काही धागे आणि कौल असे असतात की, नक्की काय साधायचे त्यातून तेच समजत नाही. कधी कधी कलादालनच्या नावाखाली फोटोशॉपच्या किळसवाण्या करामती डकवल्या जातात. लेखन करण्यासाठी मिपासारखे फुक्कट व्यासपीठ मिळाले याचा गैरफायदा कोणी घेऊ नये हीच इच्छा मिपाच्या संपादक मंडळा पैकी एक म्हणून व्यक्त करावी वाटते.
वर्षपूर्तीसाठी अभिनंदन ..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
स्वत:ची टिमकी वाजवून घेणे हा या धाग्यामागील उद्देश नव्हता, तर मिपा संबंधी काही विषयांवर चर्चा घडवणे, हा होता.
पण तो प्रयत्न वाया गेला, असे वाटते.
असो.
पुन्हा कधीतरी.
तात्या हे 'स्थळ' स्वखर्चाने चालवितात. तो खर्च किती असतो?
आपण तात्यांच्या खर्चाने एकमेकाला का झोडपावे? पण म्हणून झोडपायचे थांबावे का? तर अजिबात नाही. तर आपल्या पैशांनी ही हाणामारी करावी. म्हणून आपण सर्वांनी वर्गणी द्यायला हवी असे मला वाटते. नीलकांतना व्य. नि. पाठवला तर त्यांनी तूर्तास नको असे म्हटले.
अगदी सदस्य होण्याबद्दल वर्गणी घ्यायची नसेल तरी ऐच्छिक वर्गणी जमा करायला काय हरकत आहे. जास्त पैसे उरले तर समाजिक कार्याला दान करता येईल (दान हा शब्द मला आवडत नाही पण दुसरा शब्द सुचला नाही).
मिपाकरांचे मत जाणून घ्यायला आवडेल.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
अभिनंदन अभिजितराव!
अगदी मनापासून लिहिले आहे. मिपा आपलेच आहे, आपल्या सर्वांचेच आहे. माझा मालकी हक्क फक्त मुखपृष्ठावरील कोटेशन बदलण्यापुरता आणि आजची खादाडीचे चित्र बदलण्यापुरता!
अगदीच कुणी विनाकारण गरळ ओकू लागला तरच मला मालकी हक्कांचा वापर करावा लागतो. आणि हो, शुद्धलेखनासंबंधी रटाळ चर्चादेखील मला मालक म्हणून धाडकन उडवून टाकायला आवडतात! :)
असो. आपल्या सर्व मायबाप मिपाकरांचा मी कृतज्ञ आहे...
तात्या.
प्रतिक्रिया
मनातलं बोललंस मित्रा
खरंय..
वर्षपूर्ती
आपला
वा!
अभिनंदन
प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद.
एकमेकाला
- तात्या हे 'स्थळ' स्वखर्चाने चालवितात. तो खर्च किती असतो?
- आपण तात्यांच्या खर्चाने एकमेकाला का झोडपावे? पण म्हणून झोडपायचे थांबावे का? तर अजिबात नाही. तर आपल्या पैशांनी ही हाणामारी करावी. म्हणून आपण सर्वांनी वर्गणी द्यायला हवी असे मला वाटते. नीलकांतना व्य. नि. पाठवला तर त्यांनी तूर्तास नको असे म्हटले.
- अगदी सदस्य होण्याबद्दल वर्गणी घ्यायची नसेल तरी ऐच्छिक वर्गणी जमा करायला काय हरकत आहे. जास्त पैसे उरले तर समाजिक कार्याला दान करता येईल (दान हा शब्द मला आवडत नाही पण दुसरा शब्द सुचला नाही).
मिपाकरांचे मत जाणून घ्यायला आवडेल. खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)अभिनंदन