Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 06/14/2016 - 20:53
राम राम मंडळी. मंडळी, जगभरातल्या हवामान खात्याच्या तज्ञांनी या वर्षी भारतात भरपूर पाऊस पडेल असं म्हटलं होतं. आणि त्यांचा संदर्भ घेऊन आणि थोडाफार अभ्यास करुन आमच्या भारतीय तज्ञांनीही विविध तक्ते आणि अनुषांगिक अभ्यासाच्या संदर्भ देत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असं म्हटलं होतं. सात जून पर्यंत मान्सुन महाराष्ट्रात प्रवेश करेल असे अनुमान संबंधितांनी काढले होते. केरळात मान्सुन बरसला की तो पुढे महाराष्ट्रात चारपाच दिवसांनी पोहचतो असा अभ्यास जवळ जवळ सर्व महाराष्ट्रीयन माणसांचा वेधशाळेच्या माहितीकडे दुर्लक्ष करुन झाला आहे. कालांतराने दहा तारखेपर्यंत पाऊस पडेल असं म्हटल्या गेलं. पुढे बातम्या आल्या की मान्सुनचे आगमन लांबले आहे. आपल्या अभ्यास आणि संशोधनाच्याद्वारे भारतीय वेधशाळांनी या वर्षी मे महिन्याच्या सुरुवातीपासून भारतात सर्वत्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असे अंदाज वर्तवले होते. विविध आलेख आणि तक्त्यांच्या आधारे पाऊस किती असेल त्याची मांडणी केलेली होती. जून महिन्यात अमुक अमुक, जुलै महिन्यात धमुक धमुक पाऊस पडेल, अगदी ऑक्टोंबर, नोहेंबर पर्यंत धो धो पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने सांगितला होता. पुढील महिन्यात किती पाऊस पडेल ते माहिती नाही, पण आज जून मध्य ओलांडून पुढे जात आहे तरी पावसाचा पत्ता नाही. काही ठिकाणी पडला आहे, पण सर्वत्र पाऊस नाही असे दिसत आहे. लहानपणापासून रेडीयो केंद्रावर विविध कार्यक्रमाच्या ब्रेकमधे मी ऐकायचे की आज दिवसभर हवामान ढगाळ राहील, आकाश निरभ्र राहील, वारे वाहतील, पण या विभागाचा पावसाचा अंदाज हमखास चुकतो असे वाटले आहे. हवामान खात्याच्या विभागावर नेहमीच मी व्यंगचित्र पाहिली आहेत. मला हे हवामान खात्याचे तज्ञ आणि ज्योतिषी सारखेच वाटतात, लागला अंदाजे टोला तर लागला नाय तर कोणते तरी ग्रह आडवे आले होते म्हणून हे पळ काढतात. आमचा एक मित्र म्हणत होता की मटका खेळणार्‍यांना तरी हा विभाग चालवायला द्यावा. दहा आकड्यापैकी एखादा तरी आकडा बरोबर लागेल. मंडळी, तसा हा विभाग खूपच विनोदी झाला आहे. माझ्या काथ्याकुटातील विनोदाचा भाग सोडून द्या. पण मला खरच काही प्रश्नांची माहिती हवी आहे. १) भारतात हवामान अगदी खात्रीपूर्वक सांगू शकतील अशा वेधशाळा नाहीत का ? २) हवामान खात्याचे अंदाज का चुकतात ? ३) भारतात वेधशाळा किती आणि त्यातील तज्ञ व्यक्ती कोणत्या ? ४) भारतात वेधशाळेतील अभ्यासकांची संख्या किती ? ५) भारतात सरासरी दर महिन्याला या तज्ञांवर किती खर्च होतो ? ६) वेधशाळांचा जर काही फायदाच होत नसेल तर या वेधशाळा बंद का केल्या जात नाहीत ? ७) इतकी मोठमोठी उपग्रह आपण आकाशात सोडतो त्यातील एकाही ग्रहाला पावसाचा पत्ता लागत नाही का ? विनंती : हवामान खात्याच्या अंदाजाविषयी हा धागा आहे, उगं त्याला सरकारी विभाग, त्यांचे कार्य आणि तत्सम विषयांकडे वेधशाळेला घेऊन जाऊ नये, ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
  • 30295 views

प्रतिक्रिया

Submitted by विकास on Tue, 06/14/2016 - 20:59

Permalink

हम्म

हवीत कशाला असली (हवामान खाती वगैरे) थेरं? आमचे पूर्वज जेंव्हा असली खाती नव्हती तेंव्हा देखील सुखाने शेती करत आणि नद्या दुथडी भरून वाहू शकत, कारण ... Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 06/14/2016 - 21:10

In reply to हम्म by विकास

Permalink

हाहाहा.

विकास सर भारी हं. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय असं आम्ही आमच्या लहनपणी विचारलं आहे. भोलानाथही पाऊस पडेल असं म्हणायचा. अजून एक आठवण सांगायची राहीली. पाऊस यावा म्हणून महिला डोक्यावर शेनाची एक धोंडी करायच्या. आणि डोक्यावर त्या धोंडीला मिरवत मिरवत घेऊन जायचे. बाकी, महिलांनी पाण्याच्या कळश्या डोक्यावर घ्यायच्या आणि दारोदार जायच्या. ज्यांच्या घरी या महिला गेल्या की तेथील महिला यांच्या अंगावर, त्या धोंडीवर पाणी टाकायच्या. पाऊस यावा म्हणून मागणी करणार्‍या स्त्रीया घरोघर जात तेव्हा काही तरी असं गाणं म्हणायच्या त्याची आठवण झाली. ''धोंडीबाई धोंडी, धोंडी गेली हाटा पाऊस आला मोठा. आमच्या कन्या शिजल्या. धोंडीच्या भाकरी भिजल्या'' असं घरोघर पावसाची विनवणी केली तरी खूप मोठा पाऊस यायचा. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 06/14/2016 - 23:59

