Skip to main content

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-२ }

लेखक मदनबाण यांनी बुधवार, 03/02/2016 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या प्रमाणे २०१५ साल अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन उजाडलं त्याच प्रमाणे २०१६ सालाची सुरुवातच जागतिक आर्थीक संकटांच्या घटनांनी झाली. २०१५ सालातील घटनाक्रमांचा आढावा घेतल्यास येणारा काळ हा कमालिचा अस्थिर असणार आहे याची जाणिव आता अनेकांना झाली आहे.मागच्या वर्षी प्रमाणेच या वर्षी घडणार्‍या जागतिक / भारतिय अर्थव्यवस्थेतील घडामोडी या धाग्यात येतील. "एकामेका माहिती देउ | अवघे होवु सतर्क || " आधीचा भाग :- जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण

वाचने 78723
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

सऊदी अरेबिया अमेरिकेतलि गुंतवणूक काढून घेण्याची धमकी देतोय,अमेरिकेतील दोन खासदरानी एक विधेयक आणून 2001 आणि नंतरच्या कोणत्याही दहशतवादी हल्ल्यातील पीड़ित हे त्या हल्ल्यातील सहभागी दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशविरुध् तक्रार करू शकणार आहेत।त्यामुळे दहशतवाद्यांचा खरा पण पैशावाला साथीदार गुंतवणूक काढण्याची धमकी देतोय।सऊदी अरब के अमेरिकी निवेश बेचने से हिल जाएगी दुनियाभर की अर्थव्यवस्था http://dhunt.in/16Ebu?ss=mms via Dailyhunt

हा धागा मागे पडलाय. म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था सुधारतेय असं मानूया कां? आज ब्रेन्ट तेलाने अर्धशतक मारल्याबद्दल वर आणत आहे. गेले महीनाभर तेलाचा भाव ४५ च्या आसपासच फिरतो आहे. आणि आज ५० पार. बर्‍याच दिवसात काळजी करावं असं काही घडलेलंही दिसत नाहीये. जाणकारांनी थोडी भर घालावी.

अमेरिकन फेडरल रिझर्व्हची (भारतातील रिझर्व्ह बँकेला समकक्ष) एक Federal Open Market Committee (FOMC) नावाची समिती आहे.फेड गव्हर्नर जरी व्याजाच्या दराविषयीचे धोरण जाहिर करत असले तरी या समितीत पहिल्यांदा त्यावर चर्चा होते, त्यावर मतदान होते आणि मग गव्हर्नर त्याविषयीचे धोरण जाहिर करतात. म्हणजे गव्हर्नर पूर्णपणे स्वत:च्याच मनाने निर्णय घेत नसतात. या समितीची बैठक प्रत्येक तिमाहीमध्ये दोनदा होते आणि या बैठकीचा वृत्तांत बैठक झाल्यानंतर सुमारे तीन आठवड्याने प्रसारीत करण्यात येतो. अशीच बैठक २६-२७ एप्रिल रोजी झाली आणि त्याचा वृत्तांत (मिनिट्स) १८ मे २०१६ रोजी प्रसारीत करण्यात आले. त्यानुसार या बैठकीत अनेक गोष्टी ठरल्या त्यापैकी एक गोष्ट पुढीलप्रमाणे--- "The Committee expects that economic conditions will evolve in a manner that will warrant only gradual increases in the federal funds rate; the federal funds rate is likely to remain, for some time, below levels that are expected to prevail in the longer run. However, the actual path of the federal funds rate will depend on the economic outlook as informed by incoming data." या ठरावात व्याजाचे दर कायम ठेवावेत असेही म्हटले होते. या ठरावाच्या बाजूने फेडच्या गव्हर्नर जॅनेट येलेन यांनी मत दिले. तर FOMC च्या अन्य एक सदस्या इस्थर जॉर्ज यांनी त्याच बैठकीत ०.२५% ने व्याजाचे दर वाढवावेत असे मत मांडले. पण असे मत मांडणार्‍या त्या एकट्याच असल्यामुळे बहुसंख्य सदस्यांचे मत ठरावाच्या बाजूने आले आणि व्याजाचे दर त्या बैठकीत कायम राहिले. मात्र वर अधोरेखित केलेल्या वाक्यांवरून समजते की भविष्यात व्याजाचे दर वाढू शकतील अशी हिंट त्या ठरावात दिली होती. त्यापूर्वीच्या बैठकींमध्ये "पुढील काही काळापर्यंत व्याजाचे दर कायम राहतील" अशा स्वरूपाची भाषा असे. या बैठकीचा वृत्तांत १८ मे रोजी आला आणि १९ मे रोजी व्याजदर भविष्यात वाढतील या अपेक्षेने बाजार खाली पडला. २७ मे रोजी हार्वर्ड विद्यापीठात भाषण करताना जॅनेट येलेन यांनी म्हटले: "It's appropriate, and I've said this in the past, I think for the Fed to gradually and cautiously increase our overnight interest rate over time and probably in the coming months, such a move would be appropriate". म्हणजेच व्याजाचे दर पुढील काही महिन्यात वाढतील असे म्हटले. तर काल फिलाडेल्फिया इथे भाषण करताना त्यांनी व्याजाचे दर नक्की का वाढतील याविषयी कुठचेच संकेत दिले नाहीत. त्यामुळे आज हाँगकाँग, सिंगापूर येथील बाजार वर आहे. जॅनेट येलेन यांनी असे परस्परविरोधी संकेत यापूर्वीही दिले आहेत.सप्टेंबर २०१५ मध्ये समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटले--"in light of the heightened uncertainties abroad and a slightly softer expected path for inflation, the committee judged it appropriate to wait for more evidence" म्हणजे एवढ्यात व्याजाचे दर वाढणार नाहीत. तर त्यानंतर काही दिवसातच त्यांनी म्हटले--"most of my colleagues and I anticipate that it will likely be appropriate to raise the target range for the federal funds rate sometime later this year" म्हणजे यावर्षी (२०१५ मध्ये) व्याजाचे दर वाढतील असे संकेत त्यांनी दिले. अन्य एका वेळेसही जॅनेट येलेन यांनी असेच परस्परविरोधी संकेत दिल्याचे आठवते. सप्टेंबर २०१४ मध्ये इंग्लंडमध्ये बँक ऑफ इंग्लंडचे (फेड आणि रिझर्व्ह बँकेला समकक्ष)तत्कालीन गव्हर्नर मार्क कॅर्नी यांनी असेच परस्परविरोधी संकेत दिल्यानंतर ब्रिटिश खासदार पॅट मॅकफॅडेन यांनी गव्हर्नरना:"तुम्ही एखाद्या अविश्वसनीय प्रियकरासारखे (unreliable boyfriend) वागत आहात" असे म्हटले. आजच आपल्या राजनसाहेबांनी व्याजाचे दर कायम ठेवले आहेत.राजनसाहेब इतर कुठल्याकुठल्या गोष्टीवर मधूनमधून भाष्य करत असले तरी व्याजाचे दर या गव्हर्नरसाठीच्या सर्वात महत्वाच्या विषयावर त्यांनी कधीच अशी परस्परविरोधी विधाने केलेली नाहीत. फेडच्या गव्हर्नरने असे परस्परविरोधी संकेत दिले तर त्याचे इतर सगळ्या देशातील सेंट्रल बँकांवर निर्णयप्रक्रीयेत परिणाम होतात हे नक्कीच. कारण फेड काय करणार यावर ते त्यांच्या देशातील व्याजाचे दर किती ठेवावेत हे ठरवत असतात.अशावेळी जर अमेरिकन फेडनेच असे परस्परविरोधी संकेत दिले तर त्यांची अडचण होणार हे नक्कीच. असो. आपल्याकडे पुढील दीड महिना तरी व्याजाचे दर कायम राहतील. अमेरिकेत काय होईल हे सांगता येत नाही.

Federal Open Market Committee (FOMC) वरून आठवले. साधारण डिसेंबर २०१४-जानेवारी २०१५ मध्ये भारतातही अशी समिती आणावी अशा स्वरूपाच्या हालचाली मोदी सरकार आल्यानंतर सुरू झाल्या.अमेरिकेत अशी समिती कित्येक वर्षांपासून आहे.अशी हालचाल सुरू होताच मोदी सरकारने काहीही केले तरी त्याला विरोध करायचा विडा उचललेल्या पुरोगामींनी त्यावर टिका सुरू केली. गिरीश कुबेर यांनी तर लोकसत्तामध्ये अग्रलेख लिहून मोदी सरकार रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता हिरावून घेणार आहे आणि बँकेचे पंख कापणार आहे असेही लिहिले. तेव्हापासून गिरीश कुबेर आणि लोकसत्ता हा प्रकार मनातून उतरला. साधारण त्या दरम्यानच रिझर्व्ह बँकेचे मॅन्डेट 'inflation targeting' असावे आणि इतर कुठच्याही गोष्टींची काळजी न करता रिझर्व्ह बँकेने महागाईचा दर २% ते ६% या दरम्यान ठेवावा यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँकेत करार झाला. त्याविरूध्दही काही मंडळींनी आकांडतांडव केलेच. वस्तुतः असे 'inflation targeting' अनेक देशांमधील सेंट्रल बँका ठेवतात. युरोपिअन सेंट्रल बँक येण्यापूर्वी जर्मनीची सेंट्रल बँक या प्रकाराची अगदी काटेकोर अंमलबजावणी करत असे. स्वित्झर्लंडची सेंट्रल बँकही हाच नियम पाळते. न्यू झीलंडमध्ये तर सेंट्रल बँक महागाईचा दर ठरलेल्या मर्यादेत ठेऊ शकली नाही तर गव्हर्नरची पदावरून उचलबांगडी होऊ शकते. हा करार करून सरकार आणि रिझर्व्ह बँकेने योग्य तेच केले आणि त्यासाठी श्रेय राजनसाहेब आणि जेटली या दोघांचेही. तरीही टिका करणारे करतच असतात. राजनसाहेबांसारखा स्वतंत्र बाण्याचा माणूस अशा प्रकारचे पंख कापायचा प्रयत्न मान्य करणार नाही. राजनसाहेबांची शिकॅगोमधील बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापकाची नोकरी आहेच आणि त्यांना जगातील कोणतीही आघाडीची संस्था (आय.एम.एफ असो की वल्ड बँक असो) अगदी हसत पायघड्या घालून बोलावेल अशी परिस्थिती असताना जर असा बाहेरून दबाव येत असेल तर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाला चिकटून राहायचे त्यांना काही कारणही नव्हते. पण असे प्रश्न विचारायच्या भानगडीत फार कोणी पडले नाही.

टिंग टाँग... Moody's Investors Service ने Deutsche Bank चे क्रेडिट रेटिंग २३ मे २०१६ ला खाली केले. त्यांनी Baa2 हे रेटिंग दिले आहे.हे रेटिंग फक्त २ अशांनी जंक स्टेटस पेक्षा वर आहे. Deutsche Bank च्या ट्रॅकिंगची सुरुवात मला वाटत मागच्या धाग्यात अंशु जैन यांच्या राजिनाम्या पासुन झाली होती...त्यानंतर बाकीचे घटना क्रम ट्रॅक करता येतात... आताची स्थितीचे वर्णन वर सुरुवातीला केलेच आहे. Moody's downgrades Deutsche Bank's ratings (senior debt to Baa2, long term deposits to A3 and counterparty risk assessment to A3(cr)); outlook stable Deutsche Bank's credit rating was downgraded to 2 notches above junk आता Deutsche Bank चे ट्रॅकिंग का ? कारण...ते म्हणतात :- Deutsche Bank today remains by far the largest German bank, with assets of 1.7 trillion euros in April 2016. The second-ranked German bank. आता पर्यंतचे त्यांचे जवळपास सगळे घोळ पाहिले आहेत ! त्यावरुन आता यांच्यावर नजर हवीच ! मागच्या धाग्यात जपानच्या अर्थव्यवस्था विषयक काही प्रतिसाद दिले होते, त्यात एका ठिकाणी असे म्हंटले होते :- त्यामुळे पुढील काळात जपानची अर्थव्यवस्था नक्कीच चर्चेत राहिल असे दिसते. याच जपानचे आबे जी ७ परिषदेत म्हणाले :- G7 vows growth efforts as Japan's Abe warns of global crisis Japanese Prime Minister Shinzo Abe, talking up what he calls parallels to the global financial crisis that followed the 2008 Lehman Brothers bankruptcy, said the G7 "shares a strong sense of crisis" about the global outlook. चला, आबे बोलले हे महत्वाचे... ज्या बद्धल हा आणि आधीचा धागा आहे. व्हेनाज्युएलाचा उल्लेख अधे मधे केला होता, त्याची परिस्थीती खालील प्रमाणे आहे :- आर्म कॉनफ्लिक्ट आणि बँकिंग इंडस्ट्रीचा इसेंस सांगणारा एक डायलॉग पाहिला होता तो इथे देत आहे :- जाता जाता दोन महत्वाच्या बातम्या देउन जातो,,,, १} Druckenmiller Loads Up on Gold, Saying Bull Market Exhausted २} Billionaire Soros Cuts U.S. Stocks by 37%, Buys Gold Miner

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- काला रे सैईया काला रे, तन काला रे मन काला रे ,काली जबां की काली गारी, काले दिन की काली शामे,सैया करते जी कोल बजारी :- Gangs of Wasseypur 2

सध्या सगळीकडे Brexit { British exit } ची चर्चा जोरात आहे,एक घटना ज्यावर ब्रिटनचे आणि जगाचे भविष्य अवलंबुन असेल... नक्की हे काय चालले आहे ते जाणुन घेण्यासाठी खालील महत्वपूर्ण दुवे नक्कीच कामास येतील. Euro-federalists financed by US spy chiefs :- By Ambrose Evans-Pritchard { telegraph.co.uk 12:00AM BST 19 Sep 2000} Somnolent Europe, Russia, and China: Accept US Hegemony or Go to War? Somnolent Europe, Russia, and China Consequences of Brexit sink in for US politicians after killing of MP जाता जाता :- Paul Craig Roberts यांना मी बर्‍याच काळा पासुन फॉलो करत आहे, आणि त्यांचे वरील दोन्ही व्हिडीयो ऐकण्यास महत्वपूर्ण आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बंद कर राग... डोक्यात गेली आग ! :- युथ * बदल घडवायची ताकद !!!

In reply to by मदनबाण

वरच्या प्रतिसादात एक व्हिडियो ध्यायचा राहुन गेला होता तो इथे देतो. वेस्ट व्हर्सेस रशिया हा वॉरगेम बर्‍याच काळा पासुन रंगतो आहे असे मी मागच्या धाग्यात म्हणालो होतो, पुतिन यांची चेतावणी सध्या काय स्थिती आहे ते दर्शवते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बंद कर राग... डोक्यात गेली आग ! :- युथ * बदल घडवायची ताकद !!!

In reply to by मदनबाण

Brexit { British exit } म्हन्जे Withdrawal of the United Kingdom from the European Union युरोपियन महासंघातून ब्रिटनचे बाहेर पडणे. येत्या २३ जूनला ब्रिटनमध्ये सार्वमत घेण्यात येणार आहे. ताज्या पोलनुसार ४०% ब्रिटिशांना वाटते की ग्रेट ब्रिटनने युरोपियन महासंघातून बाहेर पडावे, तर ३९% लोकांना वाटते की कायम राहावे. युरोपियन महासंघातून बाहेर पडल्याने त्याचा परिणाम ब्रिटनच्या महासंघातील सदस्य देशांशी होणार्‍या व्यापारावर होईल. तसेच, ब्रिटनमध्ये येणार्‍या परकीय गुंतवणुकीवर व स्थलांतरित होणार्‍या लोकसंख्येवर परिणाम होईल. तो किती होईल? तर २०३० पर्यंत ब्रिटनची जीडीपी २.२% ने कमी होऊ शकते. (या परिणामाची विविध भाकिते आहेत. सर्वाधिक भाकिते -०.८% ते +०.६% या रेंज मध्ये आहेत. वर्स्ट केसमध्ये -२.२% तर बेस्ट केसमध्ये +१.६% परिणाम होईल.) d मग, ब्रिटन बाहेर का पडतंय? डेव्हिड कॅमेरॉन व त्यांच्या राणीला माहिती! अर्थात यामुळे 'जगाच्या (परिणामी भारताच्या) अर्थव्यवहारावर काय परिणाम होईल, हे अर्थतज्ञांना माहिती.

फेडच्या चेअरपर्सन जॅनेट येलेन यांनी व्याजाच्या दरांवर परस्परविरोधी संकेत द्यायची आपली परंपरा चालूच ठेवली आहे. व्याजदरांमध्ये वाढ व्हायच्या शक्यतेवर त्यांनी म्हटले: "we really need to look at the data and I can't pre-specify a timetable so I'm not comfortable to say it's in the next meeting or two but it could be. It could be. It's not impossible. It's not impossible that by July for example we would see data that led us to believe that we are on a perfectly fine course, and that data was an aberration and that other concerns would have passed." संदर्भ म्हणजे व्याजाचे दर वाढवायला योग्य परिस्थिती निर्माण होऊ शकेल किंवा शकणारही नाही अशा स्वरूपाचे विधान त्यांनी केले. या दोन सोडून तिसरी शक्यताच नसल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्यांचे हे विधान बरोबर आहे. पण यातून इतरांनी नक्की काय अर्थ काढायचा? अर्थव्यवस्थेत नक्की कोणते बदल होणार आहेत हे कोणीच नक्की सांगू शकणार नाही हे नक्कीच. पण तसे असेल तर एकाच वेळी दोन्ही बाजूंचे (एखाद वेळेस व्याजाचे दर वाढतील किंवा वाढणारही नाहीत) संकेत दिल्यामुळे एकूणच गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे हे नक्कीच. अमेरिकन फेडच्या प्रमुखांनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाकडे उद्योग आणि अर्थजगताचे लक्ष असते. वर प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे पूर्वीपासून येलेन असे काहीसे परस्परविरोधी संकेत देत आहेत. याविषयी या लेखात म्हटले आहे: "This pattern-the Fed talking about imminent interest rate hikes but then delaying them due to disappointing economic performance-has been playing out for a couple of years. A lot of commentators simply treat it as bad luck, with the Fed as a mere spectator. But that misunderstands what's going on. In reality, the Fed's constant chatter about raising rates is itself an important cause of the economy's sluggish performance. Markets and business leaders pay close attention to Fed statements. When Yellen signals that higher interest rates- and consequently slower growth-are imminent, companies respond by cutting investment spending. The result is a self-defeating feedback loop." यावेळी व्याजाचे दर न वाढवायला ब्रिटनची युरोपिअन युनियनमधून एक्झिट हे कारण दिले गेले आहे. पण तसे व्हायची शक्यता गेल्या काही महिन्यांपासून चालू आहेच. आणि या विषयावर जर अनिश्चितता असेल तर मे महिन्यात (आणि आताही) 'एखाद वेळेस दर वाढू शकतील किंवा वाढणारही नाहीत' असे बोलायचे प्रयोजन कळत नाही.

ब्रेक्‍झिट निर्णय काय लागेल अन आपल्यावर काय परिणाम होईल याकडे लक्ष्य लागले आहे, त्यामुळे धागा वर काढत आहे. उद्या ब्रिटीश लोक सहज बाहेर पडतील असं वाटत नाही...बघूया.

In reply to by खेडूत

गेले बाहेर हो.. ब्रेक्झिट इट इज.. खुश व्हावे की दु:खी व्हावे हे सांगता येत नाहीय. याच्या सविस्तर परिणांमांविषयी सविस्तर धागा काढावा असं वाटतंय. इंटरेस्टिंग आहे हे.

ब्रेक्झिट म्हणजे काय? त्याचे जगाच्या/युरोपच्या/भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील? हे समजावणारा एखादा धागा काढावा, अशी मिल्टन/ट्रुमन/बोका-ए-आझम/इतर जाणकारांना नम्र विनंती!

In reply to by तुषार काळभोर

@ पैलवान नक्की असे का व्हायला पाहिजे होते हे समजुन घेण्यासाठी खालील चित्रपट नक्की पहा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सोने का पानी चढाके पिया, हुइ गोरी जवानी... रेशमसे मेरे बदन कि पिया, सारी दुनिया दिवानी ! ;) :- Badlapur

टिंग टाँग... Deutsche Bank to shut 188 German branches, cut 3,000 staff Bafin fines Deutsche Bank for anti-money laundering flaws: source ब्रिटिश लोक शेवटी बाहेर पडलेच... आता नेक्स्ट कोण ? फ्रान्स ? इटली ? ;) या घटनेचे पडसाद येत्या काळात अजुन स्पष्ट स्वरुपात पहाता येतील आणि अनुभवता देखील येतील. या सार्वमतात ब्रिटन विभागला गेला आहे हे स्पष्ट कळुन आले. Scotland :- 62.0% London :- 59.9% Northern Ireland :- 55.7% या भागातुन युरोपियन युनियन मध्येच रहावे असे मत वरील प्रमाणात दिसले. Scotland या पुढे चर्चेत राहिल अशी स्थिती दिसुन येत आहे. संदर्भ :- EU referendum results and maps: Full breakdown and find out how your area voted Brexit: Scotland to take the high road? वर्तमानपत्रांनी ही घटना कशी दाखवली ते सचित्र इथे पहावयास मिळेल :- How newspapers covered Brexit – in pictures या घटनेमुळे जेनेट येलन यांना आता शोअप करायला नविन कारण मिळाले... ;) त्यांच्या सेमीअ‍ॅन्युअल मिटिंग्स चे २ व्हिडियो इथे देत आहे, ते ऐकण्या सारखे आहेतः- जाता जाता :- पुणेकर मंडळी हुशार आहेत. मागच्या वर्षी जेव्हा सोने २४-२५ हजाराच्या आसपास होते तेव्हा सोने खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी अशा आशयाची बातमी वाचल्याचे स्मरते ! गोल्ड रश इज ऑन नाउ... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सोने का पानी चढाके पिया, हुइ गोरी जवानी... रेशमसे मेरे बदन कि पिया, सारी दुनिया दिवानी ! ;) :- Badlapur

मदनबाण यांचा विजय असो. एक बदल... मिपाकरांचा / वाचकांचा विजय असो... :) मागच्या धाग्यात अंदाज वर्तवल्या प्रमाणे फ्रान्स आणि जर्मनीत घडलेल्या इस्लामी दहशदवादी हल्ले हे आता आपल्या नजरे समोर आहेत... येणार काळ युरोपसाठी अत्यंत कठीण दिसत आहे. टिंगटाँग :- German economy on a knife edge: Struggling Deutsche Bank closes nearly 200 branches Deutsche Bank Outlook Revised To Negative AsOperating Conditions May Challenge Strategy Execution; Ratings Affirmed :- S&P Global Ratings Deutsche Bank Collapse May Trigger 'Global Financial Catastrophe' या बँकेवर आणि याच्या शेअर प्राईजवर आता अनेक जणांचे लक्ष लागले असुन शेअर प्राईज सिंगल डिजिटवर येण्यावर बिलियन्स लागले आहेत. ज्या प्रमाणे ब्रिक एक्झीट घटनेकडे अनेकांचे लक्ष होते,त्याच प्रमाणे ते इटलीत घडणार्‍या बँकिंग क्रायसिसकडे सुद्धा लागले आहे,त्या बद्धल काही दुवे वरच्या प्रतिसादात दिले आहेत. मॉन्टे दा पाशी ही इटलीतली आणि जगातली सगळ्यात जुनी बँक { स्थापना :- १४७२ } अडचणीत आहे अश्या काहीशा बातम्या आणि माहिती मध्यंतरी वाचनात आली होती.सध्या इटली फोकस मध्ये आहे एव्हढ मात्र नक्की. Why Italy's banking crisis will shake the eurozone to its core If You Thought Brexit Was Bad Wait Until The Italian Banks All Go Bust :- Italy’s bail-in conundrum Why Italy’s bank crisis could be a ‘ticking time bomb’ Why This Could Be the End of Europe as We Know It Why Italy’s banks could ignite a eurozone crisis साउथ चायना सी बद्धल मागच्या धाग्यात उल्लेख केला होता आणि त्या बद्धल घडामोडी वेगाने घडतील असा अंदाज होता त्या प्रमाणेच घडलेल्या दिसल्या, आता प्रश्न आहे की अमेरिकेच्या अंगात चीन बरोबर खरचं युद्ध करण्याची धमक आहे का ? चीन ने केलेले / चालु असलेले आणि होणारे अनेक ड्रिल्स पाहता ते सज्ज आहेत असे कळुन येते. जाता जाता :- अमेरिकेतील निवडणुक आणि इकॉनॉमिक कोलॅप्स या संबंधी अधिक घटनाक्रम आता पहावयास हवा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bass Rani - Mumbai Dance feat. Julius Sylvest :- Nucleya

In reply to by सिन्नरकर

अमेरिकेने (१९३३ साली सुरुवात करून) १९७१ साली सोने व डॉलर हे चलन यांच्यातला संबंध (गोल्ड स्टँडर्ड) पूर्णपणे संपवला तेव्हापासूनच फिक्शनल इकॉनॉमी सुरु झाली आहे... आता फक्त, नोटांच्या छपाईच्या अतिरेकामुळे प्रचंड ताण आला असून ती कधीही कोसळेल, अशी अवस्था आली आहे !

टिंगटाँग... Deutsche Bank profit tumbles 98% Deutsche Bank profits plummet 98%, CEO warns of further cuts Deutsche Bank scrapes through European banks stress test Europe’s Banking Crisis Leaves EU Scrambling to Avoid Repeat of 2008 Crash Deutsche Bank: problems of scale मॉन्टे दा पाशी ही इटलीतली आणि जगातली सगळ्यात जुनी बँक { स्थापना :- १४७२ } अडचणीत आहे अश्या काहीशा बातम्या आणि माहिती मध्यंतरी वाचनात आली होती.सध्या इटली फोकस मध्ये आहे एव्हढ मात्र नक्की. ECB approves rescue plan for Italian bank Monte dei Paschi: sources Italian bank Monte dei Paschi approves privately-backed rescue plan World's oldest bank fares worst in EU stress test Italy’s Monte Paschi Flunks Stress Test, Plans to Raise Capital Rescue package in place as Europe's oldest bank revealed weakest in stress tests 2 anecdotes perfectly illustrate why Italy's banking system is such an epic mess Italy is imploding in slow-motion - and it could signal the end of the euro Vicenza: dark heart of Italy's banking crisis where locals have lost millions The First Italian Bank Bailout Package Is Being Prepared Italy Banking Collapse, Does Trudeau Still Think UK Should Have Voted No to Brexit Or Is He an Idiot? Italian bank raises billions after poor show in stress tests EBA stress test :- AIB and Bank of Ireland least prepared in Europe for another crash EU bank stress tests: vulnerability of Barclays and RBS under scrutiny No clean bill of health for Irish banks in stress tests AIB and Bank of Ireland among Europe’s worst performing banks in latest stress tests How To Look At EU Bank Stress Tests Results मध्यंतरी एक्स फेड चेअरमन Ben Bernanke यांनी जपानला भेट दिली होती { सोमवार ११ जुलै २०१६ },आणि अनेकांना हॅलिकॉप्टर मनी ची चाहुल लागली होती... आणि त्यानंतर... Helicopter Money: Why Some Economists Are Talking About Dropping Money From the Sky Helicopter money talk takes flight as Bank of Japan runs out of runway

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- याद आ रहा है तेरा प्यार...कहा हम कहा तुम, हुए तुम कहा गुम... :- Disco Dancer

In reply to by मारवा

लिंकींग रोड वर फिरल्यासारख वाटलं हा.हा.हा... खरंय. पण निवांतपणे लिखाणासाठी वेळ मिळत नाही, तसेच बराच वेळ जालावर माहिती शोधण्यात खर्च होतो.शिवाय दिलेल्या लिंक्स वाचकांनी वाचण्यास / उघडुन पाहण्याचे कष्ट घेण्यास हरकत नसावी ! निदान दिसणार्‍या लिंक्स चे विवरण पाहुन / वाचुन सुद्धा बरीच माहिती कळेल, निदान मिपाकर तितके अडाणी नाहीत याची खात्री आहे ! ;) बर्‍याचदा प्रतिसाद देताना अजुन जमा केलेली माहिती सुद्धा ध्यायची राहुन राहते... उदा.IMF chief Christine Lagarde यांच्या विरुद्ध उभी असलेली केस, बहुधा मागच्या धाग्यात त्याचा उल्लेख केला होता, त्याचा अपडेट वरच्या प्रतिसादात ध्यायचा राहुन गेला होता. {आता तो देतो.} IMF chief Lagarde to stand trial in €400mn payout case - court अवांतर माहिती :- 1,000s Turkish forces surround NATO’s Incirlik air base for ‘inspection’ amid rumors of coup attempt Vanished guns: Firearms stolen from elite US Army base in Germany Russia sends military planes, biohazard troops to fight Siberian anthrax outbreak 'DANGEROUS INFECTION' Russian biological warfare troops rushed to Arctic after outbreak of lethal anthrax hospitalises 40 जाता जाता :- आपल्याला माहित असलेली माहिती आपण जरुर इथे शेअर करावीत. लिंक दिल्या तरी चालेल. :) इथे दिलेल्या माहिती बद्धल विस्तॄत लिखाण करणे जरी मला शक्य नसले, तरी दिलेली माहिती मिपाकरां पर्यंत आणि वाचकां पर्यंत पोहचावी हीच मूळ इच्छा आहे. आपण केलेल्या सुचने बद्धल मनःपूर्वक आभारी आहे,क्षमा प्रार्थी सुद्धा आहे कारण तेव्हढा वेळ हाताशी नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- याद आ रहा है तेरा प्यार...कहा हम कहा तुम, हुए तुम कहा गुम... :- Disco Dancer

In reply to by मदनबाण

नमस्कार, मी आपण दिलेल्या लिंक रेफर करत असतो आणि बरीचशी चांगली माहिती मिळते. आपले मनापासून धन्यवाद. मी You Tube वर बरेच follow करतो .... जसे .... पिटर लिंच हे महाशय तर US बद्धल फार Negative आहेत आणि ते कधीही कॉल्याप्स होतील असे मानतात. काहीच्या मते, US Election च्या वेळेल फेड रेट वाढवेल आणि तिथूनच एका इकॉनॉमिक्स कॉल्याप्स ला सुरुवात होईल ... असो ... पण आता हे वेळच सांगेल... काही घटनांचा आपल्या अर्थव्यवस्तेवर काय परिणाम होणार हि माहिती खास कुठे मिळत नाहीये... तरी अश्या पण लिंक (किवा तुमचे मत ) कळाल्यास मदत होईल. धन्यवाद (टीप - मराठी लिहिणे खास जमत नाहीये तरी थोडा थोडा प्रयत्न चालू आहे.)

काल बँक ऑफ इंग्लंडने (भारतातील रिझर्व्ह बँकेला समकक्ष) आपली मोनेटरी पॉलिसी जाहिर केली. त्याअंतर्गत पुढील निर्णय घेतले गेले: १. व्याजाचे दर ०.२५% ने कमी केले गेले आहेत. पूर्वी ०.५०% असलेला व्याजाचा दर आता ०.२५% झाला आहे. २. क्वांटिटेटिव्ह इजिंग अंतर्गत आणखी ६० बिलिअन पाऊंडचे सरकारी बाँड खरेदी करणे आणि १० बिलिअन पाऊंडचे खाजगी कंपन्यांचे बाँड खरेदी करणे. ३. Term Funding Scheme नावाच्या नव्या सुविधेअंतर्गत बँकांना ०.२५% दराने कर्ज उपलब्ध करून देणे. बँक ऑफ इंग्लंड अर्थव्यवस्थेत नक्की काय चालू आहे आणि व्याजाच्या दरांविषयी जे निर्णय घेतले आहेत त्याविषयी inflation report दर महिन्याला सादर करते. ऑगस्ट महिन्याचा inflation report इथे बघता येईल. हा रिपोर्ट एकूण ६८ पानी आहे आणि तो वाचायला सुरवात केली आहे. तो वाचून पूर्ण झाल्यावर त्यात आणखी काही सापडले तर लिहितोच.पण काल घेतलेल्या निर्णयांविषयीची कारणमिमांसा काय असावी याचा विचार करून हा प्रतिसाद लिहित आहे. बँक ऑफ इंग्लंडला इन्फ्लेशन टार्गेटिंग अंतर्गत महागाईचा दर २% ते ६% या दरम्यान राखणे बंधनकारक असते. इथे दिलेल्या माहितीवरून समजते की जानेवारी २०१४ पासून इंग्लंडमधील महागाईचा दर २% पेक्षा कमी आहे. २०१५ मध्ये काही काळ तो ऋणही होता. महागाईचा दर ऋण असणे (डिफ्लेशन) हे इन्फ्लेशनपेक्षा अधिक वाईट असते. तेव्हा महागाईचा दर २% पर्यंत आणण्यासाठी काही पावले उचलणे गरजेचे होते. त्या अंतर्गत व्याजाच्या दरात ०.२५% ने कपात करण्यात आली आहे. या दरात कपात झाली तरी तो फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवायला मर्यादा येतील. याचे कारण मुळात बँकांमधील ठेवींवर व्याजाचे दर बरेच कमी आहेत (०% हून थोडेसेच जास्त). त्यामुळे त्यात आणखी कपात करता येणे शक्य नाही.त्यामुळे बँकांची Cost of funds अजून कमी करता येणे शक्य नाही--त्यामुळे या कमी झालेल्या व्याजाच्या दरांचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवायला मर्यादा येतील.त्यामुळे बँकांची Cost of funds कमी करण्याच्या उद्देशाने Term Funding Scheme ही नवी सुविधा आणण्यात आली आहे. बहुदा अशा नवीन सुविधांतर्गत दिलेल्या रकमेवर व्याज अधिक आकारले जाते.पण बँक ऑफ इंग्लंड या रकमेवर ०.२५% इतकेच व्याज आकारणार आहे. व्याजाचे दर कमी करण्याच्या निर्णयानंतर ब्रिटिश पाऊंड आणखी खाली आला आहे. नोव्हेंबर २०१५ च्या तुलनेत १५% ने तर जून २०१६ पासून ९% ने पाऊंड खाली आला आहे.पाऊंड खाली आला की आयात केलेल्या गोष्टींच्या पाऊंडमधील किंमती वाढून महागाईचा दर वाढावा ही अपेक्षा आहे. क्वांटिटेटिव्ह इजिंग अंतर्गत दीर्घ मुदतीचे सरकारी बाँड खरेदी केले जातच आहेत.याचा उद्देश हा की यातून दीर्घ मुदतीच्या बाँडच्या किंमती वाढाव्यात, त्यावरील परतावा कमी व्हावा आणि बाँडवरील परतावा कमी झाला की अधिक जोखमीच्या इन्व्हेस्टमेन्ट व्हेईकल्समध्ये (शेअर इत्यादी) गुंतवणुक केली जाऊन कंपन्यांना बाजारातून अधिक पैसा उभा करता येईल आणि त्यातून कंपन्यांची इन्व्हेस्टमेन्ट वाढेल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. यावेळी बँक ऑफ इंग्लंडने खाजगी कंपन्यांचेही बाँड खरेदी करायचा निर्णय घेतला आहे. त्यामागचे उद्दिष्ट हे की कंपन्यांची डेट मार्केटमधील Cost of funds सुध्दा कमी व्हावी. एकूणच काय तर येनकेन प्रकारेण अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी वाढवायचा प्रयत्न चालू आहे. इतके सगळे करूनही inflation report मध्ये बँक ऑफ इंग्लंड म्हणत आहे की अर्थव्यवस्थेत तेजी येणे कठिण आहे!!

वर्ष संपायला आता फक्त ४ महिने बाकी आहेत... जगा मध्ये प्रचंड अस्थिरता { आर्थिक / स्थलांतरामुळे / सतत सुरु असलेल्या हल्ल्यांमुळे / युद्धामुळे } अनुभवली जात आहे. वर्षाच्या सुरुवाती पासुन याची जाणिव सगळ्यांना पूर्णपणे झाली होती... तेलाचे दर, चीन मधला स्टॉक मार्केट क्रॅश ते अगदी जर्मनी, फ्रान्स इथल्या घटांनापर्यंन अनेक गोष्टी या काळात झाल्या. येणार्‍या काळात काही महत्वाचे घटनाक्रम अर्थातच घडणार आहेत, त्यापैकी २ खाली देतो, १} अमेरिकेतल्या निडणुका २} इटली मधले रेफरेंडम अमेरिकेच्या निवडणुकीकडे सार्‍या जगाचे लक्ष लागलेले आहे हे काही नव्याने सांगण्याची बाब नाही, तरी सुद्धा "लिक्स" मुळे आता अजुन वेगळे सुद्धा वळण लागले आहे. यापुढील काळात अजुन काही लिक्स होतील याच्या शक्यता नाकारता येत नाहीत. हिलरी आणि ट्रम्प यांच्या पैकी कोण आले / येतील / त्यामुळे काय शक्यता आहेत ? त्याविषयी जालावर काही माहिती / मते वाचली / शोधली ती खाली देतो... १} डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर येतील आणि त्यानंर मार्केट कोसळेल व त्याचा दोष ट्रम्प देण्यात येतील. २} हिलरी जिंकेल आणि मोठ्या युद्धास सुरुवात करेल. ३} ट्रेम्प जिंकुनही ओबामा ऑफिस सोडणार नाही, अमेरिकेत मार्शल लॉ लागेल. ४} युक्रेन आणी साउथ चायना सी येथील घटना क्रम { चीनसाठी योग्य वेळ ठरेल कारण साउथ चायना सी पेक्षा मिडियाचे जास्त लक्ष अमेरिकेतील निवडुक कव्हर करण्यात जाईल.} हल्लीच इस्ट चायना मध्ये देखील ड्रील झाले त्याचा व्हिडियो :- आता इटली बद्धल... इटली फायनॅशिअल क्रायसिस मधुन जातोच आहे त्याच बरोबर पोलिटिकल क्रायसिस मधुन सुद्धा जात आहे आणि बहुतेक ऑक्टोबरच्या आणि डिसेंबरच्या मध्ये रेफरेंडम होइल. त्यात इटलीचे पंतप्रधान Prime Minister Matteo Renzi हरल्यास ते पद सोडतील, आणि नंतर populist Five Star Movement येतील ज्यांना युरो रेफरेंडम हवा आहे. ---------------------- मला Nigel Farage यांचे युरोपियन युनियन मध्ये केलेले भाषण आवडले होते, त्या भाषणाचा व्हिडियो खाली देत आहे. बाकी, मध्यंतरी ९/११ आणि २८ पेजेस बद्धल सुद्धा बातम्या आल्या... त्याबद्धल वाचताना मला प्रामुख्याने नाव कळले ते Prince Bandar bin Sultan यांचे. यांच्या बद्धल अधिक इकडे :- Saudi Government Links to 9/11 Shouldn’t Stay Secret :- https://28pages.org/ Those Secret 28 Pages on 9/11: Read This Before You Read Them Russ Baker on the Saudi-9/11 Coverup :- http://whowhatwhy.org ही २८ पाने डिक्लासिफाइड केल्यास सौदी अरेबियाने $750 Billion Of US Assets सेल ऑफ करण्यात येइल अशी धमकी दिली होती,पण अजुन तरी तसे त्यांनी केले नाहीये,पण अमेरिकेने याच सौदी अरेबिया बरोबर $1.15 billion ची आर्म डिल केली आहेत ज्यात १३० टँक्सचा सुद्धा समावेष आहे, आहे की नाही गंमत ? जाता जाता :- आपल्या इथला घटनाक्रम :- China to closely watch Modi’s Vietnam stop पाकड्यांकडुन परत त्रास :- अर्णब त्याचे काम करत राहतोय...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तेनु काला चश्मा जचदा ए...जचदा ए गोरे मुखडे ते.... ;) :- Baar Baar Dekho

लिंक रोडचा डिटेल रोड केल्याबद्दल धन्यवाद

मदनबाण - Thu, 18/06/2015 - 14:30 रोलर कोस्टर इज ऑलरेडी स्टारटेड इन युरोप... मागच्या आठवड्यात Deutsche Bank च्या Co-Chief Executives नी रिझाइन केले आहे.... सो विल इट बी नेक्स्ट next Lehman? गेले वर्षभर मी या बँकेला ट्रॅक केले... टिंग टाँग टिंग टाँग बेल वाजवत राहिलो... शेवटी एकदाची ऑफिशिअल कबुली आलीच ! Deutsche Bank Poses Greatest Risk to Global Financial System हे आयएमएफ ने सांगितले होते. Deutsche Bank ADMITS it is preparing for market crash as fears over bail out grow मध्यभागी Deutsche Bank { निळ्या रंगात } आणि त्या बँकेचे कनेक्शन्स - P2 K लेहमन आणि Deutsche Bank यांचा तुलनात्मक आलेख :- P3 जाता जाता :- वरच्या प्रतिसादात लिक्सचा उल्लेख केला होता, George Soros यांच्या ऑरगनायझेशनचे अनेक डॉक्युमेंट्स लिक झाले आहेत. Soros hacked, thousands of Open Society Foundations files released online DC Leak Exposes Top Clinton Donor George Soros Manipulating Elections याच George Soros यांनी S&P 500 वर पुट लावला आहे, याचा अर्थ S&P 500 खाली जाईल असे त्यांचे गणित आहे. George Soros Is Betting on Gold and Against the U.S. Economy Billionaire Soros' namesake fund doubled down against the S&P 500 हे एकटेच नाहीत...Big name billionaires are turning bearish Billionaire investors turn bearish as US stocks hit record highs

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Cisco to lay off about 14,000 employees: tech news site CRN