सार्वजनिक सणांचे करायचे तरी काय?
दहीहंडी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात पण लोक गेलेत. सर्वोच्च न्यायालयाला न जुमानता लोकांनी मनोरे रचले( माणसांचे आणि डीजेचे पण) आपण तरी का मागे राहा म्हणून काही लोकांनी निळी हंडी पण साजरी केली! निळी हंडी साजरी करून आपण बाबासाहेबांनी ज्या कर्मकांडापासून आपल्याला स्वतंत्र करायचा प्रयत्न केला त्यांच्यातच गुरफटून जात आहोत का? (निळ्या हंडीच्या आयोजनाला कुणी गेले असतील तर त्यांनी ती पण डीजेच्या तालात झाली काय हे सांगावे. )
आपण वाईट गोष्टी उचलायला एवढे उत्सुक का असतो?
सार्वजनिक जीवन शांत सुस्थिर असावे असे वाटते. घरात काय करायचे ते करा. सार्वजनिक आयोजनांना एक निश्चित जागा उपलब्ध करून द्यावी, रस्त्यावर नको. खेळाडू आले की ट्राफिक जाम करून ओपन टॉप रॅली पण मला आवडत नाही. उगाच उन्माद! विदेशातून आपण हे उचलले. ते करतात म्हणून लगेच हे स्वीकारार्ह होत नाही.( स्पॅनिअर्ड्सचा टोमॅटिना सणही मला व्यक्तिशः आवडत नाही. ) त्यांच्यासारखी पर्यायी व्यवस्था आपण करतो का? कोणाला आणीबाणी आली असेल तर फुकट जीव जातो आपल्याकडे. रस्ते बंद करून सण काय काहीच साजरे करू नये आपल्या देशात.
रस्त्याला पर्याय सार्वजनिक मैदानं वगैरे आहेत. दहीहंडी आपण देवळाच्या प्रांगणात किंवा शाळेच्या आवारात करू शकतो. आमच्याकडे आज सुट्टी असते आणि मला आठवते गावात एकच दहीहंडी आणि ती पण शाळेच्या मैदानात फोडली जायची. ( अजूनही तसेच असावे.)
माझ्या गावी एकच कोजागिरी पौर्णिमा व्हायची , ती पण मैदानात आणि कोजागिरी म्हणजे गाणी वाजवून रात्र जागवणे ही संकल्पनाच नव्हती आमच्याकडे. कोजागिरी पौर्णिमेला गच्चीवर गाणी वाजवायची असतात हे मला पहिल्यांदा नागपुरात कळले. गावी एकच दुर्गा बसायची, तीसुद्धा मैदानात आणि गाणी वाजत ती फक्त संध्याकाळी ठराविक वेळेतच. फक्त धार्मिक गाणी. गणपती बसत नव्हते आमच्या गावी.
गावात जे शक्य होते ते शहरात शक्य होणे कठीण आहे याची जाणीव आहे. नवरात्रीत मैदानाचा फक्त एक कोपरा( कायमस्वरूपी स्टेज होते गावात, तेवढेच) फक्त व्यापले जाई. बाकी मैदान मोकळे असे. गावातले व्यवहार सुरळीत राहत. आम्ही पोट्टे खेळत बसू. एखादा सिक्सर देवीच्या कुशीत जायचा, पण तिला वाईट नव्हते वाटत! शहरात मोठी मैदानं असतीलच असे नव्हे. मोकळ्या जागाच सापडणे कठीण!
तर प्रश्न हा आहे की मोठ्या शहरातल्या कळपाला शिस्त लागावी हा स्वच्छ हेतू कसा पुरा करता येईल? सार्वजनिक सण सार्वजनिकही राहतील आणि लोकांना शून्य त्रासदायक राहतील हे कसे साध्य करायचे?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मुळात सार्वजनिक सण हवेतच कशासाठी ?
कायदे पाळायचे तर सगळ्यांनी पाळा...
चांगला विषय आणि नीट मांडणी.
हे दही हंडीतलं शेलिब्रिटी
काहीही होणार नाही...
ज्यांना खरंच धिंगाणा- मज्या
सहमत. दहीहंडी उत्सवाचं उदाहरण
गणेशोत्सवाचा उद्देश कधीच
+ १
बाळगोपाळच हंडी फोडत.तीन थरात
सहमत.. यावर उपाय काय हेच दिसत
मुर्खपणाचा कळस!!!
भयाण आहे हे!
कोणता गणपती आहे हा ?
आगमनाची मिरवणुक
होय, बरोबर, ही मिरवणूक गणपती
रिकामटेकडे आणि उन्मादि उद्योग !
आणि ह्यात पण एक गंमत आहे...
अरे देवा ......
तर प्रश्न हा आहे की.....
हे अजिबात शक्य नाही.
तुमचं देशावर प्रेम उरलेलं नाही तेव्हा आता देश सोडून बाहेर जा..
मी
भोसरीतल्या राड्याबद्दल तर
माझ्या निरिक्षण आणि
माझ्या निरिक्षण आणि अंदाजानुसार....
माझे निरीक्षण
अण्णाभाऊ साठे पण आले आता.
वेडा आहेस! मौसीखी हराम नाही
नक्की लिहा. वाट पाहतोय.
या ठणठणाटात हल्ली एक बरं
निळी हंडी माहीत नाही?
एका मोठ्या मैदानात उत्सवप्रिय
उपाय चांग्ला आहे, आवडला.
एका मित्राच्या बर्थडे पार्टी
वपु काळात डीजेच्या भिंती
वा... होत्या की.
काका.. हे लिखाण वपुंच्या (मी
उत्साहाने वाचत होतो. काळे
+१००!
डिजे आणि स्पिकर्स वॉल्स.
काळे साहेबांचा नाव टाकला त्या
लोकशाही आहे असे चालायचेच !
न्यायालयाच्या निर्णयाविरूद्ध
सार्वजनिक सणांचे करायचे तरी
उत्सवांच्या त्रासदायक स्वरूपाचं काय करायचं?
100 टक्के सहमत,
चांगली माणसे ...
याचे उदाहरण
अप्रतिम प्रतिसाद, डॉक्टर!
ट्राय अँड बी द चेंज विदीन. बाहेरून कायदे करून दादागिरीने काही होत नाही.१००+ "The only thing necessary for the triumph of evil is for good men to do nothing." - Edmund Burke जवळपास सर्वच प्रतिसादकांना या परिस्थितीत बदल हवा आहे, अनिष्ट प्रवृत्ती वाढीला लागू द्यायच्या नसतील तर सुष्ट, विचारी लोकांनी विवेकाने, पण सातत्याने अशा गोष्टींना ब्रेक लावायला हवा असं वाटतं.