Skip to main content

माझी पण शृंगापत्ती

Published on शुक्रवार, 19/08/2016
शृंगापत्ती रूपेश पाटील* ( नाव बदललेले आहे) हि एक सॉफ्ट वेअर कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला आहे. तेथे असणाऱ्या सर्व सोयी सुविधा आणि मोकळॆ वातावरण याचा तो मनसोक्त उपभोग घेते. त्यात त्याच्या बरोबर काम करणाऱ्या इतर मित्रमंडळी पैकी एका रूपाली* बरोबर त्याचे धागे जुळले. एके दिवशी तो रूपालीची पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आला. त्याने रूपालीला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले. अर्थात रुपाली गरोदर होतीच. त्याला हा गर्भ नको होता. कारण रूपालीला फार पगार नव्हता. रूपेशचे विचार वेगळे होते. त्याला चांगला पगार असणारी मुलगी हवी होती. चार पैसे जास्त असले कि खरेदी खाणे पिणे पर्यटन यावर कसा सढळ हस्ते खर्च करता येतो. ही मुलगी फार पगार मिळवत नव्हती. मग काय, बस, आपण फक्त चांगले मित्र राहूया असे रूपेशने तिला सांगितले. अर्थात हा गर्भपात झालाच. रूपाली माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली तिथे तिने रीतसर गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या. दुर्दैवाने पूर्ण गर्भपात झाला नाही आणि थोडेसा भाग आत राहिला होता हे सोनोग्राफीत समजून आले मग परत एक छोटीशी शल्यक्रिया आणि सर्व आलबेल झालं. आता यापुढे दोन वेगवेगळ्याअ गोष्टी आहेत - (१) सात आठ महिन्यांनी माझा हा मित्र त्याला मित्राच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण आले म्हणून गेला. स्वागत समारंभासाठी गेला. मित्राबरोबर गप्पा टप्पा झाल्या. कुणाची मुले काय करताहेत? एक कोण तरी आजोबा झाला होता त्याची म्हातारा म्हणून यथेच्छ टिंगल करून झाली. सून कुठली आहे तिचे घराणे, खानदान,, हनिमूनला कुठे जाणार इ सर्व चर्चा झाल्या आणि वधूवराना भेटायला हा स्टेज वर गेला. मुलाला अभिनंदन म्हणून हस्तांदोलन केले आणि वधूकडे वळून पहिले तर "रुपाली" . आमचा मित्र एकदम चमकला. त्याचा चेहरा उतरला. रुपालीने अर्थात ओळख दाखवली नाही. सासऱ्याचे "डॉक्टर मित्र" म्हणून नमस्कार चमत्कार झाले. आमच्या मित्राला तेथे असलेले सुग्रास स्नेहभोजन काही घशाखाली उतरेना. तेवढ्यात त्याला एक फोन आला. त्याची संधी घेऊन मित्रांमधून हा मला कॉल आहे मी निघतो म्हणाला. मित्रमंडळींनी नेहमीप्रमाणे हा "बायकांच्या घोळक्यात कृष्ण" असतो म्हणून थट्टा केली ती पण त्याला जीवावर आली. एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची शपथ घेतलेली, दुसरीकडे मित्राला फसवले गेल्याची भावना या दोलायमान परिस्थितीत चार दिवस त्याने अस्वस्थतेत घालवले. बायकोशी बोलायचे तर बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही. पाचव्या दिवशी त्याने मला फोन केला आणि हि कहाणी सांगितली. (मी त्याच्या त्या मित्राला ओळखत नाही.) मी त्याला गीतेतील "कर्मण्येवाधीकारस्ते सारखे ज्ञानामृत पाजले. काही दिवसांनी त्याला या मित्राच्या घरी जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा परत हीच कहाणी. सुनेच्या दृष्टीत त्याला न बोलून तिरस्कार दिसतो आणि सासू सारखी म्हणत होती "भावजी तुमचं लक्ष कुठाय" गेले नाही तर एक चांगला मित्र गमावण्याची शक्यता किंवा गेलो तर आपले "स्वागत" तेथे "नाही आले तर बरे"असे होणार हि बोच अशा शृंगापत्तीत तो आहे. (२) सात आठ महिन्यांनी माझा हा मित्र त्याला मित्राच्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण आले म्हणून गेला. स्वागत समारंभासाठी गेला. मित्राबरोबर गप्पा टप्पा झाल्या. कुणाची मुले काय करताहेत? एक कोण तरी आजोबा झाला होता त्याची म्हातारा म्हणून यथेच्छ टिंगल करून झाली. सून कुठली आहे तिचे घराणे, खानदान,, हनिमूनला कुठे जाणार इ सर्व चर्चा झाल्या आणि वधूवराना भेटायला हा स्टेज वर गेला. मुलीला अभिनंदन म्हणून हस्तांदोलन केले आणि वधूकडे वळून पहिले तर "रुपेश" . आमचा मित्र एकदम चमकला. त्याचा चेहरा उतरला. रुपेशने अर्थात ओळख दाखवली नाही. सासऱ्याचे "डॉक्टर मित्र" म्हणून नमस्कार चमत्कार झाले. आमच्या मित्राला तेथे असलेले सुग्रास स्नेहभोजन काही घशाखाली उतरेना. तेवढ्यात त्याला एक फोन आला. त्याची संधी घेऊन मित्रांमधून हा मला कॉल आहे मी निघतो म्हणाला. मित्रमंडळींनी नेहमीप्रमाणे हा "बायकांच्या घोळक्यात कृष्ण" असतो म्हणून थट्टा केली ती पण त्याला जीवावर आली. एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची शपथ घेतलेली, दुसरीकडे मित्राला फसवले गेल्याची भावना या दोलायमान परिस्थितीत चार दिवस त्याने अस्वस्थतेत घालवले. बायकोशी बोलायचे तर बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही. पाचव्या दिवशी त्याने मला फोन केला आणि हि कहाणी सांगितली. (मी त्याच्या त्या मित्राला ओळखत नाही.) मी त्याला गीतेतील "कर्मण्येवाधीकारस्ते सारखे ज्ञानामृत पाजले. काही दिवसांनी त्याला या मित्राच्या घरी जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा परत हीच कहाणी. जावयाच्या दृष्टीत त्याला न बोलून तिरस्कार दिसतो आणि सासू सारखी म्हणत होती "भावजी तुमचं लक्ष कुठाय" गेले नाही तर एक चांगला मित्र गमावण्याची शक्यता किंवा गेलो तर आपले "स्वागत" तेथे "नाही आले तर बरे"असे होणार हि बोच अशा शृंगापत्तीत तो आहे. ============================================= खरेकाकांच्या धाग्यावर चांगली चर्चा चालू आहेच, पण तोच प्रसंग जर दोन वेगवेगळ्या प्रकारे मांडला तर तुमच्या प्रतिक्रिया काय असतील हे बघण्यासाठी हा प्रपंच. टेक्निकल चूका काढू नयेत ही विनंती.

वाचन संख्या 5034
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

"सग्गळे पुरुष मेले तस्लेच अस्तात...करून सवरून नामनिराळे...बिच्चार्या मुलींना नादावून फसवतात हो" छाप प्रतिक्रियांच्या अपेक्षेत

रूपेश पाटील* ( नाव बदललेले आहे) हि (हा हा हा) एक सॉफ्ट वेअर कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला आहे. हिट विकेट.

रूपेश पाटील* ( नाव बदललेले आहे) हि एक सॉफ्ट वेअर कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला आहे. तेथे असणाऱ्या सर्व सोयी सुविधा आणि मोकळॆ वातावरण याचा तो मनसोक्त उपभोग घेते.
तुमच्यात कर्त्याप्रमाणे क्रियापद चालत नै काय हो?

काचेचं भांडं हे स्त्रीच्या अब्रुसारखे असते... तडकले की गेलं. पुरुषाची अब्रू म्हणजे जुना तांब्या पितळेचा हंडा .... कितीही पोच येतील पण तडकत नाही.

विडंबन तसा गंभीर (?! ;) ) प्रकार आहे. तो नीट झाला तर मजा येते, नाहीतर विडंबनाचाच इनोद बनतो ;) सून कुठली आहे तिचे घराणे, खानदान,, हनिमूनला कुठे जाणार इ सर्व चर्चा झाल्या आणि वधूवराना भेटायला हा स्टेज वर गेला. मुलीला अभिनंदन म्हणून हस्तांदोलन केले आणि वधूकडे वळून पहिले तर "रुपेश" . ??? इतर विरोधाभासी नजरचूका इतर प्रतिसादांत आल्या आहेतच.

हो खरे आहे. जरा घाईघाईत लिहायचा प्रयत्न केल्यामुळे झाले खरे. खरे तर हे विडंबन नव्हते. पण खरेकाकांच्या गोष्टीमध्ये केंद्रस्थानी जर मुलगा असता तर बघणार्‍यांचा काय दृष्टीकोन काय राहिला असता हे जाणून घेण्याचा एक प्रयत्न होता. पण तो त्यातल्या व्याकरणाच्या चुकांमुळे वेगळ्याच दिशेने गेला. खाली डिस्क्लेमर होता खर तर, पण असो.

In reply to by किंबहुना

माफ करा पण तुम्ही एवढ्या पूर्ण लेखात "रूपेश, आता यापुढे दोन वेगवेगळ्याअ गोष्टी आहेत , (१),(२)", एवढचं स्वतः लिहाल. बाकी तर फक्त लिंग बदल करायचा होता...

इस लिंग बदलती दुनियामें इन्सानकी नियत ठीक नही

In reply to by तिमा

ठ्ठो करून हसू आलं! लई भारी!

In reply to by तिमा

निकला न करो तुम् घाईकरकर, मि.पा.की नियत ठीक नही! :)

In reply to by प्रदीप

मुद्देसे हटाओ ध्यान अपना ये तत्व ईमान रहने दो. धागे को संभालो ट्रोलोंसे मि.पा.की नियत ठीक नही!

तरीपण....किंबहुना सर्व सुखी..!