मला व्यक्तिशः रागदारीतलं काहीही कळत नाही. हे माझं दुर्दैव! इच्छा असूनही इतक्या वर्षांमध्ये वेळ काढू शकलो नाही ही एक खंत आहे, आणि उर्वरित आयुष्यात जमेल अशी शक्यता अति-धूसर आहे. पण तरीही जमेल तशी माहिती गोळा करीत रहातो, कधीतरी वाचेन या आशेवर!
पूर्वी मिपावर संस्थापक तात्यांना विनंती केली होती की रागदारीवर आधारित हिंदी-मराठी चित्रपट संगीतावर एक लेखमाला लिहा, त्यांनी 'बघू' म्हणत टाळलं. चंद्रकांता, स्वरगंगा, पी. सरकार ही काही संस्थळं. (पूर्वी आसावरी नावाचं एक चांगलं संस्थळ होतं ते आता सापडत नाही.)
असंच शोधत असतांना श्री. राजन पर्रीकर यांच्या पूर्वी पाहिलेल्या संस्थळाला पुन्हा भेट दिली. तेंव्हा किशोर कुमारने गायलेल्या काही गाण्यांचा उल्लेख पाहिला. मी बरीच वर्षे ऐकत आलो आहे की किशोर कुमार म्हणे शास्त्रीय संगीत शिकलेला नव्हता, पण आर डी ने त्याच्याकडून मेहेबूबा मधलं मेरे नैना सावन भादों किंवा कुदरत मधलं हमें तुमसे प्यार कितना अशी रागांवर आधारित गाणी गाऊन घेतली.
(यांतल्या 'मेरे नैना' च्या विषयी एका जुन्या कॅसेटवर कुणा निवेदकाकडून [कोण ते याक्षणी आठवत नाही, कुणीतरी ज्येष्ठ संगीतकार होते] ऐकलेला किस्सा असा होता: रेकॉर्डिंगच्या वेळी म्हणे जेंव्हा आर डी ने त्याला सांगितलं की राग शिवरंजनी वर आधारित गाणं म्हणायचंय, तेंव्हा किशोर म्हणाला होता की 'ते राग वगैरे माहीत नाही, लता दीदींना आधी गाऊ देत, मी तसंच म्हणून दाखवतो की नाही बघ'...आणि तो निवेदक पुढे म्हणतो की "The rest is history.")
तर बरेच दिवस हा भुंगा डोक्यात आहे की हे नक्की सत्य आहे का? म्हणून 'किशोरची रागदारीवर आधारित गाणी आहेत का' असा शोध घेतला. या दुव्यानुसार हे खालील संकलन. यातील बहुतांश गाणी मला आवडतात आणि आनंद देतात. या शोधानंतर किशोर कुमार शास्त्रीय संगीताबाबत अगदीच अनभिज्ञ होता असं मानणं कठीण वाटतं.
