आमच बी क्वाश्चुम डिजाइन

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
31 Jan 2009 - 2:24 pm

आमच बी क्वास्चुम डिझाईन

तर काय सांगत व्हतो मी. हां आमी कापड घाल्तो ती सोताच उन थंडी वारा पाउस या पासुन सौरक्षन व ल्वॊकांच लज्जा रक्षन याच्यासाटी. आता कापडाच्या आत समदीच मान्स भोंगळी असत्यात म्हनून काय भोंगळ फिरायच?
आता यकदा आमची प्यांट लाग्ली गळायला. पट्टा घालायला लागला. लै़च वैताग यायला लागला. मंग आमी ती प्यांट घालन सोडुन दिल. दुसरी प्यांट घालायला लाग्लो. तसे आमी कंच्या बी प्यांटवर कंचा बी शर्ट घालतोय. कापडं घालतोय ह्य काय थोडयं का? काही दिवसांनी ही प्यांट टाईट व्हायला लाग्ली. मंग आमी पह्यली प्यांट काल्ढी.ती बी आता टाईट व्ह्यायला लागली. च्यायला! आमी वैतागलो. म्हनल आता लेंगा घालावा. पन त्यो अस्तोय ढवळा. लईच लौकर खराब व्हतोय. आन शहरात लेंगा घातल्याव ल्वॊक पावटा म्हंतीन ना? प्यांटच यक कलर डार्क घेतला की मंग झाल. धुवायची भानगड नश्ष्ये. ल्वॊक म्हनली प्यांट मळाली की मंग धुवायची. पन या टाईट लुज च काय करायच. आमच्या जीवन शिक्षन मंदिरात प्वॊर खाकी प्यांटीवर कर्गुटा बांदायची.त्याची आठवन आली. खाकी प्यांट ढवळा सद्रा आन डोक्याव टोपी. प्यांटीच बिटान तुटल की पोष्ट उघड. वरुन सद्रा आसायचाच. आन कोन पघतय?
सद्र्याच बिटान तुट्ल कि मंग तिथ सुईचा टाका मारायचा. पक्की गाठ. अशी बिटान तुटत जायची आन मंग तवर सद्रा पाठीवर ईरुन फाटायचा. मंग तिथुनच काढायचा. तव्हाच आंघुळ्या करुन घ्यायच्या. मंग सदु शिंप्याने शिवलेला न्हाईत बाजारातुन आन्लेला नवीन सद्रा न धुताच घालायचा. त्येच्या बाहीव मिलचा शिक्का बी दिसायचा. नंतर तो बी शेंबुड पुसु पुसु घालवायचा. कर्गुट्याची आयडिया म्हनल आपन आता करावी. पन आमी आता पल्डो पुन्यात. आन आता विल्याश्टिकचा जमाना आलाय. मंग म्हन्ल हितल्या शिंप्याला ईचाराव प्यांटीला विल्याश्टिक लाउन दे ट्राउजरवानी .फ्याशन वाल्या टेलर ला ईचारल तर तो न्हाई म्हन्ला. मंग यकानी पटवर्धन
टेलरच नाव सांगातल.त्येच्याक बी गेलो.. त्याला म्हन्ल प्यांट गळू नये म्हनुन पुर्वी दोन बंद व्हतेच की. मराठी पिच्चरमदी पैशेवाल्याच्या मंद बुद्दीच्या पोराला असल्या काळ्या प्यांटी घालायची ; हिंदी पिच्चरमदी डिटेक्टिवला बी आस्ल्या प्यांटी घालायची
ईनोदी दिस्ते म्हनुन. हॆ हॆ हॆ . द्या टाळी ! म्हनुन त्येच्याक पघितल पन त्या पटवर्धननी न्हाईचा प्रहार पुनेरी पद्धती ने आमच्या डोस्क्याव हान्लाच..
नंतर काळात मंग प्यांटीच्या कमरेवर दोन बिटान आन येक फ्ल्याप. अशी बी क्वाश्चुम फ्याशन व्हतीच ना . म्हजी आमच्या यकट्याचा प्राब्लेम न्हाई हा. लोकान्लाबी शेम प्रोब्लेम असनार. नंतर मंग म्हनल यखादा सादा टेलर पघावा. बायकुच्या वळखीने त्येच्याक गेलो. त्येला म्हनल प्यांटीच्या कमरेवर विल्याश्टिक लावायच. आतुन नीट ववुन घ्यायच.तो म्हन्ला प्यांटीच्या कमरेव वळ्या दिसतीन. म्हन्ल चालन. वय झाल्याव शिंव्ह कटीव बी वळ्या दिसत्यात. मंग यकदाची प्यांट झाली. घालुन पघितल. प्वॊट फुगुन पघितल. यकदम रिल्याक्स पुरवनी झाल्ती या विल्याश्टिकची. आमच्या या कॊश्चुम डिजाईन नी आमी सोतावरच खुश झालो. लई दिस मंग आमी ती प्यांट न धुता लोकान्ला आमच कॊश्चुम डिजाईन दाखवत फिरलो. सुरवातीला लोकांनी कवतिक केल पन वास यायला लाग्ल्याव मंग ल्वोकांनी सांगातल. तसं आमी रात्रीतुन प्यांट धुतली. सकाळी पघितल. बाकी प्यांट वाळल्याली पन कमरेला वल्ली व्हती. आम्ही लवकर वाळावी म्हनुन गरम गरम विस्त्री मारली. आन घालायला गेलो त प्यांट गळायला लागली आन त्यासोबत आमचा अहंकार ही.

विडंबनराहणीअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

31 Jan 2009 - 2:28 pm | अवलिया

हुच्च....लै भारी
तिच्यामारी धरुन फटाक... चाबुक....
तुम्ही लेखमालाच का लिहित नाही हो... सनातन प्रभात मधे...
अहंकार निर्मुलनावर बरेच लोक लिहित असतात तिथे... हॅ हॅ हॅ

--अवलिया

काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार?
व्यनी सोडा खव वापरा.

दशानन's picture

31 Jan 2009 - 2:30 pm | दशानन

आम्ही लवकर वाळावी म्हनुन गरम गरम विस्त्री मारली. आन घालायला गेलो त प्यांट गळायला लागली आन त्यासोबत आमचा अहंकार ही.

:)

छान वाक्य !

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

आनंदयात्री's picture

31 Jan 2009 - 2:32 pm | आनंदयात्री

=)) =)) =)) =))

काका !!! लै लै भारी !!
हसुन हसुन गालांना वात आला =))

फारच अनपेक्षित उतरला अहंकार !!

आनंदयात्री's picture

31 Jan 2009 - 2:34 pm | आनंदयात्री

प्रतिक्रियेत हे लिहायचे राहिले की .. आता लिहतो ठळक !!

हे हे हे ...

:)

विजुभाऊ's picture

1 Feb 2009 - 7:47 pm | विजुभाऊ

सदशिव पेठेत कुठेतरी "येथेदुखणारे गाल चेपून मिळतील" अशी पाटी आहे बहुतेक.
गालांना वात येणे हा नवा प्रादुर्भाव दिसतोय.
माधव ज्युलीयनांच्या कवीतेत रमणींचे गाल लाजून लाल गुलाबी वगरे व्हायचे......त्याना कुणी वात आला असे म्हणत न्हवते

प्रमोद देव's picture

31 Jan 2009 - 2:53 pm | प्रमोद देव

लई जबरा हाय तुमची आयडियाची कल्पना!

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Jan 2009 - 3:01 pm | बिपिन कार्यकर्ते

काका!!!!!!!!!!!!!

खत्तरनाक लिवलंय. हसून हसून बेजार झालो. प्रचंड मोठ्या गॅप नंतर खास घाटपांडी बोलीभाषेत वाचायला मिळालं. लैच्च मज्जा आली. :) आसं कायतरी लिवत जा की न्हेमी!!!

बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

31 Jan 2009 - 3:29 pm | श्रावण मोडक

सिक्सर. चालू द्या. दर शनिवारी का आता?

विसुनाना's picture

31 Jan 2009 - 3:50 pm | विसुनाना

पोलिसमामा, लई दिसांनी लई भारी लिवलंया.

त्येच्या बाहीव मिलचा शिक्का बी दिसायचा. नंतर तो बी शेंबुड पुसु पुसु घालवायचा.
- आटवान हून नाकातून धारा लागल्या.
प्यांटीला विल्याश्टिक लाउन दे ट्राउजरवानी .
- तेला सस्पेन्डरं म्हनत्यात, त्येच का?.

इनोबा म्हणे's picture

31 Jan 2009 - 4:37 pm | इनोबा म्हणे

सॉल्लीड लिवलंस रे पक्या काका... अहंकार गळुन पडल्यावर कसं येकदम रिल्याक्स वाटलं असेल नै ;)

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

चापलूस's picture

31 Jan 2009 - 5:39 pm | चापलूस

सॉल्लीड लिवलंस रे पक्या काका... अहंकार गळुन पडल्यावर कसं येकदम रिल्याक्स वाटलं असेल नै :)

ठ्ठो! काकांचा व्यंग्यप्रहार वाचून आपण तरी रिलॅक्स झालो. इतरांचे माहीत नाही.

छोटा डॉन's picture

31 Jan 2009 - 5:51 pm | छोटा डॉन

पकाकाका, एकदम शॉल्लेट आणि रापचीक झाला आहे हा लेख, क्लासच ...!
हसुन हसुन बेडवरुन पडायची वेळ आली, हामाला आमच्या बेडचा लै अहंकार आहे पघा, आज तो बी गळुन पडायची वेळ आली होती.

बाकी इनोबाशी सहमत ...

काका, आता येक करायच, आठवड्याला एक का होईना असला अफाट लेख टाकायचाच.
आम्ही वाट पहातो आहोत.

------
( लैच अहंकारी ) छोटा डॉन

घाशीराम कोतवाल १.२'s picture

2 Feb 2009 - 6:03 pm | घाशीराम कोतवाल १.२

हुच्च....लै भारी
तिच्यामारी धरुन फटाक... चाबुक....
तुम्ही लेखमालाच का लिहित नाही हो...
काय आहे दर शुक्र्वारी तुम्ही लिहा आपण हि एका पेपर मधे छापु आणी ईथे मिपा वर देउ
कि अमुक अमुक पेप्रात तुमचे लेख म्हनुन
आणी लिन्क पण देउ ईकडे कस बरो बर ना =D> ;) <:P
पटल तर हलकेच घ्या
___________________________________________________
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
मंडळ आपले आभारी आहे.......

सहज's picture

31 Jan 2009 - 9:27 pm | सहज

किति दिवसांनी ???

दणक्यात एन्ट्री मारली पण! लै भारी.

:-)

चतुरंग's picture

31 Jan 2009 - 10:15 pm | चतुरंग

एकदम बिनतारी पंचनामाच केलाय की!!
एकसो एक सिक्सर! वा वा सक्काळी सक्काळी मज्जा आली!!

वय झाल्याव शिंव्ह कटीव बी वळ्या दिसत्यात.

हे एकदम ज ह ब ह रा हा!! =)) =)) =)) =)) =))

चतुरंग

अघळ पघळ's picture

1 Feb 2009 - 12:26 am | अघळ पघळ

एकदम ज ह ब ह रा हा!!

(जीवजंतू) अघळ पघळ

धनंजय's picture

2 Feb 2009 - 7:31 am | धनंजय

सीमेपार!

(नाडी नाय का व बांधाच्ची? विल्याष्टिक कायासाठी?)

पक्या's picture

1 Feb 2009 - 12:24 am | पक्या

अहो फॅशन आणि कॉस्चुम डिझाईन ह्यात फार फरक आहे. कॉस्चुम डिझाईन म्हणजे सिनेमात, नाटकात भूमिकांचा अभ्यास करून कलाकाराचा पेहराव ठरविणे आणि त्यानुसार त्यांचे कपडे डिझाईन करणे. मग हे कपडे रोजच्या वापरातील असू ही शकतात आणि रोजच्या वापरातील नसूही शकतात.
बहुधा हा फरक न कळल्याने लेखाचे नाव चुकले असावे. 'आमची बी फ्याशन' असे दिले असते तर ठीक वाटले असते.
फरक समजून न घेताच तुम्ही असा उपहासात्मक लेख लिहील्याने तेवढा भावला नाही.

चंबा मुतनाळ's picture

1 Feb 2009 - 2:31 am | चंबा मुतनाळ

प्रकाशकाका, अहंकार गळून पडल्यावर गार गार वाटत असेल ना वार्‍याच्या झुळुकेबरोबर!
मस्त लेख झाला आहे.

-चंबा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Feb 2009 - 8:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन लै आवल्डे.
अहंकार गळून गेल्यावर स्वतःलाच बरं वाटलं की नाय ! :)

प्रकाश घाटपांडे's picture

1 Feb 2009 - 9:23 am | प्रकाश घाटपांडे

मिपाकर मनमोकळे आहेत. प्रगल्भ आहेत.मिपा तांत्रिक कारणाने खुप दिवस उघडत नव्हते. उघडले तरी लिहिता येत नव्हते. विडंबन म्हणजे विकृतीकरण नव्हे. पण ते आकलन व्यक्तिसापेक्ष आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती / प्रवृत्ती. शुक्र तारा मंद वारा.... या गाण्यातील ओळीवर एखाद्या गंभीर प्रकृतीच्या विज्ञानवादी माणसाने शुक्र हा 'ग्रह' आहे 'तारा' नाही असा वाद घालत बसला तर त्या गाण्याचा रसास्वाद घेता येणार नाही. वरील लेखन खर तर वेगवेगळ्या काळातील खरोखर घडलेल्या गोष्टींचे तुकडे आहेत. पुण्यात लक्ष्मी रोडला पटवर्धन टेलर्स , एलोरा टेलर्स, अरिस्टोक्रॅट टेलर्स अशी सुप्रसिद्ध दुकाने आहेत. तिथे मी कपडे शिवायला टाकत असे. विडंबनाची खरी मजा नामसदृष्यात असते. केशवसुत व केशवकुमार यांच्या आम्ही कोण? या कवितेचा रसास्वाद घेताना आमच्या देव गुरुजींनी विडंबनाचा रसास्वाद कसा घ्यायचा हे देखील शिकवले होते. सर्जन व कसाई यांची तुलना फक्त विडंबनातुन होउ शकते. असो. स्वतःला पुढे आणण्याचे काही नाविन्य पुर्ण मार्ग हे आमचे मित्र गुंडोपंत यांनी आमच्यावर लिहिलेल्या कलाकृतीने आम्ही जाम खुश झालो.
असो काळाच्या प्रवाहात कोण तुम्ही? कोण आम्ही ? सारेच क्षुद्र.
प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर's picture

1 Feb 2009 - 10:31 am | विसोबा खेचर

उत्तम विडंबनात्मक लेखन! फक्त काही कंप्लेन्टीवरून 'नी पटवर्धन' ह्या उल्लेखाऐवजी नुसता 'पटवर्धन' हा उल्लेख ठेवत आहे. पुण्यातील पटवर्धन टेलरकडे आपण कपडे शिवायला टाकत होता ही वस्तुस्थिती आपण नमूद केलेली आहे त्यामुळे 'पटवर्धन' ह्या उल्लेखात कुणाला काही आक्षेप असण्याचे काहीच कारणं नाही!

असो.. उत्तम लेखन. अजूनही येऊ द्या! :)

तात्या.

सुचेल तसं's picture

1 Feb 2009 - 10:28 am | सुचेल तसं

घाटपांडे काका,

विडंबन आवडले...

लिखाळ's picture

1 Feb 2009 - 4:46 pm | लिखाळ

लेख मजेदार...
बरेच दिवसांनी तुमचे लिखाण वाचले. बरे वाटले.
-- लिखाळ.

कपिल काळे's picture

1 Feb 2009 - 5:04 pm | कपिल काळे

मस्त..

तरीच हल्ली सगळे पोलिस कापड वर करुन बघ्त्यात कोन हाय त्ये. लायसनमध्ला फोटु आन चैरा जुळतोय का त्ये बघाय लागत, त्यासाठी एखादा क्वास्चुम करा की डिजाइन, म्ह्ंजे कापडं वर करुन बघाय नाय लागणार.

कलंत्री's picture

1 Feb 2009 - 8:10 pm | कलंत्री

प्रकाशकाकांनी एका आगळ्या आणि वेगळ्याच समस्येची मस्तपैकी तोंडओळख करुन दिली आहे. मागे एकदा असेच आमच्या ज्येष्ठ मित्राची ( वय ७५) भेट झाली. त्यांनी राजेंद्रनाथ घालत अशी पँट ( पँटीला मागुन पट्टा असतो आणि तो खांद्यावरुन पुढे लावलेला असतो.) मी विचारले, कि, तुमची ही पँट पाहुन मला जुन्या चित्रपटाची आठवण झाली. बढिया है, तर त्यांनी सांगितले की ही फॅशन म्हणून घालत नाही. वृद्धावास्थेत पट्टा घातला की पोट आवळले जाते आणि पोट दुखते, पँट सैल असली तर घरंगळत जाते. त्यासाठी मागुन / खांद्यावरुन असा पट्टा घ्यावा लागतो. म्हणजे पोटाला आवळलेही जात नाही आणि पँटही घरंगळत नाही.

समस्याही कश्या आणि किती विचित्र असतात ना?

केवळ_विशेष's picture

2 Feb 2009 - 2:35 pm | केवळ_विशेष

लिहिलं आहेत सर तुम्ही... तुफान हसतोय पुन:पुन्हा वाचून ... :)

विशाल कुलकर्णी's picture

18 Feb 2009 - 12:53 pm | विशाल कुलकर्णी

तुमी तं भल्ले फ्याशनेबल निगाले ना बप्पा ! कसलं रापचिक लिहुन राहीले. ते शेवटाचं वाक्य तं यकदम डोल्यात अंजान घालुन गेलं ना भौ !

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

पाषाणभेद's picture

21 Apr 2009 - 5:05 pm | पाषाणभेद

लय भारी क्वाश्चुम डिजायन हाय ह्ये. च्या मारी हासून हासून दमलो.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

बाबा योगिराज's picture

3 Sep 2015 - 6:10 pm | बाबा योगिराज

लय झ्याक लिवलय....