लेखककेडीयांनी शनिवार, 20/08/2016 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य
४ अंडी
१ कांदा बारीक चिरून
५ ते ६ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
१/२ इंच आल्याचा तुकडा, बारीक चिरून
३ ते ४ लाल सुक्या मिरच्या
१ चमचा तिखट चिली सॉस
१ चमचा सोया सॉस
१ चमचा टोमॅटो सॉस
१ चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर
१ चमचा मध
१ मोठा चमचा तेल
मीठ, चवीनुसार
कृती
नेहेमीची अंडा भुर्जी, बॉइल्ड एग भुर्जी खाऊन कंटाळा आलेला असेल तर हा एक थोडा वेगळा प्रकार करून बघा. थोडासा गोडसर तिखट असल्यामुळे मुलं आवडीने खातात. तिखट हवे असल्यास मिरच्या वाढवा किंवा तेलात हिरवी मिरची वापरू शकता. कांद्या ऐवजी कांदेपात वापरली तर चव अजून खुलेल.
अंडी उकडून, सोलून त्याच्या गोल चकत्या कापून घ्या. पॅन मध्ये तेल गरम करून त्यात लाल मिरच्यांचे तुकडे करून घाला. मिरच्या थोड्या परतून मग त्यात आलं, लसूण घाला. थोडा वेळ परतून मग चिरलेला कांदा घालून कांदा मऊ होऊं द्या.
आता पॅन मध्ये, सोया, टोमॅटो आणि चिली सॉस घालून मिश्रण एकजीव करून घ्या. एक चमचा मध घालून ढवळून घ्या. अंड्यांच्या चकत्यांवर कॉर्नफ्लॉवर भुरभुरा आणि त्या हळुवारपणे पॅन मध्ये घाला. अलगद हाताने अंडी परतून मसाला सगळीकडून लावून घ्या.
चवीनुसार मीठ घालून, गरम गरम स्वीट न स्पायसी एग्स सर्व्ह करा!
धागा त्यांचा मिरच्या तुम्हाला झोंबल्या?
धाग्यावर दिलेल्या प्रतिसादाबद्दल हलकं घ्यायचं कि कसं ते दिक्षीत साहेब पाहून घेतील. तुम्ही तेवढं ते वैयक्तीक प्रतिसाद आवरा.
किसन्या, तू श्रावण महिना असून अगदी ठळक स्पायसी एग असा लिहिलेला धागा उघडलाच कशाला?
.
कुठं कुठं म्हणून न्यायची सोय नाही ह्याला.
बारमध्ये गेलो तर बूस्ट मागणार हे देव.
वजनाने जड पात्याची धारधार सुरी वापरा आणि त्या पात्याला अगदी नियमीतपणे (शक्यतो आठवड्यातून एकदा) धार करा.
भुश्श्यासारखा बारीक कांदा चिरायचा असेल तर सगळे काही सुरीवर अवलंबून असते.
हा व्हिडीओ बघा.
वजनाने जड पात्याची धारधार सुरी वापरा आणि त्या पात्याला अगदी नियमीतपणे (शक्यतो आठवड्यातून एकदा) धार करा.
अहो अशी दर आठवड्याला धार काढली तर सूरी 4 महिन्यात खलास होईल! :-)
व्हिडिओत दाखवलंय, किंवा मास्टर शेफ वर आपण बघतो, कि एका स्टील च्या खरखरीत रॉड वर ते सुऱ्या घासतात, त्याला होनिंग म्हणतात.
स्टेनलेस स्टील च्या सुऱ्या साधारण २ ते ४ वेळा वापरल्या कि होनिंग कराव्या, कार्बन स्टील ची पाती मात्र प्रत्येक वेळी वापरताना होन करावी.
सुऱ्यांना धार मात्र सहा महिने किंवा वर्षातून एकदा काढली कि पुरते.
सुऱ्या बद्दल लिहीन एकदा सविस्तर.
अरे क्या बात है! जियो सरजी जियो! कमाल फोटो! आपण टाकलेली पाकृ कोणीतरी करून बघावी आणि चव आवडावी ह्या पेक्षा दुसरं सुख नाही. खरंच तुमचं मनापासून कौतुक आणि आभार!
प्रतिक्रिया
हीच पाककृती अंडे न घालता कशी
अंडं तुम्ही नं घालता कोंबडीने
In reply to हीच पाककृती अंडे न घालता कशी by किसन शिंदे
ओ पाटील
In reply to अंडं तुम्ही नं घालता कोंबडीने by संजय पाटिल
सामना मिक्सड डबल नाहीये तर
In reply to ओ पाटील by किसन शिंदे
हाहाहा....
In reply to अंडं तुम्ही नं घालता कोंबडीने by संजय पाटिल
ओ मालक
In reply to हाहाहा.... by केडी
किसन्या, तू श्रावण महिना असून
In reply to ओ मालक by किसन शिंदे
इंग्रजी नाव असूनही मराठीत
In reply to किसन्या, तू श्रावण महिना असून by अभ्या..
वरील अगदी बरोबर
In reply to हाहाहा.... by केडी
पनीर नाही तर बटाटे घालुन..
In reply to हीच पाककृती अंडे न घालता कशी by किसन शिंदे
मी पयला!
मी पाह्यलं, पण तू पयला नाय
In reply to मी पयला! by कैलासवासी सोन्याबापु
छान रेसेपी! करुन बघेन!
तूर्तास काही नाही.
फोटो जीवघेणा आहे तो पहिला!!
मस्त!
आधी ते 'कॉकटेल' सोकाजीराव
In reply to मस्त! by सोत्रि
खलास
का हो?
धन्यवाद.....
In reply to का हो? by आनंदी गोपाळ
एक आपलं बेसिक.........
वजनाने जड पात्याची धारधार
In reply to एक आपलं बेसिक......... by सदानंद पाटील
मोदक, 'स्वयं' पाकसिद्धी करत
In reply to वजनाने जड पात्याची धारधार by मोदक
बकेट लिस्ट हो.. बकेट लिस्ट..!
In reply to मोदक, 'स्वयं' पाकसिद्धी करत by उडन खटोला
वजनाने जड पात्याची धारधार
In reply to वजनाने जड पात्याची धारधार by मोदक
सुऱ्या बद्दल
In reply to वजनाने जड पात्याची धारधार by केडी
मग बहुदा मी होनिंग म्हणत असेन
In reply to वजनाने जड पात्याची धारधार by केडी
करूनच पाहिली पाहिजे ,दिसायला
+१
अरेरे
धन्यवाद.....
In reply to अरेरे by बाबा योगिराज
येवढा झब्बू पुरे का?
तुम्हाला गप्प बसवत नाही का हो
In reply to येवढा झब्बू पुरे का? by आनंदी गोपाळ
तोच तर प्रॉब्लेम असतो ना.
In reply to तुम्हाला गप्प बसवत नाही का हो by पिलीयन रायडर
अरे क्या बात है! जियो सरजी जियो!
In reply to येवढा झब्बू पुरे का? by आनंदी गोपाळ
फोटो काय भारी दिसतोय.