Skip to main content

ऐश्वर्या राय - बच्चनला चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल इतक्या लवकर "पद्मश्री" मिळणे योग्य आहे का ?

लेखक उपटसुंभ
मंगळवार, 27/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 2511
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

तीची लायकी नाही हेच खरं ! आताच ! जर तिला देणे होताच तर जेव्हा ती मीस वल्ड झाली तेव्हाच देणे योग्य होता... पण त्यावेळी ती अमर कृपा - बच्च्चन मंडळी मध्ये जमा होईल हे कोणाला स्वप्नात पण नसावे तेव्हा अभिषेक बाबागाडीतून फिरत असावा ;) ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

In reply to by दशानन

आपण ह्या विधानाशी जोरदार सहमत!!!! हल्ली तिच्यामारी, हे पुरस्कार आहेत की गौरी-गणपतीमधली/भोंडल्याची खिरापत आहे तेच कळेना झालंय. स्वरभास्कर म्हणल्याजाणार्‍या पं. भीमसेन जोशींना वयाच्या इतक्या उशीरा भारतरत्न दिलं जातं, पण पद्मश्री देताना उठसुठ वाटत फिरताहेत.

मला वाटतं "कजरारे" मधल्या नृत्याविष्कारासाठी पुरस्कार जाहीर झाला असावा..! ;) अथवा सपाला खूष करण्याचा प्रयत्न आहे. हे खरं असेल तर पुढच्या वेळी संजय दत्तला "पद्मश्री" मिळाला तर नवल वाटण्याचे कारण नाही.

तिची लायकी नाही. तिच्या बरोबरच इतर काही लोक पण लोक आहेत ...ज्यांना ही खिरापत मिळाली आहे.. इथे वाचा.. http://tinyurl.com/cykudc

सासऱ्या बरोबर छान नाचते आणि आपले चुलत सासरे म्हणजे अमरसिंग ला पण बरोबर सांभाळते म्हणुन दिलाय का हा पुरस्कार? अहो हेलन ला पण आहे ना........ आत्ता बोला??

योगदान म्हंजी काय रं भौ? खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

तिची लायकी खरचं नाही. काय दिवे लावलेत तिने.. अभिनयामध्येही सुमार आहे. अमरसिंगची कॄपा म्हणुन सगळं. पुरस्काराचा अपमान !

माझ्यामते तिला पद्मश्री हे तिच्या फक्त चित्रपटसॄष्टी मधील योगदानाबद्दल नव्हे तर... भारताचे नाव जगात उज्ज्वल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याकरिता दिले गेले आहे. व्यक्तिशः मला ऐश्वर्या आवड्त नाही... पण तिने विश्वसुंदरी किताबावर नाव कोरून भारताचे नाव सगळ्या जगात केले होते... हे विसरुन चालणार नाही.... बाकी लायक उमेदवारांना पद्मश्री व तत्सम किताब मिळायला मरेपर्यंत वाट पहावी लागते यात संशय नाही.... याबाबतीत सरकार पैशाचे घोटाळे करण्याएवढी तत्परता दाखवत नाहीत हे खेदाने म्हणावे लागते.... सागर

ऐश्वर्याला दिल्या गेलेल्या या पुरस्काराने पद्मश्रीचाच सन्मान झाला आहे असे आमचे ठाम मत आहे! - टिंग्या बच्चन! अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

In reply to by सखाराम_गटणे™

अरे किती अवांतर हे? ते पण तेच तेच लोकांचे..लै कंटाळा येतो राव असली लांबड बघीतल्यावर. तात्या आणि संपादक मंडळी कायतर करा राव!

In reply to by सखाराम_गटणे™

काय गटण्या तुला लई चिंता रे ! तुझा दोस्ताना थोरल्याशी की धाकट्याशी ;) नाय मध्ये पण एक हाय मधला बच्चन ( अभिजीत बच्चन की काय नाव हाय त्याचं) ******* सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!! गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी

In reply to by दशानन

>>तुझा दोस्ताना थोरल्याशी की धाकट्याशी आम्ही दोस्तीनी करतो, दोस्ताना नाही

तुम्हाला कशाला हव्यात नसत्या चौकश्या? - टिंग्या!

http://beta.esakal.com/2009/01/27182453/padma-award-issue.html अभिनव बिंद्राला दिले तर ह्यांना का नाही दिले.. ऐश्वर्या राय एक वेळ समजू शकतो.. मिस वर्ल्ड वगैरे झाली होती.. पण अक्षय कुमार किस खुशी मे?? :? त्याच्या पेक्षा विजेंदरकुमार आणि सुशील कुमार ह्यांना दिले असते तर जास्त योग्य झाले असते असे वाटले...

योगदान म्हणण्याइतपत तिने किंवा अक्षयकुमार वगैरेंनी काही केले आहे असे वाटत नाही. पद्मश्री अश्या लोकांना मिळावी हे पटत नाही म्हणून नाही या पर्यायास मत दिले आहे. रेवती

अक्षयकुमार ची निवड अगदिच टूक्कार वाटते त्यच्यापेक्षा रजनिकांत चालला असता (रजनिकांत ला ह पुरस्कार आधि मिळाला आहे का नाही ??)

दुसर्‍या पर्यायाला मत दिले आहे. मदनबाण..... Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood. Swami Vivekananda.

चुकीचे आहे

In reply to by श्रेया

वास्तविक तीला भारतरत्न मिळायला हवे होते.....परंतु सरकारने पद्मश्री ऑफर करुन ऍशला वाटाण्याच्या अक्षता लावल्याबद्दल जाहीर निषेध! - टिंग्या बच्चन! अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

फक्त अभिषेकला का वगळ्ले? त्याला सुद्धा हा पुरस्कार द्यायला हवा होता म्हणजे सर्व कुटुम्ब पद्मश्री झाले असते. कदाचित सपचे खासदार संख्याबळ कमी पडले. हरकत नाही. पुढच्या वर्षी धूम ३ नंतर भारतरत्न देऊन टाका.

अय साला .... आपली ऐपत आहे ओळख आहे ! आपण घेतला विकत पुरस्कार. तुम साला लोग कायको जलता है ? अमिताभकुमार |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

ऐश्वर्या राय - बच्चनला चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल इतक्या लवकर "पद्मश्री" मिळणे योग्य आहे का ? अहो पण तुमच्याआमच्या मताला कोण कुत्रा विचारतो आहे? सबब, मत दिले नाही.. तात्या.

अभिशेक बच्चन जिचे 'श्री' आहेत ते कमी की काय म्हणून अजून एक 'श्री' दिला असेल

मी पुर्णपणे सहमत आहे... she deserves it truly... considering her influence in many fields.. people should learn to appreciate... and she being part of Bacchan family obviously adds value to Bacchan tag.. and not vice-verse though.. :)