व्हेज नुडल्स
साहीत्य:
नुडल्स - ३ पाकीट
व्हिनेगार - ४ चमचे
ग्रीन चीली सॉस - ४ चमचे
टमाटो सॉस - २ चमचे
लसुण - १२/१५. बारीक चिरुन
तेल - ४ /५ मोठे चमचे
मीठ - चवीनुसार
मिरपुड - १ चमचा
भाज्या आवडी प्रमाणे. मी खालील घेतल्या
कांदा १
ढब्बु मिर्ची - १
गाजर - १
पत्ता कोबी - वाटी भर बारीक चीरुन
वाटाणे - १/२ वाटी
कृती:
सर्व भाज्या बारीक उभ्या चीरुन घ्या.
व्हिनेगार व दोन्ही सॉस एकत्र करुन घ्या.
एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळा. १ चमचा मीठ आणी १ चमचा तेल घाला. नुडल्स पाण्यात शिजवुन घ्या. चाळणी वर उपसुन ठेवा.
एका नॉनस्टीक भांड्या मधे ४ चमचे तेल गरम करा.
लसुण घाला व कच्चट वास जाई पर्यंत फ्राय करा.
आता बाकी भाज्या घाला व थोडे परतवुन घ्या.
मीठ आणी मिरपुड टाकुन नीट मिक्स करा. एक हलकी वाफ काढा. भाज्या खुप शिजवायच्या नाही. थोडं क्रंची / कच्चट असु दे.
व्हिनेगार - सॉस मिश्रण घाला
शेवटी नुडल्स घालुन हलक्या हाताने मिसळुन घ्या.
व्हेज नुडल्स तयार. आपल्या आवडीच्या साइड डीश सोबत गरम गरम सर्व्ह करा

वाचने
6164
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान पाकृ.
छान
रेसिपी छान !
धन्यवाद
In reply to रेसिपी छान ! by पगला गजोधर
चायनीज लोकं, अत्यंत उच्चं
In reply to रेसिपी छान ! by पगला गजोधर
वोक मिळत नाहीत सहज.कढयाच
असू द्या हो.
In reply to वोक मिळत नाहीत सहज.कढयाच by कंजूस