Skip to main content

उन्मुक्त

लेखक जयवी यांनी गुरुवार, 29/01/2009 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
देहफुले उमलवून मुक्त तू उन्मुक्त तू तुफानी प्रीत सरी उधळूनी रिक्त तू झेलूनी तुझा प्रपात नखशिखान्त नाहते प्रणयाचा मी मरंद मनमुराद चाखते दाहक कोसळ तुझा उतरतो नसानसात मदहोशी पसरते गात्रातून अंतरात वितळते मिठीत मुग्ध बेहोषी धुंद धुंद उन्मेषी श्वासांची लयकारी मंद मंद जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 4089
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

सुंदररित्या शब्द बद्ध केलय. कुठेही अश्लीलता जाणवत नाही. झेलूनी तुझा प्रपात नखशिखान्त नाहते प्रणयाचा मी मरंद मनमुराद चाखते हे तर खासच. शेखर.

सुंदर आज छोट्या ओळींच्या कवितांचा दिवस दिसतोय. (ह. घ्या) खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

सपुर्ण कविता आवडली. नीलकांत

In reply to by नीलकांत

हेच बोलतो --अवलिया काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार? व्यनी सोडा खव वापरा.

In reply to by अवलिया

खरंच आवडली (=> कळलीही) एक शंका: मरंद म्हणजे मकरंदच का? अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदिती..... मरंद म्हणजेच मकरंद :)

कविता आवडली. मरंद हा शब्द प्रथमच वाचला. उन्मेष म्हणजे अंकूर किंवा असेच काही ना? नवनवोन्मेषशालिनी लेखणी :) उन्मेषी श्वास म्हणजे काय? -- लिखाळ.

वेगळी लय आहे.. मरंद, लयकारी.. सुंदर शब्द रचना... खासच. सुरेखच कविता आहे. वितळते मिठीत मुग्ध बेहोषी धुंद धुंद उन्मेषी श्वासांची लयकारी मंद मंद जबरदस्त! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

'मरंद' हा नवीन शब्द समजला जयश्री ... धन्स... कविता आवडली(च) हेवेसांन :)

आवडली कविता.

सुंदर कविता !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

जयश्री, मस्त कविता. खूप दिवसांनी आलीस. साती

आयला! कविता लैच मादक आहे! जियो..! तात्या.

कविता छानच आहे. पण मला "उन्मेष" चा अर्थ कळला नाही. कोणी सांगेल काय?

In reply to by प्रमोद देव

काका, चाल छान आहे.. :) काही वेळेला गजाननराव वाटव्यांचा पगडा वाटतो.. :) आपला, (वाटवेप्रेमी) तात्या.