Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by स्पा on Wed, 01/14/2015 - 13:15
लेखनविषय (Tags)
बालकथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
"ते" असतातच तुमच्या आजूबाजूला, लहानपणी माहित नसतं, हळू हळू मोठे होत जातो तसे त्यांची व्याप्ती लक्षात यायला लागते,तरीही तसा त्यांचा त्रास नसतो तुमचे शिक्षण पूर्ण होते,मग तुम्हाला नोकरी लागते.वय तिशी कडे झुकायला लागले कि तुमच्याच घरातले घात करतात, आणि त्यांच्या नजरा तुमच्याकडे वळतात.मग कधीही दिवसा ढवळ्या रात्री अपरात्री ते तुम्हाला दर्शन द्य्याला लागतात,तुम्हाला त्यांच्यात ओढायचा त्यांचा बेत असतो,जणू तेच त्यांचे जीवितकार्य असते.साम दाम दंड भेद सगळे मार्ग अवलंबिले जातात.या मध्ये काही मध्यस्त आणि तुमचे नातेवाईक सुद्धा असतात,कुठूनही ते तुम्हाला शोधू शकतात,लपायचा काहीच चान्स नाही अस्मादिक हि याला कसे अपवाद असतील.या वर्षीचा वाढदिवस साजरा झाला आणि मातोश्रींनी बॉम्ब टाकला चला, नावनोंदणी करून टाकू, जाहिरात करायला आता आम्ही मोकळे, बस झाले उंडारणे.माझ्या परवानगी सारख्या मामुली गोष्टीची अर्थातच त्यांना आवश्यक्यता वाटली नाहीच,काही दिवस शांत गेले आणि अचानक मला कुठल्या कुठल्या नंबर वरून फोन यायला लागले.ते "तेच" होते,भेटायचं म्हणत असायचे मी मेल वर पत्रिका पाठवा म्हणून कटवायचो त्यातल्या त्यात माझे सुदैव असे कि घरी पत्रिका हा मुद्दा महत्वाचा असल्याने मी सुखी होतो, जल्ला एकही पत्रिका जुळायला मागत नसल्याने पुढचा काही त्रास नव्हता. पण त्यांनी आक्रमणाचा जोर वाढवला आणि घरीही यायला लागले.काल काही समदुक्खी मित्र wats app वर गप्पा मारत असताना हा विषय निघाला, एक एक किस्से एवढे वाढत गेले,कि हे दुख्ख इथवर मर्यादित ण ठेवता सर्वदूर पसरले पाहिजे या मतावर सर्व आले आखिर दर्द बाटनेसेही तो कम होता हे म्हणून हा प्रपंच प्रसंग एक :- रात्री ९ च्या दरम्यान कसाबसा दमून भागून घरी आलो, "ते" बसलेले होते, पहिलाच अनुभव असल्याने मी आत जाऊन आईला विचारले कोण ब्वा हे.. मग समजले मुलीचे पिताश्री. बाहेर आलो वर पासून खालपर्यंत स्क्यान्निंग झालं. मग नमस्कार चमत्कार बाबांनी विचारलं मुलगी काय करते, बस्स इतकच विचारायची वाट बघत होते वाट्त ते , धाडधाड गोळीबार सुरु, मुलगी कुठल्या नर्सरीत शिकायची इथपासून सुरवात झाली...मध्येच ती दुसरीत मलेरिया मुळे सहामाही मध्ये मराठीत नापास झाली होती हि महत्वाची माहिती पण मिळाली पोटात मरणाचे कावळे बोंबलत होते.तरी तसाच हां हु करत पुराण ऐकत होतो.