✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पाव भाजीची गोष्ट

व
विवेकपटाईत यांनी
Sun, 06/19/2016 - 11:46  ·  लेख
लेख
गेल्या महिन्यातील गोष्ट चिंकी आणि तिची बहिण दिल्लीला येणार होती. गेल्या वेळी तिची दिल्लीची पाव भाजी खाण्याची इच्छा राहून गेली होती. तिचा फोन आला होता, काका या वेळी दिल्लीची पावभाजी टेस्ट करायची आहे. रविवारी सकाळच्या गाडीने चिंकी येणार होती. घरी पोहचता पोहचता तिला किमान ८ तरी वाजणार होते. घरा शेजारी शनी बाजार लागतो. सौ.ने हुकुम दिला पावभाजी साठी लागणार्या भाज्या घेऊन या. बाजारात भाजी घेताना, चिंकीला कसे मूर्ख बनवायचे हा विचार करू लागलो. मनातील खोडकर शैतान मुलगा जागा झाला. तिला न आवडणार्या भाज्या वापरून अश्यारितीने भाजी बनविली पाहिजे कि चिंकीला कळले हि नाही पाहिजे. वयाने मोठा झालो असलो तरी एखाद्या शैतान मुलासारखे दुसर्यांची विशेष करून बालगोपाळांची फिरकी घ्यायला अजूनही आनंद मिळतो. सौ.ला आमची कल्पना काही विशेष आवडली नाही. पण तिने विरोध हि केला नाही फक्त एवढेच म्हंटले, मी काही यात मदत करणार नाही. तुम्हाला वाटेल ते करा. रविवारी सकाळी चहा पिऊन, जवळपास ६ वाजता भाज्या चिरायला घेतल्या. घरी बाजी चिरण्यासाठी लाकडाचा ट्रे आहे. चाकूने बारीक बारीक भाज्या चिरायचे ठरविले. सर्व प्रथम ३-४ बटाटे (२५०ग्राम) बारीक चिरले, नंतर लाल भोपळा आणि दुधी भोपळा (प्रत्येकी २५० ग्राम) वरचे जाड साल काढून बारीक चिरला. एक वांगे (वरचे साल काढून टाकले) बारीक चिरले. वांग्यामुळे भाजीला एक वेगळा तेज स्वाद येतो. एक फुलगोबी (फ्लावर- ३०० ग्रामचे असेल) बारीक चिरले. मटार २५०ग्राम (एक वाटी) घेतला. दोन ढोबळी मिरच्या बारीक चिरून टाकल्या. या शिवाय लोबियाच्या हिरव्या शेंगा (मराठीत काय म्हणतात माहित नाही- तश्या कुठल्याही शेंगा चालतील) बारीक चिरून टाकल्या. ५ लिटरचे कुकर भाज्यांनी भरून गेल्यावर भाज्या कापणे बंद केले. भाज्या चिरायला १ तास लागला. भाजी आता दीड गिलास पाणी टाकून कुकर गॅस वर ठेवले. एक पूर्ण लसूण,८-१० हिरव्या मिरच्या आणि १ इंच अदरक यांची पेस्ट तैयार करून घेतली. अर्धा किलो टमाटर (आंबट वाले नको) आणि अर्धा किलो कांदे बारीक चिरले. या पैकी काही फोडणी साठी आणि काही नंतर सर्व करण्यासाठी. एक जुडी कोथिंबीरआणि तीन लिम्बांचे चार-चार तुकडे करून ठेवले. दोन शिट्या झाल्यावर