Skip to main content

ताज्या घडामोडी :भाग २

लेखक संदीप डांगे यांनी रविवार, 14/08/2016 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
पाकव्याप्त काश्मीरही भारताचेच आहे अशी डरकाळी फोडून नरेंद्र मोदींनी आपण एक कणखर पंतप्रधान असल्याचे सूचित केले, त्याच बरोबर गिलगिट बालटीस्थानात जनभावना उसळल्याने पाकिस्तानचे जरा कठीणच झाले आहे, भारतीय यंत्रणा योग्य काम करत असल्याचे हे चिन्ह समजावे काय?

वाचने 70000
प्रतिक्रिया 306

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

बरोबर्च बोलले ... त्यांचा घात करणारा संघात होता , इतकेच ते बोलले होते.

In reply to by चंपाबाई

आणि नारायण आपटे हे दोघेही संघाचे नाही तर हिंदू महासभेचे सदस्य होते आणि हिंदू महासभा संघाचा भाग नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर संघाशी संबंधित नव्हते तरीही त्यांना गांधीहत्येच्या खटल्यात आरोपी बनवण्यात आलं होतं. पुढे निर्दोष सोडावं लागलं ही गोष्ट वेगळी. जर नथुराम संघात होता तर सावरकरांना अटक करायची काय गरज होती? -(चंपाबाईंच्या गुणपत्रकावरचे इतिहासात मिळालेले गुण जाणण्यास उत्सुक) बोका-ए-आझम

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

हिंदू महासभा आणि रा.स्व.संघ हे कधीच एकत्र नव्हते. निदान तसं कुठेही वाचनात आलेलं नाही. अगदी डाव्यातल्या डाव्या इतिहासकारांच्या पुस्तकांतही या दोन्ही संघटना वेगवेगळ्या आहेत असाच उल्लेख पाहिलेला आहे. त्यामुळे त्या कधी वेगळ्या झाल्या हे कसं सांगणार? हिंदू महासभा हा पक्ष लाला लाजपतराय आणि पं. मदनमोहन मालवीय यांच्या अखिल भारतीय हिंदू सभेमधून उदयाला आला आणि या सभेची स्थापना ही १९०५ मध्ये बंगालच्या फाळणीनंतर (लाॅर्ड कर्झनकृत) मुस्लिम लीगच्या स्थापनेला उत्तर म्हणून झाली होती असं वाचलेलं आहे. संघाची स्थापना १९२५ मध्ये नागपूरला झाली.

In reply to by बोका-ए-आझम

Godse dropped out of high school and became an activist with Hindu nationalist organizations Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) and Hindu Mahasabha, although the exact dates of his membership are uncertain https://en.m.wikipedia.org/wiki/Nathuram_Godse http://indianexpress.com/article/india/india-others/retracing-nathuram-…

In reply to by बोका-ए-आझम

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कधी होते आणि गांधीजींच्या हत्येच्या वेळी संघाचे सदस्य होते का याबद्दल निश्चित माहिती नाहीये. पण हिंदू महासभेचं नियतकालिक ' अग्रणी ', ज्याला नंतर ' हिंदू राष्ट्र ' हे नाव देण्यात आलं, त्याचं संपादन त्याने केलं होतं. आता हिंदू महासभेच्या मुखपत्राचा संपादक हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य होता हे तुम्ही तुमच्या दिव्यदृष्टीने पाहून बोलू शकता. तुम्हाला भारतीय राज्यघटनेने धादांत खोटं बोलायचं स्वातंत्र्य दिलेलं आहेच.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापू , बोकाभाऊ,चंपाताई, ते संघ, हिंदू महासभा वगैरे जाऊ द्या हो...मला एक सांगा 1. "संघाच्या लोकांनी गांधीजींना मारलं -- इति राहुल गांधी 2. "संघाच्या लोकांनी गांधीजींना मारलं असं मी कधीही म्हटलं नव्हतं, गांधीजींना मारणारा संघाशी संबंधित होता असं मी म्हटलंय -- इति राहुल गांधी ह्यांचे सुप्रीम कोर्टातील प्रतिज्ञापत्र. 3. मी जे म्हटलंय त्यावर मी ठाम आहे. मी कोठेही घुमजाव केलं नाही-- इति राहुल गांधी अरे आखिर केहना क्या चाहते हो ?? माझं प्रामाणिक मत -- राहुल गांधींच्या फोनवर पोकेमॉन गो डाऊनलोड करून द्यावा. काँग्रेसला अच्छे दिन येतील

In reply to by चंपाबाई

१. नथुराम संघाचा नव्हता. २. गांधीजी संघाला प्रातःस्मरणीय आहेत यांचा वारंवार उच्चार करण्यात संघवाले धन्यता का मानतात, हे अगदी उघड आहे.

In reply to by श्रीगुरुजी

नवीन सिंद्धांत - १) भारतातील दहशतवादासाठी पाकिस्तानी दहशतवादी जबाबदार आहेत. पाकिस्तान त्यासाठी जबाबदार नाही. २) जगभरातील दहशतवादासाठी इसिस जबाबदार नसून इसिसचे सदस्य त्यासाठी जबाबदार आहेत. ३) भारतातील भ्रष्टाचारासाठी खांग्रेस जबाबदार नसून त्यासाठी खांग्रेसी जबाबदार आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

ठाणे नाट्यगृह स्फोट प्रकर्णात सनातननेही जाहिर केले होते , हे त्या व्यक्तींचे वैयक्तिक काम आहे . संस्थेचा संबंध न्हाय.

In reply to by चंपाबाई

चंपाबाई, संस्थेचा संबंध नाही हे केवळ संस्थेचं म्हणणं नसून न्यायालयाचंही अगदी तस्संच मत आहे. आ.न., -गा.पै.

नागा बंडखोरांच्या शिखर संघटनेशी भारत सरकार ची चालू असलेली बोलणी शेवटच्या टप्यात आहेत अशी बातमी आहे. फायनल aggrement काय असेल याची कोणतीही माहिती बातमी मध्ये दिली नाही. http://indianexpress.com/article/india/india-news-india/nagaland-india-… नागा peace commitee च खालील स्टेटमेंट मुळे उत्सुकता आणखी वाढली आहे "The NSCN and the Naga people highly appreciate the government of India for recognizing the sovereign rights of the Nagas through the framework agreement.”

लोकहो, कन्नड अभिनेत्री आणि (माजी?) काँग्रेस आमदार रम्या हिच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल झाला आहे. अधिक माहिती : http://maharashtratimes.indiatimes.com/nation/advocate-registers-case-a… वरील बातमीनुसार हा खटला सरकारकडून नसून खाजगी आहे. तसेच तिच्या वक्तव्यावरून कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाहीये. माझ्या मते तिचं वक्तव्य अपराधपात्र नाही. पाकिस्तान नरक नाही हे तिचं व्यक्तीनिष्ठ मत आहे. तिला ते बाळगायची पूर्ण मुभा आहे. तिने तिथले लोकं आपल्यासारखेच आहेत असं म्हंटलं आहे. त्यातही काहीही आक्षेपार्ह नाही. तसं पाहायला गेलं तर १९४७ साली फाळणीच्या वेळेस पाकिस्तानी लोकांनी वेगळा पाकिस्तान मागितलाच नव्हता. तो त्यांच्यावर लादला गेला आहे. अर्थात, आज पाकिस्तानात जे नरकसदृश्य अराजक आणि दहशतवाद आहे तो तिथल्या नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे आहे. पाकिस्तानी सत्ताधारी भारताचे शत्रू आहेत. पाकिस्तानी जनता नव्हे. त्यामुळे रम्याच्या वक्तव्यात देशद्रोह शोधायला जाणे म्हणजे हातचा हुकुमी एक्का घालवणे आहे. शेवटी ती तिच्या वक्तव्यावर ठाम आहे हे वाचून संतोष वाटला. आ.न., -गा.पै.

लोकहो, हा काय प्रकार आहे? : पूजा, विवाहादी कार्यक्रमांसाठी १०० पेक्षा अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यासाठी पोलिसांची अनुमती आवश्यक ! पोलिसांच्या हाती अमर्याद अधिकार येणार असं दिसतंय. आमच्या (एकत्रित) घरी न बोलावता तीनचारशे माणसं सहज जमतात कुठल्याही कार्यास. दरवेळेस पोलिसांना कळवणार कोण! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

फक्त सार्वजनिक ठिकाणीच परवानगी घ्यावी लागणार. तसेच हा कायदा अजूनही मंजूर झालेला नसून मंजुरीपुर्वी त्याबाबत जनसामान्यांच्या सूचनांचा जरूर विचार केली जाईल, अशी ग्वाही गृह विभागाचे अतिरक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी दिली आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

प्रस्तावित अंतर्गत सुरक्षा आणि संरक्षण विधेयकाचा मसुदा राज्य सरकारने मागे घेतला.

In reply to by गामा पैलवान

हा काय प्रकार आहे? : पूजा, विवाहादी कार्यक्रमांसाठी १०० पेक्षा अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यासाठी पोलिसांची अनुमती आवश्यक !
निव्वळ मूर्खपणा.

इन्कम ठ्याक्स कडुन एस एम एस आलाय .. काला पैसा पांढरा करा म्हणुन. ते स्वीस ब्यान्केच्या.काळ्या पैशाचेही असेच पांढरे करणार का ?

In reply to by बोका-ए-आझम

२०१४ ..... स्वीस ब्यान्केतला काळा पैसा आणू. २०१६ .... काळा पैसा पांढरा करा स्कीम . २०१७ ..... स्वीस ब्यान्केतील भारतीय ठेवी घटल्या ! बघा ... मोदीनी काळा पैसा भारतात आणला. नमो नमो !

In reply to by चंपाबाई

बाई कदाचित तुम्हाला महिती नसावे की Voluntary Disclosure of Income Scheme ही स्कीम यापुर्वी देखील येउन गेली आहे. पी चिदंबरम अर्थमंत्री असताना त्यांनी देखील ही स्कीम राबवली होती. उगा कशाल भाजपा आणि मोदींच्या नावाने खडे फोडता आहात?

In reply to by मृत्युन्जय

काळा पैसा आण्णार अशी दहशत घालून मग वॉलंटरी इन्कम डिस्क्लोजची स्कीम आणणं. हे म्हणजे... दहावीची परिक्षा प्रॅक्टिकल अवघड असते बघ ! अशी दहशत घालून स्वतः मास्तरनेच दहावीचा प्रायव्हेट क्लास काढुन मुलाना तिथे येण्यास मजबूर करणं यासारखेच आहे ना ?

In reply to by मार्मिक गोडसे

मिस्टर तुम्ही जावा वरती वरुणदेवाला हेग च्या कोर्टात खेचा! आमच्या "चतुर व्यापाऱ्यांना" बोलायचे काम नाही! ;)

पराराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी बुधवारी रात्री पाकिस्तानचे पराराष्ट्र सचिव अझिज चौधरी यांना पत्र लिहून यापुढे फक्त सीमेवर होणा-या दहशतवादावर चर्चा होईल असे सांगितले. १५ ऑगस्टला पाकिस्तानच्या पराराष्ट्र सचिवांनी एस जयशंकर यांना पत्र पाठवून चर्चेचे आमंत्रण देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर १९ ऑगस्टला काश्मीरमधल्या हिंसाचाराप्रकरणी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानाने औपचारिक चर्चेचे निमंत्रण भारताला पाठवले होते. या पत्राला याआधीच भारताने उत्तर दिले होते. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत चर्चा होईल पण पाकिस्तानने ठरवून दिलेल्या विषयांवर नाही हे भारताने आधीच स्पष्ट केले होते. भारत पाकिस्तानशी काश्मीरविषयी नाही तर सीमेवर होणा-या दहशतवादावर चर्चा करने असेही भारताकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे एस जयशंकर यांनी पाकिस्तानला पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जर पाकिस्तान चर्चा करण्याचे गांर्भीयाने घेत असेल तर दोन्ही देशांमध्ये काही मुद्द्यावर सुरूवातीपासून चर्चा व्हायला हवी. यात पठाणकोट हवाई तळावर झालेल्या हल्ला देखील चर्चीला गेला पाहिजे असेही भारताने पत्राने म्हटल्याचे समजते आहे. पाकिस्तानला चुकीचे मुद्दे काढून खेळी करायची असेल तर आम्हाला देखील असे खेळ खेळता येतात अशीही तंबी पत्राद्वारे भारताने दिली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि पराराष्ट्र सचिव एस जयशंकर मिळून या विषयावर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाची योजना आखत असल्याचीही माहिती सुत्राने दिली आहे. http://www.loksatta.com/desh-videsh-news/in-late-night-letter-to-pakist… _____________________________________________________________________________________ हे एक वेगळे पाऊल व चांगली सुरूवात आहे. पाकिस्तानबरोबरील धोरणात भारताची भूमिका कायमच धरसोड असलेली व सातत्य नसलेली राहिलेली आहे. त्यामुळे या नवीन भूमिकेवर भारत किती काळ ठाम राहील याची खात्री नाही.

In reply to by श्रीगुरुजी

पाकिस्तानबरोबरील धोरणात भारताची भूमिका कायमच धरसोड असलेली व सातत्य नसलेली राहिलेली आहे. त्यामुळे या नवीन भूमिकेवर भारत किती काळ ठाम राहील याची खात्री नाही.
हे महत्त्वाचं गुरुजी! आज ना उद्या भारत सरकार ला फुटीरवादी आणि पाकिस्तान बर काश्मीर विषयी चर्चा करावीच लागणार आहे. काश्मीर जसे जसे पेटत जाईल तस तस ह्यांची ठाम भूमिका मावळ होत जाईल. आजच राजनाथ सिंग यांच्या काश्मीर भेटीतून याचे संकेत मिळालेत.

नाशिक येथे विक्रीयोग्य कांदयाला घाऊक बाजारात "५ पैसे" प्रति किलो भाव मिळाला जरी कोणाकडे ५ / १० / २० / २५ पैशाची नाणी शिल्लक असतील तर कांदा खरेदीस वापरुन संपवावीत. जर कोणाला विश्वास असेल कि कांदा भाव याहुन कमी होतील, त्यांनी ५ / १० / २० / २५ पैशाची नाणी जपुन ठेवावीत. अच्छे दिन आ गये.

"लोकमत" मध्ये आज एकमेकांना पूरक अश्या 2 बातम्या आल्या आहेत. पहिली "हजी अली दर्ग्याचे दार महिलांसाठी खुलं, उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय " आणि "त्याला फाईट आणि वातावरण टाईट" करण्यासाठी "मंगळागौरीमध्ये पुरूषांच्या प्रवेशासाठी उच्च न्यायालयात याचिका". याचिका सुद्धा मजेशीर आहे आणि कोर्टाने देखील ती दाखल करून घेतली आहे. इंडिया बदल रहा है...!!!!! http://www.lokmat.com/storypage.php?catid=1&newsid=14321041 http://www.lokmat.com/storypage.php?catid=1&newsid=14321045

रोज आपल्या पत्नीच्या पाया पडतो असे सांगून काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेले संदीप कुमार महिलांसोबत या सीडीमध्ये आक्षपार्हस्थितीत दिसून आल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. संदीप कुमार मूळचे हरियाणातील सारंगथल गावातील आहेत. केजरीवाल सरकारमधून हकालपट्टी करण्यात आलेले संदीप कुमार हे तिसरे मंत्री आहेत. यापूर्वी जितेंद्र तोमर आणि असिम अहमद खान या मंत्र्यांना केजरीवाल सरकारने बाहेरचा रस्ता दाखविला होता. http://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-cm-kejriwal-removes-mini…

