Skip to main content

मला आवडलेले पुस्तक ( विस्तारीत)

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 28/08/2008 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
मला आवडलेले पुस्तक हा धागा प्रतिसादानी ओसंडुन भरुन वाहु लागल्यामुळे नवा धागा सुरु करत आहे कृपया एका प्रतिसादात एकाच पुस्तकाचा उल्लेख करावा एका पुस्तकावर जास्त सदस्य प्रतिसाद देऊ शकतात प्रतिसाद देताना ते पुस्तक तुम्हाला का आवडले/ त्यात वाचनीय काय आहे ते लिहावे ही विनन्ती मिपाकरांना भेटल्यानन्तर एक गोष्ट प्रकार्षाने जाणवते की ही सर्व मंडळी वाचनप्रिय आहेत. पुलंची पुस्तके त्याना पाठ आहेत. त्या व्यतीरीक्तही बरेच वाचन करणारी मंडळी आहेत. कोठेही असली तरी प्रसंगी अखंडीत वाचीत जावे हे ब्रीद आपण सारेच पाळत असतो. चला मग आपण आपल्याला आवडलेली पुस्तके शेअर करुयात. जमले तर मुम्बै/पुण्यात एखादा पुस्तक कट्टा / शेअर लायब्ररी सुरु करुया. निदान सुरुवात तरी करुया चाकोरी बाहेरची पुस्तके या नन्तर एक नवा धागा मला आवडलेले पुस्तक / ते का आवडले तेही साम्गायचे आहे. एका प्रतिसादात केवळ एकाच पुस्तकाचा उल्लेख करावा म्हणजे त्या पुस्तकात काय आवडले हे सांगता येईल तोत्तोचानः अनु चेतना गोसावी एका लहान मुलीची कथा लहान मुलाना एक व्यक्ती म्हणुन वागणुक द्यायला हवी . मुलाना घालुन पाडुन बोलण्यापेक्षा " तू खरोखर एक चांगली मुलगी आहेस" हे वाक्य त्या मुलीच्या मनात एक आत्मविष्वास जागवते. शाळेने नाकारलेले हायपर ऍक्टीव्ह मुलगी आणि तिच्या नव्या शाळेतली तिच्या सारखीच मुले त्यांच्या शाळेतले वातावरण. युद्धावेळचे वातावरण त्याचा लहान मुलांवर होणारा परिणाम या सर्वांचे वर्णन. केवळ मनोरंजन न होता मुलांच्या जगात डोकावयाचे संधी देणारे पुस्तक. "तारे जमीन पर" पहाताना मला या पुस्तकाची आठवण होत होती . संग्रही असावेच असे पुस्तक.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 51370
प्रतिक्रिया 74

प्रतिक्रिया

In reply to by विजुभाऊ

शांताराम खूप मोठे होते. जवळपास 1000 पाने. मी वाचले. बरीच पाने रटाळ वाटली. पण मला ठीक वाटले. अगदीच टाकाऊ नव्हते.

हे पुस्तक मी सध्या वाचत आहे अजुन पुर्ण वाचुन झालेले नाही जितका भाग वाचला त्या विषयी अमिताव घोष अतिशय आवडता लेखक त्याची बरेच दिवसांपासुन पेन्डींग असलेली द ग्लास पॅलेस सध्या वाचतोय. ही सुद्धा सुंदरच भट्टी जमवलेली आहे. मंडाले आणि रत्नागिरी पहीली दोन प्रकरणे संपली. घोष ने कादंबरीसाठी ५ वर्षे अतीपरीश्रम घेतलेले आहेत ते जाणवतात. कादंबरीची सुरुवात मंडालेत ब्रिटीश फौजांनी केलेल्या आक्रमणातुन होते. बर्माचा राजा थिबॉ त्याची फॅमिली ला इंग्रज युद्धात नमवुन रत्नागिरीला त्यांची रवानगी करतात.निर्वासित केलेल्या थिबॉ चे रत्नागिरीतले वास्तव्य, त्याचा एकाकीपणा, नॉस्टॅल्जीया, त्याच्या चार मुली, नोकर त्यांचे अफेयर्स, क्रुर राणी, बदलता भारत, श्रुड साहेब, राजाच हळुहळु होत जाणार डिग्रेडेशन, तिकडे बर्मातला सागवानचा बर्माटीक चा प्रचंड व्यापार, त्यातला हत्तींचा वापर. तिथला भन्नाट निसर्ग, साहेबाची धंद्यातली इन्व्हेन्शन्स, साहेबाच्या महत्वाकांक्षेने पोखरत जाणारा बर्मा, त्यातले आपल्याला सहसा अपरीचीत असणार्‍या रेसेस व लोक. फारच सुंदर उतरलय. इतिहासाची प्रचंड माहीती असुनही ती कादंबरीवर अजिबात हावी न होउ देता घोष मोठ्या कुशलतेने संक्रमणातुन जात असलेले लोक समाज फार सुंदर रेखाटतात. अत्यंत वाचनीय उत्कंठावर्धक वगैरे वगैरे आहे. इथे घोषची कॅरेक्टर्स सुरुवातीला तरी मनाची पकड घेत नाहीत पण हळुहळु ती डोक्यात सेटल होऊ लागतात. घोष ला कॅरेक्टर बिंबवायला वेळ लागतोय कारण त्याचा फोकस बहुधा जास्त मोठा असा काळावर आहे. तरी सर्वस्व गमावलेला थिबॉ फार ट्रॅजिक रेखाटलाय तो मनात घर करुन राहतो. मंडालेच्या राजवाड्यातील मुख्य हॉलला द ग्लास पॅलेस नाव त्यावरुन हे शीर्षक. कादंबरीचे मुखपृष्ठ निव्वळ अप्रतिम आहे. त्यावरची जे एम कोएट्जी ची मोजक्या शब्दातली प्रतिक्रीया पुस्तकाविषयी बरेच काही सांगुन जाते. एक सॅम्पल देण्याचा मोह आवरत नाही. ब्रिटीश आर्मीत लढणार्‍या भारतीय सैनिकांविषयी चा हा संवाद बघा “In Singapore, as a young man, I worked for a time as a hospital orderly. The patients were mainly sepoys like these—Indians, back from fighting wars for their English masters. I still remember the smell of gangrenous bandages on amputated limbs; the night-time screams of twenty-year-old boys, sitting upright in their beds. They were peasants, those men, from small countryside villages: their clothes and turbans still smelt of wood-smoke and dung fires. ‘What makes you fight,’ I would ask them, ‘when you should be planting your fields at home?’ ‘Money,’ they’d say, and yet all they earned was a few annas a day, not much more than a dockyard coolie. For a few coins they would allow their masters to use them as they wished, to destroy every trace of resistance to the power of the English. It always amazed me: Chinese peasants would never do this—allow themselves to be used to fight other people’s wars with so little profit for themselves. I would look into those faces and I would ask myself: What would it be like if I had something to defend—a home, a country, a family—and I found myself attacked by these ghostly men, these trusting boys? How do you fight an enemy who fights from neither enmity nor anger but in submission to orders from superiors, without protest and without conscience? “In English they use a word—it comes from the Bible—evil. I used to think of it when I talked to those soldiers. What other word could you use to describe their willingness to kill for their masters, to follow any command, no matter what it entailed? And yet, in the hospital, these sepoys would give me gifts, tokens of their gratitude—a carved flute, an orange. I would look into their eyes and see also a kind of innocence, a simplicity. These men, who would think nothing of setting fire to whole villages if their officers ordered, they too had a certain kind of innocence. An innocent evil. I could think of nothing more dangerous.” “Saya.” Rajkumar shrugged offhandedly. “They’re just tools. Without minds of their own. They count for nothing.” 1

In reply to by मारवा

हा परिच्छेद खूप आवडला. 'द ग्लास पॅलेस' वाचायलाच पाहिजे. खूप ओघवती आणि हृदयाला भिडणारी भाषा!

द गॉडफादर, गॉन विथ द विंड, फॉल ऑफ जायंट्स, ऑक्टॉपस, सायक्यामोर रो, उत्तरयोगी, गुड टू ग्रेट, स्वामी, नॉट गॉन विथ द विंड (विश्वास पाटील), व्यक्ती आणि वल्ली, चार नगरातले माझे विश्व (जयंत नारळीकर) आणि अजून बरीच पुस्तके...यातली मी काही दोनदा वाचली आहेत.