कुकर गॅस वरून उतरवून घेतले. तो पर्यंत चिंकीचे हि घरात पदार्पण झाले होते. काका कशी भाजी बनवितात आहे,हे पाहण्यासाठी स्वैपाकघरात आली. त्या वेळी मी पनीर (२५० ग्राम) बारीक चिरीत होतो. तिला पाहताच मी गुगली फेकली, म्हणालो चिंता करून नको तुझ्या आवडीच्याच भाज्या आहेत, यात फ्लावर, बटाटे, बिन्स आणि पनीर आहे. शिवाय माझ्या सारखा अडाणी तुझ्या सारख्या डॉक्टरीण बाईला मूर्ख बनवू शकतो का? काका तू किनई,.... म्हणत ती बाहेर पडली. तिने कुकर उघडून पाहण्याची जुर्रत केली नाही. हायसे वाटले. आता वेळ घालविण्यात अर्थ नव्हता. घरात एक मोठी कढई आहे. ती गॅस वर ठेवली. २-३ डाव तेल टाकले. एक चमचा मोहरी टाकली. मोहरी तडतडलल्या वर अदरक, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकली. नंतर कांदे घातले. कांदे थोडे ब्राऊन झाल्यावर, टमाटर टाकले. टमाटरला तेल सुटे पर्यंत ४-५ मिनिटे लागतातच. तो पर्यंत वाट पहावीच लागते. घाई केल्यास टमाटर व्यवस्थित तळल्या जात नाही. अपेक्षित स्वाद हि मिळत नाही. कुकर उघडून, एका पळीने भाजी ढळवून काढली. टमाटरला तेल सुटू लागल्यावर, १ मोठा चमचा, हळद, तिखट आणि गरम मसाला आणि २ चमचे धने पूड त्यात घातली. नंतर भाजी घातली. आपल्याला भाजी जेवढी पातळ पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकू शकतात. मला थोडी घट्ट भाजी आवडते म्हणून जास्त पाणी घातले नाही. नंतर बारीक चिरलेले पनीर त्यात घातले. एक उकळी आल्यावर तीन चमचे MDH पावभाजी मसाला आणि चवीनुसार मीठ त्यात घातले. २-३ मिनिटानंतर गॅस बंद केला. कुठलाही पदार्थ झाल्यावर चिरंजीवाला स्वाद पाहण्यासाठी बोलवतोच. त्याची पावती मिळाली म्हणजे पदार्थ चांगला झाला आहे, हे समजावे. त्यांनी टेस्ट करून पावती दिली. मी स्वैपाक घरातून बाहेर आलो. घामाघूम झाल्यामुळे सरळ स्नान घरात जाऊन आंघोळ केली. तो पर्यंत सौ. ने स्वैपाकघराचा ताबा घेतला होता. घरात काढलेल्या लोण्यात पाव परतून पावभाजी सर्व केली. पावभाजी चिंकीला पाव भाजी भारी आवडली. तरी हि तिने म्हंटले, मला माहित आहे काका, तुम्ही निश्चित मला न आवडणार्या भाज्या यात घातल्या असतील. आम्ही सर्व जोरात हसलो...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
पाकक्रिया
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
9570 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