आज रिलायन्स ने जीओ दूरसंचार सेवेची अधिकृत घोषणा केली. दिनांक पाच सप्टेंबर २०१६ पासून जिओ नेटवर्क सुरु होत आहे. आपले सादरिकरण करतांना मुकेश अंबानी यांनी जिओ ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजिटल इण्डिया ह्या संकल्पनेला साहाय्यक ठरेल अशी आशा व्यक्त केली. इतर सेवापुरवठादारांना गर्भित धमक्या देत त्यांनी इशारा केला आहे की जिओ च्या कोणत्याही सेवेमधे अडथळा आणण्याचे प्रयत्न करु नये. रिलायन्स जीओच्या उपभोक्त्यांना आयुष्यभरासाठी कॉलसुविधा मोफत असणार असून एक जीबी फोरजी डाटाप्लानसाठी फक्त ५० रुपये द्यावे लागतील त्याच बरोबर विद्यार्थ्यांना २५ टक्के अतिरिक्त डेटा फ्री मिळणार आहे. सांप्रतच्या टेलिसर्विसप्रोवायडरचे कंबरडे मोडणारे हे पाऊल आहे असे दिसत आहे. आगे आगे देखो होता है क्या.

In reply to by संदीप डांगे

मुकेश अंबानींनी रिलायन्सच्या सर्व कर्मचाऱ्यांना जिओ सोडून इतर सर्व्हिस प्रोव्हायडर वापरू नये असे सांगितले आहे. एच आर कडून तसे लिखित आदेश सुद्धा दिले गेले आहेत. हे कितपत योग्य वाटते ? अशी सक्ती एखादी कंपनी करू शकते का ?

In reply to by गणामास्तर

काय वाईट आहे त्यात? मला तरी नाही वाटत. ज्या कंपनीचे स्वतःचे नेटवर्क आहे त्यांनी अशी सर्विस वापरायला काय हरकत आहे? शिवाय कंपनी एम्प्लॉयी म्हणून विशेष सवलती असतीलच. कंपनी सोडल्यावर तर सक्ती नाही ना करणार? मी कर्मचारी असतो तर मला काही समस्या नसती वाटली. नंबर तोच असुद्यात फक्त. सर्विसप्रोवायडर कोन का असेना.

In reply to by गणामास्तर

काय वाईट आहे त्यात? मला तरी नाही वाटत. ज्या कंपनीचे स्वतःचे नेटवर्क आहे त्यांनी अशी सर्विस वापरायला काय हरकत आहे? शिवाय कंपनी एम्प्लॉयी म्हणून विशेष सवलती असतीलच. कंपनी सोडल्यावर तर सक्ती नाही ना करणार? मी कर्मचारी असतो तर मला काही समस्या नसती वाटली. नंबर तोच असुद्यात फक्त. सर्विसप्रोवायडर कोन का असेना.

In reply to by संदीप डांगे

चांगले अथवा वाईट या अर्थाने म्हणत नव्हतो मी. भले सवलतीच्या दरात मिळत असेल, इतर काही फायदे असतील परंतु अशी 'सक्ती' करणे कितपत योग्य आहे ? मला काही कारणास्तव जिओ वापरायचेच नसेल तर जबरदस्ती का म्हणून ?

In reply to by गणामास्तर

मोदक व गणामास्तर, माफ करा, पण ह्यात 'सक्ती' नक्की काय आहे हे मला खरंच कळत नाही आहे. मी आजवर सर्वच कंपन्यांचे नेटवर्क वापरुन पाहिले आहे. मला असा फरक कधीच वाटला नाही. त्यामुळे कदाचित मला हे सक्ती प्रकरण समजत नसावं. जिओ न वापरण्याचं कारण कळलं तर कदाचित समजू शकेल. नाहीतर आयुष्यभर कॉल फुकट, मजबूत नेटवर्क, डेटा स्वस्त अशा उत्तम सर्विसची जबरदस्ती म्हणजे स्वर्गात राहायची जबरदस्ती म्हणेल मी ;)

In reply to by संदीप डांगे

मुकेश अंबानींनी रिलायन्सच्या सर्व कर्मचाऱ्यांना जिओ सोडून इतर सर्व्हिस प्रोव्हायडर वापरू नये असे सांगितले आहे. एच आर कडून तसे लिखित आदेश सुद्धा दिले गेले आहेत. तुम्ही फक्त आणि फक्त MS Office वापरून जे काही काम असेल ते करायचे. कोरल ड्रॉ, फोटोशॉप किंवा आणखी तुम्हाला आवडतील ती सॉफ्टवेअर्स वापरायची नाहीत. ही "सक्ती" चुकीची आहे असे माझे आणि मास्तरचे मत आहे.

In reply to by मोदक

मोदकराव, तुम्ही एमऑफिस व कोरल-फोटोशॉपची तुलना जिओ व इतर नेटवर्क्स अशी नै करु शकत. त्यांची कॅटेगीरीच वेगळी आहे. अ‍ॅडोबची सक्ती आणि कोरलला मज्जाव करणार्‍या अ‍ॅडएजन्सी आहेत. असं काही उदाहरण दिलंत तर समजेल. पण कोरल असो वा अडोबी, (काही लायसन्स इशूज असतात) सक्ती मान्य करु शकतो. कारण कोरल असो वा अ‍ॅडोबी, 'मी' काम काय व कसं करतो ह्यावर अवलंबून असतं, 'सॉफ्टवेअर'वर नाही. इथे आपण संत्र आणि सफरचंद ह्याची तुलना करत नै आहोत. हे म्हणजे या झाडावरच्या 'तमक्या' फांदीवरचं नाही 'अमक्या'च फांदीवरच सफरचंद खायचं अशी सक्ती आहे. आणि तुम्ही म्हणताय आम्हाला कुठल्याही फांदीवरच्या सफरचंदाची मुभा हवी. इट्स गॉना टेस्ट द सेम! मला इतर नेटवर्क्स आणि जिओ ह्याच्यातला फरक समजून घ्यायचा आहे. माझ्यालेखी सगळ्या नेटवर्क्स मधे काहीही फरक नाही. (अपवादः कवरेज, कॉल/डेटा रेट्स यामध्ये असणार्‍या तफावती सोडून)

In reply to by संदीप डांगे

सक्ती नाहीच आहे ह्यात. कोणीही कुठलेही नेटवर्क वापरु शकते. तसेही, समजा दुसरे नेटवर्क वापरले तर कंपनीला काय कळणारे? ----- फक्त जे लोक मोबाईल कंपनीच्या कामासाठी वापरला म्हणुन बिल क्लेम करत असतील त्यांच्या साठी रीलायंस च वापरला पाहिजे अशी अट कंपनीने घातली आहे. त्यात मला काही चुक दिसत नाही आणि सक्ती ही नाही.

In reply to by गणामास्तर

पेपर मधल्या बातम्यांवर मत बनवु नका. कंपनीने सुचना केली असेल, पण सक्ती नाही. कारण सक्ती केली तरी कर्मचारी जर दुसरे नेटवर्क वापरत असेल तर रीलायंस ला कळणार कसे? कोणी म्हणले की मी मोबाईलच वापरत नाही तर काय? सुचना आहे, कंपनीची सेवा वापरुन कंपनीचा ब्रँड कर्मचार्‍यांनी प्रपोगेट इतकीच इच्छा आहे./असावी.

In reply to by गणामास्तर

"सक्ती करणे" हाच मूळ मुद्दा खटकत आहे. बाकी अशी सक्ती अनेक कंपन्या करतात. टाटां मोटर्स मध्ये बाकी ब्रँडच्या गाड्या आत घेणार नाही असे काहीतरी ऐकले होते. हा तसाच प्रकार आहे.

In reply to by मोदक

एक्झॅक्ट्ली तसलाचं प्रकार. .टाटा चे कर्मचारी इतर ब्रँडच्या गाड्या आत घेऊन जाऊ शकत नाहीत. गेटवर गाडी लावून आतपर्यंत तंगडतोड करायची.