आताच ही बातमी वाचली व डोके जरा सुन्न झाले !
प्रत्येक १५ ऑगस्ट अथवा २६ जानेवारीनंतर च्या वर्तमानपत्रामध्ये भारतीय तिरंग्याचा अपमान... अमुक-मतुक ने झेंडा उलटा लावला.. तमुक-अमुक राष्ट्र गाणच्यावेळी झोपले होते... ह्या बातम्या का येत असाव्यात ?
तिरंग्याचे अथवा राष्ट्रगीताचा मान कसा ठेवा हे राजकिय नेत्यांना खरोखरच माहीत नसते का ? मागे एकदा सर्वे झाला होता एनडीटीव्हीचा, लोकसभेतील किती सदस्यांना राष्ट्रगीत माहीत आहे त्याचा... त्यांचा सर्वे चालू होऊन पंधरा मिनिटे झाली पण एका कबुतराला व्यवस्थीत उत्तर देता आले नाही... खाड करुन टिव्ही बंद केला व डोक्याला होणारा त्रास वाचवला !
आता वर जी बातमी दिली आहे त्या बद्दल थोडंस !
मंदसौर मध्ये.. (म.प्र.) भाजपा कार्यकर्तांनी तिरंग्या सोबतच भाजपाचा कमळ वाला झेंडा पण फडकवला ... ह्यांना हे माहीत असू नये की जेथे राष्ट्र ध्वज येतो तेथे बाकीचे सर्व ध्वज त्याच्या उंची पेक्षा खाली व योग्य अंतरावर लावले जातात ? की त्यांना भाजपाचा ध्वज हा राष्ट्र ध्वजाच्या तोडीस तोड वाटला असावा ? व ह्यात भाजपाचेच कार्यकर्ते आहेत हे पाहून विस्मय वाटला कारण हीच भाजपा मागे दोन वर्षा पुर्वी दिल्ली मध्ये राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत ह्यावरील माहीती पुर्ण पुस्तक मुलाच्या मध्ये मुफ्त मध्ये वाटत होती व त्यांच्या त्या कार्याचे समाजातील सर्व स्थरातून अभिनंदन केले गेले होते... ! एक पार्टी दिथ डिफरन्स असा स्वतःचा उल्लेख करुन घेणारी ह्या पार्टीच्या पदाअधिकारांना इतकी महत्वाची माहीत नसावी .. हे खेदाचे वाटते.. !
मागे १५ ऑगस्टला आम्ही मित्र मंडळींनी रस्तावर पडलेल्या... ज्याचा उपयोग झालेला आहे / फाटलेला आहे.. कोणी मुर्खाने गटारे शेजारी टाकलेल्या ध्वजाचे काय करावे ह्या बद्दल माहीती प्रसार केला होता... व लहानमुलांच्या शाळेत जाऊन त्यांना समजवले होते मला वाटत आहेत तसाच एक कार्यक्रम ह्या मोठ्या नेत्यांचे / त्यांच्या पार्टीच्या पदअधिका-यांचे घ्यावेत !
ह्या बद्द्ल तुम्हाला काय वाटते ?
राष्ट्र ध्वज अवमाननेचा जो कायदा आहे त काय म्हणतो ?
** मला भाजपा / अथवा इतर पार्टीचे नेते ह्यांच्या बद्दल काही ही बोलायचे नाही आहे मला फक्त राष्ट्र ध्वजाचा अपमान होतो तो कसा थांबता येऊ शकतो ह्या बद्दल चर्चा करायची आहे कृपया फाटे फोडू नका.
वाचने
5331
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
लहानपणापासुनची
बरोबर आहे
In reply to लहानपणापासुनची by आनंदयात्री
झेंडा आणि देशप्रेम
In reply to लहानपणापासुनची by आनंदयात्री
>>>आपल्याला
In reply to झेंडा आणि देशप्रेम by संदीप चित्रे
तुमची चिंता योग्य आहे.
>>कॉलेजमधे
In reply to तुमची चिंता योग्य आहे. by आचरट कार्टा
राष्ट्रध्वजाचा अपमान, म्हणजे देशाचा अपमान!
In reply to तुमची चिंता योग्य आहे. by आचरट कार्टा
अपमान
>>>देवाच्या
In reply to अपमान by नितिन थत्ते
सहमत आहे
In reply to अपमान by नितिन थत्ते
गाव
आपल्या कडे
राष्ट्रभावना
सहमत
In reply to राष्ट्रभावना by आनंद घारे
सहमत
In reply to राष्ट्रभावना by आनंद घारे
सहमत
In reply to राष्ट्रभावना by आनंद घारे