Skip to main content

दु:खः कारण आणि निवारण उपाय - भारतीय तत्वज्ञानाच्या नजरेतून

Published on मंगळवार, 21/06/2016
जनीं सर्वसूखी असा कोण आहे। विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥ मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले। तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥ - मनाचे श्लोक आवडीनें भावें हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१॥ नको खेद करुं कोणत्या गोष्टीचा । पति लक्ष्मीचा जाणतसे ॥२॥ सकळ जीवांचा करितो सांभाळ । तुज मोकलील ऐसे नाही ॥३॥ जैसी स्थिती आहे तैशापरी राहे । कौतुक तूं पाहे संचिताचें ॥४॥ एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा । हरिकृपें त्याचा नाश झाला ॥५॥ संत एकनाथ महाराज हरिपाठ - अभंग २३ वा

वाचन संख्या 5491
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

देहाभिमान कर्माभिमान | जात्याभिमान कुळाभिमान | ज्ञानाभिमान मोक्षाभिमान | या नांव भ्रम || मी तूं हा भ्रम | उपासनाहि भ्रम | ईश्वरभाव हाहिं भ्रम | निश्चयेंशी || भ्रमरूप विश्व स्वभावें | तेथें काय म्हणोन सांगावें | निर्गुण ब्रह्मावेगळें अवघें | भ्रमरूप ||

आदरणीय गावडे सर, स.न.वि.वि. आजकाल तुमची जरा काळजीच वाटायला लागली आहे , कसे आहात आपण , बरे आहात ना ? बाकी तुमच्या ह्या अभंगांवरुन आम्हाला तुकोबांचा अभंग आठवला :-
काळ सारावा चिंतनें । एकांतवासीं गंगास्नानें । देवाचें पूजन । प्रदक्षणा तुळसीच्या ॥1॥ युक्त आहार व्यवहार । नेम इंद्रियांचा सार । नसावी वासर । निद्रा बहु भाषण ॥ध्रु.॥ परमार्थ महाधन । जोडी देवाचे चरण । व्हावया जतन । हे उपाय लाभाचे ॥2॥ देह समर्पिजे देवा । भार कांहीं च न घ्यावा । होइल आघवा। तुका ह्मणे आनंद ॥3॥
ह्या पेक्षा सोप्प्या शब्दात आणी इतक्या प्रांजळपणे "दु:खः कारण आणि निवारण उपाय - भारतीय तत्वज्ञानाच्या नजरेतून " अन्य कोणी स्वानुभवातुन सांगितलेला माझ्या तरी पाहण्यात नाही. असो. येता का यंदाच्या आषाढी वारीला ? तुम्ही तंबोरा घ्या , मी टाळ कुटतो , प्रचेतस सरांना ढोलकी मृदुंग वाजवायला देवु . कळावे . लोभ असावा. आपला विनम्र सीझर मार्कस ऑरेलियस अ‍ॅन्टोनियस ऑगस्टस् Vi Veri Veniversum Vivus Vici

In reply to by प्रसाद गोडबोले

>> आजकाल तुमची जरा काळजीच वाटायला लागली आहे , कसे आहात आपण , बरे आहात ना ? =)) विकांताला "एका जनार्दनी अर्थात मनाचे आरोग्य" नावाचे पुस्तक विकत घेतले. मनाच्या आरोग्यविषयी त्यात काहीच नव्हते. निव्वळ साम्प्रदायिक पुस्तक. त्या पुस्तकात "एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा" या अभंगाचा संदर्भ सापडला.

तुमची एक खरड वाचली कुठेतरी" चांगले लेख कसे टाकावेत?" मार्गदर्शन करावे.त्या गुरुने फारच चांगले सोपे करून सांगितलेले आहे.प्रचिती आली. #पण एक सांगा - हे ,अभंग ,ओव्या,चरण,श्लोक पाठ आहेत का?कमाल आहे.

फार अपेक्षेने धागा उघडला होता! थोडी निराशाच पदरी पडली! :( असो, पुलेशु! Sandy

मला वाटलं दुःखाच्या कारणावर मोठा लेख असेल ? सकाळी सकाळी अपेक्षाभंग झाला. १) दुःख आहे. २) दुःखाला कारण आहे ३) दुःख दूर करता येतात ४) दुःख दूर करण्याचे उपाय. या बाबतीत गौतम बुद्धांचं तत्वज्ञान मला अधिक वास्तव आणि पटनारे वाटते. -दिलीप बिरुटे

सद्यपरिस्थितीबद्दल दु:ख करणे आणि आगामी अनिवार्य वाईट स्थितीची काळजी करणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपण कोणत्या विषयावर बोलत आहोत?

सगाजी, या आठ ओळीत दु:खाची कारणे आणि निवारण या बद्दल भारतीय तत्वज्ञान संपते असे तुम्हाला म्हणायचे नाही असे वाटते, बहुदा ही सुरुवात असावी. मुळात बरीचशी तत्वज्ञाने परोपकार या तत्वावर आधारित असतात, त्यामुळे कुणाला तरी काहीतरी दु:ख असणे ही दुस-या कुणाच्यातरी मोक्षप्राप्तीची पायरी असते. मला माहित असलेल्या पैकी ' सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया' आणि 'जो जे वांछिल तो ते लाहो' अशा एक दोन रचनाच सर्वांच्या सुखाचा विचार करतात, बाकी ' पीड परायी जाने रे,' या मार्गाने जाणारेच असतात.