मृगगड ट्रेक
रविवारचा सुट्टीचा दिवस.चांगलं घरी व्हाॅट्स अॅप वगैरे खेळत बसावं,पावसाळा म्हणून काहीतरी चटपटीत बनवून खावं,मित्रमंडळी बोलावून गफ्फा हाणाव्या हे सोडून सुखाचा जीव कुठे डोंगरदऱ्यात घाम गाळत घालवावा!
पण नाही.ट्रेकला जाण्याचा किडा एकदा चाववुन घेतला की त्याची नशा सोडवत नाही हे ऐकलं होतं पण स्वतःवरच त्याचा परिणाम होईल माहित असतं तर पहिला माथेरान वन ट्रि हिल ट्रेक केलाच नसता ;) यावर्षीचा महिला दिन माझ्या नुकत्याच चाळीशीतल्या ;)पदार्पणाचं सेलिब्रेशन म्हणून माथेरान वन ट्रि हिल ट्रेक करुन काय केला, परत कधी जाता येईल ट्रेकला वाटच बघायला लागले.मी काही नियमित ट्रेकर ,फिट बिट मुळीच नाही.पण आमच्या कॅप्टन सोनटक्केंच्या ग्रुपने मी धापा टाकत रडारड करत गेले तरी वर पोहोचवले बाबा.आणि ट्रेकची मजा कळली.जाताना कुठे या भानगडीत पडले,उद्या क्लिनिकला उगाच दमायला होणार, कधी संपणार हा उभा चढ,मग गरगरणं अशा सगळ्या अवस्था पार करुन वर ते झाड काय दिसलं एकदम उत्साहच संचारला होता.
नकळत मी पुढच्या ट्रेकला नक्की जायचंच ठरवून टाकलं आणि कॅप्टनच्या ग्रूपवर मृगगड ट्रेकची घोषणा झाली.खोपोली पाली रस्त्यावरच्या गावातला किल्ला म्हणजे आमचाच भाग.मग माझी हक्काची जोडीदारीण जिच्या भरवशावर मागचा ट्रेक केला त्या कविता १९७८ ला साद घातली.ती येते म्हंटल्यावर ट्रेकला जाण्याचं नक्की केलं.
ट्रेक ग्रुपवर जाणाऱ्या लोकांचा आकडा साठपर्यंत पोहोचला.मोठ्ठा ग्रुप म्हणजे मजा येणार याची खात्रीच.आयोजकांचे हाल तेच जाणे अर्थात! मग कॅप्टननं किल्ल्याचे फोटो काल टाकले आणि माझं शौर्य मावळायला सुरूवात झाली :( लै डेंजर असा राॅकपॅच आणि चिंचोळी खिंडीसारखी वाट बघून धडकीच भरली.
काहीही होवो आता जायचंच म्हणून फोटो बघायचे बंद करुन टाकले! आणि नवर्याला अजिबात दाखवले नाहीत.ते बघून तू कशाला तडफडायला जाते सुट्टीच्या दिवशी वगैरे डायलाॅग ऐकून घ्यायची माझी बिलकुल तयारी नव्हती!
सकाळी सव्वा आठला ग्रुपबरोबर कर्जत स्टेशनवर खोपोली गाडीत बसलो.आणि गरम वडापाव खात ट्रेक खादाडीला तर सुरूवात झाली.
मृगगडाला जाण्यासाठी खोपोलीअलिकडच्या लौंजी गावात टमटम बुक केल्या होत्या.खोपोली पाली रस्त्यावर परळी म्हणून गाव लागते.इथून पुढे सहा किमीवर भेलिव गाव आहे.या किल्ल्याला म्हणून भेलिवचा किल्ला पण म्हणतात. तसे हा किल्ला म्हणजे तीन डोंगर शेजारी शेजारी आहेत.त्यातला मधला मृगगड.त्याला वळसा घालुन छान घनदाट जंगलातून वाट जाते.लांबून किल्ला लहान वाटत होता.म्हणून मी स्वतःवरच खुश होऊन चालत होते,काय स्टॅमिना वाढलाय माझा!
अाणि चिमणीची दोन डोंगर जोडणारी चिंचोळी वाट पुढे उभी राहिली!
दोन्ही बाजूंनी हाताचा आधार घेत,ग्रुप कॅप्टनच्या मदतीने कशीबशी खिंड लढवली आणि मला जोरात चक्कर आली!इतकी की डोळ्यासमोर टिव्हीचे लाईट गेल्यावर चांदण्या येतात तसे पांढरे धुके! मला वाटलं संपला माझा ट्रेक आता.कॅप्टन आणि कविता धावत माझ्याजवळ आले.मग सरबत पी,गोळी खा,कॅप्टननी तर माझे बुट काढुन पावलावर अॅक्युप्रेशर पाॅइंट्स दाबून दिले.मला प्रचंड लाज वाटत होती. आपल्यामुळे उशीर होतोय. पण कॅप्टन बुवांनी त्यांना स्वतःलाही असा त्रास कुठल्याशा गडावर चढताना अचानक उंचावर गेल्यावर झालेला अशी माझी समजूत काढली.मी सध्या तरी ती खरी मानली आहे!
तर जरा तकवा येताच आम्ही परत चढाईला सुरूवात केली.आता आल्या डोंगरात कोरलेल्या अरुंद पायर्या. त्या पण पावसाने गुळगुळीत झालेल्या.खाली दरी असल्याने वर बघत चढण्यापलिकडे काही आॅप्शन राहातच नाही इथे!
मग पोहोचलोच.वर दोन पाण्याची टाकी पाण्याने भरलेली होती. फिल्टर्ड पाण्याची बाटली सोबत घेऊन फिरणार्या माझी बाटली चक्क या पाण्याने भरली आणि प्यायलेच ते पाणी.खरं माझ्यातला डाॅक्टर नाक मुरडून बघत होता त्या पाण्याकडे.पण ग्रुपमधले सगळे बिनधास्त पिताना पाहुन लाज वाटून प्यायले ;)
वर अजून एक चढ पार केला आणि खालुन खुणावणारा जरीपटका समोर आला.आणि अफाट दृश्य.
लोणावळ्याची टायगर हिल आणि उंबर खिंड परिसर,सह्याद्रीची प्रचंड मोठी कातळभिंत समोर दिसत राहाते.इतका वेळ न आलेला पाऊस वर गेल्यावर शहाण्यासारखा आला.ते अप्रतिम दृश्य, तो भणाण गार वारा थोडावेळ अनुभवुन आम्ही लगेच निघालो.किल्ल्यावर फारसे अवशेष नाहीत.हा नुसताच पहारेकरी किल्ला असावा.
परत येताना त्या कातळात कोरलेल्या डेंजर पायर्या उतरायच्या होत्या! पण ग्रुपमधल्या अनुभवी सदस्यांनी एकेकाला धीर देत देत उतरवलं एकदाचं.नंतर परत खिंड उतरायची होतीच.ती चक्क बसून बसून उतरलो!
नंतरचा रस्ता त्यापुढे केकवाॅक! करवंदाच्या जाळीतली करवंदं खात खात आरामात खाली पोहोचलो तासाभरात. आणि मग आमचे अवतार बघितले! चिखलाने माखलेले हात पाय कपडे आणि प्रचंड भूक.तिथेच देवळात भात भाजीचं जेवण काय जेवलोय सपाटून!
आत्ताच घरी परत आले आणि नवर्याला सांगायला लागले आजचा वृत्तांत. मग तो मला नेहमीप्रमाणे का जाते तडफडायला म्हणला आणि मी पुढचा ट्रेक कधी आहे सांग गं कविता असं टायपायला सुरूवात केली पण!

वाचने
26050
वाचनखूण
प्रतिक्रिया
81
मी पयली. मस्त ट्रेक.
हिरवळ बघुन खुप मस्त वाटले..
मस्त झालाय ग ट्रेक.मी कधी
भारीच...
In reply to भारीच... by सतिश गावडे
कोरीगडला जाताना लायन्स
In reply to कोरीगडला जाताना लायन्स by प्रचेतस
वृत्तांत मस्तच भेट द्यायला
In reply to वृत्तांत मस्तच भेट द्यायला by महासंग्राम
पावसाळ्यात प्रचंड गर्दी असते
छान लिहिलंय
In reply to छान लिहिलंय by प्रचेतस
मृगगडाचा काळ साधारण दोनहजार
In reply to मृगगडाचा काळ साधारण दोनहजार by सतिश गावडे
मृगगडाचाच असं म्हटलंय सर. गड
In reply to मृगगडाचाच असं म्हटलंय सर. गड by प्रचेतस
ठीक आहे...
In reply to छान लिहिलंय by प्रचेतस
येस्स सर..
शैलेंद्र सोनटक्के का?
In reply to शैलेंद्र सोनटक्के का? by यशोधरा
हो यशो.
In reply to हो यशो. by अजया
ओके, कविता मैत्रीण आहे माझी,
In reply to ओके, कविता मैत्रीण आहे माझी, by यशोधरा
मी ती कविता नाही बर का!
In reply to मी ती कविता नाही बर का! by कविता१९७८
काय सांगतेस काय!! खरंच की काय
In reply to काय सांगतेस काय!! खरंच की काय by यशोधरा
खरच
In reply to खरच by कविता१९७८
पण तू नव्हेस हे मला ठाऊक आहेच
In reply to पण तू नव्हेस हे मला ठाऊक आहेच by यशोधरा
:)
Jabarich ajaya Tai....keep it
अरे व्वा !! ट्रेकला जाणं सुरू
In reply to अरे व्वा !! ट्रेकला जाणं सुरू by किसन शिंदे
नक्की नक्की.
डेंजर दिसतयं...
In reply to डेंजर दिसतयं... by इशा१२३
ईशे खुप मज्जा आली
अरे वा!
व्वा ! वाट अवघड दिसतेय.लायन
In reply to व्वा ! वाट अवघड दिसतेय.लायन by कंजूस
तो मोराडीचा डोंगर.
अजया मस्त लिहिलं आहेस गं.
सुपर्ब!
मस्त!
छान छान,आजच एक मस्त ट्रेक
धाडसी आहात हो ती खिंड खतरनाक वाटली
In reply to धाडसी आहात हो ती खिंड खतरनाक वाटली by मारवा
दोन्ही बाजुंनी डोंगर येतो
In reply to दोन्ही बाजुंनी डोंगर येतो by अजया
घसारा??
In reply to घसारा?? by अभ्या..
घसारा म्हणजे स्क्री.
मानलं बुवा
फारच मस्तं!
असा प्रकार झाला तर!
In reply to असा प्रकार झाला तर! by धनंजय माने
हो.प्यारेकाका
आमच्या फोंड्याची आणि आंबोलीची
In reply to आमच्या फोंड्याची आणि आंबोलीची by स्पार्टाकस
How about Everest base camp?
In reply to How about Everest base camp? by धनंजय माने
२ वेळा करुन झाला आहे.
In reply to आमच्या फोंड्याची आणि आंबोलीची by स्पार्टाकस
हौशी लोक जाऊ शकतात असा
In reply to हौशी लोक जाऊ शकतात असा by अजया
आपल्याला मजा वाटायला हवी भिती
जबरा
ट्रेकचं वर्णन मस्त!
नवख्यांची पावसाळी भटकंती -
In reply to नवख्यांची पावसाळी भटकंती - by कंजूस
+१
लै भारी. !
छान.
वा! झानच झालाय ट्रेक.
मस्त...
मस्त !!
In reply to मस्त !! by नीलमोहर
तुम्हीपण vartigo वाले का???
ब्रेव्हो
In reply to ब्रेव्हो by सस्नेह
हा अजयाचा दुसरा ट्रेक होता
अभिनंदन
In reply to अभिनंदन by गामा पैलवान
पहिलटकरणीची भिती ;) दुसरं काय
बाब्बौ...
मस्त झाला ट्रेक
जबरदस्त !!! अजया न कवि जियो :
जबरी
In reply to जबरी by स्वच्छंदी_मनोज
फसवा तर नाही वाटला पण जबरी
In reply to फसवा तर नाही वाटला पण जबरी by कविता१९७८
..
In reply to .. by स्वच्छंदी_मनोज
बरोबर.परत येताना पण बाहेर
In reply to .. by स्वच्छंदी_मनोज
अच्छा, दिशादर्शकबाण नव्हते पण
मस्तच लिहले आहेस ताई. पण मला
भारी!!
छान
जबरदस्त!
भारी ! विषेशतः पावसाने
मस्त! खिंड लढवता-लढवता
खडकातले चेहरे
मस्तच झाला ट्रेक आत्तु :D
भारी!!
छान वर्णन
गेल्या तीन दिवसांपासून
कडक. जाऊन आलोय इथे.
मस्त वृत्तांत...
अप्रतिम. त्या निसरड्या