✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अपेक्षाभंग करणारा TE3N

ब
बोका-ए-आझम यांनी
Sun, 06/12/2016 - 10:02  ·  लेख
लेख
TE३N पाहिला. बरा आहे. थोडा confusing आहे. अजून छान होऊ शकला असता. दिग्दर्शकाने जर नवीन प्रयोग म्हणून Thriller चा वेग कमी ठेवला असेल तर तो प्रयोग कधीकधी पडतो. मुख्य problem हा आहे की लोक involve होत नाहीत. कथा involve होण्यासारखी असूनही. एक सत्तरीच्या घरातला माणूस, त्याची व्हीलचेअरला खिळलेली पत्नी. गेली ८ वर्षे तो दररोज पोलिस स्टेशनला भेट देतोय. ८ वर्षांपूर्वी त्याच्या नातीचं अपहरण झालंय आणि तिचा मृत्यूही झालाय. तिला न्याय मिळवून देणं आणि या अपहरणकर्त्याला लोकांसमोर आणणं हा या माणसाच्या जगण्याचा एकमेव हेतू आहे. कुठेतरी तो आपल्या नातीच्या मृत्यूसाठी स्वतःला जबाबदार धरतोय. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिका-यानेही नोकरी सोडलीय. तो आता चर्चमध्ये फादर आहे. काही घटना घडतात. एका लहान मुलाचं अपहरण होतं. त्यामुळे या ८ वर्षे जुन्या प्रकरणावरची धूळ झटकली जाते आणि पोलिसांना आता धर्मोपदेशक झालेल्या फादर मार्टिनची, एकेकाळच्या इन्स्पेक्टर मार्टिनची मदत घ्यावी लागते. ८ वर्षांपूर्वी अपहरणाचा गुन्हा करणारा आणि आत्ता अपहरण करणारा एकच माणूस असावा असे काही धागेदोरे पोलिसांना मिळतात. त्यावरून एक माणूस पकडलाही जातो. पण मार्टिनला काही शंका येतात. तो आपल्या पद्धतीने शोध घ्यायचा प्रयत्न चालू करतो आणि ... अशी एकंदरीत कथा आहे, जी खूप छान फुलवता आली असती, पण त्यातच दिग्दर्शक कमी पडतो. अग्ली मध्ये अनुराग कश्यपने जो ताण शेवटपर्यंत निर्माण केला होता तसा ताण इथे जाणवतच नाही. अमिताभ बच्चन मस्त. सत्तरीला आलेला, डोळ्यांत सतत अपराधी भाव असलेला जाॅन बिश्वास त्याने सुंदर उभा केलेला आहे. नवीन धागेदोरे मिळाल्यावर त्याच्या डोळ्यांत येणारी चमक तर जबरदस्त. त्याच्यासारख्या पडद्यावर अत्यंत smartly वावरणाऱ्या अभिनेत्याने संपूर्ण चित्रपटात, शेवट सोडला तर, एकदम बेंगरूळ, गोंधळलेल्या माणसाचं जे bearing घेतलं आहे, त्यासाठी तरी हा चित्रपट बघायला हरकत नाही. नवाजुद्दीनही तितकाच तोडीस तोड आहे. दोघेही एका frame मध्ये असताना चित्रपट पकड घेतो, पण इतर दृश्यांमध्ये ती ढेपाळते. दोघांमध्ये ठिणग्या उडाव्यात अशी अभिनयाची जुगलबंदी जरी झडत नसली तरी ते एकमेकांना अप्रतिम साथ देतात. विद्या बालनच्या व्यक्तिरेखेला श्रेयनामावलीत guest appearance असं का संबोधण्यात आलेलं आहे, हे अनाकलनीय आहे. तिची पूर्ण लांबीची व्यक्तिरेखा आहे. तिला दिग्दर्शकाने सुदैवाने पोलिस uniform दिलेला नाही. तो अत्याचार झाला असता. तिची एकदम एकसुरी भूमिका आहे. एकदाच तिच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दलचा संदर्भ येतो पण तेवढंच. चित्रपटाचा सर्वात मोठा problem म्हणजे यात मुख्य गुन्हा का घडतो याबद्दलचं स्पष्टीकरण इतकं filmy आणि न पटण्यासारखं आहे की ते समजल्यावर धक्का बसण्याऐवजी भ्रमनिरास झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे इमारतीचा सांगाडा आकर्षक पण बांधकाम पूर्ण झाल्यावर ' कुछ जमा नही ' असं वाटत राहतं. अजून एक. छायाचित्रकाराने टिपलेलं कोलकाता शहर अप्रतिम. In fact, शहर हीसुद्धा एक व्यक्तिरेखा आहे असं म्हणायला हरकत नाही. पण ज्याप्रकारे कहानी मध्ये कोलकाता, तिथले लोक, चालीरीती हे कथेत भिनतात तसं इथे होत नाही. त्यामुळे कहानी जसा कोलकाताशिवाय कुठे इतर ठिकाणी घडूच शकत नाही, तसं तीन चं होत नाही. तो दिल्ली, मुंबई - कुठेही घडू शकतो. चित्रपट जरी निराशा करतो तरी अभिनयाच्या जोरावर अमिताभ आणि नवाजुद्दीन आणि थोडीफार विद्या बालन त्याला उचलून धरतात. त्यासाठी तरी तो बघायला हरकत नाही. मी चित्रपटाला २ स्टार्स देईन. हा ५ स्टार्सवाला होऊ शकला असता. पण... ता.क. हा चित्रपट कोरियन चित्रपट Montage वरुन घेतल्याचा श्रेयनामावलीत स्पष्ट उल्लेख आहे. पण त्याबद्दल निर्माता - दिग्दर्शकाचं कौतुक करावं की उघडउघड copy पण नीट न केल्याबद्दल टीका करावी ते समजत नाहीये.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
7045 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

छान परिक्षण..

संजय पाटिल
Sun, 06/12/2016 - 10:33 नवीन
छान परिक्षण.. आता तुम्हीच बघायला हरकत नाहि म्हणताय तर बघतो एकदा..
  • Log in or register to post comments

छान परिक्षण.अमिताभसाठी

अजया
Sun, 06/12/2016 - 12:03 नवीन
छान परिक्षण.अमिताभसाठी कोणताही पिक्चर एकदा बघावाच लागतो!
  • Log in or register to post comments

गुपित

चलत मुसाफिर
Sun, 06/12/2016 - 12:10 नवीन
या चित्रपटाचे संपूर्ण अंतगुपित आंतरजालावर फोडण्यात आलेले असून ते कालच वाचले. अर्थात खरे-खोटे कळण्याचा काही मार्ग नसतो. पूर्वी धूम३ प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटात आमिर खान मरतो आणि त्याचा मुखवटा लावून कमल हासन वावरतो असे "गुपित" कुणीतरी फोडलेले वाचले होते! पण सदरचे परीक्षण वाचून, यावेळी वाचलेले कथानक बरोबरच असावे असे वाटते आहे.
  • Log in or register to post comments

पैशे वाचवल्याबद्दल आभार बोका

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 06/12/2016 - 12:16 नवीन
पैशे वाचवल्याबद्दल आभार बोका भाऊ गाववाले! कहानी ची फ्रेम वापरलेले एक अजुन थ्रिलर रसायन म्हणता येईल का ह्या सिनेमाला
  • Log in or register to post comments

अगदी अगदी.

बोका-ए-आझम
Sun, 06/12/2016 - 20:01 नवीन
पण कहानीला मी ४.५ स्टार्स दिले असते. त्यातला एकंदरीत suspense आणि ज्या प्रकारे प्रेक्षकाला बांधून ठेवलं होतं ते इथे दिसलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

मस्त परीक्षण

वाल्मिक
Sun, 06/12/2016 - 13:25 नवीन
मस्त परीक्षण ================================== स्वाक्षरी हाउस फुल ,झाली हौस करून http://www.misalpav.com/node/36320
  • Log in or register to post comments

..

आनंद कांबीकर
Sun, 06/12/2016 - 13:33 नवीन
'टे३ण' चा 'वजीर' झाला वाटतं.
  • Log in or register to post comments

चित्रपटाचा सर्वात मोठा

निशांत_खाडे
Sun, 06/12/2016 - 13:34 नवीन
चित्रपटाचा सर्वात मोठा problem म्हणजे यात मुख्य गुन्हा का घडतो याबद्दलचं स्पष्टीकरण इतकं filmy आणि न पटण्यासारखं आहे की ते समजल्यावर धक्का बसण्याऐवजी भ्रमनिरास झाल्यासारखं वाटतं.
TE3N आजच पाहिला. शंभर टक्के सहमत आहे.
  • Log in or register to post comments

खूप मस्तं परीक्षण!!

पद्मावति
Sun, 06/12/2016 - 14:37 नवीन
खूप मस्तं परीक्षण!! 5 स्टार चं potential असलेला सिनेमा चांगल्या दिग्दर्शकाच्या हाती पडला असता तर छान झालं असतं.
  • Log in or register to post comments

छान परिक्षण बोकेराव!

रेवती
Sun, 06/12/2016 - 17:45 नवीन
छान परिक्षण बोकेराव! जालावर आल्यानंतर शिनेमा पाहीन.
  • Log in or register to post comments

अमिताभसाठी हा चित्रपट पाहिन.

प्रचेतस
Sun, 06/12/2016 - 17:47 नवीन
अमिताभसाठी हा चित्रपट पाहिन.
  • Log in or register to post comments

मी काल बघणार होतो.

नाखु
Mon, 06/13/2016 - 14:27 नवीन
आणि अता अमिताभसाठी नक्की बघेन... लेकाने ह्याला विरोध दर्शवून कुठला तरी भुताचा सिनेमा बघायचा आहे म्हणून बेत हाणून पाडला. तो भुताचा सिनेमा नक्की कसा आहे हे मिपा भुतावळीने सांगावे. परिक्षण मापात (अजिबात) पाप न केलेले. अज्ञ पालक नाखु
  • Log in or register to post comments

हाच का?

चलत मुसाफिर
Mon, 06/13/2016 - 15:19 नवीन
The Conjuring 2 म्हणत असणार तो. अजून पाहायचाय, त्यामुळे मतशांतता. त्या दिग्दर्शकाचे The Conjuring 1 आणि Insidious हे दोन्ही horror चित्रपट जबरदस्त आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

हो

नाखु
Mon, 06/13/2016 - 16:37 नवीन
कुणीतरी इंग्लीश्वाल्यांनी सांगा कसा आहे तो. पुन्हा शंकावाला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

मतशांतता

बोका-ए-आझम
Mon, 06/13/2016 - 18:04 नवीन
हा शब्द आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

मुसाफिर भौ

मारवा
Mon, 06/13/2016 - 18:33 नवीन
त्या दिग्दर्शकाचे The Conjuring 1 आणि Insidious हे दोन्ही horror चित्रपट जबरदस्त आहेत अहो या चित्रपटाची मला किमान १० जणांकडुन बघच रे एकदा अशी शिफारस झालेली आहे. पण त्यात नक्की काय आहे ते कुणीच सांगत नाही. तु बघ फक्त म्हणतात सांगितल तर मजा जाईल आखिर ऐसा क्या है इस मुव्ही मे ? तुम्ही ही अस नका सांगु बघा फक्त थोडी तरी आयडीया द्या राव एकदम नाहीतर ४-५ तास वेस्ट होतात वाचत मुद्दाम नाही त्यात जास्तच माहीती समजुन जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

कॉन्ज्युरींग विषयी विचारतोय

मारवा
Mon, 06/13/2016 - 18:34 नवीन
अस काय वेगळ हॉरर आहे यात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

आसं आहे तर…

शि बि आय
Mon, 06/13/2016 - 15:23 नवीन
आसं आहे तर… तरी आपल्या तरुण म्हातार बाबांसाठी बघावा वाटतोय
  • Log in or register to post comments

छान परीक्षण

जगप्रवासी
Mon, 06/13/2016 - 15:25 नवीन
जालावर आल्यावर बघेन
  • Log in or register to post comments

वजीर सारखाच वाटतोय.

palambar
Mon, 06/13/2016 - 16:40 नवीन
वजीर सारखाच वाटतोय.
  • Log in or register to post comments

अमिताभसाठी पाहणारच.

रातराणी
Mon, 06/13/2016 - 17:13 नवीन
अमिताभसाठी पाहणारच.
  • Log in or register to post comments

आवडला

तिमा
Tue, 06/14/2016 - 08:56 नवीन
परीक्षण वाचल्यानंतर चित्रपट पाहिला तरीही आवडला. मला तरी रहस्य शेवट येईपर्यंत कळले नाही. अमिताभच्या अभिनयासाठी तरी जरुर पहावा, असे म्हणेन.
  • Log in or register to post comments

TE3N हेच चित्रपटाचे नाव आहे

सतिश गावडे
Tue, 06/14/2016 - 09:05 नवीन
TE3N हेच चित्रपटाचे नाव आहे की ही नावाची आद्याक्षरे आहेत?
  • Log in or register to post comments

त्यांनी नाव इंग्लीश चित्रपट

प्रचेतस
Tue, 06/14/2016 - 09:15 नवीन
त्यांनी नाव इंग्लीश चित्रपट Se7en ची कॉपी मारलीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

'त्यांनी नाव देताना' असे

प्रचेतस
Tue, 06/14/2016 - 09:15 नवीन
'त्यांनी नाव देताना' असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हा "ते तीन" नावाचा मराठी

सतिश गावडे
Tue, 06/14/2016 - 10:00 नवीन
हा "ते तीन" नावाचा मराठी चित्रपट आहे का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अरे आधी TEEN च असतंय, मग एक E

अभ्या..
Tue, 06/14/2016 - 10:53 नवीन
अरे आधी TEEN च असतंय, मग एक E अक्षर उलट फिरतंय आणि 3 होतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

One time watch…

विअर्ड विक्स
Tue, 06/14/2016 - 11:31 नवीन
One time watch… जझ्बा + कहानी = तीन ( तीन नाव हे माझी मते कथा तीन व्यक्ती भोवती फिरते , म्हणून असावे ). अमिताभ ची व्यक्तिरेखा जबरदस्त आहे.कथा विस्कळीत आहे. विद्या नि नवाझुद्दीन ला विशेष scope नाहीये. या दोघांच्या संवादातून त्या दोघांच्यातील नाते स्पष्ट होत नहि. बरेच असे मुद्देद आहेत…. बाकी ransom ( मराठी शब्द ? ) collect करण्याच्या कल्पनेसाठी सलाम ……. शेवटास दोन प्रसंग समांतर आहेत वा भूत- वर्तमान काळ यांची सांगड आहे हे कळले तरच चित्रपट कळला असे मानावे :)
  • Log in or register to post comments

खंडणी

सुबक ठेंगणी
Tue, 06/14/2016 - 12:39 नवीन
ransom ला खंडणी म्हणतात
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा