दृष्टीदोष असणा-या शालेय विद्यार्थ्यांसाठी लेखनिक हवे आहेत.
पुणेकर मित्र मैत्रिणिंनो,
दृष्टीदोष असणा-या शालेय विद्यार्थ्यांसाठी तातडीने ४० लेखनिकांची (स्क्राईब्ज) आवश्यकता आहे.
२३, २४, २६ आणि २७ ऑगस्ट ह्या तारखांना दुपारी १२ ते १ आणि २ ते ३, तर २४ ऑगस्टला दुपारी २ ते ४ अशा परिक्षांच्या वेळा आहेत. लेखनाचे माध्यम मराठी असून लेखनिकांसाठी वयाची अट नाही.
ज्यांना शक्य होणार असेल, त्या इच्छूक मंडळींनी कृपया तातडीने माझ्याशी संपर्क साधावा. वेळापत्रक, शाळेचा पत्ता, इतर लेखनिकांचे संपर्क आणि काही आवश्यक जुजबी माहिती, इत्यादी तपशील प्रत्यक्ष बोलून आणि वैयक्तिक संपर्कातून देता येतील.
परिक्षार्थींना प्रश्न वाचून दाखवणे, त्यांनी दिलेले उत्तर मराठीमध्ये उत्तरपत्रिकेत लिहिणे असे साधारण शालेय पातळीवरील लेखनिकांच्या मदतीचे स्वरूप आहे. ह्या वयोगटासाठी केवळ वाचणे आणि लिहिता येणे ह्या कौशल्यांची गरज आहे.
इच्छूक लेखनिकांनी परिक्षाकेंद्रावर स्वतःच जायचे आहे आणि ह्या सेवेचा कोणताही मोबदला नाही, ह्याची कृपया नोंद घ्यावी. शासनाकडून अशा लेखनिकांसाठी काही नगण्य मोबदला दिला जातो, तो हवा असल्यास आपापल्या पातळीवर प्रयत्न करण्यास हरकत नाही.
लेखनिकांची विविध वयोगटांसाठी, विविध परिक्षांसाठी आणि विविध गावांमध्ये वरचेवर आवश्यकता असते. परिक्षेच्या प्रकारानुसार लेखनिकांच्या मदतीच्या स्वरुपात बदल होतात. ज्यांना वरील कालावधीसाठी शक्य नाही, मात्र इतर वेळी कधी ते उपलब्ध होऊ शकणार असतील, तरीसुद्धा संपर्क साधावा. त्यांच्या मदतीचा खुप उपयोग होऊ शकेल.
अनेक आवाहने करूनही अजूनही पुरेसे लेखनिक उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. ह्यासंदर्भात काही उपयुक्त सल्ले आल्यासही बरे होईल.
मनःपुर्वक धन्यवाद.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
या उपक्रमाचे Corporate Social
+१
एक काम करू शकाल।
+१
मला खरंच शक्य नाहीये, पण बाकी
उपयुक्त सल्ल्यासाठी धन्यवाद.
स्तुत्य उपक्रम.
सई, खूप चांगलं काम करते आहेस.
खरंच खूप स्तुत्य काम आहे।
अतिशय कौतुकास्पद!
___/\___
धन्यवाद मंडळी.
स्तुत्य उपक्रम....
एक नंबर काम आहे तुमचं.
स्तुत्य उपक्रम!
रुपी,
आवश्यक तेवढे लेखनिक मिळाले आहेत,
ओह, बरं झालं, चांगली बातमी.
सीएसआर बद्दल