Skip to main content

पाककृती सुचवा वात प्रकृती साठी

लेखक सतिश रानडे यांनी शुक्रवार, 29/07/2016 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
माझी पत्नी आमवाताने त्रस्त आहे. खाण्यावर बरीच बंधने आहेत नेहमीच तेच तेच पदार्थ साळीच्या लाह्या वगैरे खाऊन कंटाळली आहे सबब समस्त बल्लवाचार्याना / बंधुभगिनींना विनंती आहे कि काही तरी नवीन पदार्थ सुचवावे . माझे हे पहिलेच लेखन आहे काही चुकल्यास क्षमा असावी

वाचने 7353
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

धन्यवाद - वैद्यांच्या मते आमवात हा वाताचा प्रकार आहे बहुतेक माझ्याकडून विषय मांडताना चुकलेले आहे

मुंबई परीसरात असाल तर, डोंबिवलीला वैद्य विनय वेलणकर आहेत, ते योग्य तो आहार मस्त गप्पा मारता-मारता सुचवू शकतात. दादरला रहात असाल तर, खडीवाले वैद्य योग्य तो आहार सुचवू शकतात. हे वैद्य बर्‍यापैकी सडेतोड असल्याने फार सांभाळून बोलावे लागते.पण गूण जबरदस्त. रत्नागिरीला रहात असाल तर वैद्य अभ्यंकर (जोशी पाळंद) आणि वैद्य उमेश केळकर अप्रतिम. चिपळूण परीसरात रहात असाल तर, वैद्य विद्यानंद दिक्षित. मला तरी पोटाच्या विकारांवर वैद्य लोकांचे औषध जास्त उपयोगी ठरले आहे.

बाकी जास्त माहीत नाही पण हवाबाण हर्डे देवु नका हे नक्की =)))) अवांतर : आला लगेच मिपाडॉक्टर येतील औचित्यबौचित्यभंग की काहीबाही म्हणत , त्यांना द्या हवाबाण हर्डे =))))

आमवातामधे शक्यतो आम्बट , आम्बवलेले पदार्थ खाउ नयेत. ज्वारी, नाचणीची ताक न घातलेली उकड ट्राय करु शकता.

आमवातामधे शक्यतो आम्बट , आम्बवलेले पदार्थ खाउ नयेत. ज्वारी, नाचणीची ताक न घातलेली उकड ट्राय करु शकता.

वात: गुडघे दुखणे वगैरे असेल तर अधूनमधून एरंडेल चमचाभर घेणे. आमवात: खाल्लेलं नीट पचत नाही आणि पचून उरलेलं शरीराबाहेर टाकलं जात नाही तो आम होय.तो वेगवेगळ्या प्रकारे परिणाम दाखवतो-झोप येत राहाणे/पाय दुखणे/डोकं जड होणे/खोकला/निरुत्साह /अंगाला कंड सुटणे वगैरे.- त्रिकटु चूर्ण चिमुटभर जेवताना घेतल्यास काय वाटेल ते पचते.अधूनमधून त्रिफळा घेणे.

आम वात म्हणजे र्‍हुमटिक आर्थायटिस ना?