दिल्ली का ठग मधलं ये राते ये मौसम नदी का किनारा (राग किरवानी):
आराधना मधलं कोरा कागज़ था ये मन मेरा (राग पहाडी):
एक राज़ मधलं पायल वाली देखना (राग मारूबिहाग):
खामोशी मधलं वो शाम कुछ अजीब थी (राग कल्याण):
प्रेम पुजारी मधलं फुलोंकी रंग से (राग पहाडी):
दूर का राही मधलं बेकरार दिल तू गाये जा (राग किरवानी):
अमर प्रेम मधलं चिंगारी कोई भडके (राग भैरवी):
अमर प्रेम मधलंच कुछ तो लोग कहेंगे (राग खमाज़):
गँबलर मधलं दिल आज शायर है (राग भैरवी):
लाल पत्थर मधलं गीत गाता हूं मैं (राग किरवानी):
शर्मिली मधलं कैसे कहे हम प्यार ने हम को (राग तिलंग):
शर्मिली मधलंच खिलते हैं गुल यहां (राग भीमपलासी):
ये गुलिस्तां हमारा है मधलं गोरी गोरी गांव की गोरी रे (राग तिलंग):
हरे रामा हरे कृष्णा मधलं कांची कांची रे (राग भुपाली):
एक बार मुस्कुरा दो मधलं सवेरे का सूरज तुम्हारे लिये है (राग कल्याण):
अनामिका मधलं मेरी भीगी भीगीसी पलकों पे रह गये (राग किरवानी)
चोर मचायें शोर मधलं घूंगरू की तरह (राग झिंझोटी):
आप की कसम मधलं ज़िंदगी की सफर में गुज़र जाते हैं जो मुकाम (राग बिहाग)
उलझन मधलं अपने जीवन की उलझन को कैसे मैं सुलझाऊं (राग अहिर भैरव):
आंधी मधलं इस मोडसे जाते हैं (राग कल्याण):
हेराफेरी मधलं दरबार में उपरवाले की (राग मालकंस):
अनुरोध मधलं आप के अनुरोध पे (राग कल्याण):
घर मधलं आप की आंखों मे कुछ (राग केदार):
कस्मे वादे मधलं मिले जो कडी कडी (राग भैरवी):
देस परदेस मधलं ये देस परदेस (राग शंकरा):
गोलमाल मधलं आनेवाला पल जानेवाला है ( राग किरवानी) :
गौतम गोविंदा मधलं इक ऋतू आये इक ऋतू जाये (राग भैरव):
बेमिसाल मधलं किसी बात पर मैं किसी से ख़फां हूं (राग भैरवी):
नमक हलाल मधलं पग घुंगरू बांध के (राग दरबारी कानडा):
आपस की बात मधलं तेरा चेहेरा मुझे गुलाब लगे (राग कल्याण):
दर्द का रिश्ता मधलं यूं नींद से वो जान-ए-चमन जाग उठी है (राग श्याम कल्याण)
:
झुमरू मधलं किशोर ने गायलेलं कोई हमदम ना रहा हे गाणं राग झिंझोटी वर आधारित आहे, पण त्याच्या बरीच वर्षे आधी अशोक कुमारने जीवन नैया चित्रपटासाठी हे गाणं म्हंटलं होतं.
अशोक कुमार यांच्या आवाजात हे गाणं ऐकण्याआधी त्यांनी सुरूवातीला किशोर विषयी सांगितलं आहे तेही ऐका:
किंचित वेगळं: वर निर्देशिलेल्या पर्रीकरांच्या संस्थळावर किशोरने बागेश्री रागातलं सुहाना गीत चित्रपटासाठी बाजे बाजे बाजे कही रे बांसुरियां हे गाणं ऐकायला मिळालं, चित्रपट प्रदर्शित झाला नाही.
तर सुहृदहो, मला एका दिवसात सापडलेल्या रागदारीवर आधारित किशोरकुमारच्या काहीच गाण्यांचं हे संकलन आहे (आणि हे फक्त संकलनच आहे, त्याला वैयक्तिक कुठलीही अभ्यासाची बैठक नाही याची acute जाणीव मला आहे!). यात जमेल तशी भर घाला.
आणि हो, इथे शास्त्रीय संगीत जाणणारी आणि चित्रपट संगीतातही रुची राखणारी बरीच दिग्गज मंडळी आहेत, तेंव्हा त्यांनी एकत्र येऊन एक शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपट संगीताविषयी सोदाहरण लेखमाला लिहावी अशी मनापासून विनंती आहे!
वाचने
15705
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख
खजिना!!
शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपट संगीताविषयी सोदाहरण लेखमाला लि
आमचे श्रध्दास्थान !
नीटसे कळले नाही
अॉ... , अचं जालं तल!
In reply to नीटसे कळले नाही by स्पा
क्या बात है!
अप्रतिम माहिती धाग्याबद्दल
क्षमस्व!
फिल्म संगीत व शास्त्रीय संगीत संबंध
मननीय प्रतिसाद.
In reply to फिल्म संगीत व शास्त्रीय संगीत संबंध by चौकटराजा
सहमत
In reply to फिल्म संगीत व शास्त्रीय संगीत संबंध by चौकटराजा
मस्त लेख
अप्रतिम!!
अप्रतिम धागा. वर स्पाने
छान लेख.
लैच भारी.....
सुरेख धागा!
बेसूर न वाटण्याचे कारण....
In reply to सुरेख धागा! by पैसा
सुरेख लेख!
मस्त धागा बहुगुणी
..
अशी
In reply to .. by चंपाबाई
गाणे शास्त्रीय रागावर आधारीत
असे गीत असणेच शक्य नाही.. कारण
In reply to गाणे शास्त्रीय रागावर आधारीत by स्पा
आती क्या खंडाला
In reply to गाणे शास्त्रीय रागावर आधारीत by स्पा
प्रत्येक गाणं कुठल्या तरी
In reply to आती क्या खंडाला by उडन खटोला
+१
In reply to प्रत्येक गाणं कुठल्या तरी by संदीप डांगे
थोडा खुलासा
शोध घेतल्यावर त्याचे मामा धनंजय बॅनर्जी हे शास्त्रीय संगीत गायक होते असा उल्लेख सापडला. अधिकृत शिक्षण नसले तरी काही प्रमाणात संगीताची ओळख मामाकडून मिळणे शक्य वाटते. उपजत स्वरज्ञान तर त्याला होतेच.निल्या१:चित्रपट संगीताला धरुन शास्त्रीय्स संगीताचा आस्वाद घेणे म्हणजे काठाला धरून समुद्र पोहु पाहण्या सारखे आहे. शा.संगीताची खरी प्रचिती घ्यायची असेल तर आधी काठ सोडून सागरात प्रवेश करावा, यमनावर आधारित हिंदी चित्रपटाची गाणी शोधण्यापेक्षा यमनच का नाही ऐकत लोक्स? ऐकून पहा तेही आवडेल.अगदी खरंय, आणि वेळ मिळेल तेंव्हा शुद्ध शास्त्रीय संगीत ऐकतोही, आणि त्यातल्या खूपश्या 'जागा' (अगदी "कळत" नसल्या तरी) आवडतात असंही वाटतं, पण आपल्याला नेमकं काय आणि का आवडलं हे कळायलाही वेळ आणि साधना कमी आहे याची जाणीव होते. "देणार्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी" असा काहीसा प्रकार! डबडं बांधूनही ज्यांना विहिरीतही पोहता येत नाही अशा माझ्यासारख्या जीवांनी समुद्रात उडी मारणं म्हणजे नाका-तोंडात पाणी जाणं आहे, आणि तसं ते गेलंही आहे बरेचदा, म्हणूनच माझ्याकडून प्रयत्न अर्धवट सोडले गेले आहेत! जेंव्हा जमेल तेंव्हा पुन्हा प्रयत्न नक्कीच करणार आहे, पण तोपर्यंत हात धरून कुणा गुरूने 'या रागातल्या या सुरावटीवर या गाण्याचा हा भाग आधारित आहे' हे सांगितलं तर मनापासून आवडेल. या धाग्यावर नवीन काही प्रतिसाद आले नाहीत म्हणजे धागा थंडावला आहे, तेंव्हा प्रतिसाद देऊन तो वर आणावा की नाही अशा द्विधा मनस्थितीत होतो, पण मी खुलासा देईन असं म्हंटलं होतं म्हणून हा लेखनप्रपंच. यानंतर या विषयाशी संबंधित आणखी माहिती देणारे प्रतिसाद आले तर तेही चांगलंच.माझा॑ प्रवास.....
In reply to थोडा खुलासा by बहुगुणी
ऐकत रहा
In reply to थोडा खुलासा by बहुगुणी
अप्रतिम धागा
वाखूसा
किशोरदाच्या जयंतीनिमित्त
...
In reply to किशोरदाच्या जयंतीनिमित्त by गॅरी ट्रुमन
सुरेख
व्हिडिओ बद्दल धन्यवाद
गॅरी ट्रूमन धन्यवाद