Skip to main content

पुण्यातील माहिती अधिकारी कार्यकर्त्याच्या हत्येचे गूढ

लेखक योगेश कोकरे यांनी बुधवार, 10/08/2016 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या एक जुनी बातमी वाचली ,,,पुण्याच्या एक RTI कार्यकर्ते ची हत्येच्या तपासाची....... तो कार्यकर्ता एका रोड बनवणाऱ्या कंपनीने अवैधरित्या संपादित केलेल्या जमिनीची माहिती बाहेर काढत होता. जेव्हा त्या कंपनी चे गैरव्यवहार बाहेर पडायला सुरवात झाली ,,,त्या नंतर लगेचच या कार्यकर्त्याला पुण्यात अतिशय क्रूर पद्धतीने मारून टाकण्यात आले . त्या नंतर पोलिसानी ज्या पद्धतीने तपास केला त्याचे परिणामी CBI कडे case सोपवण्यात आली. त्या कार्यकर्त्याच्या सख्या भावाने त्याचा लढा पुढे चालू ठेवलाय. तो highcourt मध्ये स्वतः म्हणणे मांडतोय.आणि सगळ्यात वाईट म्हणजे cbi ने पण त्याला आता ठेंगा दाखवलाय . CBI केस बंद करायच्या विचारत आहे म्हणजे बंदच केली होती ,पण त्या सख्या भावाने पुन्हा कोर्टात पिटीशन दाखल करून CBI ला CASE तपास करायला भाग पाडले. कार्यकर्त्याच्या हत्येला 5 वर्ष उलटून गेल्यावर पण काहीच तपास नव्हता . त्या सख्या भावाचा संशय त्या रोड बनवणाऱ्या कंपनी च्या मालकावर होता ,ती कंपनी महाराष्टाली खूप मोठी रोड बनवणारी कंपनी आहे.ज्यात खूप मोठया लोकांचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत. एखाद्या चित्रपटाला शोभेल अश्या काही गोष्टी या case मध्ये घडल्या आहेत. आता सगळ्या पात्रांची नावं सांगतो. ज्याचा खुन झाला ते सतीश शेट्टी त्यांचा सख्खा भाऊ संदीप शेट्टी रोड बनवणारी कंपनी IRB इन्फ्रा. कंपनी चे मालक वीरेंद्र म्हैसकर. या हत्येची पार्श्वभूमी बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असेल . सतीश शेट्टी RIT कार्यकर्ते होते.irb इन्फ्रा ने मुंबई पुणे द्रुतगती मार्ग या शेजारील गावात अवैधरित्या जमीन संपादित केली होती असा सतीश शेट्टी ना संशय होता . माहितीच्या अधिकाराखाली त्यांनी सगळी माहिती मागवली आणि त्यांच्या लक्षात आले कि इथे काही काळेबेरे कारभार चाललाय.ज्यामध्ये सरकारी अधिकारी ,irb इन्फ्रा चे अधिकारी ,राजकीय लोक यांचे हितसंबंध गुंतले होते. त्यांनी irb विरोधात complaint दाखल केली. त्यानंतर त्यांना IRB कडून साम, दाम,दंड ,भेद हि नीती अवलंबली गेली. आधी धमकीवजा समाजवण्यात आले.तरी ते ऐकले नाहीत. मग 2 कोटी ची लाच देण्याची गोष्ठ झाली ती हि त्यांनी नाकारली. मग त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यांनी मग पोलीस संरक्षण मागितले कारण त्यांना काही लोकांकडून धोका होता .त्या लोकांची नावे पण त्यांनी पोलिसांना लिहून दिली . तरीपण त्यांची हत्या करण्यात आली. या नंतर या हत्येचा तपास सुरु झाला. तपास करणारे अधिकारी यांनी जणू आधीपासूनच ठरवले होते कि काही लोकांना जाणूनबुजून वाचवायचे आहेत.त्या साठी त्यांनी बनावट साक्षीदार तयार केले.त्यात त्यांना यश आले नाही. त्यात एक चमत्कार घडला .राज्य सरकार ने हा तपास CBI म्हणजे देशाची सर्वोच्च तपास यंत्रणे कडे कोणीही मागणी न करता सोपवली. त्या वेळी गृहमंत्री होते आपले आबा .जे आता आपल्यात नाहीयत. CBI कडे CASE गेली कि लोकांना वाटते कि आता दुध का दुध और पाणी का पाणी होते.तसंच सतीश शेट्टी यांचे भाऊ ना पण वाटले ,आणि तपासाची सूत्रे cbi ने मुंबईच्या STF कडे दिली . STF ने चालढकल केली त्यात एक वर्ष गेलं ,त्यानंतर HIGH कोर्ट मध्ये STF म्हटले कि आम्हाला लोंकांची चौकशी करायची आहे,तेव्हा HIGH कोर्ट ने ताशेरे ओढत म्हटले कि या लोकांची नावे संदीप शेट्टी ने एक वर्षांपूर्वी तुम्हाला सांगितली आहेत .आणि तुम्ही एकवर्ष नंतर तीच नावे आम्हाला सांगताय .मग तुम्ही एक वर्ष काय केलं? अशी ऑर्डर पण त्यांनी दिली ,याची दखल CBI चे एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊन STF कडून तपास काढून घेतला आणि पुण्याचा ACB कडे दिला.नंतर तपासाणे जोर धरला. IRB च्या कार्यालयांवर छापे टाकले .खुप गोष्टी पुढे आल्या. परंतु त्यानंतर CBI च्या वकिलांनी कोर्टात ARGUMENT करणंच बंद केलं.का कोणास ठाऊक, थोड्याच दिवसांनी हि case बंद करायचा निर्णय cbi ने घेतला. परंतु संदीप शेट्टी यांनी हार न मानता पुन्हा कोर्टाचे दरवाजे ठोठावले .पुन्हा नव्याने पिटीशन दाखल केली . आणि त्यात रिस्पॉन्डन्ट म्हणून cbi चे डायरेक्टर ,आणि तपास करनारे अधिकारी यांना केले.त्यावेळी कोर्टाने पण संदीप शेट्टी ना विचारले कि आपण इतक्या वरिष्ठ पातळीच्या लोकांना कसे काय रिस्पॉन्डन्ट करू शकता...त्यावेळी संदीप यांनी स्वतः कोर्टाला आपले म्हणणे पटवून दिले व कोर्टाने हे मान्य केले. आणि आता height म्हणजे CBI हि CASE पुन्हा रेइन्वेस्टीगेट करणार आहे.म्हणजे इतके वर्षे cbi काय भाकऱ्या थापत होते कि काय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यात हितसंबंध कसे काय आहेत आणि कोनाकोनाचे आहेत याचा थोडा अभ्यास केला तर असे दिसून येते कि आपल्या देशातील खुप मोठ्या मोठ्या लोकांचा हात आहे. देवेंद्र म्हैसकर जे फोर्ब्स मासिकानुसार देशातील पहिल्या 50 श्रीमंत लोकांमध्ये आहेत. आणि श्रीमंतीचे रहस्य काय तर रोड तयार करायची मोठी मोठी कंत्राट याना मिळत गेली. Virendra हे नवीमुंबई येथील एका कॉलेज मध्ये डिप्लोमा झालेले आहेत. त्यानंतर ते त्यांच्या कौटुंबिक व्यवसायात दाखल झाले. वीरेंद्र म्हासीस्कर चे वडील कंत्राटदार असताना ते मुंबई मध्ये स्थायिक होते.शिवसेना भाजपा च्या जवळचे होते .ह्या हितासंबंधाच्या जोरावर त्यांनी युतीच्या सरकार वेळी खूप मोठी कंत्राटे मिळवली .आणि त्यावेळी महाराष्ट्र सरकार मध्ये बांधकाम व परिवहन मंत्री होते नितीन गडकरी . साहजिक गडकरी यांच्या संमती शिवाय इतकी मोठी कंत्राट मिळणं शक्य नव्हतं. आणि नितीन गडकरी यांचे सुपुत्र देखील या कंपनी च्या भगिनी कंपन्या मध्ये डायरेक्टर बॉडी वर होते असा एक आरोप आहे . या कंपनी मध्ये शरद पवार यांचे पण हजारो शेर आहेत आणि हे त्यांनी जाहीर केले आहे. त्यात आता पुन्हा युतीचे सरकार आहे . आणि राज्यातली व्यक्ती नितीन गडकरी आता केंद्रात आहेत . साहजिक त्यांचे वजन केंद्रात खुप आहे. योगायोग बघा , जसं केंद्रात bjp सरकार आले तसं सतीश शेट्टी case मध्ये cbi काम करणं बंद झालंय, म्हणजे ते मनापासून काम करत नाहीय. त्यांना हि case काहीही करून बंद करावी असे आदेश आहेत असाही आरोप संदीप शेट्टी यांनी केला आहे. इतकं सगळं लिहायचं कारण कि आपल्या देशात विश्वास ठेवायचा तर कोणावर . राज्यसरकार,राज्यपोलिस, तपास यंत्रणा,राज्यकर्ते,CBI, CID, मंत्री कि आणखी कोण? आपण अराजकतेकडे वाटचाल करत आहोत का? असे आणखी 14 rti कार्यकर्ते यांचे बळी गेलेत,,,,त्यांचा तपास शुन्य दाभोलकर गेले, कलबुर्गी गेले,पानसरे गेले, यांना जेम्स बॉन्ड ने मारले काय? कि कोणीही या गोष्टींचा छडा लाऊ शकत नाही का यांनी सर्वांनी स्वतः स्वतः च्या हत्या केल्या,,,सलमान खान case मध्ये चिंकारा काळविटाने पिस्टल ने आत्महत्या केली का?कि फुटपाथ वर झोपलेले लोक स्वतः सलमानच्या गाडीखाली गेले. न्याय लवकर मिळत नसेल तर लोकांनी किती दिवस कोर्टाच्या पायऱ्या झिजवायच्या,,,,स्वतः च्या नोकऱ्या सोडून नुसतं कोर्ट कचेरी करायची,,,,आणि यासाठी जो पैसा लागतो तो आणायचा कोठून? एकंदरीत माझा स्वतःचा विश्वास या देशावरूनच उडालाय ...इथे पैसा फेको तमाशा देखो असाच प्रकार चाललेय. ज्याच्याकडे पैसा ,सत्ता त्याच्याकडे न्याय . आता तीन महिन्यापूर्वी सतीश शेट्टी प्रकरणामध्ये पहिली अटक झाली आहे आणि ज्यांना अटक झालीय ते आहेत याच case चे तपास करणार पुणे ग्रामीण पोलिसांचे अधिकारी. यांनी जाणीवपूर्वक बोगस पुरावे तयार करून खोटी case तयार केली.मूळ पुरावे नष्ट केले.चुकीचा तपास केला. ANi या हत्येत indirect सहभाग असल्याचा या वर आरोप आहेत. संदीप शेट्टी यांच्या मते हे दोन अधिकारी irb चे पुण्यातले हस्तक असून या case मधले खुप छोटे मासे आहेत. हत्या होऊन 5 वर्ष उलटलेली आहेत.पुढे काय होईल माहित नाही. मिपा करानो आपल्याला काय वाटते , या प्रकरणात तसेच या सारख्या दुसऱ्या प्रकरणात न्याय मिळायची शक्यता किती आहे? कि जिथे इतके मोठे लोकांचे लागेबांधे असतात .

वाचने 59400
प्रतिक्रिया 155

प्रतिक्रिया

तुम्ही पण आमच्याच पंगतीतले दिसता. ताजा कलम.... पुढच्या महिन्यात आमचा एक नातेवाईक पण देश सोडून चालला आहे.तो बहूदा परत येणार नाही. असो, तुमच्याकडे, सत्ता आणि पैसा असेल, तर आणि तरच, ह्या देशांत तुम्ही समाधानाने राहू शकता.

In reply to by मुक्त विहारि

विश्वास जरी उडाला असला तरी देश माझा आहे.घरात घुशी लागल्या म्हणून कोणी शेजारी राहायला जात नाही . आणि जे जातात ते त्या घराचे कधीच नसतात . पुरुषार्थ पळून जाण्यात नाही तर परिस्थितीचा सामना करण्यात आहे . असो बाहेर जाऊन आपल्या देशाला विसरू नका आणि त्याचे नाव कसे मोठे होईल या साठी प्रयत्न कराल अशी अपेक्षा.

In reply to by योगेश कोकरे

घरात घुशी लागल्या म्हणून कोणी शेजारी राहायला जात नाही . आणि जे जातात ते त्या घराचे कधीच नसतात . पुरुषार्थ पळून जाण्यात नाही तर परिस्थितीचा सामना करण्यात आहे

In reply to by स्पा

त्यांना पण थोडी मजा करू दे कि. चांगले करमणूकप्रधान प्रतिसाद लिहीत आहेत, तेवढाचं आमचा पण विरंगुळा.

In reply to by योगेश कोकरे

कोकरे साहेब... प्लेगमधे घरदार सोडून जावेच लागते की नाही ?.. :=) या विषयावर एक स्वतंत्र लेख लिहिने तेव्हा या बाबतीतील माझी मते स्पस्ट करेन.. हे आपले करेक्शन करावी म्हणून लिहिले आहे... :-)

In reply to by मुक्त विहारि

>>>>> पुढच्या महिन्यात आमचा एक नातेवाईक पण देश सोडून चालला आहे.तो बहूदा परत येणार नाही. आपणासही जावं असे वाटत असेल तर मन:पूर्वक शुभेच्छा. देशाबद्दल वाईट बोलणारे आम्हाला नकोच आहेत. आम्ही आमच्या देशात सुखी आहोत. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कटू सत्य पचवायची ताकद प्रत्येकात असतेच असे नाही. ================ १. "स्वदेशी"चा मंत्र जपत गांधींनी स्वराज्य मिळवले आणि आज भारतात प्रत्येक व्यक्तीकडे एक तरी परदेशी वस्तू असतेच. २. इथे एखादा राजकीय पुढारी "रस्ता-रोको" कधीही घडवू शकतो. ३. इथे एखादा वरिष्ठ पोलीस अधिकारी एखादे कुटुंब पार उद्वस्थ पण करू शकतो. ४. समान नागरी कायदा स्थापन करायची अजूनही ह्या देशाला हिंमत नाही. ५. खनिज तेल आयात करावे लागते, म्हणून आपण खनिज तेलाचा वापर कमीत-कमी केला पाहिजे, इतकी पण देशहिताची जाणीव इथल्या बर्‍याच लोकांकडे नाही. ६. काश्मीरच्या बाबतीत तर सगळाच सावळा-गोंधळ गेली ६०-६५ वर्षे सुरु आहे. ७. एकही शेजारी देश मित्र नसलेला हा एक देश आहे.(नेपाळ आधी होता पण आजकाल नेपाळचे आणि चीनचे संबंध, भारत-नेपाळ मैत्रीपेक्षा फार वेगळ्या पातळीवर आहेत.सध्या नेपाळवर चीनचे गारूड आहे.चीन ते काठमांडू एखादा राष्ट्र मार्ग जरी तयार झाला तरी त्यात नवल वाटायला नको आणि त्या मार्गावरून चीनचा माल नेपाळ मध्ये खपायला लागला तरी त्यात नवल नाही.) ८. आयातीच्या प्रमाणात निर्यात नाही. ९. "निकालाला लागलेला विलंब, हा पण एकप्रकारचा अन्यायच," हे पण ह्या देशातील एक ठळक उदाहरण. १०. एखादा नेता नवा पक्ष स्थापन करतो आणि मग बेरजेचे राजकारण करायला तो पक्ष दुसर्‍या पक्षांत विलिन करतो. ================== जे नंदाच्या काळात घडले तेच सध्या घडत आहे, तरी पण तुम्हाला असे वाटत असेल की हा देश उत्तम आहे, तर तुमचे मत तुमच्यापाशी. "आपणासही जावं असे वाटत असेल तर मन:पूर्वक शुभेच्छा." तुमच्या सारख्या मंडळींचे आशीर्वाद पाठीशी असल्यावर अजून काय हवे? तुम्ही जसा मला उपयुक्त सल्ला दिलात, तसा माझा पण एक सल्ला. कृपया खालील पुस्तके जरूर वाचा.देशा बाबत चाणक्याने फार अभ्यास केला आहे.किंबहूना माझा देश योग्य मार्गाने जात आहे का? आणि इथली पुढची पिढी अधिकाधिक सार्वजनिक हिताच्या गोष्टी करणार आहे का? ह्याचा आढावा वेळोवेळी घ्यायला ही ३ही पुस्तके मला तरी उपयोगी पडली. १. कौटिलीय अर्थशास्त्र. (प्रस्तावना दूर्गा भागवत, सरिता प्रकाशन) २. संपूर्ण चाणक्य नीति (डॉ. इंदूभुषण बडे, मनोरमा प्रकाशन) ३. सुत्रे चाणक्याची सुत्रे गव्हर्नन्सची. (डॉ. वसंत गोडसे, परम मित्र पब्लीकेशन) ======== वरील प्रतिसाद हा बिरुटे सरांनाच आहे, कारण, "वादे वादे जायती संवादः" हा अनुभव मी सरांबरोबर बर्‍याच वेळा घेतला आहे. भलेही आमचे मुद्दे एकमेकांना पटोत न पटोत, पण आम्ही दोघेही त्यात वैयक्तिक काहीच आणत नाही.

In reply to by मुक्त विहारि

>>>> माझा देश योग्य मार्गाने जात आहे का ? हो जात आहे. >>>>इथली पुढची पिढी अधिकाधिक सार्वजनिक हिताच्या गोष्टी करणार आहे का? करणार आहे. जसा आहे, तसा. आणि आहे तो माझा देश भविष्याच्या दृष्टीने योग्य आणि उत्तम मार्गाने चालला आहे, जात राहणार आहे. असतील काही उणिवा तर त्याही दूर होणारच आहेत. मी माझ्या देशाचा फक्त गेल्या शंभर वर्षाचा इतिहास चाळला आहे, बदलतोय माझा देश. आणि माझा देश मोठी दमदार पावलं भविष्याच्या दृष्टीनेही टाकत चालला आहे, ज्यांना वाटतं या देशात राहावं त्यांनी राहावं, ज्यांना वाटत नाही, हा देश आपल्या योग्येतेचा नाही, त्यांनी स्वतःहून चालतं व्हावं. हमे अपने हाल पर छोड़ दो. आम्ही आमचं पाहुन घेऊ. आम्ही आमच्या देशात कसं राह्यचं ते.....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्ही तितपतच मागे गेला असाल ह्याची कल्पना होती... म्हणूनच तर वरील १० मुद्दे गेल्या १०० वर्षाच्या आसपासचेच दिले आहेत. आणि त्या मूद्द्यांचे तुम्ही खंडण पण केलेले नाही. "बदलतोय माझा देश." ते तर आम्ही रोजच बघतो, मग ती दिव्यातली दंगल असो किंवा मुझफ्फर नगर मधील किंवा काश्मीर मधला वाढता हिंसाचार किंवा मग ह्या देशात असलेले आणि वाढत चाललेले बांगला देशीय. खेदाने म्हणावे लागते की, आमच्या वेळेचा भारत असा न्हवता.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ज्यांना वाटत नाही, हा देश आपल्या योग्येतेचा नाही, त्यांनी स्वतःहून चालतं व्हावं. हमे अपने हाल पर छोड़ दो. आम्ही आमचं पाहुन घेऊ. आम्ही आमच्या देशात कसं राह्यचं ते.....!
प्रा.डॉ शी बाडिस...

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>आपणासही जावं असे वाटत असेल तर मन:पूर्वक शुभेच्छा. देशाबद्दल वाईट बोलणारे आम्हाला नकोच आहेत. हे असंच लिहिलो तर प्रतिसाद संपादित झाला, 'व्यक्तिगत टिप्पणी टाळा' म्हणून...

In reply to by मुक्त विहारि

मुवि, मी तुमच्या पंगतीतला नाही पण विश्र्वात अब्जावधी लोकांनी स्वतःची रहाती ठिकाणे सोडली आहेत, देश सोडले आहेत ते चांगले आयुष्य जगता यावे म्हणून. देश सोडणे ही काही महान महत्वाची गोष्ट नाही. आपल्याला शक्य असेल तर, मानाने जगता येत असेल, उत्तम जीवन जगता येते असेल तर जरुर स्थलांतर करावे या मताचा मी आहे. पण सवीस्तर मत परत केव्हा तरी. आणि उरला प्रश्र्न नावे ठेवण्याचा.... आपण आणि आपल्या वाडवडिलांनी वाईट गोष्टींना नावे ठेवली नाहीत, म्हणूनच ही परिस्थिती ओढवली आहे.... :-) ठेविले तैसे रहावे ही वृत्ती तुम्ही ठेवायलाच हवी असे मुळीच नाही. आता यावर तुम्ही काय करता हा प्रश्न कृपया विचारु नये. कारण त्याचे उत्तर फार मोठे आहे...

In reply to by जयंत कुलकर्णी

हा प्रश्र्न मी कुणालाच विचारत नाही. कारण, जो तो त्याला/तिला योग्य वाटेल असाच निर्णय घेत असतो.

In reply to by मुक्त विहारि

मुवि, अहो, हे वाक्य तुम्हाला नाही. जे असा प्रश्न विचारतात त्यांना उद्देशून लिहिले आहे.... :-)

In reply to by जयंत कुलकर्णी

जयंत कुलकर्णींशी सहमत. बाहेरच्या (स्पेशली विकसित) देशात कायमचे स्थलांतर करणेही मोठी नसली काही सोपी बाब नाही (वर्क विजा वर जाणे वेगळे). तसेच ते कुणालाही जमेल असे अजिबात नाही. नोकरी (हवी तशी लांबची गोष्ट), घर मिळवणे भारतापेक्षा जास्त कठीण आहे असा वैयक्तीक अनुभव. कल्चरल डिफरंसेस संभाळणे, मुले वाढवणे अशा अनेक अवघड गोष्टी आड येऊ शकतात. पण रस्ते व फुटपाथ, वीज, ईंटरनेट, पाणी, खाजगी आणी सार्वजनिक वाहतूक (जॅम असली तरी सुसह्य), पोलीस, हेल्थकेअर, अँब्युलंस, सुरक्षितता, कचरा नियोजन व स्वच्छता, खाद्यपदार्थ आणी औषधांवर कडक नियम, शहरांचे नियोजन, प्रदूषणावर मात आणी आणखी बरंच काही भारताच्या तुलनेत (वादग्रस्त ठरू शकते पण खात्री बाळगा) उच्च दर्जाची/चे आहेत हे नक्की. अवांतर : मिपावरील काथ्याकुट आणी न्युज चॅनेलवरच्या बातम्या पाहिल्या की चीडचीड, फ्र्स्ट्रेशन,ब्लड प्रेशर वाढू शकते. मला वाटतं सध्यातरी काथ्याकुट विभाग सोडून ईतर विभांगामधे तात्पुरतं स्थलांतर करावं. =)) जनहित मे जारी. =))

In reply to by मुक्त विहारि

हे हे, मुवि साहेब, खरंच तुम्ही शिफ्ट व्हायचा विचार सुरु करा. ह्या देशावरुन विश्वास उडालेली माणसं 'अधिक घाण' करायला नकोतच इथे. परिस्थिती आहे ती आहेच, पण विश्वास उडालेल्या माणसांकडून काही विधायक होण्याची शक्यता अजिबात नसते. मी जेव्हा जेव्हा समाजासमोर हरल्याचा विचार करतो, काहीच बदलू शकत नाही असे वाटायला लागते तेव्हा तेव्हा मला तीन माणसे नेहमीच लख्खकन आठवतात. पहिले शिवाजी महाराज, दुसरे बाबासाहेब आंबेडकर आणि तिसरे महात्मा फुले. ह्या तिघांनी ज्या परिस्थितीत व्यवस्था एकशे ऐंशी अंशात फिरवली ते बघता समाजासमोर, देशाच्या विदारक समस्यांसमोर हतबल होऊन विश्वास उडणे ह्या सारख्या भावना मनाला दुरुन देखील हुंगत नाहीत. त्या तिघांनी 'ह्या देशाचे काही होऊ शकत नाही' असा विचार केला असता तर...? (असे आणखी हजारो आहेत. मला नेहमी हे तिघे आठवतात इतकेच.) अधिक घाण बद्दल: अधिक घाण म्हणजे अशी विश्वास उडालेली माणसे जिथे तिथे करवादत अधिकाधिक अविश्वासाचं वातावरण निर्माण करुन तसा दॄष्टीकोन बनवण्यास, तशी जीवनशैली बनवण्यास हातभार लावत असतात. मानसिक खच्चिकरण झाले तर कितीही ताकद असो काहीच विधायक घडणे शक्य नसते. विश्वास नसेल तर फक्त ४८० सैनिक ९१ हजारांना शरणागती घेण्यास भाग पाडू शकत नाही, कोणी मांझी भलाथोरला पर्वत कापून रस्ता करु शकत नाही. चांगले काही घडतंच नाही, निव्वळ वाईटच घडते अशी मानसिकता पसरत जाणे देशाच्या समस्यांमधे अधिकची वाढ करणे हेही आहे. ज्याप्रमाणे असामाजिक घटक समस्या वाढवतात तर त्या समस्या वाढवायला लागणारे उचित वातावरण अशी हतबल झालेली, करवादणारी माणसे तयार करत असतात हे विसरु नये. त्यामुळे लवकर निघा, सुखरुप पोचा, आणि काळजी घ्या. तिकडे काही बरेवाईट झाले तर भारतात सुखरुप परत येण्यास मदत केली नाही म्हणून भारतसरकारच्या नावाने शिमगा करु नका म्हणजे मिळवली...

In reply to by स्पा

सुंदर भाषण?? बरं बरं... स्पाराव, एक यादी बनवा बरं. आजपर्यंत देशात भ्रष्टाचारामुळे मारल्या गेलेल्या आणि खूप प्रसिद्धी मिळालेल्या व्यक्ती व दुसरी भ्रष्टाचाराविरुद्ध खमकी लढत दिलेली आणि अजूनही जीवंत असलेल्या व्यक्ती.

In reply to by संदीप डांगे

ह्या तिघांनी ज्या परिस्थितीत व्यवस्था एकशे ऐंशी अंशात फिरवली अहो आपला समाज चुंबक सूची सारखा आहे. कितीही फिरवा तरीही परत मूळ पदी परत येतो. आपल्याला चार शिवाजी महाराज आणि दहा महात्मा फुले आणि वीस डॉ आंबेडकर लागतील मूलभूत विचारसरणीत फरक करायला.

In reply to by सुबोध खरे

अच्छा, म्हणजे आपल्यावर परत मुसलमानांचे राज्य आले आहे, दलितांना परत पूर्वीसारखं वागवलं जात आहे आणि मुली परत घरात कोंडल्या गेल्या आहेत असं वाटतं काय आपणास?

In reply to by संदीप डांगे

अच्छा, म्हणजे आपल्यावर परत मुसलमानांचे राज्य आले आहे, दलितांना परत पूर्वीसारखं वागवलं जात आहे आणि मुली परत घरात कोंडल्या गेल्या आहेत असं वाटतं काय आपणास? खरे साहेबांना काय म्हणायचे आहे याबाबत तुमचा थोडासा गैरसमज झाला आहे असे वाटते ! मला ते म्हणणे वेगळे आहे असे वाटते. जरा असा विचार करून पहा... भारतात कालमानाप्रमाणे जुलूम करणारे बदलत गेले आहेत आणि बर्‍याचदा त्यांची जुलूम करण्याची पद्धत बदलत गेली आहे... पण जुलूम सहन करण्याची आणि/किंवा त्यासंबंद्धी आपल्यात बदल घडवून आणण्याची जनतेची मनःस्थिती तशीच राहिली आहे. शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ आंबेडकर आणि इतर अनेकांनी समाजाला जागे करून त्याच्या ताकदीची आणि जबाबदार्‍यांची जाणीव करून नवचैतन्य निर्माण केले. जनतेनेही त्यांच्या कार्यकालात प्रगती केली. मात्र या महामानवांचा कार्यकाल समाप्त झाला आणि समाजाच्या प्रगतीला खीळ बसत गेली आहे... बर्‍याच मुद्द्यांवर समाज तेथेच थांबला आहे किंवा त्याच्या प्रगतीचा वेग नगण्य होत गेला आहे. त्यापेक्षा वाईट म्हणजे, नंतर आलेल्या काही नेत्यांनी त्या महामानवांच्या चळवळीचे अपहरण करून, मुळ मुद्द्याचे भ्रामक स्वरूप दाखवून, जनतेला भरकवटून आपल्या व्यक्तीगत हितसंबंधांच्या दिशेने वळवले आहे. मुख्य म्हणजे जनता विकासाचा मूळ मार्ग सोडून; जाणून-न जाणून-दबून राहून-आंधळेपणे आपल्या नवीन नेत्यांची तळी उचलत राहिली आहे आणि म्हणून मार्गभ्रष्ट होत गेली आहे. याचा परिणाम जनतेच्या विकासाचा दर खुंटण्यात झाला आहे*. सद्या तर, "पाचेक वर्षांतून एकदा मतदान करून (किंवा न करूनही) निवडून दिले म्हणजे आपले नेते आपोआप संत-सज्जन बनतील आणि जनतेच्या भल्याचीच कामे करतील; जनतेला काही करायची गरजच नाही; जनतेने शिस्त, प्रामाणिकपणा आणि कायदा पाळणे यासारखे किमान मूलभूत गुणधर्म स्वतःत बाणून घेण्यासारख्या गोष्टींची गरज नाही"; हाच विचार आपल्या जनमानसात रुजलेला आहे. थोडक्यात, "असेल माझा हरी, तर देईल मला खाटल्यावरी." हे कळत-नकळत आपल्या मनावर बिंबले आहे. रोजच्या व्यवहारातले अगदी साधे उधाहरण द्यायचे झाले तर : रस्त्यावरच्या कचर्‍याबद्दल 'सकारण' तक्रार करणार्‍या आणि त्याबाबत सरकार/सिस्टिमला जबाबदार मानणार्‍या लोकांपैकी बर्‍याच जणाना मूळातच आपण रस्त्यावर कचरा टाकू नये हे पटवून द्यावे लागते, आणि दरवेळेस ते त्यांना मान्य होईलच असे नाही ! मग, यापेक्षा मोठ्या मुद्द्यांचा व्यक्तीगत स्वार्थापुढे जाऊन विचार करणे कठीण होत असले तर आश्चर्य कसले ?! :( महामानव आपल्या कालखंडात जनतेला योग्य दिशा दाखवून त्यावर कसे जायचे हे दाखवून देऊ शकतात. पण, वस्तूस्थिती हीच आहे की महामानवही शेवटी मर्त्य मानवच असतात, त्यांनाही त्यांचा काल संपल्यावर या पृथ्वीचा निरोप घेणे भाग असते. देश, समाज सतत पुढे जायचा असेल तर समाजातल्या सर्वच लोकांनी दाखवलेल्या मार्गावरून पुढे जाणे जरूर असते... किंबहुना त्या मार्गात जरूर ते बदल करून प्रगतीला अधिक विकसित करणे जरूर असते. हे नाते काहीसे खेळातल्या प्रशिक्षक/कर्णधार व खेळाडू यांच्या सारखे असते. प्रशिक्षक/कर्णधार मार्गदर्शन करतो, कर्णधार तुमच्या बरोबर खेळही करेल, पण त्यांच्यापैकी कोणीही प्रत्येक खेळाडूचा व्यक्तीगत खेळ करू शकत नाही. प्रत्येक खेळाडूला आपला खेळ स्वतःच उत्तम करायचा असतो. किंबहुना, मिळालेल्या मार्गदर्शनाचा फायदा घेऊन जनतेतील प्रत्येकाने आपापली जबाबदारी स्वतः उचलली तरच टीम, समाज, देश पुढे जात राहतो. या बाबतीत आपण भारतीय खूप मागे आहोत, हे सत्य नाकारण्यात काहीच अर्थ नाही. कारण, सत्य स्विकारणे ही सुधारण्याची पहिली पायरी असते. +++++++++++++++ * : देशाच्या सुधारणेला लागणार्‍या वेळेच्या लांबीसंबंधी आणि नागरिकांच्या सामाजिक-राजकिय जाणिवेसंबंधी थोडीशी तुलना : नॉर्वे हा देश ८ मे १९४५ पर्यंत डेन्मार्क, स्वीडन व जर्मनी या देशांच्या प्रत्यक्ष जोखडाखाली होता किंवा ब्रिटनसारख्या देशाच्या अवैध राजकिय दबावाखाली होता. भारताप्रमाणेच झगडा करून तो १९४५ मध्ये स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र झाला. या वेळेपर्यंत नॉर्वे हा देश अविकसित (त्यावेळेपर्यंत 'विकसनशिल' हा फसवा शब्द वापरात आलेला नव्हता) देश होता. या पार्श्वभूमीवर खालील सत्ये पाहणे रोचक ठरेल : १. साधारणपणे भारताच्या स्वातंत्र्याच्या आसपासच्या काळात नॉर्वेला स्वातंत्र्य मिळाले आहे. २. नॉर्वेतली लोकशाही, राजकीय व्यवस्था (गव्हर्नन्स) आणि भ्र्ष्टाचारमुक्तता जगातल्या पहिल्या तीनात गणली जाते. ३. आजमितीला नॉर्वे जगातल्या सर्वात जास्त विकसित देशांमध्ये गणला जातो. ४. आजमितीला नॉर्वे जगातच नव्हे तर युरोपातही सधन राष्ट्र समजले जाते... ते केवळ देशाच्या जीडीपी किंवा गंगाजळीमुळेच मुळेच नाही तर सर्वसामान्य नॉर्वेजियन नागरिकाचे वार्षिक उत्पन्न सुमारे $७०,००० असल्याने आहे... (सधनतेची समान वाटणी). हे असे का ? याचा थोडा अभ्यास केला तर त्यामागे खालील महत्वाची कारणे दिसतात... १. नॉर्वेला स्वातंत्र्य मिळवून देण्यार्‍या आणि त्याचे सुरुवातीचे सरकार चालवण्यार्‍या नेत्यांनी जनतेला केवळ स्वातंत्र्यासाठी उत्तेजित केले असेच नाही तर : (अ) देशाच्या लोकशाहीची घडी नीट बसविण्यासाठी आवश्यक ती "निस्वार्थ काळजी" घेतली, आणि (आ) जनतेला "आपल्या" देशाच्यासंबंधीचे हक्क, जबाबदार्‍या आणि कर्तव्ये योग्य रितीने आणि प्रामाणिकपणे समजावून दिली. २. जनतेने आपल्या जबाबदार्‍या आणि कर्तव्ये योग्य रितीने आणि प्रामाणिकपणे पार पाडली आणि जरूर तेथे आपल्या वैध हक्कांसाठी आग्रह धरला... आणि हे आजतागायत सतत चालू आहे. यासंबंधीचा माझा व्यक्तीगत अनुभव : ओस्लोच्या भेटीत तेथे गेली २५ वर्षे रेस्तराँ चालवणार्‍या एका पाकिस्तानी वंशाच्या नॉर्वेजियन नागरिकाशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली होती. त्याच्या शब्दात सांगायचे झाले तर, "साब इधर बहुत हाय टॅक्स है (नॉर्वेमधिल कराचे प्रमाण जिडीपीच्या ४२.२% आहे. व्यक्तिगत कर सरसकट {फ्लॅट} २८% आहे.)। लेकीन बदलेमे सरकार इतनी सुविधा देती है की उसके बारेमे कोई शिकायत नही। फिरभी हमारे देशोंमे और इधरमे एक बहुत बडा फरक है। इधर हमारे एरियाके एमपीने अगर काम नही किया तो हम उसकी कॉलर पकडके सवाल कर सकते है।" विकसित आणि सधन देशांच्या सूचीतील नॉर्वेच्या उच्च स्थानाचे रहस्य या चार साध्या सोप्या वाक्यांत दडले आहे. ...त्या नॉर्वेजियन नागरिकाच्या शेवटच्या वाक्यातील कृती (हे भारतिय एमपीच्या बाबतीत करणे केवळ दिवास्वप्नच असू शकते. पण,) आपण आपल्या शहरातल्या कॉर्पोरेटरच्या संदर्भात करतो आहोत अशी कल्पना (तीही केवळ कल्पनाच करू शकतो म्हणा) करून पाहिले तर... या प्रतिसादातले सुरुवातीपासूनचे सगळे मुद्दे समजून घ्यायला सोपे जाईल ! :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सुंदर आणि नेमके त्यापेक्षा वाईट म्हणजे, नंतर आलेल्या काही नेत्यांनी त्या महामानवांच्या चळवळीचे अपहरण करून, मुळ मुद्द्याचे भ्रामक स्वरूप दाखवून, जनतेला भरकवटून आपल्या व्यक्तीगत हितसंबंधांच्या दिशेने वळवले आहे. मुख्य म्हणजे जनता विकासाचा मूळ मार्ग सोडून; जाणून-न जाणून-दबून राहून-आंधळेपणे आपल्या नवीन नेत्यांची तळी उचलत राहिली आहे आणि म्हणून मार्गभ्रष्ट होत गेली आहे. याचा परिणाम जनतेच्या विकासाचा दर खुंटण्यात झाला आहे हि तर दुखरी नस आहे डॉक्टर साहेब. राज्य असो व देश कुठली हि गोष्ट लोकसहभागाशिवाय सुधारणार नाही. पारतंत्र्यात निदान स्वातंत्र्याचे स्वप्न तरी होते. आज असे मोटिव्हेशन नाही. प्रचंड क्षमता असूनही गुणात्मक सुधारणा नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एक्कासाहेब +१००००००००० एक्का साहेबांचे लेखन सुस्पष्ट,मुद्देसूद आणि आशयघन असल्याने त्यात काही अधिक उणे करणे शक्यच नसते. अजिबात वितंडवाद न घालता संयत आणि सुसंस्कृत भाषेत कसे लिहावे याचा हा एक उत्तम वस्तुपाठ लोकांनी गिरवावा असाच आहे. आम्ही त्यांच्या लेखनाचे सुरुवातीपासून "फॅन" आहोत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नेहमीप्रमाणे "बूल्स आय." "भारतात कालमानाप्रमाणे जुलूम करणारे बदलत गेले आहेत आणि बर्‍याचदा त्यांची जुलूम करण्याची पद्धत बदलत गेली आहे... पण जुलूम सहन करण्याची आणि/किंवा त्यासंबंद्धी आपल्यात बदल घडवून न आणण्याची जनतेची मनःस्थिती तशीच राहिली आहे." + १

In reply to by संदीप डांगे

दुसरी भ्रष्टाचाराविरुद्ध खमकी लढत दिलेली आणि अजूनही जीवंत असलेल्या व्यक्ती.
- सुब्रमण्यम स्वामी - अण्णा हजारे - सुचेता दलाल

In reply to by अनुप ढेरे

धन्यवाद ढेरेसाहेब! लढून जिवंतही राहता येतं ह्याची हि यादी पुरावा आहे, पब्लिक सपोर्ट हा मोठ्ठा मुद्दा असतो, एकांडे शिलेदार सतीश शेट्टी होतात हे लक्षात घेतले पाहिजे! हे कोणत्याही देशात होऊ शकते!

In reply to by संदीप डांगे

माझ्या मते नुस्तं चांगल्या मनाचं/इंटेंशनच असून भागत नाही. गां*त दम तर लागतोच पण भरपूर बुद्धीपण लागते.

In reply to by अनुप ढेरे

हायला लईच डायरेक्ट बोला तुमि, पण बरोबर बोलत। प्रामाणिक लोक खामकी हवी तसेच त्यांच्या माग जनता पण उभी हवी। कारण सतीश शेट्टी सुद्धा धाडसी होते। काही वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांना केंद्र सरकार ने अटक केलेली आणि जेंव्हा जनक्षोभ उसळला, तेंव्हा सरकार चा नाकींनव आले। तेंव्हा इंडिअन एक्सप्रेस मध्ये आलेल्या बातमीचा heading होत ""Anna arrests Government" , त्यावेळी खूप आनंद झालेला जो पूढे फार काळ टिकला नाही। पण लोकांचा पाठिंबा आलेले खामकी लोक सरकार ला घाबरवू शकतात हे पटल। कोल्हापूर चा टोल विरोधी लढा याची साक्ष देतो.

In reply to by अनुप ढेरे

राजकारण असंच खेळलं जातं राजे. नुसतं धाडस असून उपयोग नाही. भांडून डोकी फोडून काही होत नाही. योग्य व्यक्ती पर्यंत माहिती पोचवणे नि आपण बाजूला होणे सुद्धा कधी तरी आवश्यक असते. अवांतर - नाना पाटेकर एका पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन फटके देऊन येतो. मजा वाटते.

In reply to by मुक्त विहारि

सगळ्यांना प्रथम स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! या लेखातली कथा चीड आणणारी आणि व्यथित करणारी आहे. राजकीय आणि आर्थिक दांडग्या लोकांसमोर सामान्य माणूस आणि न्यायव्यवस्था दबली जातेय ही दुर्दैवी पण वस्तुस्थिती आहे. अन्याय करणारे राजकीय/औद्योगिक धन दांडगे असतील तर सामान्य माणसाला न्याय मिळणं खरंच खूप कठीण झालंय हे वास्तव नाकारता येत नाही. पण अशा परिस्थितीत सुद्धा दुर्दम्य आशावाद बाळगणारी चांगली माणसं, संस्था, उपक्रम, संघटना, सुधारक आहेत म्हणून सकारात्मक, संरचनात्मक गोष्टी सुद्धा घडत आहेत हे ही खरं. द बेटर इंडिया या फेसबुक पानावर अनेक सकारात्मक उपक्रम प्रसारित होत असतात. असो. प्रगतिशील आणि निखळ बुद्धिमत्तेवर आधारित शिक्षण/नोकरीच्या संधी, भ्रष्टाचार मुक्त व्यवस्थेत जीवन जगण्याचा अनुभव अशा कारणांसाठी (भारताविषयी नकारात्मक भाव न बाळगता) जर कोणी परदेशगमन करत असेल तर त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. पण परदेशात जाऊन भारताला नावं ठेवणारी लोकं आणि भारतात राहून परदेशी जाणाऱ्यांना किंवा परदेशी लोकांना नावं ठेवणारी लोकं, दोन्हीही चूक. जसं अमेरिकेत सगळंच छान हा गैरसमज तसंच भारत हा एकमेव वैभवशाली आणि महासत्ता हा सुद्धा अवास्तव समज. आंधळं आणि अभिनिवेशपूर्ण परदेशप्रेम किंवा स्वदेशप्रेम दोन्हीही अवास्तव आणि दांभिक. परदेशात गेलेले सगळे देशद्रोही आणि शरीराने स्वदेशात राहणारे सगळे देशभक्त हा सुद्धा एक मोठा गैरसमज. गेली पाच वर्ष अमेरिकेत राहताना आणि त्याआधी भारतातील विविध भागात राहताना, फिरताना अनेक निरीक्षणं नोंदवली, त्यावर एकदा सविस्तर लेख लिहीन. पण शरीराने अमेरिकेत राहणाऱ्या अनेक मूळ भारतीयांनी मनात विविध मूल्यांच्या रूपांनी भारत जपलेला दिसला आणि शरीराने भारतात राहून सुद्धा काही लोकांनी अमेरिकेच्या भ्रष्ट मूल्यांच्या आंधळ्या आकर्षणापोटी मनात एक भ्रष्ट अमेरिका पोसलेला दिसला. मग कोण नक्की कोण आहे? भारतीय आई वडिलांच्या पोटी जन्मलेल्या पण अमेरिकन नागरिक असलेल्या सुनीता विल्यम्स हिने अंतराळात जाताना प्रेरणास्थान म्हणून गणपतीची मूर्ती सोबत नेली. तिला आपण काय म्हणणार? आणि पुण्यात रेव्ह पार्टीमध्ये ड्रग्स घेऊन नागड्या अवस्थेत सापडलेल्या तथाकथित प्रतिष्ठित लोकांच्या मुलांना आपण काय म्हणणार? माझ्या ओळखीचे एक मूळचे भारतीय गृहस्थ आहेत, ते आता अमेरिकेचे नागरिक आहेत. त्यांच्या मुलाला जेव्हा १८ व्या वर्षी अमेरिकन नागरिकत्व मिळालं तेव्हा त्यांनी त्याला भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांना अभिमान वाटेल असा नागरिक हो आणि मुख्य म्हणजे आपल्या ५ हजार वर्षांच्या वैदिक-संत महात्म्यांच्या उज्वल परंपरेला विसरू नकोस असा आशीर्वाद दिला. भारत/अमेरिकेतल्या अनेक सेवाभावी उपक्रमात हे गृहस्थ सहभागी असतात. अमेरिकेतल्या एका दुकानात तिरंगा झेंडा चुकीचा लावलेला पाहून त्यांनी दुकान मालकाच्या निदर्शनाला ते आणून दिलं. आपल्या जन्मभूमी विषयी आणि आपल्या कर्मभूमी विषयी कृतज्ञ असं त्यांचं आचरण आहे. त्यांना आपण काय म्हणणार? शेवटी कोणी कोणत्या देशात राहायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे पण आपण आपल्या कुटुंबाकडून आणि देशाकडून मिळालेल्या सांस्कृतिक मूल्यांना जपलं आणि सकारात्मक विचार करून आपल्या जन्मभूमी आणि कर्मभूमी विषयी कृतज्ञ राहिलो तर हे विश्वची माझे घरं किंवा वसुधैव कुटुंबकं हे तत्व खऱ्या अर्थानी सार्थ होईल.

In reply to by कल्पक

सुंदर प्रतिसाद ! खालील वाक्ये विशेष आवडली... परदेशात जाऊन भारताला नावं ठेवणारी लोकं आणि भारतात राहून परदेशी जाणाऱ्यांना किंवा परदेशी लोकांना नावं ठेवणारी लोकं, दोन्हीही चूक. शरीराने अमेरिकेत राहणाऱ्या अनेक मूळ भारतीयांनी मनात विविध मूल्यांच्या रूपांनी भारत जपलेला दिसला आणि शरीराने भारतात राहून सुद्धा काही लोकांनी अमेरिकेच्या भ्रष्ट मूल्यांच्या आंधळ्या आकर्षणापोटी मनात एक भ्रष्ट अमेरिका पोसलेला दिसला.

मोठ्यांच्या वाटेला जाऊ नये, सिम्पल. आपण आपली नोकरी मान खाली घालुन करावी, निवृत्त व्हावे,म्हातारे व्हावे, मरावे. बदल घडवायचे आहेत तर मोठ्यांच्या वाटांना वळसा घालून बदल घडवावेत. भारतात काम करण्यासारखी, बदल घडवण्याजोगी क्षेत्रे भरपूर आहेत.

In reply to by स्वामी संकेतानंद

स्वामी संकेतानंद,,, ज्याचं जळतं त्यालाच कळतं .बाकीच्यांना काही फरक पडत नाही .आपले म्हणणे स्वामी या नावाला शोभते ,,,,,,पण काही लोकांचा बाणा हा वेगळा असतो,,, लढेंगे तो मरते दम तक लढेंगे ... बचेंगे तो और लढेंगे....बाकीचे काय किड्यामुंगी सारखं जगणं काय कामाचं

In reply to by योगेश कोकरे

दादा दोनच प्रश्न 1 स्वाम्याला तुम्ही नीट ओळखता काय? 2 बाकी आम्ही किडमुंगी वगैरे सोडा, तुम्ही काय काय केलंय त्याची एखादी जंत्री द्याल जमले तर, कसे?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

इथे माणसे पाहून नाही तर ID बघून प्रतिसाद दिले जातात त्यामुळे, ह्याला ओळखता का ? त्याला ओळखता का? असले प्रश्न अनाठाई आहेत

In reply to by स्पा

"ID बघून" च्या ऐवजी "लिहिलेला मजकूर बघून" प्रतिसाद दिले तर अजूनच चांगले... अगदी सोन्याहून पिवळे :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

दादा दोन्ही प्रश्नांची उत्तरे 1) स्वामीला मी ओळखत नाही 2) आम्ही काय केले हे इथे सांगायची गरज नाही .

In reply to by योगेश कोकरे

वाह! एकदम बाणेदार प्रतिसाद! तुमच्याकडे चारचाकी असल्यास आणि त्याच्या मागच्या काचेवर काही लिहिलं असल्यास त्याचा फटू पाठवाल काय?

In reply to by अनुप ढेरे

अनुपजी ...खूप लहान माणूस आहे मी . अजून चार चाकी नाही घेत्तली .पण गाडीच्या मागे काय लिहिले आहे ,या वरून काय निष्कर्ष काढायच्या आहे तुम्हाला?

In reply to by योगेश कोकरे

स्वामी बद्दल स्पा म्हणाला ते मान्य आहे म्हणून असो, पण, जर आपण काय काय केले आहे ते इथे सांगायची गरज नाही असे आपल्याला वाटत असेल तर आपणही इतरांना किडेमुंगी वगैरे शेलकी विशेषणे वापरायचे कारण नाही, कारण स्पष्ट असेल नाही का?

या प्रकरणामधल्या मूळ तपास अधिकार्‍यांनाच अटक झाली आहे ( न्यायकृपेने ते जामिनावर बाहेर सुद्धा आले ). द्रुतगती महामर्गाशेजारील संपादीत जमीनीचे प्रकरणच या मागे आहे हे गावामधला उघड सत्य आहे . तरीसुद्धा स्थानिक पोलीसांनी कित्येक वर्ष तो तपास भलत्याच दिशेला नेला . काही दिवसांपूर्वी या प्रकरणातील एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा ( बस ड्रायव्हर ) मृत्य्पू झाला . सरकार भाजपा किंवा काँग्रसचा नसता तर धनदांडग्यांचाच असता .

मध्य प्रदेशात " व्यापम " घोट्याळ्यात तर ३० ते ३५ साक्षीदार " मरण ( ? ) " पावले म्हणतात ! कुणाचा तरी जबरदस्त वरदहस्त असल्याशिवाय , असे काहीही घडत नसते असे मानण्यास जागा आहे. मुळात 'कायदा गाढव असतो ' हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतेच आहे. कायद्यातील पळवाटा जोपर्यंत नष्ट केल्या जात नाही , तोपर्यंत काहीही करणे म्हणजे दगडावर डोके आपटून घेण्यासारखे आहे असेच वाटते. कायद्याचा धाक कुणालाच नाही, शेवटी एकच म्हणावेसे वाटते की " पराधीन आहे जगती, पुत्र भारताचा , दोष ना कुणाचा " .

कोल्हापूरमधील रस्त्यांचे काम म्हैसकरांच्या आयआरबी याच कंपनीला दिले होते. त्या कंपनीने कोल्हापूरमध्ये प्रवेश करणार्‍या सर्व रस्त्यांवर टोल आकारायला सुरूवात केल्यावर स्थानिकांनी गोविंद पानसरे व एन डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिने आंदोलन केले. टोल पूर्ण रद्द करावा अशी त्यांची मागणी होती. आंदोलकांनी अनेकवेळा टोलबूथ उद्ध्वस्त केले तरी टोल सुरूच राहिला. उच्च न्यायालयाने देखील टोल रद्द करण्याचा आदेश देण्यास नकार दिला. पानसरे टोलबंदीच्या आंदोलनाबरोबरच हिंदुत्ववादी संघटनांविरूद्ध सुद्धा जाहीर भाषणे देत होते. २६/११ च्या मुंबईतील हल्ल्यामागे रा. स्व. संघाचा हात होता असा तद्दन मूर्खपणाचा आरोप असणारे पुस्तक कोल्हापूरातील माजी पोलिस निरीक्षक मुश्रीफ यांनी लिहिले होते (हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत आहे हे भारतातील सर्व न्यायालयात सिद्ध होऊन कसाबला फाशी दिल्यानंतर सुद्धा असले पुस्तक लिहिणे हा नालायकपणाचा कळस होता). त्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला पानसरे व आचरटशिरोमणी कोळसे पाटील उपस्थित होते. त्या सर्वांनी प्रकाशन समारंभात संघावर भरपूर टीका केली. तद्दन मूर्खपणाचे आरोप असलेल्या पुस्तक प्रकाशन समारंभाला उपस्थित राहून व त्या समारंभात भाषणे करून पानसरे व कोळसे पाटील यांनी पुस्तकातील आरोपांना एकप्रकारे संमतीच दर्शविली होती. या समारभानंतर काही दिवसातच पानसरेंचा खून झाला व खुनाचे बालंट सनातन प्रभातवर लादण्यात आले. खुनानंतर ७ महिन्यांनी समीर गायकवाड नावाच्या सनातनच्या एका साधकाला अटक केली. त्याला अटक करून जवळ्पास ११ महिने होऊन गेले तरीसुद्धा त्याच्याविरूद्ध पुरेसे पुरावे मिळालेले नाहीत व त्यामुळे त्याच्याविरूद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करून खटला सुरू करणे लांबणीवर टाकले जात आहे. पानसरे जसे हिंदुत्ववादी संघटनांवर टीका करीत होते तसेच ते कोल्हापूरमधील आयआरबी ने लावलेल्या टोलविरूद्ध सुद्धा जोरदार आंदोलन करीत होते हा मुद्दा पोलिसांनी जाणूनबुजून नजरेआड केलेला दिसतो. विशेषतः सतीश शेट्टीच्या खुनाशी आयआरबीचा संबंध जोडलेला जात असताना हाच संबंध इथे का जोडला नसावा हे गूढ उलगडणे अवघड नाही.

In reply to by श्रीगुरुजी

किंचित भर / दुरुस्ती
२६/११ च्या मुंबईतील हल्ल्यामागे रा. स्व. संघाचा हात होता असा तद्दन मूर्खपणाचा आरोप असणारे पुस्तक कोल्हापूरातील माजी पोलिस निरीक्षक मुश्रीफ यांनी लिहिले होते (हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत आहे हे भारतातील सर्व न्यायालयात सिद्ध होऊन कसाबला फाशी दिल्यानंतर सुद्धा असले पुस्तक लिहिणे हा नालायकपणाचा कळस होता).
नेमकं पुस्तक मी वाचलेलं नाही. त्यातले काही उतार्‍यांबद्दल कल्पना आहे. अगदिच ढोबळ व्हर्जन सांगायची मुश्रीफ ह्यांच्या स्टोरीची तर ती अशी -- भारतावर समुद्रमार्गे हल्ला होणार असल्याची खबर गुप्तचर संस्थांना लागली. गुप्तचर संस्थातल्या खबर लागलेल्या काही हिंदू राष्ट्रवादी अतिरेकींचे हस्तक लोकंही होते. त्यांना एवीतेवी कामटे -करकरे -साळसकर ह्या ए टी एस अधिकार्‍यांचा काटा काढायचा होता. कारण त्यांनी हिंदू राष्ट्रवादी अतिरेकी करत असलेल्या कारवायांच्या तपासात बरीच प्रगती केलेली होती.(मालेगाव स्फोट की समझौता एक्स्प्रेस मधला स्फोट असा काहिसा मामला होता.) प्रत्यक्ष पाकी अतिरेक्यांचा जेव्हा हल्ला झाला; त्यावेळी गोम्धळाचे वातावरण माजलेले होते आख्ख्या मुंबैत. तर हल्ला होणारच आहे;र्ह्याची खबर असल्याने आधीच तयार असलेल्या हिंदू राष्ट्रवादी अतिरेक्यांनी ह्याचा फायदा घेत काही कोव्हर्ट ऑपरेशन्स का पेरलल ऑपरेशन्स म्हणतात ती केली. ए टी एस च्या टीमला मारलं; आणि इतर काही महत्वाचे ठरु शकणारे अडथळे दूर केले. नाव खराब पाकी अतिरेक्यांचे झाले. हिंदू अतिरेकी परस्पर सुटले. . . खरे खोटे माहित नाही. यू ट्यूबवर पोलिस निरिक्षक मुश्रीफ ह्यांचा तासाभराचा विडियो आहे; त्यात अधिक नेमके मुद्दे सापडतील. मी मला आठवताहेत ते आणि समजले होते ते मुद्दे लिहिलेत. . . प्रश्न इतकाच की हे सगळे खरे असेल तर तथाकथित हिंदू अतिरेक्यांना शिक्षा किम्वा त्यांचा शोध कसा काय घेतला जाउ शकत नाही ? आणि हे सगळे खोटे असेल तर मुश्रीफ अजूनही बाहेर कसे ? त्यांच्यावर प्रॉप्पर अब्रूनुकसान वगैरेचा दावा कोणी केल्याचे माझ्यातरी ऐकण्यात नाही. आय मीन, मुद्दा इतका गंभीर आहे की आरोप करुन थांबणे पुरेसे नाही. पुढची कार्यवाही नको का व्हायला ? निदान माजी पोलिस निरिक्षकाच्या माणसाला तरी हे सगळे करण्यात अडचण यायला नको.

In reply to by मन१

भारतावर समुद्रमार्गे हल्ला होणार असल्याची खबर गुप्तचर संस्थांना लागली. गुप्तचर संस्थातल्या खबर लागलेल्या काही हिंदू राष्ट्रवादी अतिरेकींचे हस्तक लोकंही होते.
हिंदू राष्ट्रवादी अतिरेकी!!!!!!!!!!!!!!!!!
त्यांना एवीतेवी कामटे -करकरे -साळसकर ह्या ए टी एस अधिकार्‍यांचा काटा काढायचा होता. कारण त्यांनी हिंदू राष्ट्रवादी अतिरेकी करत असलेल्या कारवायांच्या तपासात बरीच प्रगती केलेली होती.(मालेगाव स्फोट की समझौता एक्स्प्रेस मधला स्फोट असा काहिसा मामला होता.)
समझोता एक्स्प्रेसमधील स्फोट २००६ मध्ये झाला. जर २६/११/२००८ या दिवसापर्यंत या स्फोटाच्या तपासात बरीच प्रगती झाली होती, तर त्यानंतर जवळपास ८ वर्षानंतरसुद्धा खटल्याची प्राथमिक सुनावणी सुद्धा का पूर्ण झाली नसावी? मालेगावमधील स्फोट २६/११/२००८ पूर्वी जेमतेम दीड महिने आधी झाला होता. जर २६/११/२००८ या दिवसापर्यंत (म्हणजे स्फोट झाल्यापासून जेमतेम दीड महिन्यात) या स्फोटाच्या तपासात बरीच प्रगती झाली होती, तर त्यानंतर जवळपास ८ वर्षानंतरसुद्धा खटल्याचे साधे आरोपपत्र सुद्धा का दाखल झाले नसावे?
प्रत्यक्ष पाकी अतिरेक्यांचा जेव्हा हल्ला झाला; त्यावेळी गोम्धळाचे वातावरण माजलेले होते आख्ख्या मुंबैत. तर हल्ला होणारच आहे;र्ह्याची खबर असल्याने आधीच तयार असलेल्या हिंदू राष्ट्रवादी अतिरेक्यांनी ह्याचा फायदा घेत काही कोव्हर्ट ऑपरेशन्स का पेरलल ऑपरेशन्स म्हणतात ती केली. ए टी एस च्या टीमला मारलं; आणि इतर काही महत्वाचे ठरु शकणारे अडथळे दूर केले. नाव खराब पाकी अतिरेक्यांचे झाले. हिंदू अतिरेकी परस्पर सुटले.
. कमाल आहे! म्हणजे संघ व तथाकथित हिंदू अतिरेक्यांना पाकिस्तानी अतिरेकी नक्की कोणत्या मार्गाने हल्ला करणार, नक्की कोणत्या शहरात हल्ला करणार, त्या शहरातील नक्की कोणकोणत्या ठिकाणांवर हल्ला करणार, नक्की कोणत्या दिवशी व दिवसाच्या कोणत्या वेळी हल्ला करणार, हल्ला झाल्यावर हल्ल्याच्या प्रतिकारासाठी कोणते अधिकारी पाठविले जाणार, ते किती वाजता निघणार व कोणत्या मार्गाने जाणार याची इत्यंभूत माहिती मिळाली होती तर. म्हणून तर या तथाकथित हिंदू अतिरेक्यांनी आपले अतिरेकी स्क्वॉड करकरे, साळसकर व कामटे जिथे एकत्रित पोहोचतील त्या जागी अचूक वेळी तयार ठेवले होते. या तथाकथित हिंदू अतिरेक्यांकडे प्रत्येक सेकंदाची अचूक माहिती असल्याने एटीएसचे अधिकारी जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा लगेच तिथे बंदुका सज्ज करून तयार असलेल्या तथाकथित हिंदू अतिरेक्यांनी त्यांना लगेच मारून टाकले आणि बिचार्‍या निष्पाप कसाबला त्यात गोवले. मोस्साद, आयएसआय, एफबीआय व केजीबी या जगातील चार गुप्तहेर संघटना एकत्र आल्या तरी त्यांना इतका अचूक प्लॅन तयार करता येणार नाही. धन्य आहे ही पोरकट थिअरी मांडणार्‍यांची आणि त्यांच्या पुस्तक समारंभाला उपस्थित राहून अशा मूर्खपणा व नालायकपणाला पाठिंबा देणार्‍यांची!
आणि हे सगळे खोटे असेल तर मुश्रीफ अजूनही बाहेर कसे ? त्यांच्यावर प्रॉप्पर अब्रूनुकसान वगैरेचा दावा कोणी केल्याचे माझ्यातरी ऐकण्यात नाही. आय मीन, मुद्दा इतका गंभीर आहे की आरोप करुन थांबणे पुरेसे नाही. पुढची कार्यवाही नको का व्हायला ? निदान माजी पोलिस निरिक्षकाच्या माणसाला तरी हे सगळे करण्यात अडचण यायला नको.
ही थिअरी आणि हे आरोप इतक्या महामूर्खपणाचे आहेत की ते आरोप खोटे आहेत हे सिद्ध करणे हे मूर्खपणाचे ठरेल. मुश्रीफसारखी माणसे आरोप करताना आपण कायद्याच्या कचाट्यात येऊ नये यासाठी अत्यंत धूर्तपणे आरोप करतात. थेट आरोप करण्याऐवजी "असे लोकांमध्ये बोलले जाते", "आंतरजालावर अशा पोस्ट फिरत असतात" अशा तर्‍हेची नरो वा कुंजरो वा स्वरूपाची संदिग्ध वाक्ये पेरतात जेणेकरून आपण खोट्या आरोपांचे धनी होऊ नये परंतु योग्य तो संदेश सर्वत्र पोहोचविला जाईल असे धोरण असते. अशा महामूर्खांच्या आरोपांना प्रत्त्युत्तर देणे म्हणजे त्यांच्या पुस्तकाची फुकट प्रसिद्धी करून, पुस्तकाचा खप वाढवून त्यातले असत्य जनतेत पसरवायला मदत केल्यासारखे असते. त्यामुळे संघ परिवाराने मुश्रीफ व त्याच्या या रद्दी पुस्तकातील आरोपांना प्रत्त्युत्तर न देता दुर्लक्ष केले असावे. बादवे, असाच आरोप अंतुले व वाचाळवीर दिग्विजय यांनी केले होते. आपण अडगळीत फेकलो गेल्याने परत प्रकाशात येण्यासाठी अंतुल्यांनी हा सनसनाटी आरोप केला होता, तर "बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ" या मानसिकतेतून कायम बाष्कळ बरळणारे दिग्विजय सिंग यांनी देखील सनसनाटी निर्माण करण्यासाठी हा आरोप केला होता. अंतुले बिचारे आरोप करूनसुद्धा शेवटपर्यत अडगळीतच राहिले तर दिग्विजय सिंग हे केवळ विदूषक म्हणूनच आजतगायत प्रसिद्ध आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

तोंडी आरोप करणे आणि पुरावे देत पुस्तक प्रसिद्ध करणे यात फरक आहे. संघ परिवार या पुस्तकावर बंदी आणण्यासाठी न्यायालयात जाऊन पुस्तकावर बंदी आणू शकला असता. कारण हे पुस्तक म्हणजे घटनाक्रम, त्यातील फटी, कागदपत्रे, विनिता कामटेंनी केलेले आरोप त्याला न मिळालेली उत्तरे याची निरस जंत्री आहे. शिर्षकाएवढा पुस्तकातील मजकूर सनसनाटी नाही. वकिली बाडं, सरकारी कामकाज इत्यादी वाचण्याची सवय असणाराच या पुस्तकातून काही निष्कर्ष काढू शकेल. पण जे पुरावे दिलेत त्याचा उगमही दिलेला आहे तेव्हा मिश्रीफांनी मांडलेली थिअरी चुकीची किंवा पूर्वग्रहदूषित असेल पण पोरकट निश्चित नाही म्हणून कदाचित बंदीची मागणी करण्यापेक्षा दुर्लक्ष करणे म्हणजे गवगवा न होउ देणे जास्त योग्य वाटले असावे.

In reply to by अंतरा आनंद

तोंडी आरोप करणे आणि पुरावे देत पुस्तक प्रसिद्ध करणे यात फरक आहे.
काय फरक आहे? पुस्तक लिहिण्याएवढे पुरावे होते तर २६/११/२००८ नंतर ते जाहीर करायला आणि संघाला (आय मीन हिंदू अतिरेक्यांना!) न्यायालयात खेचून बिचार्‍या कसाबचा बचाव करायला हवा होता? तोंडी आरोप केले म्हणजे कमी विश्वासार्ह आणि पुस्तकातून केले म्हणजे संपूर्ण विश्वासार्ह असं काही असतं का? तसं असतं संभाजी ब्रिगेडने जातीय विष ओकलेली सर्व पुस्तके विश्वासार्ह ठरली असती.
संघ परिवार या पुस्तकावर बंदी आणण्यासाठी न्यायालयात जाऊन पुस्तकावर बंदी आणू शकला असता.
संघावर स्थापनेपासून आजतगायत असंख्य आरोप झालेले आहेत. संघाने आजतगायत क्वचितच आपल्यावरील आरोपांना उत्तर दिले असेल. आपल्यावर केलेल्या आरोपांविरूद्ध न्यायालयात जाऊन दाद मागणे तर दूरच राहिले. संघावर केले जाणारे आरोप हे तद्दन फालतू असून जाणूनबुजून खोटे आरोप केले जातात हे येथील जनतेला माहिती आहे. आरोप करणारा कितीही मान्यवर असला तरी आरोपातील खरेखोटे जनता जाणून असते. त्यामुळेच खोट्या आरोपांना थारा न मिळता आरोप करणार्‍यांचेच हसे झाले आहे. डॉ. मनमोहन सिंग हे भारतातील अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्व होते. १९९१-९६ या काळात अर्थमंत्री म्हणून काम केल्यावर त्यांची प्रतिमा विद्वान, अर्थतज्ज्ञ, सुसंस्कृत, मितभाषी इ. गुणांनी नटलेली झाली होती. १९९९ च्या निवडणुकीत दिल्लीत प्रचारसभेत बोलताना, "१९८४ ला जे शिखांचे जे हत्याकांड झाले त्यात संघाचा सुद्धा हात होता" अशा अर्थाचा आरोप केला होता. संघाने या आरोपावर फारशी प्रतिक्रियाच दिली नाही. संघाच्या अंदाजाप्रमाणे हा आरोप मनमोहन सिंगांवरच बूमरँग झाला. दिल्लीत त्यांच्याविरूद्ध शिखांनीच मोठी निदर्शने केली. शेवटी मनमोहन सिंगांना आपण केलेल्या खोट्या आरोपाबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त करावी लागली. २-३ दिवसांपूर्वीच आचरटशिरोमणी कोळसेपाटील यांनी आरोप केले की १९८४ च्या दंगलीत ज्यांनी हत्याकांड घडवून आणले त्यापैकी ५०% संघाचे कार्यकर्ते होते. याचे भक्कम पुरावे त्यांच्याकडे आहेत. या आचरटाला एवढेही समजत नाही की यांच्याकडे संघाविरूद्ध इतके भक्कम पुरावे होते तर गेली ३२ वर्षे हे काय करी होते? त्यांनी अजून एक आरोप केला की भारतातील ९०% दंगली संघ सुरू करतो. या बाष्कळ आरोपांवर न्यायालयात जाणे सोडाच, संघाने प्रतिक्रिया सुद्धा दिलेली नाही. कोळसेपाटील यांचा आचरटपणा सुप्रसिद्ध असल्याने असले आरोप करून त्यांचेच हसे होते हे संघाला माहित आहे.
कारण हे पुस्तक म्हणजे घटनाक्रम, त्यातील फटी, कागदपत्रे, विनिता कामटेंनी केलेले आरोप त्याला न मिळालेली उत्तरे याची निरस जंत्री आहे. शिर्षकाएवढा पुस्तकातील मजकूर सनसनाटी नाही. वकिली बाडं, सरकारी कामकाज इत्यादी वाचण्याची सवय असणाराच या पुस्तकातून काही निष्कर्ष काढू शकेल. पण जे पुरावे दिलेत त्याचा उगमही दिलेला आहे तेव्हा मिश्रीफांनी मांडलेली थिअरी चुकीची किंवा पूर्वग्रहदूषित असेल पण पोरकट निश्चित नाही म्हणून कदाचित बंदीची मागणी करण्यापेक्षा दुर्लक्ष करणे म्हणजे गवगवा न होउ देणे जास्त योग्य वाटले असावे.
२६/११ चा हल्ला नक्की कोणी केला याचे संपूर्ण पुरावे सापडले आहेत. त्यातील एक मारेकरी कसाब याच्यावर तीन वेगवेगळ्या न्यायालयात पूर्ण कायदेशीर सुनावणी होऊन त्याच्यावरील आरोप सिद्ध होऊन त्याला फाशी झालेली आहे. असे असताना घटना घडून अनेक वर्षे उलटल्यावर व घटनेला नक्की कोण जबाबदार होते ते १००% सिद्ध झाल्यावर असली टुकार पुस्तके लिहून बेछूट आरोप करणे हे पोरकटपणाचेच लक्षण आहे. आधी सांगितल्याप्रमाणे संघ असल्या मूर्खांकडे कायमच दुर्लक्ष करीत आला आहे. त्यामुळे संघाने पुस्तकावर बंदीची मागणी केली नाही यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही.

In reply to by अंतरा आनंद

इथे विचारवंतांचा दुटप्पीपणा दिसतो बर्‍याचदा, अगदी अलिकडे राणा अयुब नावाच्या 'पत्रकार' बाईने ( इशरत प्रकरण जिने बाहेर काढलं ती) २००२च्या दंगलीबद्दल एक स्फोटक पुस्तक प्रसिद्ध केलं. ज्यासाठी तिने गुजरातेत जाऊन गुप्तपणे इन्वेस्टिगेशन केलं. वरिष्ठ पोलिसांशी वगैरे बोलली ज्यांनी मोदी-शहा जोडीबद्द्ल स्फोटक माहिती तिला देली. हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर कोणीही त्याची फार दखल घेतली नाही. त्यावर तिने असं म्हणणं सुरू केलं की ज्या लोकांवर मी आरोप केले त्यांनी माझ्या बद्दल एकाही तक्रार केली नाही ना माझ्यावर खटला भरला. म्हणजेच मी लिहिलेलं खरं आहे. याउलट, गेल्या आठवड्यात आउटलुक मासिकात एका पत्रकाराने संघ/समिती ईशान्य भारतातून तरूण मुलींची वाहतूक करत आहे आणि त्यांच्यावर जाणून बुजून हिंदू संस्कार करत आहे अशी स्टोरी लिहिली. यावर संघाने रितसर खटला दाखल केला आहे. हे झाल्यावर लगेच पत्रकार भावंडांनी आरडाओरडा सुरू केला की तुम्ही पत्रकारांवर असं दडपण कसं आणू शकता, ही दंडेलशाही आहे वगैरे वगैरे. ही डबल ढोलकी आहे.

हल्ला होणारच आहे;र्ह्याची खबर असल्याने आधीच तयार असलेल्या क्या बात है हे हिंदू अतिरेकी तर मोसादच्या तोडीचे असावेत. जे लष्कराला किंवा गुप्तहेरखात्याला माहित नव्हते तेही याना माहित होते. मग दाऊदचा काटा काढायला त्यांना सुपारी का देत नाही? उगाच त्यांच्या विरुद्ध खटला भरून त्यांचे खच्चीकारण वर सरकारचा पैसे आणि न्यायालयाचा वेळ फुकट घालवत आहेत. इतका "आचरटपणा"चा आरोप असल्याने त्यांच्या अब्रुनुकसानीच दावा तरी कसा लावावा. मुश्रिफना "आचरट शिरोमणी" हा किताब द्यावा हसावे कि रडावे हेच कळेनासे झाले आहे.

In reply to by सुबोध खरे

ते हिंदु दहशतवादी आयेसायच्या इशार्‍याहुन काम करत होते ते? आयेसाय वाट चुकलेले मुस्लिम तरुण अन माथेफिरु हिंदु लोक्स ह्या दोघांना हत्यारे पुरवत असते अन हे त्यांच्या इशार्‍यावर नाचत असतात!! नागरिकांनी जागरुक राहुन आयेसायचे ईरादे हाणुन पाडायला हवे.

पुस्तकाचे नाव हु कील्ल्ड करकरे असे आहे. काहीही लिहीले आहे. म्हणे पोलिसांनी बनाव करून अतिरेकी म्ह्णून कसाबला सादर केले. तो अतिरेकी नव्ह्ताच. सीएस्टी वरचे फूटेज दाबुन ठेवले वगैरे . अजून बरच काही लिहिलेय. बरं ते काही संशोधन करून लिहीलेय असेही नाही. प्रारंभीच उल्लेख केलाय की वर्तमानपत्रांतील बातम्या, न्युज च्यानेलच्या वार्ता यावरून निष्कर्ष काढलेत. त्या पुस्तकातील एक चांगली गोष्ट म्हणजे भारतातील मुसलमानांना काही उपदेश केलाय. बाकी सगळा भाग हिंदू षडयंत्र वगैरे वरच आहे.

In reply to by बबन ताम्बे

म्हणे पोलिसांनी बनाव करून अतिरेकी म्ह्णून कसाबला सादर केले. तो अतिरेकी नव्ह्ताच.
लोल, कोण लेखक कोण आहे. त्याच्या घरी जाउन त्याच्या पायाचे तीर्थ घ्यावे लागेल.

सुनील शेट्टीच्या पिक्चरमधला एक डायलॉग आहे,त्याला उद्देशून,"साले तुझे ईमानदारी का कीडा काटा है! तस्मात या देशात ईमानदारीचा कीडा काट्वून घेणे चुकीचे आहे.मी तर म्हणतो सर्वांनीच भ्रष्ट व्हावे,मग या देशात नाडले गेलेल्यांच्या नक्षल सारख्या संघटना अनेक संघटना स्थापण होतील,त्या राजकारणी ,उद्योजल यांच्याकडून करोडोच्या खंडण्या गोळा करतील,लोकं मारतील .अराजक माजेल .मग या देशातल्या कंपन्या बाहेर जातील् ,पैसा आटेल.मग या देशात भ्रष्टाचारासाठी काहीच पैसा शिल्लक राहणार नाही.हाच भ्रष्टाचारावर रामबण उपाय आहे,भ्रष्टाचारच भ्रष्टचाराल मारेल.

तुमच्याकडे, सत्ता आणि पैसा असेल, तर आणि तरच, ह्या देशांत तुम्ही समाधानाने राहू शकता. >> हे मात्र शंभर टक्के खरं आहे मुविकाका, अमेरिका, जापान, इत्यादी सगळे विकसित देशांकडे भरपुर या त्या मार्गाने मिळवलेला पैसा आहे आणि जगावर सत्तादेखील आहे, त्यांचे लांगुलचालन करणारे इतर देशही बर्‍यापैकी समाधानाने जगत आहेत.