मिपावर आंबा पाककलाकृतींचा बराच पूर आलाय त्यात माझी ही एक लाट..हमखास यशस्वी कालाकृती.
सगळी भाचरुंडं लहान असताना रत्नागिरीला माहेरी गेलं की,न्याहारी ,जेवणात काहीतरी नवं करावं लागायचं.त्याआधी एक ट्रिप आजोळी गुहागरला व्हायचीच.तिथे आंबे महामूर.येताना आंब्या-फणसाची भेट ठरलेलीच. अजूनही माझ्याकडे आजोळाहून आंब्याची पेटी येतेच,गेले तरी आणि नाही गेले तरी.
भाचरुंडं माझ्या घरी आली कि मी माहेरी गेले कि माझा खवय्या भाचा मेन्यूकार्ड तयार करत असे,त्यात,सकाळच्या नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणापर्यांचे बेत ठरवलेले असत. कधी मला हवे ते बनवण्याची सूटअसे.नेहमी तेच खायला मुलांना अगदी आवडत नाही.तोच पदार्थ रूप बदलून पुढे ठेवला की,त्याचा चट्टामट्टा झालाच म्हणून समजा.
नेहमीच्या सांदणाचे नवे रूप म्हणजे ही इडली.तिथे खोबऱ्याचीची रेलचेल,कारण नारळ घरचेच. नारळाचे खोबरे आणि नारळाचे दूध वापरून तिथे भरपूर प्रयोग स्वयंपाकघरात केले जायचे,त्यातलाच हा हातखंडा प्रयोग.दर हंगामाला एका दोनदा होणारच.आता पुढच्या पिढीतही ही सिद्ध झालेली पाककृती संक्रमित झाली आहे.(आयते खायची सोय.)
साहित्य:-
१. एक वाटी आमरस.
२. एक वाटी दही.
३. एक वाटी रवा.(तांदूळ आणि गहू मिसळून घेतला तरी चालतं.)
४. एक वाटी साखर.
५. अर्धी वाटी दूध.
६. अर्धी वाटी ओले खोबरे.
७. एक चहाचा चमचा खायचा सोडा.(ऐच्छिक.दही आंबट असेल तर गरज नाही.)
८. पाव वाटी तूप.
९. नारळाचे घट्ट दूध लागेल तसे.तसेच किंवा साखर किंवा गूळ घालून गोड केलेले.(माझी आवड तसेच)
कृती :-
१. अनुक्रमांक एक ते सहापर्यतचे साहित्य एकत्र करून मिक्सरमधून काढावे.
२. त्यात खायचा सोडा मिसळून(हवा असला तर) तूप लावलेल्या इडलीपात्रात घालून नेहमीप्रमाणेच इडल्या उकडाव्या.
३. नारळाच्या दुधासोबत वाढाव्यात.
वाचने
15816
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे देवा!!!
+11
In reply to अरे देवा!!! by किसन शिंदे
अहाहा
लय भारी !!!
मस्त !!
सहमत!
In reply to मस्त !! by नीलमोहर
मस्त
मस्तच
मस्त दिसतोय फोटो.
राजा प्रजेचे कपडे घालुन
In reply to मस्त दिसतोय फोटो. by अजया
पण आंबा सांदण यम्म लागते.
ते काय असतं ? टाक ना रेसिपी.
In reply to पण आंबा सांदण यम्म लागते. by प्रीत-मोहर
हे आम्ही फारा वर्षांपूर्वी
In reply to ते काय असतं ? टाक ना रेसिपी. by सस्नेह
वेळुन काढणे म्हणजे काय?
In reply to हे आम्ही फारा वर्षांपूर्वी by सूड
पाणी गाळुन काढणे. म्हणजे
In reply to वेळुन काढणे म्हणजे काय? by स्रुजा
+१
In reply to पाणी गाळुन काढणे. म्हणजे by प्रीत-मोहर
काय? भात वाळवायचं फडकं??
In reply to पाणी गाळुन काढणे. म्हणजे by प्रीत-मोहर
ओ तै गरम गरम वाफाळत्या पेजभ
In reply to काय? भात वाळवायचं फडकं?? by पिलीयन रायडर
बर्र !! धन्यवाद :)
In reply to पाणी गाळुन काढणे. म्हणजे by प्रीत-मोहर
आंब्याचे सांजण
सही!!
हटके रेशिपी!! यावेळी आलेले
आणि
In reply to हटके रेशिपी!! यावेळी आलेले by सूड
=))
In reply to आणि by सूड
झकास!
हात जोडले
इडली / सांदण मस्तच दिसते आहे.
मस्त दिसतेय!
दिसतीये छान. सांदण म्हणुन
भारीये! एकदम मस्त आयडिया.
मस्त
वेगळीच रेसेपी..!! आवड्ली! तू
खुप छान