In reply to हाहाहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

नवीनच

धोंडीबाईचे गाणे मला नवीनच होते! इथे शेअरल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 06/14/2016 - 21:06

Permalink

आता जरा तांत्रिक

आपण केवळ ब्रिटीशकालीन कायदेच अजून वापरतो असे नाही तर त्यावेळच्या पध्दती देखील तशाच ठेवल्या आहेत. त्यातील एक म्हणजे हवामानाचा अंदाज.. आपण आजमितीस वापरत असलेली पद्धत ही १९२० सालापासूनची आहे. मात्र आता मोदी-सरकारने ६० मिलियन्स $$ चा महासंगणक घेण्याचे ठरवले आहे. तो २०१७ मधे वापरात येईल. त्यात ३-डायमेन्शनल मॉडेलिंगचा वापर करून अमेरीकेत ज्या पद्धतीने हवामानाचे अंदाज वर्तवण्यात येतात तसे वर्तवले जातील. याचे अनेक फायदे आहेत. एक प्रमुख फायदा म्हणजे शेतकर्‍यांना रोपे कधि पेरावीत याबद्द्ल अचूक माहिती समजू शकेल. $60 Million Supercomputer To Predict
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on Mon, 06/20/2016 - 13:47

In reply to आता जरा तांत्रिक by विकास

Permalink

आप्ले

परम वगैरे करु नाही शकत का हे कामं?
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Mon, 06/20/2016 - 13:59

In reply to आप्ले by अनिरुद्ध.वैद्य

Permalink

तो त्या काळातला महासंगणक झाला

तो त्या काळातला महासंगणक झाला. आत्ताचे साधे संगणकही त्याच्यापेक्षा कित्येक पटीने भारी आहेत. इतके ते तंत्रज्ञान पुढे गेलाय.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Mon, 06/20/2016 - 17:15

In reply to तो त्या काळातला महासंगणक झाला by शाम भागवत

Permalink

महासंगणक पुढे गेले नाहीत असे

महासंगणक पुढे गेले नाहीत असे कोण म्हणाला बुआ!?? तूर्तास हवामान मॉडेलिंग साठी वापरला जाणार इंडियन इनस्टीटूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरोलॉजी पाषाण पुणे ह्यांचा 'आदित्य' हा महासंगणक जगातील सर्वोत्तम 500 महासंगणकांपैकी एक आहे तसेच ह्या सर्वोत्तम 500 लिस्ट मध्ये 11 भारतीय महासंगणक आहेत हे ही ह्या निमित्ताने नोंदवतो
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on Mon, 06/20/2016 - 17:33

In reply to महासंगणक पुढे गेले नाहीत असे by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

बापु

ते मान्यय हो. बाकी मग ते न वापरता अजुन बाहेरुन महासंगणक आणत आहेत म्हणुन विचारले. असो. आदित्यबद्दल वाचतो. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Tue, 06/14/2016 - 21:09

Permalink

लेखातील प्रश्नाशी सहमत आहे.

लेखातील प्रश्नाशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 06/14/2016 - 21:10

Permalink

:(

:(
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 06/14/2016 - 21:21

In reply to :( by प्रचेतस

Permalink

आता काय झालं तुम्हाला.

कालचा पाऊस तुमच्या गावात आलाच नाही, म्हणून सदरहू पीक तुम्ही आसवांवर काढले का ? हा माणुस असा का वागतोय, कोणास ठाऊक ? बाय द वे वल्ली, मी डिस्कव्हरी फार पाहतो. परदेशात भवंडर भवंडर म्हणून ते क्यामेरेवाले त्या वादळाभोवतीच राहून हे वादळ कुठे येणार त्याची सूचना देतात, सालं आम्ही इतक्या पुढे गेलो आम्हाला पावसाचा अंदाज बरोबर वर्तवता येत नाही. अजूनही पावसाची शक्यता असेच म्हणतो. भारतीय हवामान शास्त्र विभाग पुणे. आजच्या दिवशी काय काय अंदाजफेकतंय पाहा. (पीडीएफ फाईल लगेच उघडते, इंट्रेष्ट नसेल तर क्लिकु नये ही नम्र विनंती) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 06/14/2016 - 21:38

In reply to आता काय झालं तुम्हाला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

कै नै.

कै नै. पावसाची वाट बघतोय झालं. परवा मळवलीला थोडासा झिरपून गेला.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Tue, 06/14/2016 - 21:30

Permalink

लेखातील भावनांशी सहमत असलो

लेखातील भावनांशी सहमत असलो तरी भारतीय उपखंडात पडणार्‍या मोसमी वार्‍यांपासूनच्या पावसावर परिणाम करणारे असंख्य घटक असतात. ते कोणते व किती हे अजूनही पूर्णपणे समजलेले नाहीये. ऊर्वरीत प्रतिसाद नंतर.....
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Tue, 06/14/2016 - 22:05

In reply to लेखातील भावनांशी सहमत असलो by एस

Permalink

स्वॅप्सभाऊ ह्यांच्याशी सहमत,

स्वॅप्सभाऊ ह्यांच्याशी सहमत, अन त्यांच्या तपशीलवार प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत . बाकी नंतर बोलता येईल
  • Log in or register to post comments

Submitted by संजय पाटिल on Sat, 06/18/2016 - 11:35

In reply to लेखातील भावनांशी सहमत असलो by एस

Permalink

हेच म्हणायचे आहे..

चार महिन्यांचा पवसाळा हा फक्त भारतीय उपखंडातच असतो. इतरत्र वर्ष भर थोडा थोडा पाउस पडत असतो. यामध्ये मोसमि वारे, अरबी समुद्रातील व बगालच्या उपसागरातली परिस्तीथी, आणि अजून बरेच घटक समाविष्ठ आहेत. त्यामुळे भारतिय मॉन्सून चा अंदाज बांधणे बरेच कठिण आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 06/14/2016 - 21:54

Permalink

अजून एक...

