Skip to main content

ब्रेड पॅटीस चाट

लेखक मानसी१ यांनी सोमवार, 20/06/2016 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रेड पॅटीस चाट साहीत्य : ब्रेड, हीरवी तीखट चटणी, गोड चटणी दही : साखर मीठ घालुन फेटुन घ्या. वरुन हीरवी मिर्ची व कडीपत्त्याची फोडणी द्या. पॅटीस साठी : ४ बटाटे उकडुन २ कणस ऊकडुन आलं लसुण पेस्ट २ चमचे कोथींबीर बारीक चिरुन तीखट, मीठ , चाट मसाला : स्वादानुसार कॄती: कणसं मिक्सर वर बारीक करुन घ्या. वरील सर्व साहीत्य एकत्र करुन पॅटीस मसाला तयार करुन घ्या . १ ब्रेड स्लायीस घ्या, त्यावर तयार पॅटीस मसाला लावा. तसे सगळे ब्रेड तयार करुन घ्या . तवा गरम करुन दोन्ही बाजुने खरपुस भाजा. लागेल तसे तेल सोडा. चाट: कुरकुरीत केलेला ब्रेड पॅटीस घ्या. त्यावर २ चमचे दही घाला. १-१ चमचा चटणी टाका. सर्वात वरती बारीक शेव घालुन खायला द्या . टीप: हा पदार्थ कुरकुरीतच छान लागतो. शक्यतो खुप दही कींवा चटण्या घालुन नये. ब्रेड भीजुन लगदा होयिल

वाचने 11361
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

अगदी छान रेसिपी आहे. अश्या पाकृ आल्या की उन्हाळा सुरु झाल्यासारखे वाटाते..........आणि झालाही आहे.

मस्त लागत असेल