✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मला त्या गावी जायचेय...

ह
हृषिकेश पांडकर यांनी
Mon, 06/13/2016 - 14:20  ·  लेख
लेख
शहराच्या मध्यात साठ कुटुंबांची एक चाळ असावी... स्क्वेअर फुटाचा हिशोब नको, फक्त पाठ टेकवायला एक खोली असावी.. श्रीमंती घरात नसली तरी बेहत्तर, संपूर्ण चाळ मात्र गडगंज असावी.. महिना अखेरच्या पगाराची आस नसावी.. meeting, appraisal, onsiteचा गंध नसावा.. मला त्या गावी जायचेय... उजव्या भिंतीपलीकडल्या खोलीत पु.ल. राहत असावेत… सकाळी त्यांच्याच पेटीने जाग यावी.. नळावरील भांडणे, शाळेची गडबड, नोकरदारांची घाई आम्ही दोघांनी एकत्र पाहावी.. पु.लं.नी प्रत्येक गोष्टीवर टिप्पणी करावी..व मी मनसोक्त हसावे.. बटाट्याच्या चाळीतील सगळी मंडळी तिथेच वास्तव्यास असावी... तीच दृश्ये, तेच सण, त्याच चर्चा आज भाईंसमवेत अनुभवाव्यात मला त्या गावी जायचेय... चाळीच्या समोर ते 'चौकोनी कुटुंब' बंगल्यात राहत असावे.. उन्हाळ्याच्या सुट्टीत अंतूशेटांच्या पोफळीच्या बागेत विसावा घ्यायचाय.. नंदा प्रधानच्या गाडीवर बसून मरीन ड्राइव्ह पाहावा... त्याने केलेले मुलीचे वर्णन याची देही अनुभवावे.. रोज पानवाला बघतो... आज भाईंबरोबर त्याला भेटावे.. मला त्या लग्नात जायचेय जिथे नारायणाचा मुरारबाजी झालाय.. मला त्या गावी जायचेय... खूप शिवाजयंत्या पाहिल्या... आज भाई आणि हरितात्यांसोबत राज्याभिषेक पाहायचाय.. उभे राहावे लागले तरी चालेल, पण त्या 'म्हैस'वाल्या STमध्येच चढायचेय.. अगदी पु.लं.च्या शेजारी नाही.. पण मागे तरी राहायचेय.. कुंभारलीचा घाट उतरून चिपळुणात विसवायचेय.. आमच्याच चाळीत शेजारी येणार्‍या सखाराम गटण्याला एकदा घरी चहाला बोलवायचेय.. मला त्या गावी जायचेय... मुंबईला जाताना पेस्तनकाकांबरोबर गप्पात रमायचेय.. पु.ल. आणि पेस्तनकाका यांच्या गप्पांमधून खूप काही अनुभवायचेय.. लक्ष्मणांच्या 'कॉमन मॅन'ला घरी राहायला बोलवायचेय.. तो जाईल तिथे.. जाईल तेव्हा त्याच्याबरोबर हिंडायचेय.. मला त्या गावी जायचेय... खूप इच्छा आहे 'चितळे मास्तरांना' एक नवीन चप्पल जोडी घेऊन द्यायची.. कितीही त्रासदायक असले, तरी शत्रुपक्षाच्या ट्रीपचे फोटो बघायला जायचेय.. फोटो बघत असताना त्यांचीच चाललेली चर्चा ऐकून खूप बोअर व्हायचेय एखाद्या इमारतीचे बांधकाम बघायला भाईंना आग्रह करायचाय.. एखाद्या कार्यक्रमाला भाईंसोबत प्रमुख पाहुणा म्हणून मिरवायचेय... मला त्या गावी जायचेय... अगदी जपान-युरोपची सहल नको.. फक्त दुपारच्या चहाला पु.लं.च्या तोंडून ते ऐकायचेय.. जपानी पंखा असो की युरोपियन दारू.... त्याचा अनुभव भाईंच्या प्रत्यक्ष वर्णनातून घ्यायचाय जन्मावरून पुणेकर असलो, तरी मुंबईकर आणि नागपूरकरपण व्हायचेय कॉमन मॅनसारखे डोळे करून.. पु.लं. आणि अत्र्यांना गप्पा मारताना ऐकायचेय.. मला त्या गावी जायचेय... 'बालगंधर्व'च्या उद्घाटनात पु.लं.चा श्रोता व्हायचेय सुनीताबाईंच्या व्याघ्रदर्शनाला कॅमेर्‍याशिवाय जायचेय आमच्या चाळीतल्या लोकांबरोबर 'त्या' पुण्याच्या प्रवासाला जायचेय. गच्चीच्या चळवळीत घोषणा द्यायला जायचेय.. मला त्या गावी जायचेय... काल्पनिक असलो तरी चालेल.. पण R.K.चा तो कॉमन मॅन बनून पु.लं.च्या संपूर्ण प्रवासात एक सहप्रवासी व्हायचेय.. ...फक्त एकदाच मला त्या गावी जायचेय... d हृषिकेश पांडकर
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
रेखाटन
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
6017 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

अतिशय सुरेख!!!