मला महाराष्ट्र शासनाच्या विभाकाकडून एक एसएमस येतो आपल्यापैकी अनेकांना येत असेल. आजचा संदेश पाहा. ''या आठवड्यात मराठवाड्यात आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहून, दिनांक १९ जून २०१६ रोजी वादळी वार्‍यासह मध्यम ते भारी पावसाची शक्यता आहे. मान्सूनचे आगमन लांबण्याअची शक्यता आहे. मान्सूनचे आगमन लांबण्याची शक्यता असल्याने शेतकर्‍यांनी मान्सूनचे आगमन झाल्याशिवाय पेरणी करु नये'' शेतकर्‍यांसाठी ही संदेशाची सोय चांगली आहे पण जर मान्सून लांबण्याची शक्यता आहे, पेरणी करु नये असंही म्हणत आहात तर १९ तारखेला पावसाची शक्यता कशावरुन व्यक्त केली आहे. दुसरं असं की शेतकर्‍यांनी रान तयार करुन ठेवलं आहे. चांगला पाऊस पडला १९ ला तर शेतकरी पेरणीच्या बाबतीत दम मारेल असं मला अजिबात वाटत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 06/14/2016 - 21:58

In reply to अजून एक... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

१९ चा पाऊस पूर्वमौसमी असेल.

१९ चा पाऊस पूर्वमौसमी असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 06/14/2016 - 22:10

Permalink

पावसाच्या बाबतित इतके अगणित

पावसाच्या बाबतित इतके अगणित आणि आतापर्यंत कोणालाही पूर्णपणे न समजलेले चल घटक (व्हेरिएबल्स) आहेत की त्याचा काही तासांच्या अगोदपर्यंत नक्की अंदाज वर्तविणे जगभरच कठीण आहे. त्यातल्या त्यात उपग्रहांनी पाठविलेल्या चित्रांवरून व समुद्रात बसविलेल्या सेंसर्सवरून बर्‍यापैकी अंदाज बांधता येतो. पण तरीही (अ) समुद्रावरचा वारा कधी दिशा बदलेल, (आ) एखादे वादळ कधी सुरू होईल आणि (इ) त्यामुळे ढग कुठे वाहून नेले जातील, यांचे फार काळ अगोदर अंदाज बांधणे बरेच कठीण असते. हजारो व्हेरिएबल्स वापरून केवळ जागोजागचे सेंसर्स व उपग्रहांची मदत असलेला सुपरकाँप्युटरच बर्‍यापैकी (पण नेहमीच अचूक नव्हे) अंदाज बांधू शकतो. म्हणुनच, अगदी पाश्चिमात्य देशांतही, अगोदर ठरवलेली दिशा सोडून वादळ दुसरीकडे वळले आणि वेगळ्याच ठिकाणी किनारपट्टीवर उतरले अश्या बातम्या नेहमीच्याच आहेत. फक्त त्या आपण नेहमीच जवळून पाहत नाही, इतकेच. नुकतेच अनुभवलेले उदाहरण म्हणजे ३० मे ला अमेरिकेत मेमोरियल डे साजरा झाला. त्यानिमित्त जागोजागी प्रेक्षणीय संचलने केली जातात. त्यावेळी न्यु हेवन येथिल हवामानाच्या अंदाजात पाऊस पडण्याच्या शक्यतेचे आडाखे असे होते : ६ वाजता ४०%, ८ वाजता ६०% आणि ११ वाजता १००%. ते पाहून शहराच्या मेयरने ११ वाजता होणारे संचलन रद्द केले. प्रत्यक्षात सकाळी थोडासा पाऊस पडला, पण ११ वाजता मस्त सूर्य तळपत होता ! :) (तरी मी आमच्या नातेवाईकांना सांगत होतो की आम्हाला संचलन बघायचे असल्याने पाऊस पडणार नाही. पण त्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. आता बोला ! ;) )
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Tue, 06/14/2016 - 22:18

In reply to पावसाच्या बाबतित इतके अगणित by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

+1000 ई ए काकांना :)

+1000 ई ए काकांना :) विशेषतः सतत बदलणारे वेरिएबल्स संदर्भासाठी
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 06/14/2016 - 22:45

In reply to पावसाच्या बाबतित इतके अगणित by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

माहितीपूर्ण प्रतिसाद.

आपल्या प्रतिसादात दोन गोष्टी दिसतात एक पावसाचा अंदाज वर्तविणे जगभरच कठीण काम आहे आणि दुसरं असं की पावसाच्या अंदाजावर परिणाम करणारा घटक म्हणजे समुद्रावरचा वारा. डॉक्टरसाहेब, भारताच्या नैऋत्याकडून हा पावसाळा आपल्याकडे येतो आपण त्याला नैऋत्य मान्सुन असेही म्हणतो. आपल्याकडे जो वारा पाऊस घेऊन येतो तो वारा हिंदी महासागर आणि अरबी समूद्रावरुन वाहात येतो यात कोणतीही अनियमितता मला वाटत नाही. मला पहिल्यांदा यावेळेसच्या दैनिकामधे वाचायला मिळालं ते अल निनो चा परिणाम या वा-यांवर होतो आणि ते पावसाला अडवतात असे म्हणता येते कदाचित माझं चुकतही असेल. मग हे हवामान खातं फ़क्त अंदाज लावते असेच म्हणावे लागेल. मौसमी वारे कसे वाहतील त्याची एक नियमितता आहे की नाही ते जर नियमित वाहात नसतील, असतील तर हवामान खात्याने त्याचा अंदाज पूर्वीच बांधायला हवा असेही वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 06/15/2016 - 00:41

In reply to माहितीपूर्ण प्रतिसाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

३१ मे नंतर १० दिवसांनी १० जून

३१ मे नंतर १० दिवसांनी १० जून येणार हे एक नियमिततेचे उदाहरण झाले. अश्या बाबतीत अंदाज नाही तर खात्रीने सांगता येते. जर मोसमी हवामान आणि वारे हे जर तसेच नियमित असते तर त्यांचा अंदाज लावायची गरजच उरली नसती ! एखाद्या ठिकाणचे वातावरण दर वर्षी त्याच वेळेला "साधारण" तसेच राहते असा आपला गेल्या काही वर्षांच्या अनुभभवावरून बांधलेला "सरासरी आडाखा" असतो. कारण कोणत्याही सलग दहा-वीस वर्षांच्या श्रेणीचेही हवामान ताडून पाहिले तर कोणत्याच दोन वर्षी ते समान असलेले सापडणार नाही. त्यातच एखाद्या वर्षी काही चल घटक अचानक प्रमाणापेक्षा बदलले असले तर हवामानात फार मोठा फरक (दुष्काळ, अतिवृष्टी, वादळ, इ) पडलेला असतो. एखाद्या ठिकाणच्या हवामानावर तेथिल चल घटकांबरोबरच त्याठिकाणापासून शेकडो किमी दूर असणार्‍या ठिकाणांच्या चल घटकांचाही परिणाम पडतो. हिमालयातली थंडीची लाट महाराष्ट्रालाही हुडहुडी भरवते आणि राजस्तानमधील गरम हवा दिल्लीत लू आणते. समुद्रातल्या पाण्याची वाफच मूलतः ढग निर्माण करते. समुद्रावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे तापमान, आर्द्रता, वार्‍याचा वेग, ई तुलनेने जास्त सहजपणे होते आणि त्यात बदलही सहजतेने होतात. त्यामूळे वारे कसे वाहतील व त्यामुळे वाफ (ढग) कुठून कुठे वाहेल, हे वेळोवेळी बदलत राहते. खालील आकृतीत हे अत्यंत सोप्या प्रकारे विषद केले आहे (खर्‍या परिस्थितीत त्यात अनेक पटींनी जास्त चल घटक, किचकट प्रकारे, एकमेकाशी असंख्य प्रतिक्रिया करत असतात)... Image removed. (जालावरून साभार) हेच अतीउंचीवरील व बर्फाळ प्रदेशांतही घडते. दोन्ही धृवांवर आणि हिमालय-आल्प्स, इत्यादी उंच पर्वतराजीत तासदोनतासांत अत्यंत उलटसुलट प्रकारचे हवामान ही नित्याची गोष्ट आहे. या सगळ्याची पहिली लक्षणे सुरु झाली की मगच त्याबद्दल सांगता येते... खूप वेळ अगोदपासून ते होईलच असे सांगता येत नाही... आणि नक्की कोणत्या जागी त्याचे परिणाम नक्की कोणत्या तीव्रतेचे असतील हे सांगणे तर त्याहून कठीण असते. गेल्या वर्षीचेच उदाहरण घ्यायचे तर मान्सूनचा चांगला जोर (महासागरात ढग तयार होणे व ते भारताच्या दिशेने वहायला सुरुवात करणे) होता. पण अचानक आलेल्या वादळाने त्यांना भारताच्या किनार्‍यापासून दूरवर भरकटवले. हवामान या विषयात खूप प्रगती केली गेली आहे. हवामानाचा अंदाज बांधण्यासाठी अनेक आडखे, मॉडेल्स आणि सिद्धांत बनवले गेले आहेत. मात्र, जेव्हा नक्की उत्तर माहीत नसते तेव्हाच अनेक आडखे/मॉडेल्स/सिद्धांत तेव्हाच आस्तित्वात असतात ! :) एकंदरीत, हवामान या विषयात माणुस अजुनही प्राथमिक शाळेतच आहे ! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Tue, 06/14/2016 - 22:32

Permalink

वाचते आहे..

वाचते आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार कात्रे on Tue, 06/14/2016 - 23:19

Permalink

अनेक घटक

आत्ताच साम टीव्हीवर अ‍ॅग्रोवन कार्यक्रमात एका हवामान शास्त्रज्ञाची मुलाखत झाली . त्यानी सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष पाऊस पडणे अनेक घटकांवर अवलम्बून असते. त्यापैकी महत्त्वाचा घटक म्हणजे अरबी ,हिन्दी आणि बंगालच्या समुद्राचे तापमान व भारतीय उपखन्डातील जमिनीवरील हवेचा दाब . यावर्षी मोसमी वार्यावर विपरीत परिणाम करणारे घटक फारसे प्रभावशाली नाहीत त्यामुळे वारे मॉन्सूनला अनुकूल आहेत , भारतीय उपखंडा तील हवेचा दाब देखील योग्य आहे परन्तु समुद्राच्या पाण्याचे तापमान कमी असल्याने त्याचा विपरीत परिणाम पावसावर झालेला आहे. पाण्याच्या कमी तापमानामुळे पुरेसे बाष्प बनण्यात अडचणी येत आहेत. हे तापमान पुढच्या काही दिवसात वाढेल अशी अपेक्षा आहे . एकूणच कोकणात २३-२४ तारखेनन्तर आणि इतरत्र जुलै महिन्यात चांगला पाऊस अपेक्षित आहे
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Wed, 06/15/2016 - 00:33

In reply to अनेक घटक by मंदार कात्रे

Permalink

थोडे विषयांतर,

थोडे विषयांतर,
एकूणच कोकणात २३-२४ तारखेनन्तर आणि इतरत्र जुलै महिन्यात चांगला पाऊस अपेक्षित आहे
मागील एक दोन वर्षात सरकारने आणि इतर माध्यामांनी पाणी साठवण्याबाबतीत केलेली जनजाग्रुती कामी येतेय. महाराष्ट्रातही ठीकठीकाणी नदीपात्रे, तलाव खोल करुन जनता वाट पहाते आहे. मंदार कात्रे म्हणतायत त्याप्रमाणे पाउस झाला तर यावर्षी पाणीसमस्या थोडीतरी सुटेल अशी आशा आहे. पाहूया काय होतेय. ता.क. - राजापूरात चांगला पाउस पडतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by गणेश उमाजी पाजवे on Tue, 06/14/2016 - 23:47

Permalink

भारतीय हवामान खात्याचे अंदाज का चुकतात याची उत्तरे

पहिले म्हणजे आपण भारतीय हवामान खाते कोणत्या प्रकारचे हवामान वर्तवीतअसते ते पाहुया :-
भारतीय हवामान खाते हे ३ प्रकारचे हवामान अंदाज व्यक्त करीत असते.१) Now Casting Forecast - २४ तासांसाठी.२) Short Range Forecast - ७२ तासांसाठी.३) Mid Range Forecast - ४ ते १० दिवसांसाठी.४) Long Range Forecast - ३० दिवस ते पूर्ण हंगामासाठी.
मान्सून कसा बनतो?
मार्च, एप्रिल व मी महिन्यामध्ये उत्तरायण अगदी जोरात चालू असते तेव्हा उत्तर अटलांटिक सागर, हिंदी महासागर आणि मध्य पसिफिक महासागर या समुद्रांवर खूप गरम उन पडत असते त्यामुळे तिथली हवा खूप बाष्पमय झालेली असते. यालाच इंग्रजीत (Thermal Equator) असे म्हणतात. आणि अगदी याच वेळेस दक्षिण हिंदी महासागर आणि दक्षिण अरबी समुद्र यात कमी दाबाचे पट्टे साधारण मे महिन्याच्या मध्यावर तयार होऊ लागतात. हे कमी दाबाचे पट्टे हि बाष्पमय हवा स्वतःकडे खेचून घेतात. आणि त्यामुळे गरम हवा आणि थंड हवा याची सरमिसळ होऊन हा पट्टा अरबी समुद्रातून केरळ कडे सरकू लागतो आणि जोरदार वार्यांसह दक्षिण भारतात खूप पाउस पडतो. यालाच मान्सून असे म्हणतात.
भारतीय हवामान खाते नेहेमी अंदाज वर्तविण्यात अपयशी का ठरते याची कारणे
१) मान्सून चे अचूक वर्तमान करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर डेटा ची गरज असते. यामध्ये, उत्तर अटलांटिक सागर, हिंदी महासागर आणि मध्य पसिफिक महासागर यांच्या पाण्याचे तापमान, युरोप आणि आफ्रिकेचे जमिनीवरील तापमान, पसिफिक महासागराच्या उबदार प्रवाहांची घनता, आणि अटलांटिक आणि हिंदी महासागराच्या जवळ असलेला समुद्रावरील हवेचा दाब या आणि अशाच प्रकारच्या आणखी डेटा ची गरज असते. भारताकडे असलेली कमी उपग्रहांची संख्या आणि कमी प्रमाणात उपलब्ध असलेली उपकरणे यामुळे एवढा खोलात जाउन प्रत्येक वेळी त्यांना डेटा मिळत नाही.२) दुसरे कारण म्हणजे हा डेटा प्रोसेस करण्याची अत्युच्च क्षमता भारतीय कॉम्पुटर सिस्टीम मध्ये नाही. कारण Accuweather , skymet , आणि बाकी देश हा डेटा सांख्यिकीय दृष्टीने प्रोसेस करण्यासाठी उच्च प्रकारचे सुपरकॉम्पुटर्स आणि आधुनिक अल्गोरिदम्स वापरतात याउलट भारतात अजूनही २००० च्या काळातले जुनाट अल्गोरिदम्स वापरात आहेत, यामुळे आपल्याला काही मर्यादा आहेत.३) तिसरे कारण म्हणजे भारतातील बर्याच वेधशाळांमधली खूप महत्वाची पदे रिक्त आहेत. अर्थात आता याला बरीच कारणे असू शकतात जसे कि, हवामान खात्याला सरकार दरबारी योग्य ते महत्व नसणे. किवा शासकीय निधीची कमतरता असणे.४) चौथे महत्वाचे कारण म्हणजे भारताची भौगोलिक संरचना व याचे भौगोलिक स्थान - भारत हा उष्ण आणि बाष्पीय कटीबंधातला देश आहे कारण विषुव वृत्तीय रेषा भारताच्या ठीक मध्यातून जाते. असे असूनसुद्धा भारताच्या उत्तरेला हिमालयामुळे शीत वातावरण, वायव्य दिशेला राजस्थानच्या वाळवंटमुळे कोरडे वातावरण, पश्चिमेला सह्याद्री आणि समुद्राच्या सान्निध्यामुळे दमट वातावरण, ईशान्येला आल्हाददायक वातावरण असे आहे. त्यामुळे वेधशाळा त्यांच्या कुवतीनुसार जो डेटा गोळा करीत असतात त्यात अचूकपणाची कमी असते.त्यामुळे सध्या तरी उपग्रहांची संख्या वाढवणे, उच्च दर्जाची उपकरणे वापरणे, सुपर कॉम्पुटर्स वापरणे, वेधशाळांचे मनुष्यबळ वाढवणे, आणि सगळ्यात महत्वाचे शासकीय अनास्था दूर करून या सगळ्या गोष्टींसाठी योग्य तो निधी उपलब्ध करून देणे हेच उपाय होणे आवश्यक आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 06/15/2016 - 00:10

In reply to भारतीय हवामान खात्याचे अंदाज का चुकतात याची उत्तरे by गणेश उमाजी पाजवे

Permalink

आँ हे कधी झालं?

कारण विषुव वृत्तीय रेषा भारताच्या ठीक मध्यातून जाते.
मला वाटतं तुम्हाला कर्कवृत्त म्हणायचं असावं.. (कर्कसंगत)रंगा
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 06/15/2016 - 00:50

In reply to भारतीय हवामान खात्याचे अंदाज का चुकतात याची उत्तरे by गणेश उमाजी पाजवे

Permalink

"विषुव वृत्तीय रेषा" (इथे

"विषुव वृत्तीय रेषा" (इथे कर्क वृत्तीय रेषा असे पाहिजे) हा अनवधानाने झालेला टंकनदोष सोडला तर... ...उत्तम शास्त्रिय माहिती असलेला प्रतिसाद !
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 06/15/2016 - 09:24

In reply to भारतीय हवामान खात्याचे अंदाज का चुकतात याची उत्तरे by गणेश उमाजी पाजवे

Permalink

प्रतिसाद माहितीपूर्ण आहे,

प्रतिसाद माहितीपूर्ण आहे, आवडला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by लालगरूड on Wed, 06/15/2016 - 00:13

Permalink

मला हवामान खात्यातल्या

मला हवामान खात्यातल्या नोकरीचं खुप अप्रुप वाटतं ... कुठलं टारगेट नसतं, अंदाज खोटे ठरले तरी कोणी राजीनामा मागत नाही, कोणतीही कार्रवाई नहीं.. विशेष म्हणजे कोणी सिरियसली घेतच नाही ..
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय माने on Wed, 06/15/2016 - 01:29

Permalink

विश्वम्भर भट म्हणायचे- पाप

विश्वम्भर भट म्हणायचे- पाप वाढलेंय हो पाप! कसा पडेल पाऊस??? कितीही प्रगत उपकरणं घेऊन या तुमची, काही म्हणजे काही फरक पडायचा नाही. असो! आम्ही बनवाबनवि केलि ती आमची परिस्थिती नव्हती म्हणून, तुम्ही(म्हणजे हे सरकारी लोक) का लोकांना बनवतायत कोण जाणे...
  • Log in or register to post comments

Submitted by सौन्दर्य on Wed, 06/15/2016 - 05:54

Permalink

ह्युस्टनमध्ये

आमच्याकडे म्हणजे ह्युस्टनमध्ये पावसाचे अंदाज बर्यापैकी अचूक असतात. सकाळी अगदी अंग भाजणारे उन असले आणि वेधशाळेने ५०% पावसाचे भाकीत केले तर पाउस पडतोच पडतो. कितीतरी वेळा, "वेधशाळेने भाकीत केले आहे ना म्हणजे आपल्याला पडलेच पाहिजे" अश्या विचाराने पाउस पडत असावा. ह्यातील विनोदाचा भाग सोडला तरी वेधशाळेचे अंदाज ७५% जास्त बरोबर ठरतात.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Wed, 06/15/2016 - 09:23

Permalink

विषय

कसा मांडावा याचा वस्तुपाठ म्हणून या धाग्याकडे पाहता येईल. रेशमी चिमटे काढत माहीती देण्यास उद्युक्त करणे खरेच कौशल्याचे काम आहे.त्यामुळेच अश्या धाग्याकडे वल्लींनी हजेरी लावली असावी असे आम्चे अनुमान आहे. प्रा डॉ.नी अत्यंत ज्वलंत विषयाला वाचा फोडली आहे. जर जुनीच कार्यपद्धती,आणि अत्यंत जुनाट(ब्रिटीशकालीन) उपकरणे असतील तर हवामान खात्याला सर्वस्वी दोष देणे योग्य नाही.(औंध रुग्णालयात एक अतिप्रगत विदेशी व महागडे उप्करण निव्वळ ते चालवू शकेल असा कुशल वैद्यकीय तंत्रज्ञ नसल्याने किमान २-३ वर्षे धूळ खात पडून होते अशी बातमी सकाळमध्ये दोन वर्षांपुर्वी वाचली आहे) त्यावरून सरकारी अनागोंदी आणि हडेलहप्पीचा अंदाज येऊ शकतो. लाल गरूड यांचे त्या खात्याबद्दलचे मत सर्वच सरकारी खात्यांना कमीजास्त लागू पडते अगदी रेल्वेलाही. सरसकटीकरणास विरोध असलेला नाखु ता.क. लेखक मजकुरांकडून अश्याच माहीतीपुर्ण धाग्यांबरोबरच जाज्व्यल्य लिखाणाचीही अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Wed, 06/15/2016 - 10:57

In reply to विषय by नाखु

Permalink

जर जुनीच कार्यपद्धती,आणि

जर जुनीच कार्यपद्धती,आणि अत्यंत जुनाट(ब्रिटीशकालीन) उपकरणे असतील तर हवामान खात्याला सर्वस्वी दोष देणे योग्य नाही.
सहमत. आपली Indian Regional Navigation Satellite System (IRNSS) अंतर्गत सात उपग्रहांची स्थापना झाली असून आता आपल्याला २४ तास मोठ्या प्रमाणात माहिती मिळावयास सुरवात होणार आहे. (या वाक्यातील २४ तास हे शब्द महत्वाचे आहेत.) ह्या माहितीच्या विश्लेषणासाठी महासंगणकाची आवश्यकता असते व तोही आपण घेत आहोत. हे सगळे डिसेंबर २०१६ पर्यंत पूर्ण होणार आहे. म्हणजे पुढच्या पावसाळ्यात याचा उपयोग खर्‍या अर्थाने होणार असून तेव्हाच हवामान विभागावर काही लिहिणे जास्त संयुक्तिक होईल असे वाटते. या अगोदर महासंगणक घेऊन काही उपयोग नव्हता कारण तेवढा डाटा आपल्याला २४ तास उपलब्ध होत नव्हता. असो. मला वाटते की शास्त्रज्ञ सगळे योग्य वेळी व योग्य प्रकारे करत आहेत व सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे इतके सद्या पुरेसे आहे. अवांतर: स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण सर्वांनी ६५ वर्षे आपण धीर धरला आहे. तर आता काही महिन्यांचा धीर धरायला काय हरकत आहे? :))
  • Log in or register to post comments

