मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हे तसे माझेच आहे काव्य पण..

केशवसुमार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:

आमची प्रेरणा आनिरुद्ध अभ्यंकरांची कविता ही तुझी माझीच आहे गोष्ट पण...

चेहरा सारेच खोटे सांगतो
याचसाठी आरसा तुज दावतो

मज तडी पडणार अंती जाणतो
मी तरी मेसेज 'तसले' धाडतो

कोंबले मी पोट टीशर्टामध्ये
फुंकरीने फुगवल्यागत वाटतो

यायची असतेस तेव्हा का मला
काळ हा येणार आता वाटतो

एवढी साधी नसावी भेळ ती!
पचवण्याला वेळ आहे लागतो

तो अता हल्ली खुळ्या गत सारखा
मी कसा भारी जगाला सांगतो

हे तसे माझेच आहे काव्य पण
मी विडंबन धर्म माझा पाळतो

जालरानावर पुन्हा "केश्या" अता
नव कवींची वाट आहे पाहतो

-केशवसुमार


वाचने 2230 वाचनखूण प्रतिक्रिया 7

दशानन Mon, 01/26/2009 - 13:03
छान ! * तुम्ही साचेबंध झालात असे वाटत नाही का ? ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

In reply to by दशानन

सर्किट Mon, 01/26/2009 - 15:50
तुम्ही साचेबंध झालात असे वाटत नाही का सदर विधान "जैनाच कार्ट" ह्या सदस्याने केलेले आहे. जस्ट सो द्याट यू नो, धिस इस अ स्टेटमेंट मेड बाय समवन कॉल्ड "जैनाचं कार्टं" टू समवन कॉल्ड "केशवसुमार". व्हाट डू यू थिंक ? -- सर्किट

केशवसुमार Tue, 01/27/2009 - 20:07
प्रतिसाद न दिलेल्या आणि प्रतिसाद दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी) केशवसुमार.

प्राजु Tue, 01/27/2009 - 21:03
हे तसे माझेच आहे काव्य पण मी विडंबन धर्म माझा पाळतो अगदी अगदी! मस्तच. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मदनबाण Tue, 01/27/2009 - 21:31
चेहरा सारेच खोटे सांगतो याचसाठी आरसा तुज दावतो सह्ही.. :) मदनबाण..... Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood. Swami Vivekananda.