नमस्कार
मी मिपावर नवखि आहे. कृपया काही चुक झाली तर सांभाळून घ्यावे.
शेंगोळ्याचे लाडू हा माझा जिव की प्राण आहे. मी कोल्हापूरची आहे.हा प्रकार फक्त कोल्हापूर, सांगली जिल्हातील फक्त जैन लोकच बनवतात. मी हॉस्टेलला असताना माझी आई हे लाडू करुन द्याची. पोरी अक्षरशः तुटून पडायच्या डब्ब्यावर आणि फडशा पाडायच्या माझ्या हाती एकादा लाडू लागायचा. दिवाळीला फक्त हाच लाडु बनतो आमच्या घरी. आता बाप्पांचे आगमन होणार आहे. नवनविन खाद्य पदार्थ आणि प्रसादांची रेलचेल असेल. म्हणुन आपणही एक नविन पदार्थ सर्वाना सांगावा असे मला वाटले.
मी अजून हे लाडू नाही बनवले माझी आई किंवा सासुबाई बनवतात. त्यामुळे फोटो अर्थात नाहित.
साहित्य- मला १ किलोचे प्रमाण माहित आहे त्यानुसार साहित्य सांगते.
१ किलो हरभरा डाळ दळून घेणे.
१ किलो साखर (मी आईला पाऊण किलो घ्यायला सांगते मला जास्त गोड नाही आवडत).
पाऊण लिटर आकडी न तापवलेले दूध
१/४ किलो तूप
७-८ वेलदोडे.
हवे असल्यास ड्रायफ्रुट.
पाकृ- हा पदार्थ तूपाने युक्त असल्याने हृदय विकार असणार्यांच्या छातीत जळजळ होण्याची शक्यता आहे. कृपया त्यांनी दूरच रहावे.
प्रथम डाळीचे पिठ एका पराती मध्ये चाळून घ्या.मग त्यात ३ चमचे तुप घालून फक्त दुधामध्ये मळून घ्या. घट्ट मळा एकदम. २-३ तास झाकुन ठेवा.
२-३ तासाने मळलेल्या पिठाचे पोळपाटावर हाताच्या सहायाने शेंगोळे वळून घ्या. मला नाही आवडत हे काम. खुप हात दुखतो. शेजारच्या बर्नर वर एका कढईत थोडे तूप गरम करायला ठेवा. जसजसे शेंगोळे वळतील तसतसे पटकन खरपूस chocolaty रंगावर मंद आचेवर तळून घ्या. आतून अजिबात कच्चे राहणार नाहीत याची दक्षता घ्या. हे सर्व करायला खुप पेशन्स हवा कारण खुप वेळ खाऊ पण स्वादिष्ट लाडू आहेत.
सर्व शेंगोळे तळून झाले की ते मोडून मिक्सरला बारिक दळून घ्या. अगदी बारिक रव्यासारख झाल पाहिजे पिठ. हे काम मला जास्त आवडत कारण शेंगोळे मोडता मोडता हळूच तोंडात टाकायच अहाहा काय भारी लागत म्हणुन सांगू त्यामुळे हे काम मी विना तक्रार करते
आता इथून पुढची पाकृ रव्याच्या लाडू सारखीच आहे जवळपास. तर हे चाळलेल पिठ कम रवा एका पातेल्यात घ्या व परत थोड्या तुपावर मंद आचेवर भाजून घ्या. काय झाल जळजळल ना छातीत काय करु खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी हा बाणा त्यावेळेस सर्वानी घेतलेला असतो. मग माझा नाईलाज आहे.
तर पुढे, पिठ भाजत असताना शेजारी साखरेच्या पाकाचीही तयारी करावी. १ किलो साखर एका पातेल्यात घ्या व त्यात साखर बुडून थोडवप राहिल ईतक पाणी घाला व शेगडी वर ठेवा. पिठ भाजुन झाल की ते उतरवा. आणि पाकाकडे लक्ष द्या. थोडा कच्चाच पाक धरा. रव्याच्या लाडुला धरतो तसा. मग ३ चमचे तुप घाला पाकात आणि हळुहळू पिठ पाकात पेरा व सतत ढवळत रहा गाठी राहणार ऩाहीत याची दक्षता घ्या. ह्यावेळी आच मंद ठेवा नाहीतर करपेल पिठ.
पातळ पिठल्यासारख होईल मिश्रण मग आच बंद करा व वरुन वेलची पूड ड्रायफ्रुट घालून हलवा. व मिश्रण झाकुन ठेवा. लाडु वळता येण्या इतपत घट्ट झाल की मग हाताने सर्व गाठी ढेकुळ फोडुन लाडू वळायला घ्या.
हुश्श तर अशी आहे ही लाडवाची कहाणी. आता लक्षात आलेलच असेल तुमच्या की मी हे लाडू स्वतः का नाही बनवत.
पण तुम्ही एकदातरी तुमच्याकडे भरपुर वेळ असेल अन करायला काय नसेल दुसर तेव्हा ही रेसिपी ट्राय करा अन कसे झाले ते मला कळवा.
काही चुका असतील किंबहुना असणारच तर क्षमस्व
धन्यवाद
आपली विप्लव
वाचने
16552
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
बेसनाच्या भाजणीचेही लाडू असे
नेक्श्ट टाईमच्या पाकृला नक्की
In reply to बेसनाच्या भाजणीचेही लाडू असे by एस
अगदी हेच
In reply to बेसनाच्या भाजणीचेही लाडू असे by एस
छान आहे पाककृती. लेखनशैली पण
थँक्यू
In reply to छान आहे पाककृती. लेखनशैली पण by पद्मावति
२-३ तासाने मळलेल्या पिठाचे
२-३ तासाने मळलेल्या पिठाचे पोळपाटावर हाताच्या सहायाने शेंगोळे वळून घ्या>>
शेंगोळे म्हणजे काय?शेंगोळे म्हणजे थोडक्यात
In reply to २-३ तासाने मळलेल्या पिठाचे by संजय पाटिल
...
In reply to २-३ तासाने मळलेल्या पिठाचे by संजय पाटिल
हे बघा.
In reply to ... by चंपाबाई
व्वोखे.. समजलं.. थ्यांन्कू.
In reply to ... by चंपाबाई
फोटो टाकलात तर बरं होईल.
गिलीवीड?
In reply to फोटो टाकलात तर बरं होईल. by आदूबाळ
शेंगोळे
दर मैलाला भाषा बदलते अस
In reply to शेंगोळे by बरखा
हेच सांगायला आलो होतो.
In reply to शेंगोळे by बरखा
वेगळा पदार्थ आहे. चुरम्याच्या
चुरम्याच्या लाडवाची आठवण आली.
In reply to वेगळा पदार्थ आहे. चुरम्याच्या by रेवती
नका ओ सूड उगवू नविन आहे
In reply to चुरम्याच्या लाडवाची आठवण आली. by सूड
चुरम्याच्या लाडवाची आठवण आली.
In reply to वेगळा पदार्थ आहे. चुरम्याच्या by रेवती
हुलग्याचे पीठ नाही का वापरत
हुलगा खात नाहीत आमच्याकडे तो
In reply to हुलग्याचे पीठ नाही का वापरत by लालगरूड
छान लिहिलीये पाकृ.पुढच्या
हो अगदी नक्की. आणि हो तुम्ही
In reply to छान लिहिलीये पाकृ.पुढच्या by अजया
फोटो नसल्यामुळे आवंढा गिळता
छान आहे पाकृ,
फोटो पाहिजे ना राव.
:( फोटो कसे टाकायचे. टाकता
In reply to फोटो पाहिजे ना राव. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वेगळी पाकृ
शेवेच्या लाडू सारखेच आहे .
माझी आजी अशीच बेसन बर्फी