पद्मावति
Mon, 06/13/2016 - 14:27 नवीन
अतिशय सुरेख!!!
  • Log in or register to post comments

एकदम मस्त

जगप्रवासी
Mon, 06/13/2016 - 14:29 नवीन
एकदम मस्त
  • Log in or register to post comments

चांगली आयड्या है पण जरा

अभ्या..
Mon, 06/13/2016 - 14:35 नवीन
चांगली आयड्या है पण जरा शुध्दलेखनाची लैच एक केलीय हो. सुनीताबाईंचा डोळा फार कडक हो ह्याबाबतीत. येऊ देणार नाहीत तुम्हाला शेजारी. ;)
  • Log in or register to post comments

सुधारणा केल्या आहेत

साहित्य संपादक
Mon, 06/13/2016 - 16:22 नवीन
योग्य त्या सुधारणा केल्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

खरच खुपच छान

प्रणवजोशी
Mon, 06/13/2016 - 14:58 नवीन
खरच खुपच छान
  • Log in or register to post comments

भावोत्कट

सुधांशुनूलकर
Mon, 06/13/2016 - 15:57 नवीन
खूपच छान.
  • Log in or register to post comments

भन्नाट. आइडीयाच आवाडली एकदम.

राजाभाउ
Mon, 06/13/2016 - 16:48 नवीन
भन्नाट. आइडीयाच आवाडली एकदम.
  • Log in or register to post comments

काय योगायोग आहे

सामान्य वाचक
Mon, 06/13/2016 - 16:54 नवीन
आजच राजू परुलेकरची पोस्ट वाचली चेपू वर कि पु ल कसे थोर ई ई नव्हते आणि आत्ता तुमचा हा लेख वाचला
  • Log in or register to post comments

अस्तात ओ...आंबा न आवडणार्या

टवाळ कार्टा
Mon, 06/13/2016 - 18:31 नवीन
अस्तात ओ...आंबा न आवडणार्या लोकांतले आहेत ते...बाकी आंबा न आवडणार्या लोकांना पु.ल.सुध्द्दा इतके काही खास वाटत नैत हा योगायोग समजावा का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

काय ठाव ब्वा

सामान्य वाचक
Mon, 06/13/2016 - 19:44 नवीन
मला दोन्ही आवडतात, मध्यमवर्गीय असल्यामुळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आंबा आवडत नै असं कोण, कधी

प्रचेतस
Mon, 06/13/2016 - 19:44 नवीन
आंबा आवडत नै असं कोण, कधी म्हटलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मस्त!

इशा१२३
Mon, 06/13/2016 - 16:59 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

मस्त!

इशा१२३
Mon, 06/13/2016 - 16:59 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

अप्रतिम

टवाळ कार्टा
Mon, 06/13/2016 - 18:30 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments

मस्त आवडले.

विवेकपटाईत
Mon, 06/13/2016 - 19:54 नवीन
मस्त आवडले.
  • Log in or register to post comments

मस्तच...

ईआ
Mon, 06/13/2016 - 19:57 नवीन
मस्तच...
  • Log in or register to post comments

फारच सुन्दर

दुर्गविहारी
Mon, 06/13/2016 - 20:05 नवीन
फारच सुन्दर. पु.ल. च्या पुण्यतिथीची उत्तम आदरान्जली
  • Log in or register to post comments

सुरेख , मनस्वी !!!

स्मिता_१३
Mon, 06/13/2016 - 22:28 नवीन
सुरेख , मनस्वी !!!
  • Log in or register to post comments

सुंदर !

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 06/13/2016 - 22:34 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments

"खूप इच्छा आहे 'चितळे

प्रफ
Tue, 06/14/2016 - 15:11 नवीन
"खूप इच्छा आहे 'चितळे मास्तरांना' एक नवीन चप्पल जोडी घेऊन द्यायची.." वाचुन पाणीच आल डोळ्यात..!! खुपच सुंदर लेखन. मला न्याल तुमच्या सोबत त्या गावाला??
  • Log in or register to post comments

मस्त

सत्याचे प्रयोग
Tue, 06/14/2016 - 15:24 नवीन
मस्तच त्या साठ कुटुंबांच्या चाळीत माझीही एक खोली असावी..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा