Skip to main content

अधोगती

Published on सोमवार, 06/06/2016
संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या १४ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली.तुकोबारायांनी देखील वय वर्ष १४-१५ च्या आसपास किंवा त्याही आधी पहिला अभंग रचला असावा.समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक जेव्हा त्या काळातील समाजाच्या कानांवर पडायला सुरवात झाली तेव्हा त्यांचे वय १० पेक्षाही कमी होते.जिजाऊंनी श्री राम, कृष्णाच्या कथा सांगत घडवलेले शिवप्रभु शिवराय यांचे वय होते अवघे १४ जेव्हा त्यांनी शिवपिंडीवर स्वता:च्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली.तर.. शंभु बाळांनी शास्त्र आणि क्षस्राच्या संस्कारात भिजत"बुधभुषण" नामक ग्रंथ लिहीला तो देखील वयाच्या १६ व्या वर्षीच.अशी कैक उदाहरणं आहेत आपल्याकडे. अगदी विष्णुगूप्त चाणक्य पासुन ते स्वामी विवेकानंद, बाळगंगाधर टिळक, सावरकरां पर्यन्त.ह्या सगळ्यां संत पुरूषांमध्ये समान धागा हाच कि हे सगळे, धर्म आणिमातृभुमी वरील अफाट प्रेमाने झपाटलेले होते. ह्या सगळ्यांमधे प्रचंड उर्जा होती ती समाजाच्या कल्याणाची, प्रगतीची, स्वता:च्या अध्यात्मिक उन्नतीची.आम्हाला आता ज्या वयात "होशील का माझ्या पोराची आई" सुचतय ना, त्याचवयात ती पिढी लिहित होती..इस कदर वाकिफ है,मेरी कलम मेरे जज्बातोसे ।मै इश्क लिखना भी चाहू,तो भी इन्कलाब लिखा जाता है ।।एकीकडे एैन तारूण्यात असं लिहिणारे भगतसिंग तर दुसरीकडे"तुझ्याशिवाय करमेना" अशा वयात १८ वर्षाची सुंदर पत्नी, ६ महिन्याचं गोंडस बाळ ह्यांना सोडून देश धर्मासाठी घराबाहेर पडणारे २१ वर्षीय सावरकर. आख्खी पिढीच अजब.ह्या सगळ्यांचीच वयं जरी १५, १६ , २० असली तरी त्याची प्रोसेस काही वर्ष आधीच सुरू झाली असणार हे वेगळे सांगायलाच नको.अशा कोणत्या मातीत ह्या व्यक्ती घडल्या असतील? नेमके कोणते संस्कार ह्यांच्या मनावर बिंबवले गेले असतील की अशा तेजस्वी विचारांची ही माणसं निर्माण होत होती?आज अनेक शतकं उलटल्यानंतरही अशा महापुरूषांची आठवण झाली तरी शरीरावर रोमांच आल्याशिवाय राहत नाही, मान आदराने खाली झुकते, हात आपोआप जोडले जातात. मनातले भाव जागे होतात, डोळे पाणवतात, एका वेगळ्याच आनंदाने मन अगदी भरून पावतं.हे अशा प्रकारचे अनुभव आपल्यापैकी ब-याच जणांना कधीना कधीतरी आलेले असतात.पण आता...गेल्या काही दशकात ही परिस्थिती अगदीच बंद झाल्याचं जाणवतय. चांगली पीढी जन्माला येण्याचं संपलंय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. शाळकरी मुलं फक्त व्यसन आणि अश्लीलते कडे झुकलेली दिसते आहे.ज्या वयात पुर्वी प्रतिभावान संत जन्माला येत होती त्या वयात आता वर्तमान काळात गावगुंड निर्माण होत आहेत. वय वर्ष १६ व्या मधील मुलं व्यभिचार आणि बलात्कारा सारख्या हिडीस प्रकारात पडलेले आढळतायत. दिल्लीतील चालत्या बस मधे घडलेला बलात्कार काय किंवा मुंबईच्या मिल परिसरातला बलात्कार काय! ही सगळी त्याचीच साक्ष. किशोरवयीन मुलं.. खुन, लफडी, मारामारीत आघाडीवर आहेत. शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांनाहातात सिगारेट असणं अन् तोंडात शिव्या असणं आता अभिमानाचं झालंयही अशी पीढी उद्या प्रौढ होऊन कशी मुलं जन्माला घालतील आणि काय संस्कार करतील ह्याचा विचार न केलेलाच बरा.आपले वैदिक ग्रंथ सांगतात की जर एक पिढी बरबाद झाली की पुढच्या पाचपिढ्या बरबाद होतात.मग चांगला समाज निर्माण होणारच कसा?इंग्रजांनी आमची गुरूकूल शिक्षण पध्दती बंद केली. आणि तिथूनच आपल्या राष्ट्रीची अधोगती सुरू झाली.सर्वात आधी आम्ही आमची भाषा विसरलो. मातृभाषेची जागा कमकुवत इंग्रजी ने घेतली. मग हळुच सुरवात झाली ती आमचा जाज्वल्य इतिहास पुसण्याची. जे जे वाईट ते ह्या मातीतलं आणि जे जे चांगलं ते फक्त परकीयांचं हे आमच्या मनावर बिंबवायला लागले. विमानाचा शोध आमचा नाही. आयुर्वेद आमचं नाही, अणुरेणु आम्हाला माहीत नाही, विज्ञान आम्हाला माहीत नाही, गुरूत्वाकर्षण, खगोलशास्त्र, भुशास्त्र, सर्जरी सगळं सगळं ह्यांच.जर आमच्याकडे काहीच नव्हतं तर मग आमच्यावर गेली अनेक शतके इतकी आक्रमणं का?आक्रमणं आधी आमच्या भाषेवर, मग इतिहासावर, मग सणांवर, त्यानंतर देवदिकांवर आणि आता... देशावर. आमचा प्रत्येक सण, प्रत्येक दैवत ह्यांचं टार्गेट. ह्यातूनच जन्माला यायला लागली fxxk yaar, टच वुड बोलणारी आणि ईशवराला नाकारणारी असुरी पिढी. पाश्चात्य शिक्षण देणा-या विद्यापीठातून (?) तयार झाले कन्हैय्या सारखे अक्कलशुन्य देशद्रोही राक्षस. आमचे संस्कार बदलले, आदर्श बदलले. जिजाऊ, राणी पद्मिनी आऊटडेटेड तर सनी लिओन, आलिया भट ह्या आत्ताच्या पिढीची आयडाॅल झाली. पाॅर्न पाहणारा सगळ्यात मोठा देश भारत झाला. कुंकू, टिकली, चुडा साडीतली आई माॅड मम्मा झाली. तीला जिन्स आणि लो बॅक टाॅप जास्त कनर्फटेबल वाटू लागला.ह्या अधोगतीला सगळ्यात मोठा हातभार लावला तो ह्या सिनेसृष्टिने. हाताच्या बोटावर मोजणारे सिनेमे सोडले तर बाकी सगळेच "धन्यवाद" आहेत. पहिला आघात ह्या सिनेमांनी केला तो अभिजात संगीतावर, प्रत्येक गाणं खुदा, दुवा, मौला, इश्क, अल्ला, अशा परक्या उर्दु शिवाय पुरे होईनासे झाले. देवळं ही भ्रष्टाचारची केंद्र तर कबरी वरती चादर हे खुदा गाॅड कडे पोहचण्याचं माध्यम असं चित्र रंगवलं गेलं. आणि आता टार्गेट आहे नुकतीच वयात आलेली किशोरवयीन पिढी.सध्याचे चित्रपट आम्हाला शिकवतात ब्ल्यु फिल्म पाहणं गैर नाही, प्रेमात पडणं म्हणजेच उदात्तीकरण, हातात सिगरेट आणि वाईनचा ग्लास असणं स्टेट्स सिंबाॅल आहे. तुला बाॅयफ्रेंड किंवा तुला गर्लफ्रेंड नसण हे अपमानास्पद आहे.लहान वयातलं प्रेम दाखवले की मगच राष्ट्रपती पारितोषिक मिळवण्याचा मार्ग मोकळा होतो कि काय असा प्रश्न पडावा.असे पारितोषिक जाहिर करून शासन नेमके कोणते संस्कार घडवतय समाजावर????ह्या नॅशनल अॅवोर्ड चा नेमका हेतु काय? ह्यातून नेमके कोणते समाजकल्याण होणार आहे? किंवा आत्ताच्या पिढिचा कोणता उत्कर्ष, उन्नती होणार आहे. ह्या असल्या पारितोषिकांमुळेसमाजात जाणारा संदेश हा योग्य आहे का?की अशाच प्रकारचा समाज निर्माण होणं अपेक्षित आहे?दोन पिढ्यांमधील फरक ठळकपणे जाणवतोय.एक उत्कर्षाकडे जाणारी. आणि..दुसरी अधोगतीकडे जाणारी.संभ्रम...संभ्रम...आणि फक्त संभ्रम.दोनच गोष्टी कळतायतआपला देश विदेशी शिक्षणाचं इंधन भरून, टाॅप गिअर टाकून अधोगती कडे चाललाय...आणि दुसरं समर्थ रामदासांचे शब्द २४ तास डोक्यात रेंगाळतायत, ते म्हणजे...अखंड असावे सा..व..धा..न *आधारित

वाचन संख्या 3740
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

अरे व्वा. केवढा समग्र आढावा. एकेक मुद्दा जब्बरदस्त

उल्लेखीत महापुरुषांचे चरित्र, विचार निश्चीतच अत्यंत आदरणीय आणि अनुकरणीय आहेत. पण आजच्या काळात ते सर्व लोप पावलय असं काहि नाहि. किंबहुना त्या काळात सामान्य जनता आम आदमीचे सर्व गुणदोष बाळगुन होती म्हणुनच या महापुरुषांना समोर यावं लागलं. तसच आजही अनेक लोक आपल्यापरिने गोवर्धनाला काठ्या लाऊन असतात. सर्व काळात एकुण समाजाची गोळाबेरीज सारखीच असते.

In reply to by अर्धवटराव

सहमत... उगाच आताची पिढी ती खराब आणि पुर्वीचं सगळं ते चांगल असं मानण्यात अर्थ नाही. आता आपल्या देशातील १४-१५ वर्षाची काही मुले गणित वा शास्त्र विषयातील ऑलिम्पियाड स्पर्धांत यश मिळवतात. आणि इंग्रजांमी रुजवलेल्या पाश्चात्य शिक्षणपद्धतीला दोष देणे योग्य होणार नाही. याच शिक्षणपद्धतीतून अनेक नामवंत वकील, बॅरिस्टर घडलेत ज्यांनी समाजसुधारणा , स्वातंत्र्यप्राप्तीत उल्लेखनीय योगदान दिले अनेक शास्त्रज्ञ, अर्थतज्ञ घडलेत, शास्त्रीय दृष्टीकोन काही प्रमाणात रुजला जर आजचे शिक्षण बिघडले असेल तर त्याला आपली भ्रष्ट व्यवस्था जबाबदार आहे , शिक्षकांच्या कायमस्वरुपी भरतीकरिता २-५-१० लाखांच्या मोठ्या रकमा घेणारे संस्थाचालक, राजकारणी यांनी शिक्षणाची वाट लावली आहे. विशेष गुणवत्ता नसलेले लोक शिक्षक बनत आहेत कारण कोणत्याही हुशार , गुणवंत मुला वा मुलीच्या पालकांना वाटत नाही की आपल्या पाल्याने शिक्षक बनावे.

आजच्या परिस्थितीवर मार्मिक प्रहार

सनी लिओन, भोगसुखदर्शक चित्रपट, विवाहपूर्व भिन्नलिंगी मैत्री या मुद्द्यांचा सावरकर- भगतसिंहांशी काहीही संबंध नाही. भारताता व्यापक सांस्कृतिक बदल होत चालले आहेत हे खरे. पण ते सर्वच्या सर्व विघातक आहेत हा विचार पटत नाही. पहिली स्त्री रंगमंचावर आली, पहिला चित्रपट बनला, पहिली मुलगी शाळा शिकली, नोकरीला लागली, पहिले बाहीछाट पोलके शिवले गेले, पहिले दूरदर्शन केंद्र उघडले अशा अनेक घटनांच्या वेळी "संस्कृती बुडणार हो!"चा आक्रोश झाला होता. आक्रोश करणारे गेले. संस्कृती अजून आहे.

तुम्ही काय करत होतात हो वयाच्या सोळाव्या वर्षी ?

काही (आणि हो काहीच मुद्दे) विचार करण्यास प्रवुत्त्/भाग पाडणारे आहेत. तरी एकूण सुर सगळ कसं अधोगतीकडे वाटचाल करतयं असा भयावह चित्र रेखाटणारा आहे. ज्या पिढीने जाजवल्य देशाभिमान आणि स्वातंत्र्य पश्च्चात भारताची सुराज्य स्वप्ने दाखविली त्यांचेही व्यवस्थीत स्खलन झालेच (माणसे तीच होती, परिस्थीती बदलली,प्राधान्य बदलले) आमटे परिवार समाजकार्य,अभय बंग समाजकार्य्,नक्षलवादाचा बहुअंशी बीमोड,माध्यमांचा काही अंशी अंकुश आणि लोकांना जमेस धरण्याचे दिवस मागे पडले. जुन्याचा माज करावा अश्या काही घटना असल्या तरी लाज वाटावी अश्याही घटना असणारच (नव्हे आहेतच). तस्मात जुन्या/नव्याचा कशाचाही (विनाकारण)माज करू नये आणि लाजही (विनाकारण) वाटू नये. फायदे तोटे दोन्हीकडे भरपुर आहेत. गतीमान नाखु

अधोगती खरंच आहे? आपल्या मिपाकरांकडेच पहा. ब्याट्या, अभ्या, गावडेसर, प्रगो त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उत्तुंग यश मिळवलेली मंडळी.

In reply to by प्रचेतस

त्यांच्या मते , जास्तीत जास्त २१ वर्षे ही महान कार्ये करायची वयोमर्यादा आहे. त्यानन्तर केले असेल तरीही ती अधोगती मानण्यात येणार.. तुम्ही सुचवलेल्या मिपाकारामध्ये हाये का कोणी असे महान ? आमची तर केव्हाच अधोगती झालीये...

In reply to by प्रचेतस

ब्याट्या बाराव्व्या वर्षीच गधेगाळ लिहीत होता म्हणे!

ज्या काळातली उदाहरणे तुम्ही दिली आहेत, त्याकाळात मुली सोळाव्या वर्षीच माता बनत होत्या.. मग आता नविन पिढी जुन्या वळणावर जाऊन "होशील का माझ्या पोराची आई" म्हणतात, तर तुम्हास आनंद व्हावा का नाही .. :)

१. समाज हा बदलणारा असतो. पूर्वीही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे समाजसुधारक आणि देशप्रेमी होऊन गेले. आता प्रश्न बदलले आहेत तरी समाजसुधारणेसाठी काम करणारे लोक आहेतच. २.
शाळकरी मुलं फक्त व्यसन आणि अश्लीलते कडे झुकलेली दिसते आहे.ज्या वयात पुर्वी प्रतिभावान संत जन्माला येत होती त्या वयात आता वर्तमान काळात गावगुंड निर्माण होत आहेत.
हे सरसकटीकरण झाले. तुमच्या -आमच्या सर्व घरातली मुले एवढेच करतायेत का? (आज दहावीचा निकाल आहे म्हणे. अभ्यास न करता असेच उद्योग केले तर निकाल कसा लागायचा?) ३. गुरुकुल शिक्षणपद्धतीत किती लोक शिकत होते? शिक्षणाचा प्रसार झाला ही प्रगती नाही का? ४. कुंकू, चुडा, साडी - कपाळावर उभा- आडवा गंध, धोतर... अजून जबरदस्त मुद्दे आहेत, पण कंटाळा आला.

तुमची तळमळ समजली. पण..
गेल्या काही दशकात ही परिस्थिती अगदीच बंद झाल्याचं जाणवतय. चांगली पीढी जन्माला येण्याचं संपलंय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. शाळकरी मुलं फक्त व्यसन आणि अश्लीलते कडे झुकलेली दिसते आहे.
हे प्रचंड सरसकटीकरण नाही का? गेल्या काही दशकातील शाळकरी मुलांमध्ये मी आणि मिपावरील अनेक आले. आमच्यापैकी किती फक्त व्यसन आणि अश्लीलतेकडे झुकलेले होते/आहेत?
ज्या वयात पुर्वी प्रतिभावान संत जन्माला येत होती त्या वयात आता वर्तमान काळात गावगुंड निर्माण होत आहेत.
यावरून एक गोष्ट आठवली. जुन्या पिढीतला एक माणूस आपल्या मुलाला म्हणतो-- "शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला होता. आणि तू काय करत आहेस"!! त्यावर मुलगा म्हणतो----"शिवाजी महाराज तुमच्याएवढे असताना त्यांचा राज्याभिषेकही झाला होता"... पुढचे सूज्ञांस सांगायची गरज नाही.