Submitted by गंम्बा on Wed, 06/15/2016 - 10:18

Permalink

बिरुटेसर, तुमच्या बद्दल आदर

बिरुटेसर, तुमच्या बद्दल आदर ठेउन सुद्धा असहमत आहे असे म्हणावे लागते. १. जगात सर्वत्रच लाँगटर्म हवामानाचा अंदाज चुकत असतो किंवा तो टेंटेटीव्ह असतो. पुढच्या १२ किंवा २४ तासाचा अंदाज बर्‍यापैकी जमतो. त्यात सुद्धा २४ तासाचा पुन्हा टेंटेटीव्ह असतो. युरोप आणि युके मधे सुद्धा हवामान अंदाजाची अशीच चेष्टा उडवली जात असते. २. मान्सुन चा अंदाज हा खुपच भविष्यातला असल्यामुळे आणि मान्सुन साठी प्रचंड वेगवेगळे आणि काँफ्लिक्टींग पॅरॅमिटर असल्यामुळे ८-१० दिवस इकडे तिकडे होणे स्वाभाविक आहे. ३. गेल्या १०-२० वर्षात भारतात पण नविन तंत्रद्नान आणि पद्धती वापरल्या जातात. गोवारीकर आणि नंतर अनेक मॉडेल तयार झाली आहेत. १९२० सारखेच काम चालते असे म्हणणे पूर्ण चुक आहे. मी म्ह्णीन गेल्या खाही वर्षात मान्सुन चा अंदाज बर्‍यापैकी जमला आहे. पुढच्या २-३ दिवसात पाउस पडेल की नाही सांगणे अवघड असते.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 06/15/2016 - 12:37

Permalink

वेधशाळा कायबी म्हणू दे, 20

वेधशाळा कायबी म्हणू दे, 20 जून शिवाय खर्या पावसाला सुरवात नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Wed, 06/15/2016 - 12:43

Permalink

हवामानखात्याच्या अगदी मे

हवामानखात्याच्या अगदी मे महिन्यापासून येणार्‍या बातम्यांवर लक्ष ठेवून आहे. त्यांनी दिलेले सगळेच अंदाज चूकताहेत. बाकी धाग्यावरील माहितीपूर्ण प्रतिसाद वाचनीय. नवीन माहिती मिळतेय.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Wed, 06/15/2016 - 14:44

Permalink

हि लिंक पाहता भारतात कायम

हि लिंक पाहता भारतात कायम जुनीच स्टॅटिस्टिकल मॉडेल्स वापरली जातात हा आरोप काही पटण्यासारखा नाही , डॉक्टर वसंत गोवरीकरांनी ह्याच्या आधीचे मॉडेल 1988 मधे विकसित केले होते असे ही समजते , म्हणजे ब्रिटिशकालीन मॉडेल्स वगैरे वापरली जातात ह्यात काही तितकेसे तथ्य नसावे, उरतो प्रश्न संगणक क्षमतेचा तर त्या बाबत खालील माहिती कळली
Aaditya Indian Institute of Tropical Meteorology, Pune, has a machine with a theoretical peak of 790.7 teraflop/s, called Aaditya, which is used for climate research and operational forecasting. It ranked 96th among the world's top 500 supercomputers June 2013 list.
तस्मात संगणक क्षमतेत सुद्धा भारतीय हवामान खाते हे अगदी हे आहे असे म्हणवत नाही मला तरी सॅटिस्टिकल मॉडेलिंग बद्दल बॅट्याची मते वाचायला आवर्जून आवडतील आम्हाला.
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Wed, 06/15/2016 - 17:34

Permalink

गणेश व डॉ. म्हात्रे यांचे माहीतीपुर्ण प्रतिसाद आवडले.

वाचतोय चांगली माहीती मिळत आहे. धागा विषय आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Wed, 06/15/2016 - 20:00

Permalink

तिसरे कारण म्हणजे भारतातील

तिसरे कारण म्हणजे भारतातील बर्याच वेधशाळांमधली खूप महत्वाची पदे रिक्त आहेत. -हेच खरं कारण असावं आडाखे चुकण्याचं. शिवाय सातव्या आयोगात पगारवाढ झालीच नाही ( धागा पाहा ).सरकारी अधिकारी रुसले की काहीही होत नाही.पाऊसही पडत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 06/15/2016 - 21:27

In reply to तिसरे कारण म्हणजे भारतातील by कंजूस

Permalink

फॉल फॉल फॉल.

>>>>शिवाय सातव्या आयोगात पगारवाढ झालीच नाही ( धागा पाहा सरकारी अधिकारी रुसले की काहीही होत नाही. पाऊसही पडत नाही. फॉल, फॉल, फॉल. पगार वाढ होत नाही म्हणून पाऊस पड़त नाही हे चूक आहे. पापं वाढली हो दुसरं काही नाही. आणि देवाने तरी कोनाचं ऐकायचं हो ? एका माणसाच्या जूळ्या मुलींचं लग्न झालंय. एक कुंभाराच्या घरी दिली आहे आणि एक शेतक-याच्या घरी. कुंभाराच्या घरी दिलेली मूलगी देवाला नवस करते आत्ताच रांजन, माठ, चुली करुन ठेवल्या आहेत पाऊस नको येऊ देऊ. शेतक-याच्या घरी दिलेली मुलगी म्हणते पाऊस येऊ दे, पंढरपुरची पायी वारी करेन. अशा वेळी देव कन्फ्यूज होतो हो दुसरं काही नाही. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 06/18/2016 - 10:45

Permalink

काही नवीन माहिती.

नवे निष्कर्ष, अजून काही माहिती ? की आभार मानू ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by लिओ on Sat, 06/18/2016 - 23:20

Permalink

IRNSS

@शाम भागवत
आपली Indian Regional Navigation Satellite System (IRNSS) अंतर्गत सात उपग्रहांची स्थापना झाली असून आता आपल्याला २४ तास मोठ्या प्रमाणात माहिती मिळावयास सुरवात होणार आहे.
अवांतर: स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण सर्वांनी ६५ वर्षे आपण धीर धरला आहे. तर आता काही महिन्यांचा धीर धरायला काय हरकत आहे? :))
यातील Indian Regional Navigation Satellite System (IRNSS) मालिकेतील उपग्रह ६५० वर्ष धीर धरला तरी हवामान अंदाजास उपयोगी पडणार नाहित. IRNSS उपग्रह हे Navigation ( दिशादर्शनास ) उपयोगी पडणार आहेत. याचा अर्थ भारतीय उपखन्डात आपण नेमके कोठे उभे आहोत हे जाणण्यास परदेशी उपग्रह वापरात न आणता स्वदेशी उपग्रहाद्वारे आपण जाणु शकु.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Sun, 06/19/2016 - 12:41

In reply to IRNSS by लिओ

Permalink

चांगलीच चूक झाली

चांगलीच चूक झाली. २०१४ ला कधीतरी ओशनसॅट बंद झाला असून त्याच्यापेक्षा चांगला उपग्रह आपण सोडणार आहोत पण तो IRNSS नंतर सोडणार आहोत असे वाचले होते. @लिओ, चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. हाच खरा मीपाचा फायदा. मला वाटते ScatSat असे काहीतरी या उपग्रहाचे नाव असावे. जाणकार अधिक माहिती देतीलच.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 06/19/2016 - 03:29

Permalink

बाय द वे

याहू वेदर हे मोबाइल साठी चांगलं एप्लीकेशन वाटलं. आभाळ भरून असलेलं दिसणे, पावसाच्या शक्यतेची वेळ, तसं हवामान खात्याच्या विभाग सोडून डेस्कटॉप साठी सेटेलाइट व्ह्यु ने नकाशावरुन पावसाळी ढग कुठे दिसताहेत अशी उत्तम माहिती देणारी संकेतस्थळे माहिती आहेत का ☺ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sun, 06/19/2016 - 06:42

Permalink

प्रत्येक देश आपला उपग्रह या

प्रत्येक देश आपला उपग्रह या माहितीसाठी सोडेल असं होणार नाही दुसय्रांची माहिती घेण्यासाठी करार करतात बहुतेक.हेरगिरीसाठी मात्र आपलाच लागेल. #अंदाज चुकण्याची बरीच कारणे आहेत ती खात्यालाही माहित असतात. #मान्सुनचे तंत्र बिघडण्याचे मुख्य कारण :- पृथ्वीचे वेगवेगळे भाग असमतोल तापले की वारे वाहू लागतात आणि समुद्रावरून वारे इकडे जमिनीवर आले की ढगसुद्धा येऊन पाउस पाडतात.परंतू गेली काही वर्ष हा तापण्याचा असमतोलपणा नाहीसा होत चालला आहे.सर्व भाग सारखेच तापतात आणि वारे सुरू होत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by sagarparadkar on Sun, 06/19/2016 - 14:12

Permalink

१९ जून २०१६ चे पुण्यासाठीचे वेदर.कॉम चे अंदाज पहा .... बघू या कि

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by sagarparadkar on Sun, 06/19/2016 - 14:15

Permalink

१९ जून २०१६ चे पुण्यासाठीचे वेदर.कॉम चे अंदाज पहा .... तेवढ्यात

आधी १९:४५ ही पाऊस सुरू होण्याची वेळ सांगितली होती. आता इथे पोस्ट करतोय तेवढ्यात त्यांनी २०:०० हे वेळ दिली .... पहा त्यांचासुद्धा केवळ 'अंदाज'च आहे
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sun, 06/19/2016 - 14:37

In reply to १९ जून २०१६ चे पुण्यासाठीचे वेदर.कॉम चे अंदाज पहा .... तेवढ्यात by sagarparadkar

Permalink

हवामान खात्याच्या

हवामान खात्याच्या अंदाजांपेक्षा ज्योतिषांचे अंदाज बरोबर येण्याची शक्यता अनेक पटींनी जास्त आहे. पण, हवामानाचे अंदाज वर्तविणे याला हवामानशास्त्र म्हणतात व ज्योतिष ही थापेबाजी असते.
  • Log in or register to post comments

Submitted by कलंत्री on Tue, 06/21/2016 - 14:00

Permalink

वातावरण निर्मितीची गरज.

पाऊस पडण्यासाठी आवश्यक त्या वातावरण निर्मितीची गरज असते असे माझे मत आहे. भरपूर वनश्री. मातीची जागा सिमेंट / डांबरीकरणाने होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांचा वापर. शेतजमिनीचे अशेतजमीनिमध्ये होणारे रुपांतर. जमीनीमधील बोअरवेल्स ( कूपनलिका) चा प्रचंड पाण्याचा उपसा. यावर प्रयत्न झाला तर पाऊस आल्याशिवाय राहणार नाही.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Wed, 06/22/2016 - 13:57

Permalink

नैसर्गिक आणि पारंपारिक भाकित पद्धतींकडे दुर्ल्क्ष नको

उपग्रहांकडून मिळालेली माहिती, सुपरकॉम्प्युटर्सची मदत, आधूनिक संशोधन यांद्वारे हवामानाचा वेध घेण्याबाबत संशोधन होत रहाणे गरजेचेच आहे त्याबद्दल किंचितही आक्षेप नाही. पण त्याच वेळी निसर्गातील बदल (पक्षी, प्राणी, कीटक, झाडे इत्यादींमधील वर्तणूकीतील बदल) आणि त्यावरुन मिळणारे पावसाचे, हवामानबदलाचे संकेत यांचाही अभ्यास स्वतंत्रपणे चालू रहावा. सरकारने या अभ्यासाकरिता स्वतंत्र विभाग , निधी उभारावा असे मला वाटते. काही वर्षांपुर्वी मारुती चितमपल्लींचा मेघा छाये हा लेख तसेच २०१४ च्या पावसाबद्दलचे संकेत देणारा हा लेख अत्यंत वाचनीय आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com