शेवटी समजल कि ढोर मेहनत करून मुलीने मास्टर्स केले आहे IT मध्ये. घशाला कोरड पडली म्हणून पाणी प्यायला आत आलो, मागोमाग आई .. अरे भयंकर शिकलेली दिसतेय हि मुलगी तिला चालेल का पण , नाहीतर डॉक्टर , इंजिनिअर अशा अपेक्षा असतात हो मुलींच्या हल्ली, म्हटल मला काय विचारतेस, तुम्ही आणलाय न हे .. तुम्हीच विचारा, परत बाहेर आलो समोरून स्तुतीसुमनांचा धबधबा कोसळतच होता, तरी तशीच तशीच हिम्मत करत चालत्या ट्रेन मध्ये चढलो,विचारलं नोकरी कुठे करते ? एखाद्या भिकार्याकडे बघतात तसं माझ्याकडे बघत म्हणाला, तिच्या प्रोफाईल ला सुट होईल असा जॉब आहेच कुठे मुंबईत, शोधतेय तरी म्हटलं ओह, (अच्चा अच्च जाल तल - हे मनातल्या मनात) अजून २० मिनिटे पुराण ऐकवल्यावर त्याने तिचा बायो डेटा माझ्याकडे सरकवला, आई बाबांनी एव्हाना धीर सोडलेला होता, मी पण सहज नजर टाकली, शिक्षण: बी.कॉम ( सेकंड क्लास), tally, आणि आणि
MSCIT.
फुल हादरलो , MSCIT??????? (नाही रे नाही नसतं रे असं ... अरे ए .. सांगा रे कोणीतरी याला , पहिलीतली मुले पण देतात हि परीक्षा) म्हटलं मास्टर्स कुठून केलं? तर म्हणाले इथूनच गजाजन काम्पुटर मधून घराखालीच आहे, सरकारी नोकरी आता अश्शी मिळेल.. दोन मिनिटे काही बोलायच्या मनस्थितीत नव्हतो नंतर चेहऱ्यावर कुठलेच भाव येत नव्हते... हातपाय लटपटत होते त्यांना तसेच वंदन केले आणि कशीबशी त्यांची बोळवण केली. सुदैवाने नंतर पत्रिका जुळली नाही, आणि मी वाचलो प्रसंग २ : काही दिवस शांततेत गेले आणि अजून एक वेगळे "ते" श्री. XXX असेच रविवार संध्याकाळचे घरी उगवले,नेमक्या एक काकू घरी येऊन बसल्या होत्या.मागचा अनुभव असल्याने मी सावरून बसलो आणि आधी बायो डेटा वर झडप मारून शिक्षण चेक केलं.हा ठीके आतापुढे हे गृहस्थ मिस्टर बिन चा मराठी अवतार म्हणता येईल असे, नुसती चळवळ, आई बाबा हस्तायेत माझ्याकडे बघून. मी शक्य तेवढा मख्ख चेहरा ठेऊन थंडपणे बोलत होतो, मग हे साहेब आई बाबांना अहो आई , अहो बाबा म्हणायला लागले, आईंग म्हटल डायरेक्ट आई आणि बाबा ? आपण कुठे कामाला होतात म्हटल्यावर एकदम ताडकन उभेच राहिले, आणि शर्टात हात घालून काहीतरी शोधायला लागले, म्हटल आता हे काय, ५ मिनिटांनी त्यांना त्यांचे ओळखपत्र सापडले, साहेब रेल्वेत होते.आता रिटायर. मग म्हणे मला AC टून प्रवास असतो, तेही मोफत आहात कुठे ? मी :हँ,हँ.. हो का ? मस्तच ते : मग,आणि मी कोणाला अजून एकाला सोबत घेऊन जाऊ शकतो. त्यांना पण मोफतच,बाबांना फिरवेन मी मस्त.काय बाबा याचं लग्न झालं कि आपण दोघे मोकळेच कि (मायला याच्या कुठे पोचला हा),बाबांनाच असं नाही हा तुम्हाला पण अख्खा भारत फिर्वेन मी. मी : (ए नको रे नको असं बोलू, कंट्रोल जातोय माझा,तोंडावर हसेन मग मी येड्यासारखा,बरे दिसेल का ते) आ ? ते: : म्हणजे कोणीही एक चालतो. पुरूषच पाहिजे असं काही नाही, उद्या समजा या काकूंना पण मी घेऊन जैन (तोवर काकू ताडकन ..ऑ नको नको.. काहीतरीच आपलं,असं काहीसे घशातून विचित्र आवाज काढत बरळत उठून चपला घालायला लागल्या, आई आत पळाली ती शेवटपर्यंत बाहेर आलीच नाही) म्हणजे माझी हि बहिण आहे असे सांगीन हो मी, तात्पर्य काय कि आता ट्रेन ची चिंता नाही मी : ण हसल्याने आतडी पीळवटली गेली होती, काकू पसार झालेल्या होत्या, मी आणि बाबा दोघे आता खिंड लढवत होतो. ते: मी काय म्हणतो जावाय बापू (संपलोच), आता नेमके आपण किती जवळ राहतो, रात्री कधीही जेवायला आलात तरी तुम्ही दोघे ५ मिनिटात घरी, सगळे आपण एकत्रच म्हणजे ( मेलो मेलो ) मी : काका, अहो एवढा पुढचा विचार नको हो, आधी पत्रिका तर जुळून दे. ते: ती जुळली आहेच मी आधीच दाखवली आहे, आता कशाला वेळ घालवायचा, पटापट पुढच्या गोष्टी बोलायला लागू या, आणि मुलगी तुला आवडेलच प्रश्नच नाही, मी सांगतो ना. काय बाबा ? (वारलो) हे ऐकून उरले सुरले त्राण गेले, पुढचे काहिच ऐकू आले अहि बहुधा नातवंडांची नावे काय ठेवायची यावर चर्चा सुरु होती, मी शुद्धीत आलो तेंव्हा ते गेलेले होते. घर शांत होतं प्रसंग ३ : या तडाख्यातून सावरायला वेळ लागला, आता घरी मी नसताना कोणालाही बोलवायचं असेल तर बोलवा हे डील मी फायनल केलं एका शुक्रवारी मी ऑफिस मध्ये असताना मातोश्रींनी फोन केला, अरे ऐक ना, एक श्री XXXX म्हणून आहेत त्यांनी फोन केलेला, ते तुला भेटायचं म्हणत आहेत आज,सोबत पत्रिका नी फोटो घेऊन येतील, तर त्यांना भेटून घे ओके? तुझा नंबर दिलाय मी त्यांना. मी काही बोलायच्या आत अर्थात फोन ठेवला गेला. चायला विकेंड चा एकतर मी कसंही ऑफिस ला जातो , थ्री फोर्थ आणि वर टी शर्ट, आजच यायचं होतं काय.आणि मागचे अनुभव बघता मला कल्पनेनेच घाम फुटायला लागला, आता तर मी एकटा होतो, होम ग्रौन्ड पण नव्हतं. कामातले लक्ष उडाले, साधारण १२ ला त्यांचा फोन आला. मी पत्ता सांगितला, ऑफिस च्या बाजूला CCD मध्ये भेटायचे ठरले.बोलण्यावरून तरी तो माणूस बरंच शांत वाटला, जरा धीर आला. २ ची वेळ ठरलेली, ३ वाजले तरी पत्ता नाही, म्हटल चला बराय वाचलो हे महाशय काही येत नाहीत आता, तेवढ्यात फोन वाजलाच, ते आलेले होते, मीपण निघालो CCD त. २ कॉफी ऑर्डर केल्या आणि बसलो, परत सेम नमस्कार चमत्कार, स्वतःची ओळख वेग्रे. माणूस एकदम शांत होता प्रश्नच नाही.मी मुलीबद्दल विचारले, तर त्याने पिशवीतून एक जाडजूड फाईल काढली ( मी घाबरलो म्हटल हिची सर्तीफिकेत्स आणली कि काय ह्याने पहिलीपासूनची) ते : मी xxxx,सर्प मित्र आहे मी : अरे वा ते : होय १९६५ पासून वयाच्या १५ व्या वर्षीपासून मी साप पकडतो, ( फाईल उघडून - त्यात वर्तमान पत्रांची कात्रणे चिकटवलेली होती) हे १९७० पासून पेपरात माझी नावे यायला लागली. (मायला हा लग्नाचा अल्बम दाखवतो तसा मला एक एक पान दाखवत होता , नको रे ए नको न प्लीज्ज ) साधारण अर्ध्या तासानंतर अर्ध पुस्तक संपलं ते: अशी पटापट पाने नका उलटू , तुम्हाला समजणार नाही मग, एक एक बातमी नीट वाचा, आता वेळ काढून आलाच आहात म्हणून सांगतोय , नाहीतर हल्लीच्या तरुण मुलांना जर्रा म्हणून वेळ नसतो, हा बघा मी हिमाचल मध्ये पण एक साप पकडलेला, तिकडच्या पेप्रातली बातमी. नंतर हॉटेल वाल्याने मला कुरियर केला पेपर,अशी दयाळू माणसे असतात मी : मुलगी काय करते ? ते : हा तर त्यानंतर मी नोकरी सोडून दिली आणि पूर्णपणे यात उतरलो ( अरे ए .. मे क्या बोल रहा हु, तू क्या बोल रहा हे , मी तेरी मुलगी के बारे मे पुच रहा हु णा)नोकरी महत्वाची कि साप पकडणे ? सांगा पाहू ? अजून साधारण पंधरा मिनिटांनी मी : पत्रिका आणि फोटो मागितलेला आईने आणलाय का ? ते: हल्ली सर्प मित्र उरलेत कुठे पण , माझं पण वय झालाय आता, मी अजून एक पण काम करतो , समाजसेवा म्हणता येईल, अंधांसाठी मी ब्रेल लिपीत पुस्तके लिहितो, हि बघा (पोतडीतून त्यांनी अजून काही जाडजूड पुस्तके काढली, अता मला काय घंटा कळणारे त्यातले साहेब माझा हात हातात घेऊन त्या पुस्तकावर ठेऊन मला सांगत होते हे बघा हि ब्रेल लीपी (काय सांगताय काय? हाव च्वित) इकडे ऑफिस मधून फोन वर फोन पोरगा गायब झाला कुठे पुढील बराच वेळ मग अंध, ब्रेल लिपी आणि समाजसेवा यावर गेला मी: पत्रिका देताय णा ते : देतो हो त्या आधी मी एक गम्मत आणलीये , तुमच्या साठी नवीन असेल, मला उशीर का झाला याचे कारण मी : ??? (अजून एक काळी पिशवी टेबलावर आली) ते : तुम्हाला भेटायचं म्हणून निघालो आणि कॉल आला, चेंबूर BARC भागात मध्ये धामण दिसलीये, मग आधी तिकडे गेलो, (
तोवर ती काळी पिशवी वळवळायला लागली, आणि मला अंदाज आला त्यात ती पकडलेली धामण होती
) मग पकडली आणि आणली इथे आता इथून येऊर ला जाणार आणि सोडणार, हात लावा ना (नको हो नको , हातभर फाटलीये माझी) अहो लावा हो हात मी सांगतो कशी धरायची ते, माझी बोबडी वळलेली होती, माझा हात पकडायचा ते साहेब निरर्थक प्रयत्न करत होते, ती पिशवी वळवळत होती आणि त्यात धामण होती. मी: काका अहो नको लोक बघतायेत आपण निघुयात आता, नंतर केंव्हातरी मी येईन साप पकडायला,(तेवढ्यात त्यांच्या गडबडीत ती पिशवी खाली पडली आणि अर्धी धामण पब्लिकला पण दिसली, आधीच एकतर हुच्च्च लोकस पुढे काय झाले असेल , कल्पना करा लिहित बसत नाही) आता मला त्या CCD मध्ये घेत नाहीत :( त्या मुली बद्दल काहीही समजले नाही, पत्रिका नंतर त्यांनी मेल केली, ती अर्थातच जुळली नाही आता पुढचा धक्का कधी बसणारे या विचारात दिवस काढतोय, बापू म्हणतात बेटा ये तो ट्रेलर हे ,पिक्चर अभी बाकी हे मेरे दोस्त!!!!! -धक्क्याला लागलेला (स्पा )
  • Log in or register to post comments
  • 58773 views

प्रतिक्रिया

Submitted by पियू परी on Sat, 06/18/2016 - 17:15

In reply to निनाद शेट by सुबोध खरे

Permalink

एकुलता एक मुलगा नसला कि

एकुलता एक मुलगा नसला कि सख्ख्या मुलांमध्ये भेदभाव आणि हर बाबतीत पार्शलिटी फेस करावी लागते.
  • Log in or register to post comments

Submitted by Pain6 on गुरुवार, 01/15/2015 - 14:15

In reply to ह ह पु आ by निनाद मुक्काम …

Permalink

निनाद मुक्काम प...

सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 01/15/2015 - 05:06

Permalink

एवढं करून एकमेकास पसंत पडून

एवढं करून एकमेकास पसंत पडून {एकदाचे}लग्न ठरते राजस्थानात मंडपात दोन्ही बाजूंच्या स्त्रिया समोरासमोर बसून गाणी गातात (असं म्हणतात)त्याचा अर्थ असा असतो -आमचं ते रत्न तुमचं ध्यान गळयात पडलं ,शंभर रुपये मोजले अन नासके आंबे गऴयात पडले छाप इत्यादी. साप आपल्या भक्ष्याला कसा डसतो ,विळखा घालून आवळतो अथवा नुसता विषारी फुत्काराने आंधळा करतो त्याची आगावू कल्पना वधुपित्याने प्रत्यक्ष CCDत आणून दिल्याबद्दल त्याचे आभार मानायला हवेत. सापास गप्प करण्यासाठी पुंगी तयार ठेवा छाती फुटेस्तो वाजवावी लागेल- अभी तो ट्रेलर--बालकथा !
  • Log in or register to post comments

Submitted by मिहिर on गुरुवार, 01/15/2015 - 12:09

Permalink

हाहा

मस्त लेख. मजा आली.
  • Log in or register to post comments

Submitted by Pain6 on गुरुवार, 01/15/2015 - 14:17

Permalink

स्पा

ते परत आले की काय अशा विचाराने येथे आलो आणि भयंकर करमणूक झाली. नशिबाने कोणी नागनाथ नाही भेटले अजून पण MSCIT चा अनुभव अगदी डिट्टो आला आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by मोहनराव on गुरुवार, 01/15/2015 - 15:20

Permalink

लई भारी

स्पांडुबा... कय लिवलय!!!
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on गुरुवार, 01/15/2015 - 16:32

Permalink

मदनबाण ह्यांनी मागे कधीतरी

मदनबाण ह्यांनी मागे कधीतरी खालील फोटो खरडफळ्यावर टाकला होता त्याची ह्या धाग्यानिमित्त आठवण झाली. Image removed. ५८ वर्षीय सतीश आपटेला २० वर्षीय लिजा मिळू शकते तर मग होतकरू तरुणांनो तुम्ही पण असेच प्रयत्न करुन पहायला काय हरकत आहे? :D
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 01/15/2015 - 16:33

In reply to मदनबाण ह्यांनी मागे कधीतरी by शिद

Permalink

५८ पर्यंत कोण थांबणार

५८ पर्यंत कोण थांबणार :)
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on गुरुवार, 01/15/2015 - 16:43

In reply to ५८ पर्यंत कोण थांबणार by टवाळ कार्टा

Permalink

५८ पर्यंत थांबायला कोण

५८ पर्यंत थांबायला कोण सांगतोय? लिजासारख्या २० वर्षीय तरूणीला पटवून लग्न करण्याबद्दल बोलतोय. :) बाकी, आपटेंसारखं नशिब बलवत्तर नसतं सगळ्यांच. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 01/15/2015 - 16:45

In reply to ५८ पर्यंत थांबायला कोण by शिद

Permalink

व्हय बेक्कार जळजळ झालेली

व्हय बेक्कार जळजळ झालेली बातमी वाचून =))
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 01/15/2015 - 16:57

In reply to व्हय बेक्कार जळजळ झालेली by स्पा

Permalink

=))

=)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 01/15/2015 - 17:33

In reply to व्हय बेक्कार जळजळ झालेली by स्पा

Permalink

काय तरी!!

आडनांवबंधू असून जळतोयेस??
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 01/15/2015 - 17:41

In reply to काय तरी!! by सूड

Permalink

च्यायला काहीपण

च्यायला काहीपण =)) महाभारत शिष्टीम असल्याशिवाय जळणें थांबायचें नाहीं, कांय समजलेंत ;) =))
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on गुरुवार, 01/15/2015 - 17:47

In reply to च्यायला काहीपण by बॅटमॅन

Permalink

महाभारत शिष्टीम असल्याशिवाय

महाभारत शिष्टीम असल्याशिवाय जळणें थांबायचें नाहीं, कांय समजलेंत
च्यायला! भारीच लॉजिक... :))
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 01/15/2015 - 18:03

In reply to च्यायला काहीपण by बॅटमॅन

Permalink

@महाभारत शिष्टीम असल्याशिवाय

@महाभारत शिष्टीम असल्याशिवाय जळणें थांबायचें नाहीं, कांय समजलेंत>>> =)) हा पांडू एक..आणि हा खाटुक दुसरा! =)) दोघेही मेले महावस्ताद आहेत! =))
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 01/15/2015 - 19:19

In reply to च्यायला काहीपण by बॅटमॅन

Permalink

>>महाभारत शिष्टीम असल्याशिवाय

>>महाभारत शिष्टीम असल्याशिवाय जळणें थांबायचें नाहीं, कांय समजलेंत
आता शिंचें आणखीं तींन शोधणें आलें !! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 01/15/2015 - 16:59

In reply to मदनबाण ह्यांनी मागे कधीतरी by शिद

Permalink

पण त्यासाठी लै नाटकं (आणि

पण त्यासाठी लै नाटकं (आणि शिनेमे) करावे लागतात :) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पियू परी on गुरुवार, 07/07/2016 - 16:55

In reply to मदनबाण ह्यांनी मागे कधीतरी by शिद

Permalink

हि बातमी वाचलीत का?

हि बातमी वाचलीत का? http://www.newscrunch.in/2015/07/selfie-couple-splits-viral-marriage-of.html लग्नानंतर ३ महिन्यातच अमृता (आधीची लिजा/लिसा) त्यांना सोडून गेली.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 07/07/2016 - 17:01

In reply to हि बातमी वाचलीत का? by पियू परी

Permalink

अय्य्याऽऽऽऽ कसं ना!!

अय्य्याऽऽऽऽ कसं ना!!
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 01/15/2015 - 19:06

Permalink

कशेळे मिफा (मिपा) कट्ट्याचे

कशेळे मिफा (मिपा) कट्ट्याचे शो स्टॉपर पक्के झाले आणि भांग न पिता हसत राहिलो आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 01/15/2015 - 19:42

Permalink

भारी बे

लैच भारी लिव्हलायस बे स्प्वावड्या. . . बाकी लग्नाच्या बाजारात आपण कलाकारांना किम्मत नाय राव. :( डॉक्टर, विंजिनेरांनी अन स्पेशली आयटीवाल्यांनी लै घाण करुन ठिवलाय ह्यो बाजार. पॅकेजशिवाय पोरी बोलतच नैत. :( बघ एखांदी पैश्यापेक्षा कलेची कदर असणारी अन टाक बार ऊडवून.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 01/15/2015 - 20:01

In reply to भारी बे by अभ्या..

Permalink

डॉक्टर, विंजिनेरांनी अन

डॉक्टर, विंजिनेरांनी अन स्पेशली आयटीवाल्यांनी लै घाण करुन ठिवलाय ह्यो बाजार. पॅकेजशिवाय पोरी बोलतच नैत. Sad बघ एखांदी पैश्यापेक्षा कलेची कदर असणारी अन टाक बार ऊडवून.
जिंकलस गड्या, बास...
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 01/15/2015 - 20:20

In reply to डॉक्टर, विंजिनेरांनी अन by स्पा

Permalink

@जिंकलस गड्या, बास...>> ++

@जिंकलस गड्या, बास...>> +++१११
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 01/15/2015 - 20:36

In reply to @जिंकलस गड्या, बास...>> ++ by अत्रुप्त आत्मा

Permalink

विझत चाललेल्या धाग्याला हवा

विझत चाललेल्या धाग्याला हवा देण्याचा क्शीईईईईईईईण प्र्येत्न ! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Fri, 01/16/2015 - 09:13

In reply to विझत चाललेल्या धाग्याला हवा by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

जशी..

बेरोजगार लोकांना "भत्ता" देण्याची योजना आणि त्यांची संघटना असते तशी मिपावर लग्नाळू/लग्न्(टा)ळू संघटना चालू करावी काय म्हणजे वरील कॅट्यागिरीत नसलेल्या लोकांसाठी "आरक्षण" मागता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 01/15/2015 - 22:04

In reply to भारी बे by अभ्या..

Permalink

"डॉक्टर, विंजिनेरांनी अन

"डॉक्टर, विंजिनेरांनी अन स्पेशली आयटीवाल्यांनी " अहो डॉक्टर त्यातले नाहीत हो जय -- मौसी, लडका ज्युनियर डॉक्टर है ! मौसी-- तो क्या अभी तक वो पुरा डॉक्टर बना नही है? जय -- मौसी, पुरा डॉक्टर बननेके लिये दस बारह साल चाहिये ना? मौसी -- हाय हाय तो क्या वो अभी कुछ भी नही कमाता? जय -- नही नही मौसी मैने ऐसा कब कहा, कभी कभी शामको डॉमिनोज मे काम करने के लिये जाता है ना? मौसी -- तो क्या वो रोज नही काम करता? जय -- अब मौसी इमर्जन्सी ड्यूटी भी तो होती है हफ्ते मी चार पांच बार ! मौसी -- और वो इतना मायुस क्यू दिखता है? जय --अब क्या करे मौसी घर जो नही जा पाता?कभी कभार हफ्ते मी एकाध बारहि तो घर जा सकता है! मौसी -- तो फिर वो लडकी को वक्त कब दे पायेगा? जय -- बस मौसी एक बार शादी हो जाने दो वो डॉमिनोज जाना छोड देगा, घर तो अपने आप हि छुट जायेगा ! तो मौसी मै ये रिश्ता पक्का समझू? मौसी -- पक्का ?बेटा कान खोलकर सुनले! भले मै उसकी शादी कॉल सेंटर वाले से कर दु! डॉक्टर से हरगीज नही! सगी मौसी हुं, कोइ सौतेली मां नही! जय -- अजीब बात है मेरे इतने समझाने के बाद भी आप मान नही रही है! बेचारा डॉक्टर!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 01/15/2015 - 22:18

In reply to "डॉक्टर, विंजिनेरांनी अन by सुबोध खरे

Permalink

डाॅक

=)) डाॅक
  • Log in or register to post comments
Profile picture for user अमोघ गाडे

Submitted by अमोघ गाडे on गुरुवार, 01/15/2015 - 21:00

Permalink

अगा ग गा गा गा

मेलो ठार मेलो!!! हासुन हासुन मेलो...
  • Log in or register to post comments

Submitted by सौन्दर्य on Fri, 01/16/2015 - 04:33

Permalink

लेख आवडला. फारच चांगला लिहिला

लेख आवडला. फारच चांगला लिहिला आहे. किस्से वाचताना प्रसंग डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहिले.
  • Log in or register to post comments

Submitted by विशाखा राऊत on Fri, 01/16/2015 - 15:36

Permalink

गाववाले मस्तच लिहिले आहे

गाववाले मस्तच लिहिले आहे :) हसुन हसुन वाट
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक.कुवेत on Sun, 01/18/2015 - 18:05

Permalink

स्पावड्या

छानच लिहिलं आहेस. एक विणंती...निदान योग्य मुलगी पसंत पडून तुझं लग्न होईस्त तरी हा धागा वेळोवेळि अपडेट करत रहा.
  • Log in or register to post comments

Submitted by शित्रेउमेश on Wed, 01/21/2015 - 12:10

Permalink

मेलो हसुन हसुन....

मेलो हसुन हसुन.... आई शप्पथ एकटा असताना पण हसणार हा किस्सा आठवुन.... सर्प मित्र... हा हा हा..
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Wed, 07/01/2015 - 14:00

Permalink

आत्ताच "ते" ही सिरीज वाचली ,

आत्ताच "ते" ही सिरीज वाचली , वाटलं त्यासंबंधी काही आहे का तर हे असं ! वर काढायचा मोह काही आवरत नाहीये . दंडवत स्विकारा स्पामहाराज.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 07/01/2015 - 14:20

In reply to आत्ताच "ते" ही सिरीज वाचली , by उगा काहितरीच

Permalink

पण "तें" गेंलें हों अंतां

पण "तें" गेंलें हों अंतां पांडु ला सोडुन! :'( येतच नैत परत! :-\ दू दू दू! :-\
  • Log in or register to post comments

Submitted by मोहनराव on गुरुवार, 07/02/2015 - 17:17

Permalink

कुठवर आलंय वधुसंशोधन मग?

कुठवर आलंय वधुसंशोधन मग?
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on गुरुवार, 07/02/2015 - 18:04

In reply to कुठवर आलंय वधुसंशोधन मग? by मोहनराव

Permalink

आले. आले. "ते" आले!! ;-)

आले. आले. "ते" आले!! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 07/02/2015 - 21:09

In reply to कुठवर आलंय वधुसंशोधन मग? by मोहनराव

Permalink

आले कसे नाहीत (अजुन) ते! ;-

आले कसे नाहीत (अजुन) ते! ;-) इथवर आलं असेल. :-D
  • Log in or register to post comments

Submitted by तुडतुडी on Tue, 07/14/2015 - 16:13

Permalink

फक्त चांगल्या'च' सांगत असतात.

फक्त चांगल्या'च' सांगत असतात. त्या ऐकून एखादा गळाला लागला की नंतर नाण्याची दुसरी बाजू आपोआप समजते, पण तोवर उशीर झालेला असतो.>>> vice versa . वर्माया आणि वर्पिते पण हेच करतात . बायको मागे लागलीये की मला मिपावर अकाउंट काढुन दे म्हणुन >>> तुमच्या कशाला मागे लागलीये? तिचं तिला काढता येत नै का ? आता आमचे पण किस्से ऐका प्रसंग १: dead line जवळ आल्यामुळे २ वीकेंड ला सुधा ऑफिस मध्ये जावं लागलं . पुढच्या वीकेंड ला सुट्टी मिळाली . निवांत वेळ घालवायचा म्हणलं तर बाबांनी सांगितले दुपारी ते येणारेत . च्या आयला मूड ऑफ शल. दुपारी जरा बरा ड्रेस आणि थोबाडावर माफक रंगरंगोटी करून त्यांची वाट पाहणं आलं . मुलगा आणि मुलाचे आईवडील येतील असं वाटलं . मोजून ९ जणं त्यांच्या गाड्यांतून आली होती . मुलगा बांधकामांची contracts घेत होता . बहुधा BE सिविल होता . फुटबॉल सारखा गरगरीत . मुलाची आई : आम्हाला BE झालेली मुलगी हवीये . इंग्लिश बोलणारी असली म्हणजे छान वाटतं . (हम्म … ) माझी आई : मुलगी xyz कंपनीत सध्या काम करते मुलाची आई : आम्हाला नोकरी करणारी मुलगी नकोय .मुलाला चांगलं चुंगल करून खायला घातलं म्हणजे झालं . त्याला खाण्याची फार आवड आहे कसं कोण जाने पण अचानक तोंडातून आलं , 'ते दिसतं चे' . :-D मुलाची आई खाऊ का गिळू अश्या नजरेने बघू लागली . आणि मला तिच्या त्या चेहऱ्याकडे बघताना हसू दाबून धरण मुश्किल झालं प्रसंग २: मुलगा BE software engineer आहे . सुरवातीची नेहमीची प्रश्नोत्तरे झाल्यावर … मुलाचे वडील : माझी बायको M com आहे . पण मी तिला नोकरी करू दिली नाही . आधी घर महत्वाचं . मला सूनही घर सांभाळणारी हवीये . नोकरीवाली नकोय . (biodata मध्ये qualification लिहिलं होतं' ना . मग कशाला आलात झक मारायला ). तू वर्षभर नोकरी करू शक्तेस. नंतर मुलाबाळांसाठी सोडावी लगेल. (आयला वर्षभरानंतर चं प्लानिंग करून आलेत ) मुला मोठी झाल्यानंतर , त्यांना कळायला लागल्यावर तू खुशाल नोकरी कर . आमची काही हरकत नाही . माझ्या मुलीनेही fashion designer ची नोकरी सोडली होती . १० वर्षानंतर पुन्हा करतीये . (तुझ्या बापाने कसलाही experience नसताना software field मध्ये १० वर्षांनी नोकरी ठेवलीये का ?) मुलगा गप्पच होत. आता मी त्याच्याकडे खावू का गिळू ह्या नजरेने बघत होते
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on गुरुवार, 07/07/2016 - 20:00

Permalink

मुली पाह्ण्यच्या सर्व कथा

मुली पाह्ण्यच्या सर्व कथा भयंकर आवडल्या. एखादा कुणी मिपाव वार लिहिलेल्या लेखांचे आणि प्रतिसादांची कतरनणे अजून कसा आला नाही. पुढच्या लेखाची वाट पाहतो आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com