार न करता हाका मारायला सुरवात केली. तिकडून घाबरुन "आई आई" म्हणुन आवाज ऐकु आला. साहेब माझ्या मागे जायचं म्हणुन चालत चालत उलट्या दिशेने गेले होते. पुढच्या वेळेपासुन त्यालाही बाथरुमला नेणे आणि बाहेर उभं करुन त्याच्याशी गप्पा मारत रहाणे हा कार्यक्रम चालु केला.
स्क्रिनवरच्या मॅपवर अमेरिका जवळ येताना दिसत होती. एयर इंडीयाचे सर्व कर्मचारी एव्हाना गायब झाले होते. पॅण्ट्री उघडी ठेवुन ते बहुदा झोपायला गेले असावेत. लोक जाऊन जे हवं ते घेत होते. कचराच कचरा झाला होता. एक बाथरुन तुंबलं होतं. अबीरची तिसरी झोप चालु झाली होती. मी पुन्हा एकदा त्या सीटवर मांडी घालुन बसले होते. मला फक्त आणि फक्त ह्या विमानातुन बाहेर पडायचं होतं. समोर एक से एक भिकार चित्रपट ऑप्शनला दिले होते. त्यातला कमीत कमी भिकार लावुन मी सुन्न होऊन स्क्रिनकडे डोळे लावले होते. हे सगळं आपण नवर्यासाठी करतोय ना!! आता नवरा भेटणार ना!! वगैरे वगैरे स्वप्नरंजनं करत मी वेळ काढत होते.
अखेर १४ तासांच्या अंग मोडुन केलेल्या प्रवासानंतर ती वेळ आलीच. विमान अखेर अमेरिकेच्या जमिनीवर उतरलं. मला आणि अबीरला भयानक आनंद झाला होता.. अगदी तुरुंगातुन सुटावं असा! अबीर आजुबाजुच्या लोकांना "मी अमेरिकेला जाणार.. तुम्ही नाही.. टुक टुक" असं आनंदातिरेकानं सांगत होता!
पण अर्थातच आयुष्य एवढं सोप्पं नसतं. इमिग्रेशनला १ तास लागला. कुणीही लेकरू बघुन वगैरे काही सवलत दिली नाही. अबीर सैरावैरा सगळीकडे पळत होता. त्याला बिचार्याला खुप वेळाने नाचायला मिळालं होतं. मी जवळपास ७५% सुन्न होते. मला नवर्यापर्यंत पोहचवण्या इतपत २५% महत्वाची अॅप्स मी मेंदुत सुरु ठेवली होती!
त्या माणसानी सुद्धा दहा वेळा मला आणि अबीरला निरखुन मग शिक्का मारला.
बॅगा तोवर आल्या होत्याच. ट्रॉलीला ५ डॉलर लागणार होते. ताबडतोब रुपयात हिशोब करुन "इतके कुठे पैसे असतात का" असं म्हणून मीच जोशात बॅगा उतरवल्या आणि दोन हातात दोन २३ किलोच्या बॅगा आणि समोर गुरं काठीनं हाकतात तसं हाकत हाकत अबीर नेला. सुदैवाने कस्ट्म मध्ये काही न उचकता जाऊ दिलं.
ज्याचसाठी केला अट्टाहास तो नवरा आता उभाच असेल वाट बघत म्हणुन उड्या मारत आणि रोमँटिक विचारात बाहेर आलो. कुणीही आलेलं नव्हतं. १०-१५ मिनिटं संपुर्ण मुड नीट जाईस्तोवर वाट पाहिली. मग पळत पळत नवरा आला. आल्या आल्या त्याने अबीरला आणि अबीरने त्याला पिक्चरमध्ये दाखवतात तशी पळत पळत येऊन मिठी मारली. पुढचा बराच वेळ ते नाचत होते. मी नवर्याला पाहुन खुश होऊन पळत पुढे आलेले बाकावर जाऊन दीर्घ मिठी संपायची वाट बघत बसले.
५ मिनिटांनी वगैरे नवर्याला जाणिव झाली की मी पण आलेय. "अरेच्चा! बायको तू इकडे कुठे?!" टाईप अत्यंत क्यॅज्युअल लुक देऊन "चला, टॅक्सी करु!" म्हणुन बाप लेक निघाले.
"अबीरला पाहिलं की मला अक्षरशः काही सुचेना! तो दिसला की जाणवलं कित्ती मिस केलं मी ह्याला!!..." नवरा.. सॉरी सॉरी.. अबीरचा बाप बडबडत होता.. मी १००% सुन्न होऊन ऐकत होते..
रोमँटिक भेट झाली होती, फक्त बाप लेकाची!
वाचने
49649
वाचनखूण
प्रतिक्रिया
143
वीट भारी आहे
In reply to वीट भारी आहे by सामान्य वाचक
अगदी अगदी!
In reply to अगदी अगदी! by पिलीयन रायडर
एयर इंडियाच्या होस्टेस म्हणे बाळांना सांभाळतात सुद्धा....
In reply to अगदी अगदी! by पिलीयन रायडर
एयर इंडियाच्या होस्टेस म्हणे
In reply to एयर इंडियाच्या होस्टेस म्हणे by आदूबाळ
लै उडू नकात, मुवि 'स्वतःच्या'
In reply to एयर इंडियाच्या होस्टेस म्हणे by आदूबाळ
मला काळजी नाही म्हणजे.
In reply to एयर इंडियाच्या होस्टेस म्हणे by आदूबाळ
Are baal, Air India chya
In reply to Are baal, Air India chya by उडन खटोला
"आकाशात मिळवा मायेची पाखर"
In reply to एयर इंडियाच्या होस्टेस म्हणे by आदूबाळ
बाळ गोंडस असेल तर चक्क गोड पापा सुद्धा घेतात
In reply to अगदी अगदी! by पिलीयन रायडर
एयर इंडियाच्या होस्टेस म्हणे
एयर इंडियाच्या होस्टेस म्हणे बाळांना सांभाळतात सुद्धातुम्हाला जागेपणी स्वप्नं बघायची वाईट खोड दिसते... ती इतक्या वरच्या थराला गेली असेल तर उपाय करायची गरज आहे. ;) त्या "कुणीतरी" तुमच्यावर प्रॅक्टिकल जोक केला आहे, त्याचा जरूर बदला घ्या. :) ८२ ते ९६ या काळात अधून मधून देशभक्तीचा झटका आल्याने मी तीन चारदा एअर इंडियाने प्रवास केला आहे. दर वेळेस त्यांनी माझा निर्णय कित्ती कित्ती चूकीचा आहे याची पूरेपूर खात्री पटवून द्यायची खबरदारी घेतली आहे. दर अनुभवावर एक एक धागा काढता येईल. आपल्याच देशाची आपणच किती नाचक्की करायची असा विचार करून गप्प आहे. मात्र, यापुढे, हृदयात कितीही देशभक्ती उचंबळून आली तरी जगातले सर्व पर्याय संपले तरच एअर इंडियाने प्रवास करणार अशी शपथ घेतली आहे !In reply to एयर इंडियाच्या होस्टेस म्हणे by डॉ सुहास म्हात्रे
आपल्याच देशाची आपणच किती
आपल्याच देशाची आपणच किती नाचक्की करायची असा विचार करून गप्प आहेअसे काही नाही हो.. तुम्ही बिन्धास्त लिहा. त्यांना काही वाटत नाही तर आपण का विचार करायचा..?In reply to आपल्याच देशाची आपणच किती by मोदक
कारण, देश आपला आहे. :)
In reply to एयर इंडियाच्या होस्टेस म्हणे by डॉ सुहास म्हात्रे
नाय नाय...
In reply to एयर इंडियाच्या होस्टेस म्हणे by डॉ सुहास म्हात्रे
जगातले सर्व पर्याय संपले तरच
In reply to वीट भारी आहे by सामान्य वाचक
Air india १९४६
In reply to Air india १९४६ by पगला गजोधर
तेव्हाचाच स्टाफ अजून
एकदम खुसखूशीत लेख....
खतरनाक !!
जबराट!
बापरे! तुम्हाला प्रणाम! जग
In reply to बापरे! तुम्हाला प्रणाम! जग by कैलासवासी सोन्याबापु
एयर इंडियाचं आमच्याही जमत
हाहाहा, फार च भारी. दोन तीन
लेखन मस्त! नको त्या जुन्या
In reply to लेखन मस्त! नको त्या जुन्या by रेवती
अगदी
पिराश्टाइल ढिंचॅक वर्णन!
In reply to पिराश्टाइल ढिंचॅक वर्णन! by अजया
केकावरचं बर्फिंग!
In reply to पिराश्टाइल ढिंचॅक वर्णन! by अजया
वा!
क्षणाचा नवरा आणि अनंतकाळाचा बापही तुमची 'वरिजिनल' निर्मिती असेल तर अतिशयच आवडलेली आहे! (अवांतरः पूर्वी मिपावरच इतरत्र वाचलेलं वाक्य आठवलं: स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळाची माता आहे तसेच भेंडी ही क्षणाची भाजी आणि दिवसभराची क्यॅलरी आहे असा गपगुमान विचार करुन जेवावे ! हाच संसारसागरातुन तरुन जाण्याचा मार्ग आहे!)In reply to वा! by बहुगुणी
:)
हा हा हा! मस्तच, खुसखुशीत एकदम!
'क्षणाचा नवरा आणि अनंतकाळाचा
हाहाहा, फार च भारी. दोन तीन
मस्त खुसखुशीत आणि सशक्त लेखन.
In reply to मस्त खुसखुशीत आणि सशक्त लेखन. by प्रभाकर पेठकर
टिआरपीची चिंता आहे....
In reply to टिआरपीची चिंता आहे.... by मुक्त विहारि
मुवि सरळ मुपी वाचायला सांगा
In reply to मुवि सरळ मुपी वाचायला सांगा by महासंग्राम
मुवि सरळ मुपी वाचायला सांगा ना
In reply to मुवि सरळ मुपी वाचायला सांगा ना by मुक्त विहारि
मुवि+मिपा=मुपी असे काही
In reply to टिआरपीची चिंता आहे.... by मुक्त विहारि
हाहाहा
In reply to मस्त खुसखुशीत आणि सशक्त लेखन. by प्रभाकर पेठकर
धन्यवाद !
फिस्स्स! =))
जबरदस्त!
In reply to जबरदस्त! by हुप्प्या
तो "माझा" नवरा आहे! मनाव
मस्त.. एकदम खुसखुशीत वर्णन! :
एकंदर असा 'परकार' झालाय तर...
भन्नाट वर्णन केलय पि .रा
झकास वर्णन.. पुढील विटेच्या
खु(सखुशीत) & खु(मासदार) लेखु
लौल! एक नंबर! पुभाप्र.
इफ यु डोन्ट माईंड पिराताइ,
In reply to इफ यु डोन्ट माईंड पिराताइ, by अभ्या..
तुम्हाला खरंच एका आईची लिस्ट
In reply to तुम्हाला खरंच एका आईची लिस्ट by पिलीयन रायडर
ओके, म्हणजे कपडे वगैरे जास्त
In reply to ओके, म्हणजे कपडे वगैरे जास्त by अभ्या..
अभ्या लय चौकश्या करू नको बे.
In reply to अभ्या लय चौकश्या करू नको बे. by राघवेंद्र
हेहेहे,
In reply to ओके, म्हणजे कपडे वगैरे जास्त by अभ्या..
अजून एकः आपला थ्री पिन प्लग
In reply to ओके, म्हणजे कपडे वगैरे जास्त by अभ्या..
अभ्यासेठ....
In reply to ओके, म्हणजे कपडे वगैरे जास्त by अभ्या..
तांदुळ काढुन टाकला कारण तो
In reply to तांदुळ काढुन टाकला कारण तो by स्रुजा
नाही ग. चेक इन मध्येच होता.
In reply to नाही ग. चेक इन मध्येच होता. by पिलीयन रायडर
तांदूळ अमेरिकेत आणता येत नाही
In reply to तांदूळ अमेरिकेत आणता येत नाही by अनन्त अवधुत
हो कस्टमवाल्यांनीच.
In reply to ओके, म्हणजे कपडे वगैरे जास्त by अभ्या..
बॅगेज
उत्कृष्ट लिखाण... आम्हाला कधी
मस्त लिहिलंय, लिखाणाला _/\_.
:-)
पिरा तुझे बिन्धास्त लिखाण
मस्त लेखन.
मस्त लेखन.
=))
मस्त लिखाण
मस्त झक्कास...हसतेय नुसती!!!
खी खी खी !
In reply to खी खी खी ! by डॉ सुहास म्हात्रे
+1
मस्त लेखन!!
=)) तूफान लीहिलं आहेस पिरा.
क ह र =))
In reply to क ह र =)) by प्रीत-मोहर
पुरुष फ्लाईट अटेंडंट होते.
In reply to पुरुष फ्लाईट अटेंडंट होते. by पिलीयन रायडर
आम्हाला गुजरातीतुन लोकांना
हा: हा: !
भारीच लिहिलय! बाकी एअर इंडिया
भारीच लिहिलय! बाकी एअर इंडिया
+ ५४
एअर इंडिआ आणि ब्रिटिश
In reply to एअर इंडिआ आणि ब्रिटिश by अनुप ढेरे
+ १
मस्त गं काकू !
In reply to मस्त गं काकू ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धाग्यात अबीर आहे, त्यामुळे
In reply to धाग्यात अबीर आहे, त्यामुळे by संदीप डांगे
:)
In reply to धाग्यात अबीर आहे, त्यामुळे by संदीप डांगे
:)
In reply to धाग्यात अबीर आहे, त्यामुळे by संदीप डांगे
:)
In reply to धाग्यात अबीर आहे, त्यामुळे by संदीप डांगे
=))
In reply to =)) by पिलीयन रायडर
आपणास मुद्दा समजलेला नाही.
मस्त लेखन,जबरदस्त पंचेस.
एअर इंडियाच्या होस्टेस.....