सुबोध खरे साहेबांचा शृंगापत्ती हा धागा वाचताना ही गोष्ट आठवली.
प्रथम माफीनामा..
वीस वर्षा नंतर मराठीत लिहायचा पहिला प्रयत्न करतोय कारण शेवटचा प्रयत्न मी दहावीत असताना केला होता आणि मागच्या जन्माच्या पुण्याईने काठावर पास पण झालो होतो.
थोडकयात सांगायचा ऊद्देश..सांभाळून घ्या.
( ही गोष्ट पुस्तकाची/ सिनेमाची कथा आसू शकते जी मिपा कराना आगोदर पासून माहित असेल.)
ही गोष्ट आहे युरोपातली पण माझ्या मराठी वरून ती पश्चिम महाराष्ट्रातील वाटू शकते आणि वाटलं तरी काय फरक पडणार नाय.. भावना पोहोचवणं महत्वाचं.
तर फार फार वर्षा पूर्वी (म्हणजे मला माझ्या मित्रांनी सांगून दहा वर्षे झाली त्याच्या अगोदरची) एका युरोपातली (कलाकारांच्या नावावरून असाच वाटतंय) आटपाट नगरात एका अनाथ आश्रमात सर्व मुले मुली आनंदात राहत होती. त्यातच आपल्या गोष्टीची हिरॊयन लीना ( गोष्ट वाचून हिरॊयन का व्हिलन तुमचं तुमी ठरवा) राहत होती. आता हिरॊयन म्हणल्यावर सुंदर तर असणारच. आशा ह्या सुंदर हिरॊयन बरोबरच सैफ नावाचं आणखी एक पात्र असतं (गोष्ट वाचून हिरो का व्हिलन तुमचं तुमी ठरवा). शाळेत असताना सैफ च्या मनात लीना घुसती आणि तो तिला विचारायचे ठरवतो.
सैफ:- (लीना ओ लीना दिल तुने छिना आस काहीहि नं म्हणता) तू मला आवडती तुझं काय मत माझ्या बद्दल?
लीना:- ( ऐ माकडा आरशात तोंड बग, आला म्होटा..आस काहीहि नं म्हणता) माझ्या मनात आस काहीही नाही. मला अभ्यास करून मोठं व्हायचेय.
सैफ:- लीना.... हा चेहरा नीट लक्षात ठेव लीना...., मै तुमे भूल जाऊं ये हो नाही सकता और तुम मुझे भूल जावं ये मै होणे नही दुगा. आस काय बाय म्हणून तणतणत निगुन गेला.
दिवसा मागून दिवस गेले. पावसाळ्या नंतर हिवाळा आला आणि निगुन गेला, हिवाळ्या नंतर उन्हाळा आला आणि तो हि निगुन गेला. वर्षा मागून वर्षे गेली. लीनाने शाळा कॉलेज संपवून कंपनीत जॉब पकडला. त्याचं कंपनीत व्हिक्टर नावाचं एक पात्र असतं ( गोष्ट वाचून हिरो का व्हिलन तुमचं तुमी ठरवा). कंपनीत असताना व्हिक्टर च्या मनात लीना घुसती आणि तो तिला विचारायचे ठरवतो.
व्हिक्टर:- (लीना ओ लीना दिल तुने छिना आस काहीहि नं म्हणता) तू मला आवडती तुझं काय मत माझ्या बद्दल?
लीना:- अरे वा..( माझा पगार xx आणि त्याचा पगार xxxx असा काहीही विचार नं करता) मला ही आवडेल तुझ्या बरोबर लगीन करायला.
व्हिक्टर:- ओकचं.. मग ठरलं.. तुळशी च्या लग्नाच्या दुसाऱ्या दिवशी आपण लगीन करायचं. प्रॉमिस
लीना:- प्रॉमिस..
दिवसा मागून दिवस गेले. गणपती आले आणि निगुन गेले. दसऱ्या नंतर दिवाळी आली आणि तीही निगुन गेली. तुळशीचंही लगीन झालं आणि तो दिवस आला. ( तो किव्हा त्या नंतरचा दिवस असे दोनच मुहुर्थ आहेत त्या नंतर त्यांचे लगीन नाहीं हौऊ शकत, का ते विचारू नका, नाय तर गोष्टी ची गरज समजा). नदीच्या पलीकडील एका चर्च मधी लगीन करायचं ठरत. दोघे चर्च मधी जातात.
व्हिक्टर:- लीना आज आपल्या आयुषातला सगळ्यात महत्वाचा दिवस... तुही अनाथ मीही अनाथ...
मेरे यार कि शादी है म्हणणारे आपले मित्र पाहिजे होते.
लीना: ठीक हाय. तू तुझे मित्र बोलावं मी माझे बोलावते.
लीना नावेतून नदी पार करून अलीकडे येण्यासाठी निघते. त्याचं नावेत नावाडी मार्टिन नावाचं एक पात्र असतं (गोष्ट वाचून हिरो का व्हिलन तुमचं तुमी ठरवा).
लीना:- भैया, पलीकडं जानेका है.
मार्टिन:- सो रुपये लागेगा.
लीना:- लास्ट टाईम तो पचास लिया था.
मार्टिन:- सो रुपये लागेगा आणा है तो आओ.
बिचार्या लीलांनी तिच्याकडे असणारी शेम्भार ची नोट मार्टिन ला दिली. तिनं गावात जाऊन चेक केलं पण तिला कुणीही मित्र भेटला नाहीं. भेटला तो फक्त सैफ.
लीना:- अरे तू सैफ ना. ओळखलंस मला?
सैफ:- तुला विसरीन तो टाईम वेगळा असेल सर्वांच्या डोळयात पाणी आणि या जगात मी नसेन..
लीना:- अरे एका ना. उदय माझे लगीन हाय ये (माझ्या नवऱ्याचा कान पिळायला).
असा म्हणून लीना ने सैफ च्या जुन्या जखमेवर मीठ चोळले. सैफ च्या मनात विचारांचे आणि त्या गावात वाऱ्याचे वादळ उठले. लीना च्या लक्षात आले कि आता आपल्याला लवकर मागे गेलं पाहिजे. लीना पळत पळत नावे जवळ आली.
लीना:- भैया, पलीकडं जानेका है.
मार्टिन:- पाचसो रुपये लागेगा.
लीना:- लास्ट टाईम तो सो लिया था.
मार्टिन:- जोरसे हवा चल रही है. सो रुपये के लिये मै मेरी जान धोके में नाहीं डलुंगा. (पाचसो रुपये के लिये डलुंगा)
लीना:- मेरे पास तो सो रुपये ही है.
मार्टिन:- तो किसी के पास से लेके आओ.
लीना परत सैफ पाशी येते आणि घडलेली हकीकत सांगते आणि चारशे रुपये मागते. सैफ (मनातल्या मनात) हीच ती वेळ हाच तो टाईम.
सैफ:- हे बग. मी तुला पैसे देतो पण पण पण .... आजची रात्र माझ्याबरोबर घालावं.
लीना:- निर्लज्य, नालायक. बीप बीप बीप ( शव्या देऊन जाते )
घडलेली हकीकत नावाडी मार्टिन सांगते आणि विनंती करते कि पलीकडं गेल्यावर व्हिक्टर कडून घेऊन सर्व पैसे देते. पण ऐकेल तो मार्टिन कसला..
मार्टिन:- मॅडम, घोडा घास के साथ दोस्ती करेगा तो खयेगा क्या?
शेवटी लीना कडे कुठला हि पर्याय शिल्लक राहत नाय आणि अपरीहार्य कारणा मुळे ती रात्र सैफ बरोबर घालवते.
लग्नाचा दिवस.. गोष्टीतलं शेवट चा पात्र (पाव्हणा कलाकार) त्याचं नाव फेडरर असतं (गोष्ट वाचून हिरो का व्हिलन तुमचं तुमी ठरवा) जो कि कॉमन दोस्त असतो सैफ आणि व्हिक्टर चा. त्याला रात्री चा प्रकार माहित असतो आणि लीना च आपल्या दोस्तांशी लगीन होणार हे समजल्यावर तो व्हिक्टर ला सर्व हकीकत सांगतो..
व्हिक्टर:- लगीन कॅन्सल... पॅक अप..
द एन्ड..
आता ह्या गोष्टीत पाच पात्र आहेत.
1) लीना
2) सैफ (लीना चा शाळेतील दोस्त)
3) व्हिक्टर (लीना चा होणारा नवरा)
4) मार्टिन (नावाडी)
5) फेडरर (कॉमन दोस्त सैफ आणि व्हिक्टर चा)
प्रत्येक पात्र बरं केव्हा वाईट आहे. तुमच्या नजरेतून सगळ्यात चांगलं पात्र कुठलं. पाचही जणांना क्रमाने लावून प्रतिसाद द्या.
आणखी एकदा माफीनामा. पहिला प्रयत्न सांभाळून घ्या
वाचन संख्या
4471
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमच्या नजरेतून सगळ्यात
हे म्हणजे वेताळाने गोष्ट
तुम्हि लिहीत रहा राव
अगदी विचारप्रवर्तक
गुड।।
सगळेच कमीजास्त बरेवाईट
छे!
In reply to सगळेच कमीजास्त बरेवाईट by पैसा
आवडली
असली भन्नाट, दिलखेचक, तेजस्वी, निष्कलंक, हलकट
बाडीस, बाडीस!
In reply to असली भन्नाट, दिलखेचक, तेजस्वी, निष्कलंक, हलकट by बोका-ए-आझम
+१..
In reply to असली भन्नाट, दिलखेचक, तेजस्वी, निष्कलंक, हलकट by बोका-ए-आझम
गोष्ट एखाद्या सिनेमाचा प्लॉट
खुलासा हवा
घ्या...
व्हिक्टर
व्हिक्टर
In reply to व्हिक्टर by कपिलमुनी
क्या बात क्या बात क्या बात!
खूपच सुंदर शैली...भाषा आणि
पैल्याच
वर्जन
मी टायटल देतो. लोन लेना लीना
In reply to वर्जन by मराठी कथालेखक
लोन लेना लीना
हा हा हा ...धन्यवाद
In reply to मी टायटल देतो. लोन लेना लीना by अभ्या..
रात्र नावाड्याभौ सोबत घालविली