घाई घाईत कापी पेस्ट करताना

विवेकपटाईत
Sun, 06/19/2016 - 11:48 नवीन
घाई घाईत कापी पेस्ट करताना गडबड झाली.
  • Log in or register to post comments

छान लेख! पटाईतकाकांचे

आदूबाळ
Sun, 06/19/2016 - 12:15 नवीन
छान लेख! पटाईतकाकांचे स्वयंपाकाचे प्रयोग वाचायला नेहेमीच आवडतात. ते साहित्य, कृती वगैरेचं कोरडं लेजरबुक ना मांडता तपशीलवार रसाळ वर्णन करतात.
  • Log in or register to post comments

मस्त पावभाजी.

एस
Sun, 06/19/2016 - 12:48 नवीन
मस्त पावभाजी.
  • Log in or register to post comments

पावभाजी म्हणजे कांदे बटाटे

कंजूस
Sun, 06/19/2016 - 14:09 नवीन
पावभाजी म्हणजे कांदे बटाटे टमाट्याचं गरम मसाल्यातलं भरपूर बटर टाकलेलं फदफदं असतंत्यात ता।तुम्ही टाकलेले भोपळा वांगी कळली आणि नातीने बोट लावलं नाहीतर पाच लिटर्सचे काय पराठे करावे लागतील.
  • Log in or register to post comments

पाव भाजीचा खरा स्वाद वांगे,

विवेकपटाईत
Sun, 06/19/2016 - 16:08 नवीन
पाव भाजीचा खरा स्वाद वांगे, भोपळ्यात असतो बटाट्यात नाही. बाकी शिजल्या नंतर ५ लिटर भाजी राहत नाही. शिवाय ७-८ दिल्लीकर खाणारे असतील तर एवढी भाजी सुद्धा कमी पडू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

वांगी भोपळा घातलेल्या भाजीला

कंजूस
Mon, 06/20/2016 - 05:30 नवीन
वांगी भोपळा घातलेल्या भाजीला फारतर उंधियो म्हणता येईल.असली पावभाजी मुंबईकडे कोणी खाणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

=))

असंका
Mon, 06/20/2016 - 08:56 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

+ १

विअर्ड विक्स
Mon, 06/20/2016 - 15:01 नवीन
+ १ मुंबईकरांना पावभाजी हि लालच दिसली पाहिजे …. फोटो पाहून भरीत वाटले… क्षमस्व… अवांतर - दिल्ली , गुरगाव साईडला पावभाजीचे कौतुक नाही. खायचीच झाली तर हल्दीराम मध्ये चांगली मिळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

काय झकास वर्णन केलंय.केवढ्या

अजया
Sun, 06/19/2016 - 14:27 नवीन
काय झकास वर्णन केलंय.केवढ्या भाज्या चिरल्यात .मजा आहे काकुंची!
  • Log in or register to post comments

नाव ठीक केल्या बाबत

विवेकपटाईत
Sun, 06/19/2016 - 16:06 नवीन
नाव ठीक केल्या बाबत संपादकांना धन्यवाद. बाकी आजकालच्या पोरांना १०-२५ वर्षे फक्त स्वाद कळतो. त्याना मूर्ख बनविणे सौपी असते.
  • Log in or register to post comments

खरं हाय

खालीमुंडी पाताळधुंडी
Sun, 06/19/2016 - 16:10 नवीन
खरं हाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

तुमच्या सौ भाग्यवान आहेत,

हेमंत लाटकर
Sun, 06/19/2016 - 16:35 नवीन
तुमच्या सौ भाग्यवान आहेत, स्वयंपाकात मदत करणारा नवरा भेटला.
  • Log in or register to post comments

मस्त पावभाजी!वर्णन आवडले.

इशा१२३
Sun, 06/19/2016 - 20:02 नवीन
मस्त पावभाजी!वर्णन आवडले.
  • Log in or register to post comments

मस्त पावभाजी!वर्णन आवडले.

इशा१२३
Sun, 06/19/2016 - 20:02 नवीन
मस्त पावभाजी!वर्णन आवडले.
  • Log in or register to post comments

मस्त पावभाजी!वर्णन आवडले.

इशा१२३
Sun, 06/19/2016 - 20:02 नवीन
मस्त पावभाजी!वर्णन आवडले.
  • Log in or register to post comments

मस्तं!

पद्मावति
Sun, 06/19/2016 - 21:28 नवीन
मस्तं!
  • Log in or register to post comments

चवळी आणि रगडा

रमेश आठवले
Sun, 06/19/2016 - 21:41 नवीन
चवळी आणि रगडा लोबियाला मराठीत चवळी म्हणतात असे वाटते. ठेल्यावर मिळणारा रगडा प्याटीस हा पदार्थ आवडतो पण रगड्यात काय काय असते हे विचारण्याचे धाडस कधी केले नाही.
  • Log in or register to post comments

हो, लोबिया म्हणजे चवळी.

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 06/20/2016 - 06:54 नवीन
हो, लोबिया म्हणजे चवळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

मग प़ंजाबीत एखादा

नाखु
Mon, 06/20/2016 - 10:07 नवीन
वाकप्रचार आहे का "सोणी/कुडी तू लोबिया शेंगेंसारखी आहेस म्हणून" शंकायनी नाखु. अति अवांतर : आपण पाकघरातही पटाईत आहात हे चांगले आहे संसारी नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

पाभाची गोष्ट आवडली.

रेवती
Mon, 06/20/2016 - 05:24 नवीन
पाभाची गोष्ट आवडली.
  • Log in or register to post comments

झकास!

पांथस्थ
Mon, 06/20/2016 - 09:38 नवीन
मस्त पाककृती! बादवे, लोबियाच्या शेंगा म्हणजे मराठी मधे चवळीच्या शेंगा!
  • Log in or register to post comments

मस्तय हं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/20/2016 - 09:51 नवीन
लैच भारी. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

लोबिया म्हणजे फरसबी सुद्धा

धनंजय माने
Mon, 06/20/2016 - 10:40 नवीन
लोबिया म्हणजे फरसबी सुद्धा असू शकते. तीच वर चित्रात दिसते. अमारा कूक लोबिया दी ब्जी अड़ी च्छी अनाता है जी! लेबी खाओ जी लेबी. (शब्दातलं पहिलं अक्षर आतल्या आत बोलणारे अंजाब्बी)
  • Log in or register to post comments

हे हे हे

चांदणे संदीप
Mon, 06/20/2016 - 12:31 नवीन
पटाईतकाका जोरात कारेक्रम!! Sandy
  • Log in or register to post comments

पाभा मस्तच.. ऑलटाईम फेवरेट

विशाखा राऊत
Mon, 06/20/2016 - 14:30 नवीन
पाभा मस्तच.. ऑलटाईम फेवरेट पण पाभात मोहरी, वांगी घालुन मिक्स वेज केलेय की :)
  • Log in or register to post comments

विचार केला नाही कधी, पण आता

सूड
Mon, 06/20/2016 - 15:16 नवीन
विचार केला नाही कधी, पण आता तुम्ही म्हणताय तर बरीच झाली असणार!!
  • Log in or register to post comments

आणा ते ताट इकडं!

रातराणी
Tue, 06/21/2016 - 12:02 नवीन
आणा ते ताट इकडं!
  • Log in or register to post comments

सर्वांना धन्यवाद. पाव

विवेकपटाईत
गुरुवार, 06/23/2016 - 19:26 नवीन
सर्वांना धन्यवाद. पाव भाजीच्या भाजीत काहीही टाका पण पनीर शिवाय चव येत नाही.
  • Log in or register to post comments

पावभाजीच्या नावाखाली खपवा दुसर्‍या भाज्या...

बंड्याभाय
Sun, 06/26/2016 - 18:19 नवीन
तुमच्या पावभाजी च्या पाककृतीला आक्षेप नाही पण खरा पावभाजी भक्त असल्याने राहवले नाही. अस्सल पावभजीत वांगे टाकत नाहीत (लाल भोपळा तर अती झाल) पनीर घालणे म्हणजे बाकी भजीवर आत्मविशवास नाही असे वाटते. पावभाजीची खरी चव ही फ्लवर+बटाटा+टोमॅटो+सिमला मिरची+हिरवे वाटणे यांच्या योग्य मिश्रणात मिळते. ठाण्या - मुंबईत बर्‍याच ठिकाणी चांगली पावभाजी मिळते, पुण्यातही काही ठिकाणी चांगली (कर्वे रस्त्यावरील शीतल ईत्यादी)मिळते. हॉटेलमधली पावभाजी पुरत आणि परवडत नाही म्हणून स्वतः शिकून घेतली आहे. लहानपणी अत्त्या, मावश्या इतर शिल्लक राहिलेल्या भाज्या खपवण्यासाठी एक मिश्र भाजी करून पावभाजी म्हणून खपवत असत त्याची आठवण झाली :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा