मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गिरिस्थानांची सम्राज्ञी ............उधगमंडलम (उटी)

शान्तिप्रिय · · भटकंती
आमची गिरिस्थानांची राणी असलेल्या उटीला भेट देण्याची इच्छा या उन्हाळ्यात पूर्ण झाली.त्याबद्दल संक्षिप्त वृत्तांत देत आहे. काही फोटू जालावरून साभार मैसूर हून बंदीपूर मार्गे निघून आम्ही दुपारी ३ च्या आसपास उटी मध्ये पोहोचलो. बंदीपूर हे कर्नाटकातील व व्याघ्र प्रकल्पाचे ठिकाण आम्ही दुपारी त्या भागात प्रवास करत असलेने आम्हाला फक्त काही सुंदर हरिणांचे दर्शन झाले याशिवाय काही वानरे आणि मोर आणि रान डुक्करे दिसली . बंदीपूर नंतर तामिळनाडू राज्यातील मदुमलाई व्याघ्र प्रकल्पाचा चा भाग सुरु होतो. येथेही आम्हाला काही वानरे (ग्रे लंगूर) दिसली. वास्तविक गाडीवानाने आम्हाला येथे हत्ती सहज दिसतात असे सांगुन ठेवलेमुळे आम्ही खूप उत्सुक होतो पण आमची निराशा झाली. असो. भयंकर उन्हाळा असलेमुळे जेवढे प्राणी दिसले तेवढे काही कमी नाही अशी आम्ही मनाची समजून काढून पुढे निघालो. 1 मदुमलाईनंतर एक घाट लागतो तो आपल्याला उटीला वर पोहोचवतो. या घाटात अतिशय अवघड हेअर पिन सारखी वळणे आहेत. यातून गाडी चालवणे म्हणजे ड्रायवरच्या कौशल्याची कसोटी व सैर करणे हा प्रवाशांना एक सुंदर अनुभव आहे. एकूण ३६ हेअर पिन वळणे पार केल्यावर उटी लागते. प्रथमदर्शनी उटी म्हणजे एक पर्यटनाचा एक गोंधळ असलेला बाजार वाटला पण आम्ही जेव्हा कर्नाटक पर्यटनाच्या आमच्या हॉटेलात वस्ती साठी पोहोचलो तेव्हा उटीच्या सौंदर्याची कल्पना आलो. हे हॉटेल म्हणजे एक वारसास्थळ आहे. हे हॉटेल मैसूर च्या राजांच्या मालकीच्या जागेत आहे. हॉटेल मधील जुने दिवाण ,कपाटे इ . पाहून याची कल्पना येते. हॉटेल फार काही पॉश नसले तरी मालक आणि सेवक आतिथ्यशील आहेत. तसेच हॉटेल च्या बाहेर अतिशय सुंदर पुष्प उद्यान आहे. कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है हेच खरे! एक आनंदाची गोष्ट म्हणजे तिथे आलेल्या पाहुण्यात ९५% टक्के लोक मराठी होते. मराठी माणसाचे पर्यटन उद्योगास असे भरभरून योगदान पाहून अभिमान वाटला. खाली या उद्यानातील काही फोटू दिले आहेत. 2 3 3a त्या संध्याकाळी हॉटेल च्या बागेत मनसोक्त फिरून आम्ही नंतर विश्रांती घेउन दुसरे दिवशी उटी पर्यटन चालू केले. सुरुवातीला आम्ही छोट्या ट्रेन ने उटी वरून कुन्नूर ला गेलो. सुमारे अठरा किमी चे अंतर ही गाडी एका तासात पार करते, सुंदर डोंगर , जागोजागी भले मोठे निलगिरीचे जंगल , चहाचे मळे त्यातून तोंड काढणारे छोटे छोटे निलगिरी तेल आणि चहाचे छोटे कारखाने पाहात या गाडीतून कुन्नूर ला जायला फार मजा येते. ही गाडी युनेस्कोच्या वारसा स्थळात सामील आहे. उटी कुन्नूर ट्रेन आणि मार्ग : uct1 uct2 uct3 कुन्नूर ला फिरताना ठिकठिकाणी चहाचे मळे पाहून मन प्रफुल्लीत होते. याशिवाय ठिकठीकाणी गाजराचीही लागवड आहे. चहाचा एक मळा अभिनेत्री मुमताज च्या मालकीचा आहे असे कळले . विशेष म्हणजे प्रत्येक चहाच्या मळ्यात प्रती १०० चौरस मी अंतरावर एक सिल्वर ओक चे झाड असते. हे झाड पाणी साठवण्यास मदत म्हणून काम करते असे कळले. आमच्या टूर गाइडने सर्व बागांबद्दल माहिती सांगितली. विशिष्ठ प्रकारच्या पानांपासून ग्रीन टी , रेड टी वगैरे बनवतात असे सांगितले. काही विशिष्ठ पाने कोणतीही प्रक्रिया न करता सूर्यप्रकाशात ठेवली असता व्हाईट टी बनतो जो खूप औषधी असतो अशी माहिती मिळाली. tf1 tf2 tf3 नंतर आम्ही डॉल्फिन नोज पोईंट आणि स्लीपिंग लेडी व्यू हे पोईंट पाहिले. पर्यटनाचा शिखर काळ असलेमुळे , खूप गर्दी होती पण , हि ठिकाणे निट पाहू शकलो. डॉल्फिन नोज पोईंट म्हणजे डॉल्फिन नोज च्या आकाराचा कडा. dn1 स्लीपिंग लेडी व्यू म्हणजे एका झोपलेल्या मदनिकेचा आकार असणारे डोंगर होते. dn2 यानंतरच्या दिवशी आम्ही उटी शहरातील प्रेक्षणिय जागा पाहिल्या उटीत अनेक छोटे चहाची कारखाने आहेत. चहाचा कच्चा माल म्हणजे अर्थातच , चहाची हिरवीगार पाने. ही पाने प्रक्रिया करून , तापवून त्यांचे ऑ क्सिडायजेशन झाल्यावर रंग बदलतो व मग ती यंत्राच्या साहायाने चुरडून वेगवेगळ्या प्रकारचे चहा बनवतात. tt1 tt2 tt3 tt4 उटीत दक्षिण हिंदुस्थानातील सर्वात मोठे शिखर दोड्डबेट्टा पिक आहे. येथून पायथ्याला सुंदर दरीचे दर्शन होते. याशिवाय कोइमतूर व मेट्टुपलायम हे भाग ही इवले इवले दिसतात. db1 db2 db3 उटिचे सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे बोटनिकल गार्डन. या बागेल सुंदर पुष्पवल्ली आहेत. परंतु वनस्पतींची माहिती मात्र फ़ारशी लिहून ठेवलेली नाही. काही सुंदर फोटू देत आहे. याशिवाय येथे हिंदुस्थानच्या नकाशावर सुंदर पेरणी केली आहे. तसेच एक २० दशलक्ष वर्षांपूर्वीच्या झाडाचे जीवाष्म जपून ठेवले आहे. असे म्हणतात की या प्रकारचे झाड फक्त तामिळ नाडूत उपलब्ध होते. आम्ही गेलो त्याच्या दुसऱ्या दिवशी फ्लॉवर शो होता तसेच नुकतीच निवडणूक आणि निकाल झालेमुळे ललिता अम्मांचे होर्डिंग लावले होते. og1 og2 og3 og4 og5 og6 og7 याशिवाय एक ऑफ बीट ठिकाण म्हणजे थ्रेड गार्डन . हे काय? अशी उत्सुकता आम्हाला लागली होती. हे एक संग्रहालय असून येथे धाग्यापासून बनवलेली रोपटी ठेवली आहेत. प्रत्येक वनस्पतीचा आणि पुष्पवल्लीचा सभ्यास करून रंगीत धाग्याच्या सहायाने फुले व रोपटी तयार केली आहेत.सुंदर कला. उटी सरोवराच्या समोर हे ठिकाण आहे. tg1 tg2 tg3 tg5 नंतर संध्याकाळी उटी सरोवरात विहार करून आम्ही जड अंत:करणाने उटी चा निरोप घेतला. ol1 ol2 एकंदरीतच ही सहल मस्त झाली आणि आधीच्या माहितीप्रमाणे “ Queen of hill stations “ हे विशेषण सुध्धा उटीच्या सौंदर्याला अपुरे आहे याची आम्हाला खात्री पटलि . ranee

वाचने 4669 वाचनखूण प्रतिक्रिया 8

कंजूस Tue, 06/07/2016 - 21:20
थोडक्यात छान! इकडे आर्किडची बाग आहे का? म्हैसुरवरून एक दिवसात उटी करून आणणाय्रा सहलीत परत येतानाची मुदुमलाइतली वेळ साडेपाचची असते तेव्हा असंख्य प्राणी रस्त्याच्या कडेनेच येऊन उभे असतात.तेसहजच बघायला मिळतात.

बहुतेक तुम्ही उटी च्या याच हॉटेल मध्ये थांबला असाल. "हॉटेल मयुरा सुदर्शन". मी सकाळी फेरफटका मारत असताना हा फोटो काढला. खूप सुंदर हॉटेल आहे हे. समोरील बाग पण सुंदर आहे. पण या हॉटेल मध्ये जायला जंगलातून खूप आत जावे लागते. फोटो छान आलेत. फक्त फोटोची विदथ मोठी करा. aa

शान्तिप्रिय Wed, 06/08/2016 - 10:58
सर्वांना मनापासुन धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच सवड काढुन निरनिराळी ठिकाणे पाहुन व्रुत्तांत लिहायला स्फूर्ति मिळते. @कंजूस होय ती आर्किडचे फुले असावित. तसेच तुम्हि सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी मदुमालाई भागात प्राणी दिसत असतील. आमची वेळ चुकलीच! @राजकुमार - होय हेच ते होटेल. होटेल जरी लांब असले तरि सुंदर आहे. @पियुशा : होय अतिशय फ्रेश वाटते उटीत.त्यावेळी संध्याकाळी ९ अंश तापमान होते.