कुठे नेऊन ठेवला खो-खो
बघता बघता प्रो-कबड्डीचा चौथा सिझन आला... भारतीय खेळांमध्ये कबड्डीला प्रचंड चाहता वर्ग लाभला. तसा तो आधीही होताच, त्यात आता आणखी भर पडली आहे (क्रिकेटच्या मुस्काटात मारावी इतकी ही लोकप्रियता बरं). अर्थात, भारतीय खेळ आहेच मुळी गर्दी खेचणारे! कबड्डीपाठोपाठ माझ्या आवडीचा खेळ म्हणजे खो-खो. काय अप्रतिम कौशल्य या खेळाचं!
कधी काळी पुणे, मुंबईकरांची दादागिरी होती या खेळात. आता या दिग्गजांना धक्का देत सांगलीने वर्चस्व राखले आहे. खो-खो अस्सल भारतीय खेळ असला तरी या खेळाच्या भाषेत क्रिकेटचा पगडा स्पष्टपणे जाणवतो. आक्रमण असेल तर फिल्डिंग आणि संरक्षण असेल तर बॅटिंग. उन्हाळी-पाणकाळी (टॉस किंवा नाणेफेक) करताना जो जिंकला त्या संघाचा कर्णधार लगेच म्हणतो बॅटिंग! असो. पण हा खेळ जपला तो ग्रामीण भागातील खेळाडूंनी. वेग आणि कौशल्याचा मिलाफ असलेल्या या खेळाला आता उभारीची गरज आहे.
खरं तर या खेळाची लीग स्पर्धा व्हायला हवी होती. मला वाटलं होतं, कबड्डीच्याही आधी खो-खोचीच प्रो लीग स्पर्धा येईल. पण भारतीय खो-खो महासंघाचे पदाधिकारी इतके निष्क्रिय आणि अपयशी निघाले, की प्रो-लीगचे चार सिझन आल्यानंतरही त्यांना खो-खोची लीग स्पर्धा घेता आलेली नाही. दुर्दैव म्हणजे, खो-खोची समृद्ध भूमी असलेल्या महाराष्ट्रालाही राज्य स्तरावर ती घेता आलेली नाही.
कुस्ती, कबड्डीच्या लीग स्पर्धांनी खेळाडूंना मालामाल केले, तसलं ऐश्वर्य खो-खोच्या वाट्याला कधी येईल देव जाणो...!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ह्या धाग्याला खो का दिलाय ?
1+
जिव्हाळ्याचा विषय
अहाहा !! खो खो!!
वेगवान खेळांबाबत माहिती बरोबर
क्या बात है बापूसाहेब....!
एक कारण खो-खो नुस्ता बघून
खो-खो/ आट्यापाट्या लहानपणी
ते पाहून हल्ली जाणीवपूर्वक
खो-खो कधी खेळलो नाही पण
पण पहिले एक कळत नाही की प्रो
महाराष्ट्रीय खेळ? !
IPL म्हणजे काय ?
मग तुमचा अभ्यास झाला असला तर
वरच्या दोन ओली वाचायच्या
येतील येतील येतील , खो खो ला