✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गझल :- जंगलातले नियम इथे लावायचे

स — स्वामी संकेतानंद, गुरुवार, 06/02/2016 - 07:35
मानवांस खूळ लागले धावायचे जाणतील ते कधी, कुठे थांबायचे? घाबरून राहिले सदा काठावरी सांगतात आज ते, कसे पोहायचे! 'माज' जो समाज मिरवतो आभूषणे नम्र राहुनी तिथे कसे चालायचे? गोंधळात यारहो , तलत मी ऐकतो शान्तिदूत रोज रोज का शोधायचे? कोणत्या युगात ते मला नेतील रे? 'काम फ़क्त आपले खुळ्या चालायचे' टांगतील? जाळतील? भोसकतील का? ठरवतील आज ते, कसे मारायचे कोण तू? विचारतो कुणाला प्रश्न तू? तो म्हणेल 'नाच!' आणि तू नाचायचे शायरास त्या म्हणे मिळाली सूचना शेर आपले लिहायचे, फाडायचे काल बोलला कुणीतरी 'स्वामी' पुन्हा जंगलातले नियम इथे लावायचे - स्वामी संकेतानंद

प्रतिक्रिया द्या
1410 वाचन

💬 प्रतिसाद (6)

ज्जे बात

चाणक्य
गुरुवार, 06/02/2016 - 10:02 नवीन
झकास.
  • Log in or register to post comments

ही द्विपदी सर्वात आवडली.

यशोधरा
गुरुवार, 06/02/2016 - 11:13 नवीन
शायरास त्या म्हणे मिळाली सूचना शेर आपले लिहायचे, फाडायचे
  • Log in or register to post comments

सुंदर...

अनिरुद्ध प्रभू
गुरुवार, 06/02/2016 - 16:25 नवीन
घाबरून राहिले सदा काठावरी सांगतात आज ते, कसे पोहायचे!
विशेष आवडले
  • Log in or register to post comments

घाबरून राहिले सदा काठावरी

कानडाऊ योगेशु
Sat, 06/04/2016 - 22:06 नवीन
घाबरून राहिले सदा काठावरी सांगतात आज ते, कसे पोहायचे! आणि टांगतील? जाळतील? भोसकतील का? ठरवतील आज ते, कसे मारायचे हे दोन शेर विशेष आवडले.
  • Log in or register to post comments

छान..लाइकलेी गझल

अविनाशकुलकर्णी
Sat, 06/04/2016 - 23:32 नवीन
छान..लाइकलेी गझल
  • Log in or register to post comments

झकास!

पैसा
Sun, 06/05/2016 - 21:31 नवीन
नेहमीप्रमाणे मस्त लिहिलीस!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा