✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

थायलंड (एक अश्वत्थामा)

ब
बाजीप्रभू यांनी
Wed, 08/24/2016 - 14:55  ·  लेख
लेख
व्हिएतनाम युद्ध!, दक्षिणपूर्व आशियात कम्युनिस्ट विचारसरणीचा आणि पर्यायाने रशियाच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी अमेरिका, 'व्हिएतनाम' या चिमुकल्या देशाविरुद्ध १९५४ पासून इनडायरेक्ट आणि ६०साली प्रत्यक्ष युद्धात उतरली. २० दिवसांत व्हिएतनामच्या मुसक्या आवळू या वल्गनेसह उतरलेली अमेरिका प्रत्यक्ष २० वर्ष या युद्धात अडकून पडली. हिच २० वर्षे थायलंडच्या तीन महत्वाच्या शहरांच्या अंतर्बाह्य बदलास कारणीभूत ठरली. अमेरिकेचा आजही मित्र राष्ट्र असलेल्या 'थायलंड' देशात त्याकाळी अमेरिकेने "युद्ध-तळ" बनवला होता. व्हिएतनामच्या निबिड जंगलात लढणाऱ्या सैनिकांना "R&R" (Rest and Recuperation) पॉलिसी अंतर्गत वर्षातून दोनवेळा अशी ५ दिवस सुट्टी मिळायची. रेस्ट करण्यासाठी त्यांना बँकॉक, हवाई, मलेशिया, हाँगकाँग आणि सिंगापोर अशी ऑप्शन्स असायची. त्यात बँकॉकला ९०% टक्के सैनिकांची पंसंती असायची कारण इतर ऑपशन्स मधला प्रवासातील वेळ वाचून एक जास्त दिवस अराम करण्यासाठी मिळायचा. त्यासगळ्या घडामोडीत बँकॉकच्या जवळच समुद्राला लागून असलेल्या "पटाया" या खेडेगावावर सैनिकांची नजर पडली नसती तर नवलच. १९६० पर्यंत 'पटाया' हे मासेमारीवर उपजीविका करणारे, धुळीत हरवलेले एक शांत 'गाव' होते. अमेरिकनांची नजर पडली आणि या गावात आमूलाग्र बदल घडू लागले. पुरुषांपेक्षा संख्येने जास्त असलेल्या पटायातील स्त्रियांना गोऱ्या कांतीच्या अमेरिकनांच आकर्षण वाटल्यास नवल ते काय? बघता बघता अमेरिकनांच्या आवडीचे, त्यांच्या सोईचे 'बार, पब्स, हॉटेल्स, मॉल्स, गोल्फ क्लब्स' उभे राहू लागले. पटाया सारख्या छोट्याश्या गावाचं शहर, शहराचं महानगर अशी वाढ झपाट्याने होऊ लागली. "R&R" या टर्मचा अमेरिकन सैनिकांनी "I&I" (Intercourse & Intoxication) असं नामकरण करून टाकलं. थाई सरकारही येणाऱ्या डॉलर्सच्या मोहापायी कानाडोळा करू लागले. लोकांचा विरोध असूनही १९६६ मध्ये "The Entertainment Places Act" नावाचा "वेश्या व्यवसायला बंदी आहे (असं नाही)" असा बरेच लूप होल असलेला कायदा बनवून अमेरिकनांना मोकळं रान दिलं. १९७५ साली अमेरिकन सैन्य व्हिएतनाम युद्धात सपशेल माघार घेऊन परत गेलं, पण जाता जाता पटायाचा "वॉकिंग स्ट्रीट", बँकॉकचा "नाना प्लाझा" आणि फुकेतचा "बांग्ला" एरिया. असे तीन प्रॉस्टिट्यूट झोन बनवून गेले. थायलंडची हि ख्याती कर्णोपकर्णी जगभरात पोहोचली मग यूरोपियन्सचा, रशियन्सचा, ओघ इथे वाढू लागला. गेल्या ७-८ वर्षात चिनी आणि भारतीय पर्यटकहि कमालीचे वाढू लागलेत. हि झाली थायलंडच्या 'नाईट लाईफ' च्या जन्माची कथा. मला उत्सुकता होती या सगळ्या अपकीर्तीबद्दल लोकल आणि इतर थाईवासियांचं काय मत असेल? थाई संस्कृतीच्या श्रीमंत मूल्यांच्या विपरीत गोष्टी डोळ्यासमोर घडत असतांना थाई मंडळी शांत कशी? माझ्या ऑफिसमधील कलिग्स, अपार्टमेंट मधील शेजारी, काही बँकॉक वासिय आणि लोकल न्यूज पेपर मधील या संदर्भातील जुने आर्टिकल्स वाचून एकच सूर जाणवला. "इट वॉज ए बिग मिस्टेक". त्यावेळच्या थाई ऑफिसिअल्सच्या दुर्लक्षामुळे, भ्रष्टाचाराच्या अमंगल युतीमुळे प्रॉस्टिट्यूशन व्यवसायाच्या हातात हाथ घालून येणारे ड्रग्स, जुगार, हिंसा, किलिंग्स, अंडरवर्ल्ड, माफिया, HIV या आतापर्यंत थाई लोकांना माहित नसलेल्या गोष्टी मूळ धरू लागल्या. इतर थाई समाजावर विशेषतः तरुण मुला-मुलींवर विपरीत परिणाम होऊ लागला, लिंगबदलाच्या शस्त्रक्रियांच पेव फुटलं होतं.(आजही आहे) बुद्धाच्या शांती संदेशाचा खोल प्रभाव असलेल्या थाई भूमीला हि लागलेली किड स्वाभिमानी थाई लोकांना अस्वथ करत होती. उत्तरोत्तर लोकांचा विरोध वाढू लागला. "बूमबूम फॅक्टरी" हि आपल्या देशाची ओळख बदला!! यासाठी रॅलीज निघू लागल्या. (बूमबूम हा शब्द थाई भाषेत सेक्स संदर्भांत वापरला जातो), अग्र लेखांचे रतीब पडू लागले, कित्तेक इलेक्शन्स मधे प्रॉस्टिट्यूशनचा नायनाट करण्याच्या आणाभाका घेतल्या गेल्या. लोक भावनेला झुकून १९९६ मधे "The Prevention and Suppression of Prostitution Act" हा कायदाही बनवला गेला. पण तोही दुबळा ठरला. २००२ च्या स्वतःच्या वाढदिवसाच्या भाषणात राजे "भूमिबोल" यांनी "वॉर ऑन ड्रग्स"ची घोषणा केली. त्यावेळचे पंतप्रधान 'थकसिन शिनावात्रा' यांनी लागोलाग 'अँटी ड्रग' मोहीम चालू करून एका वर्षात २,५०० ड्रग्समाफिया, स्मग्लर्स, पेडलर्सना यमसदनी धाडले. पुढे ह्यूमन राईट्सच्या दबावामुळे ती मोहीम गुंडाळावी लागली. फाशीच्या शिक्षेच्या धाकाने ड्रग्सच्या व्यवसायाला बऱ्यापैकी निर्बंध आलेत पण व्यक्ती स्वातंत्र्याच्या कायद्यामुळे 'धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं' अशी परिस्थिती प्रॉस्टिट्यूशन बाबतीत झालीय. माझ्या कलिगच्या म्हणण्याप्रमाणे हा व्हिएतनामने आम्हाला दिलेला शाप आहे. आपल्या महाभारतात जसं अश्वत्थाम्याला त्याने सोडलेले ब्रह्मास्त्र परत घेण्याची कला अवगत नव्हती तीच बिकट अवस्था थाई सरकारची झालेली आहे. अश्वत्थाम्याला जसा कल्पकल्पांतापर्यंत कपाळीची जखम घेऊन, जखमेवर लावण्यासाठी तेल मागत दारोदार फिरशील असा शाप आहे, अगदी त्याप्रमाणेच थाईवासी "बूमबूम फॅक्टरी" हि ओळख पुसण्यासाठी देशो देशीचे उंबरठे झिजवताहेत. मला तरी थाईवासीयांची हि जखम अश्वत्थामा प्रमाणे कायम भळभळत राहील असं वाटतंय. ताजा कलम:- परवाच थायलंडच्या नवनिर्वाचित महिला पर्यटन मंत्री 'कोबकार्न वाटानाव्रागकूल' यांनी सेक्स इंडस्ट्री संपवण्याचा विडा उचललाय.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
25500 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

माहितीत भर पडली लेखामुळे...पण

अमितदादा
Wed, 08/24/2016 - 15:58 नवीन
माहितीत भर पडली लेखामुळे...पण खालील वाक्य वस्तुस्थितीला धरून नाहीये अस वाटतंय...
एका पुरुषामागे दोन स्त्रिया, १:२ असं व्यस्त प्रमाण असलेल्या या देशातील
  • Log in or register to post comments

अमितदादा ⁠⁠⁠⁠चूक मान्य

बाजीप्रभू
Wed, 08/24/2016 - 17:39 नवीन
'मेल-फिमेल' रेशो मी चुकीचा लिहिलाय. लोकल ऐकीव माहितीप्रमाणे लिहिण्याआधी थोडं गुगल करायला हवं होतं. एनीवे 'मेल-फिमेल' रेशो ९६/१०० फिमेल असा आहे. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद पोस्ट एडिट कशी करायची? मला तो भाग खालील प्रमाणे चेंज करायचा आहे, 'पुरुषांपेक्षा संख्येने जास्त असलेल्या पटायातील स्त्रियांना गोऱ्या कांतीच्या अमेरिकनांच आकर्षण वाटल्यास नवल ते काय?'
  • Log in or register to post comments

मलाही माहित नाही हो.

अमितदादा
Wed, 08/24/2016 - 19:33 नवीन
मलाही माहित नाही हो. संपादकांना व्यनि करावा लागत असावा असं मला वाटतंय. मदत पान वर काय आहे का पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीप्रभू

तुम्हाला हवा असलेला बदल केला

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/24/2016 - 20:44 नवीन
तुम्हाला हवा असलेला बदल केला आहे. जागतिक राजकारणात कळत नकळत एखादा देश कसा फरपटून जातो त्याचे हे उदाहरण आहे :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीप्रभू

सहमत

घाशीराम कोतवाल १.२
Mon, 08/29/2016 - 14:40 नवीन
तुमच्या प्रतिसादाशी सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

कॉलींग टका

कपिलमुनी
Wed, 08/24/2016 - 20:10 नवीन
तो "थाई एक्सपर्ट" आहे म्हणे !
  • Log in or register to post comments

माहितीपूर्ण लेख!

साती
Wed, 08/24/2016 - 21:29 नवीन
आवडला. बरिच नवी माहिती मिळाली.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!

बाजीप्रभू
Wed, 08/31/2016 - 15:06 नवीन
धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

नम्र विनंती

झेन
Wed, 08/24/2016 - 21:48 नवीन
मला वाटतं धागाकर्त्याने मांडलेला विषय गंभीर आहे , एका राष्ट्राची ओळख सुधारण्याचा प्रयत्न मांडला आहे. आपण शिमगा करण्याचा मोह टाळूया.
  • Log in or register to post comments

हं

चंपाबाई
Wed, 08/24/2016 - 22:43 नवीन
कोण्च्या तरी पुस्तकात हे सगळं लिहिलय. हे भगवंता , युद्ध होते तेंव्हा पुरुस्ष मरतात , अपंग होतात , स्त्रीया वाममार्गाला लागतात व कुप्रजा जन्माला येते. एकेकाळी थायलंड हे एच आय व्ही चे मेजर फोकस म्हणुन कार्यरत होते. पण सरकारचे प्रयत्न व जनतेची जागृती यांच्या बळावर एच आय व्ही एपिडेमिक कंट्रोलमध्ये आले. https://en.m.wikipedia.org/wiki/HIV/AIDS_in_Thailand
  • Log in or register to post comments

धन्यवाद

बाजीप्रभू
गुरुवार, 08/25/2016 - 07:18 नवीन
धन्यवाद! म्हात्रे सर, साती, आणि झेन @कपिलमुनी, मला 'कॉलींग टका' वाक्य डोक्यावरून गेलं. काय आहे ते? मी 'थाई एक्सपर्ट' वैगरे नाहीये. मी तसं कधी क्लेम केल्याचं आठवत नाही. गेल्या ८ वर्षांपासून कामानिमित्त थायलंड मधे रहातो. थोडीबहुत थाई भाषाहि येते त्यामुळे लोकल लोकांशी संवाद होतात. दुर्दैवाने थायलंडचं 'कानफाट्या' नाव पडल्यामुळे इमेज बिल्डिंगचे सगळे प्रयत्न सपशेल फेल होताहेत. थाई टुरिझम कधीही 'नाईट लाईफ' बद्दल जाहिरात करत नाही. इथल्या लोकल लोकांनाही "कोणीही यावं टपल्या" मारून जावं हि इमेज आवडत नाही. फारफार तर 2 km² एरियात सामावलेले प्रत्येकी वॉकिंग स्ट्रीट, नाना प्लाझा आणि बांग्ला हे 'रेड लाईट' एरिया थायलंडच्या 513,120 km² क्षेत्रफळाच्या तुलनेत अगदीच समुंदर मे खसखस आहेत. पण दुर्दैवाने मेजॉरिटी टुरिस्ट हॉटेल्स हि याच एरियात दाटीवाटीने बांधली गेली आहेत. मोर ऑर लेस सगळ्याच देशांत प्रेक्षणीय स्थळे, ऐतिहासिक खुणा, निसर्ग रम्य ठिकाणं असतातच. थाई टूर ऑपरेटर्स ते दाखवतातहि पण जसं मी म्हटलं सगळी हॉटेल्स याच भागात असल्यामुळे जे जवळचं सतत दिसतं तेच लक्षात राहतं. सगळं लीगल आहे हा गैरसमच स्वैराचाराला पोषक ठरतोय. हुल्लडबाजी करून डोक्यात जाणाऱ्या काही टुरिस्टना लोकल पोलीस 'सेक्स ऍक्ट' खाली अटक केल्याच्या बातम्या लोकल न्यूज पेपर येत असतात. इतिहासात झालेल्या चुकीची थाई लोकांना बोचत असलेली 'सल' मी पोस्टद्वारे मांडायचा प्रयत्न केलाय. टाटांची नॅनो कारला ‘गरिबांची कार’ ही ओळख पुसण्यासाठी कशी दमछाक होतेय याचं थायलंडचं "नाईट लाईफ़" हे मोठं उधाहरण आहे.
  • Log in or register to post comments

आता इतका वेळ मुनी काही बोलले

मोदक
गुरुवार, 08/25/2016 - 23:31 नवीन
आता इतका वेळ मुनी काही बोलले नाहीत म्हणून मीच सांगतो. त्यांचा प्रतिसाद तुम्हाला उद्देशून नाहीये. टका नामक आयडी ला बोलावत आहेत म्हणून "कॉलींग टका" ते टकासाहेब एकटे थायलंडला जावून ७ की ८ दिवस फिरून आले आहेत आणि त्यांचे नेमक्या जागा शोधण्याचे कसब आणि अनुभव वाखाणण्याजोगा आहे म्हणून त्यांना सगळेजण थायलंड एक्स्पर्ट म्हणतात. तुम्ही करत असलेले काम आणि त्याचे मांडलेले अनुभव याबाबत सर्वांना आदरच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीप्रभू

अच्छा!! असं आहे तर

बाजीप्रभू
Fri, 08/26/2016 - 14:26 नवीन
म्हणजे "टका' प्रगट झाले कि कमेंट्सच्या 'माळा' लागणार आहेत. बरंय.... त्यानिमत्ताने धागा जिवंत राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

थाई सरकारकडे दोन पर्याय आहेत,

संदीप डांगे
गुरुवार, 08/25/2016 - 09:42 नवीन
थाई सरकारकडे दोन पर्याय आहेत, अर्थात त्यांनी ते हाताळून बघितले असतील म्हणा. मी बापडा इथे बसून काय उपदेश देणार? १. वेश्याव्यवसाय कायदेशीर करणे व त्यावर भरमसाठ टॅक्स लावणे. अगदी कुठे २००० हजार रुपये फी असेल तर २० हजार करावी, ती रक्कम आधी सरकारकडे भरावी, तिथे आपले सर्व डिटेल्स द्यावे लागतील अशी व्यवस्था करावी. थोडक्यात टोकन सिस्टीम सुरु करावी. सेक्सविलेजेस मधे गेटपास सिस्टीम (हे गेटपास परत दणदणीत पैसे भरुन मिळतील असे करावे) ठेवावी. थोडक्यात काय तर व्यक्तिस्वातंत्र्याच्या कुठेही आड न येता प्रिविलेज बेस्ड व्यवस्था असावी. त्याने गर्दी कमी होईल आपसूक. सध्या तिकडे जाणारं पब्लिक स्वस्तात चांगलं मनोरंजन म्हणून जातंय. जर मागणी चांगली आहे तर भाव वाढवणे, दुर्मिळता निर्माण करणे हा चांगला उपाय ठरुन शकतो. अर्थात तिथे भ्रष्टाचाराचे प्रमाण कसे आहे व लोकल नागरिकांना ही प्रतिमा बदलण्यात कीती रस आहे ह्यावर अवलंबून आहे. ही प्रतिमा बदलावी अशी फक्त उच्चभ्रू, अभिजन वर्गाचीच मागणी असेल तर मात्र कठिण आहे. सर्वांचा बिनशर्त पाठिंबा हवा. २. अमेरिकन प्रोपागंडा पद्धत वापरणे: खर्‍या थाई संस्कृतीबद्दल अनेक चित्रपट, माहितीपट, जाहिराती, पुस्तके, साहित्य, ब्लॉग्स निर्माण करुन त्याची प्रसिद्धी करणे. हे वेळखाऊ पण परिणामकारक ठरते. प्रतिमाबदल हा भिक मागणे प्रकार नसून आक्रमक प्रकार असतो. चांगली वा वाईट प्रतिमा ही आक्रमकपणेच बदलली जाते. थाई लोकांनी त्यांचे पर्यटनस्थळांव्यतिरिक्त तिथलं सर्वसाधारण जीवन, लोकं, त्यांच्या अपेक्षा, जीवनशैली, स्वप्नं, ह्याबद्दलही दवणीय कन्टेन्ट प्रसारित केलं तर फायदा होऊ शकतो. ह्या सर्व प्रोपागंडा प्रकाराला बराच खर्च येऊ शकतो जो सेक्सविलेजेस्च्या करांमधून उभा करता येईल. असं काही केलं असेल तर सांगा, मलाही केसस्टडी म्हणून उपयोग होईल.
  • Log in or register to post comments

डांगे साहेब धन्यवाद!

बाजीप्रभू
गुरुवार, 08/25/2016 - 10:27 नवीन
मी इथे "फादर रे" फाउंडेशनसाठी विकांतात काम करतो. तिथे बऱ्याच इतर देशीय तसेच गव्हर्मेंट ऑफिसर्सशी संबंध येतो. या चर्चा त्या सर्कल मधेही होतात. तुमचे इनपुट्स कळवीन त्यांना. "Every Idea Is a Good Idea". एक दोन दिवसांपासून न्यूज येताहेत कि, ग्रुप बुकिंग्स असलेल्या टूर ऑपरेटर्सना सेंट्रल पटायातल्या बुकिंग्स कॅन्सल करायला लावून साऊथ पटायातल्या हॉटेल्समधे शिफ्ट करायला सांगितल्यात. म्हणजे एखादा "वखवखलेला' असेल तोच तंगडीतोड करून टेम्प्टेशन आयलंडवर जाईल. बाकी कुंपणावरचे गपचूप हॉटेलात बसतील. केसरी टूर्सच्या आयटीनरी चेंज झाल्याच्या काही येणाऱ्या मित्रांनी कळवल्यात. नवीन महिला मंत्रीने मनावर घेतलेले दिसतंय. लोकांचा सपोर्ट खूप आहे पण हॉटेल लॉबी खूप मोठी आहे. कशी सामना करेल कळेलच येत्या दिवसांत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

ओ हो, दॅट्स ग्रेट! तुम्ही

संदीप डांगे
गुरुवार, 08/25/2016 - 10:52 नवीन
ओ हो, दॅट्स ग्रेट! तुम्ही तिथे प्रत्यक्ष काम करत आहात हे ऐकून खूप अभिमान वाटला तुमचा! आपल्या चर्चेतून काही विधायक घडलं तर मिसळपावचे नाव आंतरराष्टीय स्तरावर गाजेल अशी कल्पना मनात तरळून गेली. (अर्थात हे दिवास्वप्नच) काही का होईना, तिथल्या लोकांना काहीतरी मार्ग सापडू देत हीच प्रार्थना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीप्रभू

कैच्या कै !

चंपाबाई
गुरुवार, 08/25/2016 - 11:56 नवीन
एच आय व्ही चा प्रसार निव्वळ टुरिस्ट करत नाहीत , नोकरीसाठी एकटे आलेले मायग्रंटही करतात.... स्वस्त सेक्स उपलब्ध असणं ही त्यांचीही गरज असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

कैच्याकै, तुमच्या प्रतिसादात

संदीप डांगे
गुरुवार, 08/25/2016 - 12:53 नवीन
कैच्याकै, तुमच्या प्रतिसादात उल्लेखलेले मी लिहिलं आहे का काही? बाकी, थायलंड मध्ये बहुसंख्य लोक तेवढ्यासाठी जातात, एवढे लोक नोकरीसाठी थायलंडमध्ये असतील तर धन्य आहे राव तुमचं! उगा बादरायण संबंध जोडू नका, उद्या पुण्याचं वा मुंबईचं नाव असंच खराब झाले तर चालेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई

वस्तुस्थितीच आहे ती.

चंपाबाई
गुरुवार, 08/25/2016 - 15:00 नवीन
मुम्बैमध्ये बाहेरुन येणारे लोक जास्त आहेत. त्याना मायग्रंट असे म्हणतात. ते बहुतांश वेळा एकाकी असतात... अशा वेळी ते स्वस्त सेक्स पर्यायला सहज बळी पडतात... एकाकीपण , कामाचे ताण , भावना शेअर करायला कुणी नसणे , यातून ते बाहेर जातात व क्वचितप्र्संगी एच आय व्हीला बळी पडतात. पुढे यातून त्यांचेकुटुंबित्य ..पत्नी व पुढची मुले एच आय व्ही बाधितहोतात. म्हणुन मायग्रंट व लाँग रूट ट्रक ड्रायव्हर हे ब्रिज पॉपुलेशन म्हणुन ओळखले जातात. मीच्तीन वर्षापूर्वी एच आय व्ही ओपीडी जॉइन केली... आमच्याकडे २००० रुग्ण होते. स ध्या ३५०० आहेत. एच आय व्ही कसा पसरतो ... हे वाचा... http://www.naco.gov.in/NACO/National_AIDS_Control_Program/Prevention_Strategies/TIs_for_Bridge_Populations/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

....

चंपाबाई
गुरुवार, 08/25/2016 - 15:16 नवीन
http://www.avert.org/professionals/hiv-around-world/asia-pacific/india
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई

HIV माहितीबद्दल धन्यवाद

बाजीप्रभू
गुरुवार, 08/25/2016 - 16:14 नवीन
चंपाताई!! HIV माहितीबद्दल धन्यवाद! पण मुद्दा वेश्या व्यवसायाने होणाऱ्या दुष्परिणामांवर नाही तर मुद्दा त्यामुळे एखाद्या शंभर नंबरी राष्ट्राची खराब होत असलेल्या इमेज बद्दल आहे. तसं पाहिलं तर 'इमेज' खराब होणं हा हि एक दुष्परिणामच म्हणायला हवा पण तो इतर देशांच्याबाबतीत होतांना दिसत नाही, यावर सगळा 'खल' चालला आहे. त्या मुद्दयाला धरून प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई

मुद्दयाला धरून प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.....

मुक्त विहारि
गुरुवार, 08/25/2016 - 23:39 नवीन
आपल्या चंपाबाइ कडून फारच अपेक्षा.... बादरायण संबंध जोडण्यात चंपाबाई आंतरजालावर फार प्रसिद्ध आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीप्रभू

You are not getting my point

संदीप डांगे
गुरुवार, 08/25/2016 - 15:33 नवीन
You are not getting my point :( ती तुम्ही जी गरज सांगत आहात ती वेगळी आणि एका अख्ख्या देशाची बदनामी होणे वेगळे, हायवेवर वेश्या असतात आणि नेहमीच्या चालकाला त्या माहिती असतात , म्हणून कोणी इतर गरजवंताने हायवे वर उभ्या असलेल्या कोणत्याही स्त्रीला हटकले तर चालेल काय? तुम्हाला मुद्दा कळतोय कि नेहमीप्रमाणेच..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई

...

चंपाबाई
गुरुवार, 08/25/2016 - 19:06 नवीन
त्यांची इमेज त्यानीच तयार केलेली असते , काही अंशी तरी. सेक्स लाइफ एकाच एरियात रेस्ट्रिक्ट करता येइल. पण तेही अवघडच असेल... ब्रॉथेल , रस्ता , हॉटेल- धाबा बेस्ड , लॉज , एजंटचे घर , स्वतःचे घर ..... वेश्यांचे असे सहा प्रकार असतात... एका प्रकारात सापडले की त्या लगेच दुसरा प्रकार पकडतात. एकच स्त्री अनेक प्रकारातही असु शकते. टुरिझमच्या इतर आकर्षणांवर सरकारने लक्ष द्यायला हवे. वर्षानुवर्षे धनदांडगे लोक ज्या अपेक्षेने जातात , ते तर त्याच अपेक्षेने जाणार. ते बदलता येणे मुष्किल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

थॅन्क् गॉड, यु आर ऑन ट्रॅक...

संदीप डांगे
गुरुवार, 08/25/2016 - 19:51 नवीन
थॅन्क् गॉड, यु आर ऑन ट्रॅक....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई

त्यांचा कामाचा विषय आहे रोजचा

शलभ
गुरुवार, 08/25/2016 - 21:22 नवीन
त्यांचा कामाचा विषय आहे रोजचा. चंपाबाई, जर बाकी गरळ ओकणे सोडून जरा ह्या विषयावर माहीतीपुर्ण काहितरी येऊ द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

आपल्या चंपाबाइ कडून फारच अपेक्षा....

मुक्त विहारि
गुरुवार, 08/25/2016 - 23:42 नवीन
बादरायण संबंध जोडण्यात चंपाबाई आंतरजालावर फार प्रसिद्ध आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ

त्या ठिकाणी

बाजीप्रभू
गुरुवार, 08/25/2016 - 10:31 नवीन
त्या ठिकाणी एक बॉम्ब स्फोट करा असे आततायी सूचना देखील आल्यात लोकल लोकांकडून.
  • Log in or register to post comments

थाईलँड हा एक सुंदर देश आहे

आतिवास
गुरुवार, 08/25/2016 - 10:58 नवीन
थाईलँड हा एक सुंदर देश आहे यात शंकाच नाही. तीन वेळा भेट देण्याची संधी मिळाली आणि प्रत्येक वेळी तिथल्या जनतेची दुखरी नसही जाणवली. त्याबद्दल लिहिलंत म्हणून विशेष आभार. एक लेखमालिकाच लिहा तुमच्या अनुभवांवर अशी विनंती.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!

बाजीप्रभू
Mon, 08/29/2016 - 10:02 नवीन
धन्यवाद @अतिवास, लेख मालिकेचा प्रयत्न नक्की करेन. मला थायलंडमधील टुरिस्ट स्पॉट ऐवजी थायलंडच्या अंतरंगाबद्दल लिहायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

टुरिस्ट स्पॉट ऐवजी थायलंडच्या

संदीप डांगे
Mon, 08/29/2016 - 10:09 नवीन
टुरिस्ट स्पॉट ऐवजी थायलंडच्या अंतरंगाबद्दल लिहायला आवडेल
आतिवास ताईंचंही हेच म्हणणं असावं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीप्रभू

थायलंडचा हा प्रश्न अमेरिकेमुळे निर्माण झाला आहेच

बोका-ए-आझम
गुरुवार, 08/25/2016 - 11:13 नवीन
पण अजून एक कारण म्हणजे थायलंड ड्रग्ज माफियांच्या सुवर्ण त्रिकोणाचा भाग असणं. वेश्याव्यवसाय, ड्रग्ज, बेकायदेशीर शस्त्रं आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद हे एकमेकांशी interlinked घटक आहेत आणि एकमेकांना complementary सुद्धा. तरी थाई सरकारच्या कडक धोरणांमुळे थायलंडचा मेक्सिको किंवा कोलंबिया झालेला नाही हे त्यातल्या त्यात चांगलं आहे. रच्याकने फादर रे फाऊंडेशन बद्दल उत्सुकता आहे. त्याबद्दल लिहावे ही विनंती.
  • Log in or register to post comments

थायलंडच्या सुंदरतेला या

अजया
गुरुवार, 08/25/2016 - 11:15 नवीन
थायलंडच्या सुंदरतेला या प्रतिमेचा शापच आहे.पर्यटन मंत्रीबाई सुधारणा करणार असतील तर त्यांच्या प्रयत्नांना यश येवो. तुम्ही बघितलेले थायलंड हे खरे थायलंड नाही हे कळवळुन सांगणारा मित्र आठवला तुमचा लेख वाचून.
  • Log in or register to post comments

या लेखामागची तुमची भावना आणि

पद्मावति
गुरुवार, 08/25/2016 - 16:11 नवीन
या लेखामागची तुमची भावना आणि कळकळ पोहोचली. इतक्या सुंदर देशाला असा विचित्र शाप मिळालाय याचं वाईट वाटलं.
  • Log in or register to post comments

हेच म्हणते.

यशोधरा
गुरुवार, 08/25/2016 - 19:10 नवीन
हेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

+१

शलभ
गुरुवार, 08/25/2016 - 21:19 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

+१

वटवट
गुरुवार, 08/25/2016 - 22:04 नवीन
अगदी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

पद्मावति

बाजीप्रभू
Wed, 08/31/2016 - 15:08 नवीन
धन्यवाद!! पद्मावति
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

एका गोष्टीचं कुतूहल वाटतंय.

बोका-ए-आझम
गुरुवार, 08/25/2016 - 19:46 नवीन
थायलंड सरकारचा बँकाॅक, पट्टाया आणि फुकेत यामुळे आर्थिक फायदा तर झाला असणार आणि होतही असेल. जर ही ओळख त्यांना पुसायची असेल आणि ही sin industry बंद करायची असेल तर त्यातून उद्भवणाऱ्या समस्या - बेकारी, गुन्हेगारी, अर्थव्यवस्था कुंठित (stagnant) होणं - यावर उपाय शोधायला लागेल, या industry मधून बाहेर पडणाऱ्यांना पर्याय द्यावे लागतील आणि ते पर्याय या लोकांना पसंतही पडायला लागतील. त्या अनुषंगाने काही काम चालू आहे का? अफगाणिस्तानचं उदाहरण आहे. तिथे अफूची शेती शेतकऱ्यांनी बंद करावी म्हणून पर्याय दिले गेले पण ते त्यांना पसंत पडले नाहीत.
  • Log in or register to post comments

थाई इकॉनॉमी

बाजीप्रभू
गुरुवार, 08/25/2016 - 21:12 नवीन
एकूण थाई इकॉनॉमीमधे साधारण १०% काँट्रीब्युशन असलेल्या पर्यटन व्यवसायात सेक्स इंडस्ट्रीचा नेमका वाटा किती याच्या फिगर्स खरंतर अवेलेबल नाहीत. २०१४ च्या UNAIDS च्या रिपोर्टनुसार सव्वा लाख सेक्स वर्कर्स या व्यवसायात आहेत. (लोकल न्यूज पेपर्स ३ लाख सांगताहेत) या सगळ्यांच्या उपजीविकेचं काय या कळीच्या मुद्यावर इथल्या चर्चा सत्रांत कथ्या-कूट चालू असतो. त्यातले काही महत्वाचे मुद्दे आणि थाई सरकार करत असलेले प्रयत्न पुढील प्रमाणे. १) सर्वप्रथम परदेशी सेक्स वर्कर्सना डिपोर्ट करणे. २) उत्तरपूर्व प्रोव्हिन्स डेव्हलप करणे ( मेजॉरिटी सेक्स वर्कर्स या प्रांतातून असतात) ३) पोलिसी कारवाई. ४) टूर ऑपरेटर्सचं प्रबोधन ५) जाहिरातींवर भर. वस्तुस्तिथी:- १०% तले ५% हि गमवायला थाई सरकारची मानसिकता दिसत नाही. पोलिसी कारवाई हि आपल्या BMC च्या फेरीवाल्यांवरील कारवाई सारखी असते. पोलिसांची तुकडी आली कि तेवढ्यापुरती पांगा पांग होते. एखाद दुसरी बेसावध असलेलि पकडतात बस्स संपला शो. हे मी बरेचदा डोळ्यांनी पाहिलंय. एक गाडी भोंगे लावून 'कुटुंबाशी लॉयल्टी बाबत' आवाहन करत दर १ तासाने फिरत असते आणि त्याच रस्त्यावर काही संस्था फ्रि कंडोम वाटत असते. असे विरोधाभास नेहमी दिसत असतात. (भोंगेवाली गाडी सांगते या वाटेल अजिबात जाऊ नका आणि संस्था सांगतात जा पण कंडोम घालून जा) एनीवे, प्रथमच महिला मंत्री आल्यामुळे लोकांच्या आशा पल्लवित झाल्यात. ती यशस्वी व्हावी हि माझी स्वतःची खूप इच्छा आहे. कधी नव्हे ते तिच्यासाठी गणपतीपुढे हाथ जोडलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

सकारत्मक प्रतिसाद

झेन
गुरुवार, 08/25/2016 - 20:15 नवीन
डांगे साहेब अतिशय सकारात्मक प्रतिसाद. बाजीप्रभू तुमच्यासारख्या प्रत्यक्ष काम करणा-यांबद्दल मनापासून आदर वाटतो.
  • Log in or register to post comments

चालू घडामोडी

बाजीप्रभू
गुरुवार, 08/25/2016 - 21:23 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

लेखामागची कळकळ पोचली.

एस
गुरुवार, 08/25/2016 - 21:31 नवीन
लेखामागची कळकळ पोचली.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!

बाजीप्रभू
Wed, 08/31/2016 - 15:09 नवीन
धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

...

चंपाबाई
गुरुवार, 08/25/2016 - 22:29 नवीन
देशाचं नावच बदलायला हवं... नावातच थाय आणि लं* आहे. दुसरं काय होणार मग ?
  • Log in or register to post comments

जुनं नाव सयाम आहे.

गामा पैलवान
गुरुवार, 08/25/2016 - 22:58 नवीन
जुनं नाव सयाम आहे. तेच परत वापरायला काढा म्हणावं. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई

चंपाबाईचि गाडि मगाशि चुकून

सुकुमार
गुरुवार, 08/25/2016 - 23:18 नवीन
चंपाबाईचि गाडि मगाशि चुकून रुळावर आली होति....:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई

तुमचं नेटीय वर्तन

बाजीप्रभू
Fri, 08/26/2016 - 08:25 नवीन
चंपाताई! सहज कुतूहल म्हणून तुमचं नेटीय वर्तन चेक केलं आणि तुमच्या 'दाणे टाकून कोंबडं झुंझवायच्या' सवयीचा उलगडा झाला. गंभीर धाग्यावर तुमचं विचारांचं सोनं लुटता येईल हि आशा जवळ जवळ संपुष्टात आलीय. वक्रदृष्टी का होईना पण या धाग्यावर तुमची नजर पडली हे महदभाग्य म्हणायचं. काही शब्दच्छल विनोद म्हणून ठीक आहेत पण त्याने काही व्हॅल्यू ऍडिशन होतं नसतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई

तरी बरे....

मुक्त विहारि
Fri, 08/26/2016 - 09:59 नवीन
त्यांनी ह्या धाग्यावर मोदींना नाही आणले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीप्रभू

भलत्याच अपेक्षा बुवा तुमच्या !

चंपाबाई
Fri, 08/26/2016 - 19:46 नवीन
मिसळपावावरचे इतर धागे वाचुन पहा... लोक वॅल्यु अ‍ॅडिशनसाठी लिहितात की टवाळक्या करायला , ते समजेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीप्रभू
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा