नमस्कार
महाड दुर्घटना निश्चितच अतिशय दु:खद आहे.
सुरुवातिला सर्व म्रुतात्म्यांना श्रध्धांजली.
ही दुर्घटना व्हायाला सरकारे जबाब्दार आहेत. पण आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एक्मेकावर चिखल्फेक न करता त्वरीत सर्व पुलांचे ऑडिट सुरु केले पाहिजे.
मिपाकरांनी असे इतर पूल या धाग्यात लिहावेत.
सांगलीचा आयर्विन पूल हाही ब्रिटिश्कालीन असुन तोहि दुर्घटनाग्रस्त होउ शकतो.
या पुलाबद्दल माहिति असुन्ही तेथे वाहतुक चालु होती आता कुठे जड वाहतुक बंद केली आहे.
हा पूल ८९ वर्षांचा आहे,
च्यायला ! मेले लोकं तर काय एव्हढं ? आठवतंय लल्लूप्रसाद म्हणालेले की सैनिक तर मरण्यासाठीच सैन्यात भरती होतात ? त्याच धर्तीवर म्हणूया की सामान्य माणसं भ्रष्ट अधिकारी आणि नेतेमंडळींसाठी मरायला जन्माला आलीयेत.
-गा.पै.
गेल्या आठवड्यात मराठी न्यूज चॅनेल वर झालेल्या चर्चेत पेंडसे(हायवे संशोधक व अभ्यासक ) आणि परिणीता दांडेकर (जल विशेषज्ञ) या दोघांनी खूपच अभ्यासपूर्ण माहिती दिली. या दोघां व्यतिरिक्त एक पत्रकार आणि एक राष्ट्रवादीचा माणूस होता. मला त्यांची नावं लक्षात नाहीत आणि लक्षात ठेवायची गरजही वाटली नाही कारण ते राजकारण, कोकणी लोकांवर कसा आजतागायत अन्याय झालाय, आमचं सरकार -तुमचं सरकार ई. बोलत होते.
या महाड दुर्घटनेच्या निमित्ताने पावसाळ्यातील कोकणातील परिस्थिती बद्दल थोडे --
१) कोकणात प्रचंड पाऊस पडतो हे तर आता सर्वश्रुत आहे. पहिल्याच पावसाने तिथे मोठमोठी झाडे पडणे, त्यामुळे ४ दिवस ते १ आठवडा वीज नसणे,पूर येणे ई. प्रकार होतात. हे वर्षोनुवर्षे सुरु आहे. परंतु आपत्कालीन व्यवस्था तिथे नाही. प्रत्येक वेळी तिथली स्थानिक माणसेच हाताशी असलेल्या साधनांनी लोकांच्या मदतीला पुढे येतात.
२)कोकणात जायला घाटांशिवाय पर्याय नाही. आंबा, करूळ /गगनबावडा ई. घाट पावसाळ्यात वाहतुकीला किती असुरक्षित असतात! पण त्या बाबतीत कोणतीही उपाययोजना /खबरदारी घेतली जात नाही.
३) अतिवृष्टी मुळे दरवर्षी कित्येक गावांचा सम्पर्क तुटतो. कारण चहुबाजूने गाव पुराने वेढलेलं असतं,टेलिफोन डेड असतात व मोबाईलला रेंज नसते. दळणवळणाची साधने आजही अपुरीच आहेत. थोडक्यात कोणत्याही प्रकारच्या इमर्जन्सी साठी काहीही उपाययोजना नाही.
४) पावसामुळे रस्ते खराब होणे साहजिक आहे पण दरवर्षी पावसाळ्यापूर्वी कोणतीही डागडुज्जी केली जात नाही.
वरील पैकी मोबाईल सोडता सर्व परिस्थिती मी माझ्या लहानपणी ३५-४० वर्षांपूर्वी जी अनुभवली आहे ती अजून तशीच आहे.
महाड दुर्घटनेमुळे हि परिस्थिती पुन्हा एकदा प्रकाशात आली आहे एवढेच.आत्ता पुलांचे ऑडिट करून पुढे काय? कारण ह्या पुलाचे पण ऑडिट झालेच होते आणि त्याला हिरवा कंदील दाखवला गेला होताच.
तसेच एखादा पूल वाहतुकीसाठी असुरक्षित आहे असं ऑडिट मध्ये स्पष्ट झालं तर काय होईल, तिथली वाहतूक बंद केली जाईल. पण त्यासाठी पर्यायी रस्ता असेल तरच हे शक्य आहे.
आत्ता ताबडतोब अशा असुरक्षित पुलांच्या आसपास आपत्कालीन गस्ती पथकं सुरु करणं जास्त परिणामकारक ठरेल कारण कोणतीही नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर मदत किती लवकर सुरु होते याला जास्त महत्त्व आहे.
अवांतर - कोकण म्हणजे फक्तं पेण , अलिबाग, महाड,चिपळूण आणि रत्नागिरी नव्हे.
मागच्या शुक्रवारी रात्री ३.३० च्या दरम्यान माझी बस ह्या पुलाच्या बाजुच्या पुलावरुन पास झाली. ४ ते ५ सेकंद लागले असतील पास व्हायला , पणं ह्या ४ ते ५ सेकंदात जे पाहीलं ते खुप रौद्र होतं. तुटलेल्या पुलाच्या खालुन १ फुटावर पाणी उसळ्या मारत वहात होत. गाडीच्या अपुर्या प्रकाशात ते अजुन भयानक वाटत होतं. पाण्याचा वेग एवढा होता की साधा गाडीचा टायर जरी त्या पाण्यात भीरकावला असता तरी १० मिनीटात तो पाच एक कीलोमीटर वाहत गेला असता. तो मोडलेला पुल देखील कधीही वाहत जाइल असं वाटत होतं.
पहिली गोष्ट मिपाकर असंवेदनशील वगैरे नाहीत हो! पण अशा दुर्घटना सुन्न करून जातात. काय बोलायचं यावर? मागेही माळीण दुर्घटनेबद्दल असाच आरोप केला गेला होता. खफवर अशा बाबींवर ताबडतोब चर्चा होत असतेच. धागा काढण्या - न काढण्यावरून मिपाकरांची संवेदनशीलता मोजू नये असे वाटते.
असो. एका एसटी बसचे अवशेष सापडलेत सरतेशेवटी असे वाचले. पुलापासून दोनशे मीटर अंतरावर. सर्व बेपत्ता वाहने आणि माणसांचा शोध लागो ही प्रार्थना.
मी तर आपल्याच घरातील कोणी गेल्यासारखे हे प्रकरण टी व्ही वर फॉलो करीत आहे. ड्रायवर आंजर्ले इथे सापडणे हे अनाकलनीय आहे. पूल ते समुद्र हे अंतर साधारणपणे ६१ किमी अशी पूर्व पश्चिम नदी पण तेथून मृतदेह दक्षिणेकडे १३ किमी वहात गेला आहे. सबब उरलेले सापडणे किती कठीण आहे याचा अंदाज यावा. दगड हा कॉन्क्रिटपेक्षा मजबूत आहे पण त्यात रिएनफोर्स असे काही नसते. त्यामुळे त्याचे वारंवार परिक्षण होणे गरजेचे असते असे एका माहीतगाराने सांगितले. हा पूल व सर्वच ब्रिटीश कालीन पूल हे चुना व दगड यांच्या साह्याने बनले आहेत. चुना सिंमेंटपेक्षा अधिक उत्तम मानला जातो.
इंग्रजांचे पूल हे आपण बदलेल्या पुलापेक्षा जास्त टिकतात कारण त्यांची गुणवत्ता चांगली होती आणि त्यात भ्रष्टाचार न्हवता असा एक प्रवाद आहे। पण खरे तर सिमेंट मध्ये बांधलेल्या पुलांची लाईफ हि दगड चुन्यात बदलेल्या पुलापेक्षा कमी असते याचे कारण फक्त ब्रिटिशांची गुणवत्ता नसून याचे कारण स्टील चे corrosion होत असते तसेच सिमेंट हि हवामानामुळे कमजोर होत असते त्यामानाने दगड हा शतको शतके राहू शकतो, दगडांना साधणारा चुना मात्र खराब होऊ शकतो। वापरलेल्या चुन्याच्या गुणवत्तेनुसार हे पूल जास्त काळ टिकून राहू शकतात मात्र त्यांची वजन वाहण्याची श्यक्यता कमी असल्याने आजच्या युगात त्याच काम संपलाय।
प्रतिक्रिया
नमस्कार
मी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट
मेले तर मेले ....
बिहार चे पंचायती राज मंत्री
महाडची घटना अतीशय दुर्दैवी आहे
भयंकर
पहिली गोष्ट मिपाकर असंवेदनशील
+११
+१११
इंग्रजांचे पूल हे आपण
मि गेल्या ४ वर्शात अनेकदा