✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मराठीत नवीन संस्थळ सुरु करणे

ज
जॅक द रिपर यांनी
गुरुवार, 07/28/2016 - 02:32  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी! गेल्या वर्षाभरापासून मी मिसळपावचा सदस्य आहे. त्याआधी वाचनमात्रं तर कित्येक महिने होतो. मराठी भाषेतील एक अत्यंत अप्रतिम संस्थळ म्हणून मिसळपाव आपलं नाव सार्थ करत आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. इथल्या अनेक वेगवेगळ्या विभागांमध्ये मिळणारी माहिती, अप्रतिम साहित्य, पाककृती, अनेक राजकीय चर्चा यांतून जी ज्ञानप्राप्ती होते ती केवळ अद्वितीयच म्हणावी लागेल. एवढा अवाढव्य पसारा सांभाळणार्‍या आणि चालवणार्‍या अ‍ॅडमिनना तर काय म्हणावं? केवळ सुपरमॅनच (किंवा रजनीकांत)! मराठी भाषेचा विचार करताना मिसळपाव, मायबोली, ऐसी अक्षरे, मनोगत अशी अनेक संस्थळं माझ्या पाहण्यात आली, परंतु आजपर्यंत असं एकही संस्थळ माझ्या मातृभाषेत-कोकणीत मला आढळून आलं नाही. त्या दृष्टीने विचार करता कोकणी भाषा आणि जगभरात पसरलेले कोंकणी भाषिक आपल्या मातृभाषेतील वैचारीक देवाणघेवाणीला त्या अर्थाने पारखे झालेत असं मनात आलं आणि मग वाटलं आपणच असा प्रयत्नं का करु नये? माझ्या मनात आलेले त्या दृष्टीने काही प्रश्न - १. एखादं संस्थळ सुरु करण्यासाठी काय लागतं? २. साधारणतः किती खर्च येतो? ३. एखाद्या विशिष्ट प्रकारचं सॉफ्टवेअर लागतं का? त्यातील तज्ञ मंडळी साधारण किती पैसे घेतात? ४. एकदा संस्थळ तयार झाल्यावर ते चालवण्यासाठी कोणकोणत्या तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता असते? ५. वार्षिक मेंटेनन्सला साधारण किती खर्च येतो? ६. कोणकोणत्या कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागते आणि खबरदारी घावी लागते? मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5403 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

काही उत्तरं

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 07/28/2016 - 04:04 नवीन
१. थोडे पैसे, थोडा वेळ. संस्थळ चालू ठेवायचं असेल तर मात्र बराच वेळ आणि काही माणसं. २. वर्षाला काही हजार रुपयांच्या वर खर्च होऊ नये. पण अधिक खर्च करायचा असेल तर मर्यादा नाही. ३. देवनागरी टंकनाची सोय हवी असेल तर ड्रूपाल वापरा. ठराविक सॉफ्टवर लागत नाही; ही संस्थळं जी content management system वापरतात (ड्रूपाल) ती सर्व्हरवरच चढवलेली असते. संस्थळ तयार करून देण्यासाठी किती पैसे मोजावे लागतील ह्याची अजिबातच कल्पना नाही. ४. फार ज्ञान लागत नाही. तुमच्या कंप्यूटरवर ड्रूपाल ७ चढवा; त्याच्याशी एखादा वीकेण्डभर खेळा. तुम्हाला हवं तसं संस्थळ तुमच्या कंप्यूटरवर तयार करा. त्यातून पुरेसा अंदाज येईल. ५. (नियमितपणे अपडेट करणं, विदागाराचा बॅकप घेणं ह्या गोष्टी स्वतःच करणार असाल तर) वेबस्पेस आणि डोमेन नेमचं भाडं वर्षाला काही हजार रुपये असेल, तेवढाच. ६. इतर मराठी संस्थळांसारखंच, फक्त संस्थळ चालवायचं असं मॉडेल असेल तर फार नाही => काही नाही. व्यक्तिगत मानहानीकारक मजकूर आणि तिरंग्याचा अपमान अशा भारतीय कायद्यात न बसणाऱ्या गोष्टी संस्थळावर नसल्या की झालं. आणखी काही मदत हवी असेल तर तुमचा इमेल पत्ता मला व्यनि करा. मला खूप माहिती आणि अनुभव आहे अशातली बाब नाही; पण थोडी खुडबूड करता येते.
  • Log in or register to post comments

नमस्कार

जॅक द रिपर
गुरुवार, 07/28/2016 - 05:27 नवीन
मनःपूर्वक धन्यवाद! तुम्हाला माझा इमेल संपर्कातून पाठवला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

उत्तम प्रतिसाद अदितीचा.

कंजूस
गुरुवार, 07/28/2016 - 05:25 नवीन
उत्तम प्रतिसाद अदितीचा. माझ्या मते जी मराठी संस्थळे गेल्या दोन वर्षांत बंद पडली आहेत त्यातील एक घेऊन सुरू करा आणि पाचसहा महिन्यांनी तुम्हाला हवा तसा बदल करा अथवा वेगळे रूप द्या.काम सुरू केलं की मदत करणारे भेटत जातील. एक प्रश्न: सर्व सर्वर अमेरिकेतच आहेत का भारत सरकारही यात काही करत आहे?
  • Log in or register to post comments

सगळ्यात महत्वाचं म्हणजे

मराठमोळा
गुरुवार, 07/28/2016 - 07:12 नवीन
सगळ्यात महत्वाचं म्हणजे संस्थळ का सुरु करायचं हे ठरवा आणी स्वतःला त्या ध्येयासाठी कितपत आस आहे हे समजून घ्या. हा तुनळीवरचा व्हिडिओ पहा आणी हेही एकदा पहा संस्थळ म्हणा किंवा कोणताही नवा बिझीनेस याचा पाया काय आणी कितपत मजबूत यावरून तो कितपत यशस्वी होऊ शकतो याचा अंदाज येतो. तांत्रिक बाबी फार किरकोळ आहेत. वेबसाईट बनवून देणारे ढिगाने आहेत आणी आजकाल क्लाऊड कंप्युटींग मुळे ईंफ्रास्ट्र्क्चर (Amazon web Services, Google cloud, IAAS, PAAS गुगलून पहा) फार स्वस्त झाले आहे.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद ऑफ द ट्रॅक वाटल्यास,

मराठमोळा
गुरुवार, 07/28/2016 - 07:14 नवीन
प्रतिसाद ऑफ द ट्रॅक वाटल्यास, दुर्लक्ष करा हे लिहायचे राहून गेले. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

'अक्षरास हसू नये' हे पण

जॅक द रिपर
गुरुवार, 07/28/2016 - 07:35 नवीन
'अक्षरास हसू नये' हे पण राहीलं ना :). मनापासून काहीतरी करण्याची इच्छा आहे म्हणूनच तर ही चौकशी केली दादा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

जॅक साहेब,

मराठमोळा
गुरुवार, 07/28/2016 - 08:30 नवीन
जॅक साहेब, तुमच्या ईच्छेबद्दल किंवा हेतुबद्दल शंका घेतली नव्हती किंवा उमेदीलाही धक्का लावायचा नव्हता, तसे वाटले असल्यास क्षमस्व. मला फक्त हे म्हणायचे होते की बर्‍याचदा उपक्रम ईच्छाशक्ती आणी मार्गदर्शनाअभावी मागे किंवा बंद पडतात. म्हणून 'पॅशन' आणी 'बिग पिक्चर' ओळखणे महत्वाचे आहे ईतकेच. वरील व्हिडीओ पाहिले असतील तर मी काय म्हणतो ते लक्षात येईल. तुमच्या उपक्र्माला शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक द रिपर

कोकणीमधलं संस्थळ सुरु करणार?

यशोधरा
गुरुवार, 07/28/2016 - 07:47 नवीन
कोकणीमधलं संस्थळ सुरु करणार? मस्त! :) शुभेच्छा. संस्थळ सुरु झालं की सांगालच.
  • Log in or register to post comments

कोकणी संस्थळास शुभेच्छा !

मंदार कात्रे
गुरुवार, 07/28/2016 - 08:56 नवीन
कोकणी संस्थळास शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

काढा, काढा. कोकणी संस्थळ हा

अभ्या..
गुरुवार, 07/28/2016 - 09:08 नवीन
काढा, काढा. कोकणी संस्थळ हा पथदर्शी प्रकल्प असेल. आमच्या स्पावड्याला घ्या. फार कामाचा माणूस तो.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

पैसा
गुरुवार, 07/28/2016 - 09:37 नवीन
शुभेच्छा! कोंकणी साईट काढलीत की जरूर कळवा. सगळ्या प्रादेशिक भाषातून संस्थळे, लोकांना विचारांची देवाण घेवाण करता आलीच पाहिजे. साईट काढणे आणि चालवणे याबाबत काही माहीत नसल्याने शुभेच्छांशिवाय काही मदत देऊ शकत नाही. आम्ही मात्र कायमचे मिपाकरच!
  • Log in or register to post comments

तुमच्या प्रकल्पाला हार्दीक

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 07/28/2016 - 09:44 नवीन
तुमच्या प्रकल्पाला हार्दीक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

कविता१९७८
गुरुवार, 07/28/2016 - 09:47 नवीन
शुभेच्छा
  • Log in or register to post comments

शुभेच्छा...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 07/28/2016 - 10:21 नवीन
आपणास संस्थळ काढण्यासाठी शुभेच्छा. आपण इथेच एक कोंकणी विभाग सुरु करू. मिपावरच इथे एक विभाग चालतो ना काय नाव त्याचं ते मी विसरलो तसंही आपल्याला इथे करता येईल.असं वाटून गेलं. बाकी, मला द्रुपलवर बऱ्यापैकी काम करता येतं. हौस म्हणून केलंही होतं एक सुरु. मोड्यूल अपलोड, इंस्टॉल, परमीशन्स, पण आता मला कंटाळा म्हणून मी काही मदत करू शकत नाही.सॉरी. बाकी, पै सारखेच आम्ही कायमचे मिपाकर. जीना यहाँ, मरना यहां, मिपा सिवा जाना कहा. संस्थळासाठी आपणास तहे दिलसे शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हेमंत वाघे यांना अनुभव आहे

कंजूस
गुरुवार, 07/28/2016 - 10:51 नवीन
हेमंत वाघे यांना अनुभव आहे यातला असं परवाच्या वाशी कट्ट्याला बोलले होते.
  • Log in or register to post comments

मिसळपाववर कोंकणी विभाग सुरु

गवि
गुरुवार, 07/28/2016 - 11:21 नवीन
मिसळपाववर कोंकणी विभाग सुरु करता येईल. तशी इच्छा असल्यास इथेच मत नोंदवा. अॅडमिनना विनंती करुन तसा विभाग चालू करु. पूर्ण वेगळं संस्थळ एस्टॅब्लिश करण्याला हाही एक पर्याय ठरु शकेल. मिपाच्या मुख्य प्रवाहाचा नवीन विभागाला वाढीसाठी उपयोग होऊ शकेल. बंदिस्त विभाग न करता खुलं दालन ठेवता येईल.
  • Log in or register to post comments

प्लीज करा. कोकणी- मालवणी असा.

यशोधरा
गुरुवार, 07/28/2016 - 11:33 नवीन
प्लीज करा. कोकणी- मालवणी असा. धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

कोंकणी शिकायला सुरुवात करणारच

खेडूत
गुरुवार, 07/28/2016 - 11:39 नवीन
कोंकणी शिकायला सुरुवात करणारच आहे, पुस्तक मागवले आहे. असा विभाग किंवा संस्थळ सुरू झाल्यास खूप उपयोग होईल.. शुभेछ्छा...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

अरे वा! कोणते मागवलेत?

यशोधरा
गुरुवार, 07/28/2016 - 12:01 नवीन
अरे वा! कोणते मागवलेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

वसंत लवंदे यांचं आहे, पण

खेडूत
गुरुवार, 07/28/2016 - 12:22 नवीन
वसंत लवंदे यांचं आहे, पण पेमेंट करताना कांही गडबड होतेय. दुसरं बोरकरांचं आहे ते मागवलंय- पण इंग्रजीत आहे. अजून एक श्रीधर बर्वे म्हणून आहे त्यांचं फक्त कोंकणी बोलण्यासाठी आहे. त्याला कोंकणी अकादमीचा पुरस्कार पण मिळालाय. अता ही अकादमी केव्हढी आहे वगैरे ठाऊक अनही! कायप्पा समूहावर ती एकदम पन्नास मागवलीयत. बघू, आधी काय मिळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

एकदम ५०? नावं व्य नि कराल का?

यशोधरा
गुरुवार, 07/28/2016 - 12:37 नवीन
एकदम ५०? नावं व्य नि कराल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

ऐकायला अतिशय गोड असणारी ही

गवि
गुरुवार, 07/28/2016 - 11:50 नवीन
ऐकायला अतिशय गोड असणारी ही भाषा फार आवडते. पण शिकण्याच्या बाबतीत वश होत नाही. समोरचा अस्सल गोयंकार फास्ट स्पीडमधे बोलायला लागला की कानाला गोडवा वाढतो पण शब्द समजून अंदाज लावण्याचा प्रोसेसिंग स्पीड कोलमडतो आणि एकदम काहीच ट्रॅक लागत नाही. पण आमचें नशीबमधलं गोडाचों पाव, आणि उंदीरमामा, कतरीना वगैरे अशी पॉप्युलर गाणी नेहमी ऐकत राहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

पण आमचें नशीबमधलं गोडाचों पाव

आदूबाळ
गुरुवार, 07/28/2016 - 11:54 नवीन
पण आमचें नशीबमधलं गोडाचों पाव, आणि उंदीरमामा, कतरीना वगैरे अशी पॉप्युलर गाणी नेहमी ऐकत राहतो.
ये बात! अशी आणखी गाणी माहीत असतील तर कृ० सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गाणी

रघुनाथ.केरकर
गुरुवार, 07/28/2016 - 11:59 नवीन
दि दि कतरीन, कोकणी आमची गोयची भास, बेबदो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

गाणी

रघुनाथ.केरकर
गुरुवार, 07/28/2016 - 11:59 नवीन
दि दि कतरीन, कोकणी आमची गोयची भास, बेबदो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

धन्यवाद!

आदूबाळ
गुरुवार, 07/28/2016 - 13:02 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

तुजें देव बरें करों

रघुनाथ.केरकर
गुरुवार, 07/28/2016 - 11:48 नवीन
माका कोंकणी उलोवचाक येयना रे, तरी तुका हुनहुनीत परबी.... :-)
  • Log in or register to post comments

आवाज मोगाचो आणि पुढे काहीतरी

गवि
गुरुवार, 07/28/2016 - 12:12 नवीन
आवाज मोगाचो आणि पुढे काहीतरी आवाज किसांचो (की केसांचो) असे शब्द असलेलं गाणं उडत्या चालीसाठी फार आवडलं होतं पण एकदाच निसटतं एेकण्यात आलं. नंतर खूप कीवर्डसनी शोधूनही क्लू मिळाला नाही. हे गाणं चावटही असू शकेल. पण हरवलं ते हरवलंच. त्यात कदाचित पेट्रोल पंप वगैरे शब्दही असू शकतात. ऑन द मूव्ह ऐकल्याने तिथेच विचारता आलं नव्हतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

काढा

जव्हेरगंज
गुरुवार, 07/28/2016 - 12:21 नवीन
काढा
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा