✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गरीब-श्रीमंत

द
दिनेश५७ यांनी
गुरुवार, 06/16/2016 - 11:25  ·  लेख
लेख
परवा मी रद्दी आणि काही जुनं सामान भंगारात देण्यासाठी काढलं, आणि बराच कचराही काढून टाकला. यात काही जुने कपडेही होते. भंगारात काही जुनी विजेची उपकरणे, काही भांडी, वगैरे होतं. आमच्याकडे नेहमी रद्दीसाठी येणाऱ्या भंगारवाल्याने ते सारं भंगार एका बॉक्समधे भरलं. त्यानं किती पैसे द्यावेत यावर मी कधीच घासाघीस करत नाही. तो बॉक्स उचलून तो निघाला आणि मला कचऱ्याची पिशवी आठवली. खाली जाताजाता ती कचऱ्याच्या डब्यात टाकशील का, असं मी त्यालाच विचारलं, आणि त्याने खांद्यावरचा बॉक्स खाली ठेवून कचऱ्याची पिशवी उघडली. आतले जुने कपडे पाहून त्याचे डोळे चमकत होते. साहेब, हे कपडे कचऱ्यात नका टाकू... मी घेऊन जातो, माझी पोरं वापरतील. मलाही कामाला येईल'... तो म्हणाला. 'हे कपडे तुम्ही वापरणार?' मी थोडासा खजिल होऊन त्याला विचारलं,आणि त्यानं अंगातला शर्ट वर उचलला. सुतळीनं कमरेभोवती गच्च आवळलेली, मापाशी पुरती विसंगत पँट त्यानं घातली होती. 'साहेब, माजी पोरं खुश होतील हे कपडे बघून!'... कचऱ्याच्या पिशवीतले कपडे काढून त्याच्या नीट घड्या घालत केविलवाणं हसत तो म्हणाला, आणि बॉक्स खांद्यावर घेऊन हातातली कचऱ्याची पिशवी सांभाळत तो जिना उतरू लागला. 'तासाभरानं पुन्हा चक्कर मार... असं मी नकळत सांगून टाकलं आणि पुन्हा कपाट उपसलं. काही शर्टपीस पिशव्यांमध्ये गुंडाळलेले सापडले. मग किचनमध्ये ओट्याखालचं कपाट उघडलं. काही भांडी मिळाली एक चांगला रॉकेल चा स्टोव्हही सापडला. थोड्या वेळाने तो परत आला, आणि मी त्या साऱ्या वस्तू त्याच्या हाती सुपूर्द केल्या. त्याचे डोळे आनंदानं भरले होते. .... खिशात हात घालून एक नोट काढून मला देण्यासाठी त्यानं हात पुढे केला.. हे त्याच्या व्यावसायिक स्वाभिमानानुसारच होतं. मी त्याच्याच हात धरून ती नोट पुन्हा त्याच्या खिशात घातली. ... त्याचे आनंदाने हसणारे डोळे पाणावलेही होते!... ** आज मित्रांशी गप्पा मारताना कशावरून तरी परवाची ही आठवण ताजी झाली. पंचेचाळीस वर्षांपूर्वी पहिल्यांदा 'गरीबी हटाव' हा नारा ऐकला होता. पुढे तो ऐकू येतच राहिला... आजही 'गरीबीसे आजादी' हवी म्हणून कुणी लढतायतच! ... "सोन्याच्या शर्टमुळे राज्यभर टीकेचे धनी ठरूनही येवला पालिकेचे उपनगराध्यक्ष पंकज पारख यांनी आपल्या ४५ व्या वाढदिवशी सोन्याचा शर्ट घालून आपली हौस भागवली. सोन्याचा शर्ट घालणार नसाल तर, वाढदिवसाला हजर राहीन असे छगन भुजबळ यांनी बजावले होते. पण, ऐकतील ते पारख कुठले? भुजबळ जाताच पारख यांनी सोन्याचा शर्ट परिधान करून त्यांचीही फसवणूक केली." असं कौतुकभरलं वर्णन एका पेपरात मागे वाचलं होतं. परवा माझ्या घरी भंगारवाला कचऱ्यातले जुने कपडे वेचत होता, त्याच दिवशी एक बातमी वाचली. सोन्याच्या शर्टाची जागतिक विक्रमात नोंद झाली होती!! ... एका वर्तमानपत्रात त्याच दिवशी वाचलेली बातमी आठवली. मथळा होता, 'भारताचा विकासदर 7.4% राहणार!' भारताची अर्थव्यवस्था या वर्षात पूर्वपदावर येतेय, असा दावाही त्या बातमीत होता. ... त्या भंगारवाल्यासारख्यांच्या जगण्यात या बातमीचं प्रतिबिंब कसं असेल??गरीब

Book traversal links for गरीब-श्रीमंत

  • ‹ बोट - व्यसनं
  • Up
  • बोट – Girl In Every Port ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
5444 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

लेख आवडला.

खेडूत
गुरुवार, 06/16/2016 - 11:53 नवीन
लेख आवडला. बाकी मनाने दरिद्री नवश्रीमंतांची या गरीब बिचार्‍या लोकांशी तुलना नकोच. तुमच्या पन्नासाव्या मिपा धाग्यानिमित्य अभिनंदन..!
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

एस
गुरुवार, 06/16/2016 - 15:34 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

छान लिहीले आहे .आपण कधी कधी

विभावरी
गुरुवार, 06/16/2016 - 19:10 नवीन
छान लिहीले आहे .आपण कधी कधी आवश्यकतेपेक्शा जास्त सामान जमवतो याची जाणीव झाली ...
  • Log in or register to post comments

छान लिहीले आहे .आपण कधी कधी

विभावरी
गुरुवार, 06/16/2016 - 19:12 नवीन
छान लिहीले आहे .आपण कधी कधी आवश्यकतेपेक्शा जास्त सामान जमवतो याची जाणीव झाली ...
  • Log in or register to post comments

चांगलं लिहिलंय.

यशोधरा
Fri, 06/17/2016 - 00:40 नवीन
चांगलं लिहिलंय.
  • Log in or register to post comments

चांगल लिहिलय

नाखु
Fri, 06/17/2016 - 09:41 नवीन
आणी खारीचा वाटाही मस्तच.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा