अवीनाश, त्याचे काही खास कारण नसावे.
आपण लिहिताना (जरी लिहिण्यासाठी उजव्या हातात लेखणी असली तरीही) किंवा वाचताना डावीकडुन उजवीकडे लिहितो / वाचतो.
डाव्या बाजूला प्रथम स्थान देतो. लहान असल्यापासून तशी घडण होत असणार.
आपण मराठी/ हिंदी/ इंग्लिशमध्ये लिहीतांना डावीकडून उजवीकडे लिहीत जातो, केवळ ह्यावरून आपल्याला ही सवय पडली असावी काय? तसे असल्यास इथे कुणी उर्दूभाषिक असतील तर त्यांनी ह्याबाबतीत त्यांचे निरीक्षण सांगावे.
मी बहुतेक वेळेस डाव्या पायाचा मोजा उजव्या पायात आणि उजव्या पायाचा मोजा डाव्या पायात घालतो. मग चूक लक्षात आल्यावर बदलतो. ;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
मी बहुतेक वेळेस डाव्या पायाचा मोजा उजव्या पायात आणि उजव्या पायाचा मोजा डाव्या पायात घालतो. मग चूक लक्षात आल्यावर बदलतो.
दोन पाय आणि दोन मोजे एव्हढचं माहिती होतं ... डाव्या आणि उजव्या पायाला वेगवेगळे म्हणजे जरा लयीच झाल ;)
"पण सॉकला डावं-उजवं नसतं" - मास्टर शंकर, असा मी असामी!
"मोजा हा पायात घालण्याचाच प्रकार असताना त्याला पायमोजा का म्हणतात", असा धागा काढावा का नाही यावर एक कौल टाकण्याचा विचार सुरू आहे.
स्वगतः च्यायला काहीही प्रश्न पडतात लोकांना. कुठलाही मोजा आधी चढवा, मोजे घाला नाहीतर नका घालू, चपला, सँडल घालून मोजे घाला नाहीतर बूट घातले तरीही मोजे नका घालू, काय ** फरक पडतो?
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
>>मोजा हा पायात घालण्याचाच प्रकार असताना त्याला पायमोजा का म्हणतात
फक्त पायात नाही हातात सुद्धा घालतात की. हातात घालायच्या मोजांना हातमोजे म्हणतात
>>स्वगतः च्यायला काहीही प्रश्न पडतात लोकांना. कुठलाही मोजा आधी चढवा, मोजे घाला नाहीतर नका घालू, चपला, सँडल घालून मोजे घाला नाहीतर बूट घातले तरीही मोजे नका घालू, काय ** फरक पडतो?<<
+१ :D
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
मी बहुतेक वेळेस डाव्या पायाचा मोजा उजव्या पायात आणि उजव्या पायाचा मोजा डाव्या पायात घालतो. पण चूक लक्षात आल्यावरही तसाच ठेवतो, कोणाला पडलीये बुटात डोकवायची?
सर्वप्रथम अविनाशजी यांचे अभिनंदन व अनेक धन्यवाद की हा धागा पायमोज्या संबधी ठेवला अजुन वर नाही नेला. याला काहि खास शाश्त्रीय किंवा मानस शाश्त्रीय कारण असेल का? यावर कुणी प्रकाश टाकु शकेल का?
पुढचा लै भारी धागा काढण्याअगोदर हा गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बघा.
लय भारी रे सहजा...
अविनाश ला ते ही वर्ज्य नाही. तो आता पायाशी आहे. आता उद्यापर्यन्त सरकेल वरती.
खरं तर लेखक अविनाश, विषय पायमोजा आणि ३६ प्रतिसाद असे पाहून काहीतरी तसलाच प्रकार असेल असे वाटले होते. पण काही प्रश्न नाही. अविनाश उद्या करेल पूर्ण आपली अपेक्षा.
अहो काय फरक पडतो.कुठल्याही पायात आधी मोजे घातले तरी ,दोन्ही पायात मोजे घातल्याशिवाय जागेवरुन उठता येत नाही. आणी कुठला मोजा आधी घातला याच्या पेक्षा त्या मोजांना वास येत आहे का हे बघणे जास्त महत्वाचे.
माझ्या मते मोज्याचा वाश घ्यायच्या भानगडीत पडू नये. मोजे धुवायला झाले आहेत का ते बघण्याचा उत्तम मार्ग, म्हणजे मोजे जीव खाऊन भिंतीवर फेकावेत. जर चिकटले तर धुवायला घ्यावेत, नाहीतर अजून एखादा आठवडा चालतील.
पण डाव्या पायाचा मोजा कुठला आणी उजव्या पायाचा मोजा कुठला , हे कसे ओळखायचे ??
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
पण डाव्या पायाचा मोजा कुठला आणी उजव्या पायाचा मोजा कुठला , हे कसे ओळखायचे ??
सोप्प आहे!!
मोजा हातात घालून बघायचा. डाव्या हातात फिट्ट बसला तर तो उजव्या पायाचा मोजा, नाहीतर त्याच्या उलटं!!
;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
दोन्ही बूट उडवून टॉस करायचा. जर दोन्ह्यी बूट सुलटे वा उलटे पडले तर प्रथम उजवा नाहीतर डावा!!
मी असेच करतो!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
प्रस्तुत प्रश्न फारच गहन असून त्याचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक, अध्यात्मिक,शास्त्रीय, शैक्षणिक, ऐतिहासिक, भौगोलिक आणि खरं तर वैश्विक या सर्व पातळ्यांवर विचार होणे ही काळाची गरज आहे, नव्हे... तसा वर्तमानाचा संकेतच आहे, नव्हे... तसा आधुनिकतेचा संदेशच आहे. या सर्व पातळ्यांवर डावे-उजवे हे राजकारण सुरू असते. 'मोजा' हे संरक्षण आणि सुविधांचे प्रतीक आहे आणि पाय हे समाजमान(ण)साचे प्रतीक आहे. पायात पाय घालून तोंडावर पाडण्यात पाय अनन्यसाधारण महत्त्वाची भूमिका बजावतात.
पाय आणि 'मोजा' यांचे गणितातील ध्रुवस्थान आपण नाकारूच शकत नाही. परीघ आणि व्यास यांचे गुणोत्तर म्हणजे 'पाय' (३.१४) धरण्याचे काम आहे. परीघ आणि व्यास यांच्यातील हा संबंध मोजणारे लोक म्हणजे 'पाय''मोजे'. आणि जिथे व्यास, तिथे महाभारत तर घडणारच..!
असा व्यापक प्रश्न अत्यंत कमी शब्दांत आणि प्रतिकात्मकरित्या उपस्थित केल्याबद्दल आपले पाय धरावे....(पण आधी डावा का उजवा हा विचार करतोय..!)
-झेल्यामी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
असा व्यापक प्रश्न अत्यंत कमी शब्दांत आणि प्रतिकात्मकरित्या उपस्थित केल्याबद्दल आपले पाय धरावे....(पण आधी डावा का उजवा हा विचार करतोय..!) =))
दोन्हीही एकदम धरा पण मोज्यासकट असतिल तरच..:)
असा व्यापक प्रश्न अत्यंत कमी शब्दांत आणि प्रतिकात्मकरित्या उपस्थित केल्याबद्दल आपले पाय धरावे....(पण आधी डावा का उजवा हा विचार करतोय..!)
आगायाया !! मेलो !!! =)) =))
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
मी उजवा मोजा पहिले घालतो, पण मी उजवखुराच आहे. तसेच विजारीत उजवा पाय आधी घालतो. सदर्यात उजवा हात आधी घालतो, भांग पाडताना कंगवा उजवीकडे आधी फिरवतो.
(पावलावरून चर्चा थबकत थबकत वर सरकू नये म्हणून गाडी ऍक्सेलरेट करून केसांपर्यंत पोचलो.)
MALA MARATHI PADHE 2 TO 30,
0.25(PAVKI)
1.5(NIMKI)
1.25(SAWAYKI)
1.5(DIDKI)
1.75(AUTKI)
2.5(ADICHKI)
HE SARE MP3 FORMAT MADHE PAHIJE AAHE..... ANY ONE THERE TO HELP ME
SOOORY FOR POSTING THIS AT THIS PLACE I AM NEW
ह्या लेखाचा परिणाम !
सकाळी मोजे चढवताना.. डाव्या पायातील मोजा... उजव्या पायात व उजवा डाव्या पायात घालून पाहीला... काही फरक पडला नाही पण पुन्हा उजव्या पायातील मोजा डाव्या पायात व डाव्या पायातील मोजा उजव्या पायात घालून पाहीला असता... आमचा बहाद्दुर हसु लागला व म्हणाला " साब, कोणसा भी किसीभी पैर में डालो.. चलेगा." मी धन्य आहेस ह्या उच्च नजरेने त्याला पाहीले व बुट चढवले !
:)
आपल्याला जेंव्हा पायात मोजा घालायचा असतो तेंव्हा बहुतेक लोक आधि डाव्या पायात पायमोजा घालतात व नंतर उजव्या...असे का? याला काहि खास शाश्त्रीय किंवा मानस शाश्त्रीय कारण असेल का? यावर कुणी प्रकाश टाकु शकेल का?
प्रकाश नक्की कशावर टाकायचा भौ? :?
म्हणजे, मोज्यावर की पायावर की शास्त्रीय कारणावर की मानसशास्त्रिय कारणावर?
प्रकाश कोणता चालेल? पर्याय खालीलप्रमाणे:
१.काजवा
२.लेसर की-चेन
३.पेन्सिलसेलची ब्याटरी
४.नेहमीची ब्याटरी
५.शिकारीला नेतात ती ब्याटरी
६.ट्यूबलाईट
७.जेलात वापरतात तो सर्चलाईट.
अवांतर शंका : प्रकाश पाडलेला नसताना मोजा आधी डाव्या पायावर घातला की उजव्या ते न पाहता कसं कळू शकेल? :?
अवांतर शंका २: मोजा चढवण्याचे हे काम नक्की कोणाच्या पायावर केले जात असतानाचे हे निरिक्षण आहे? म्हणजे स्वतःच्या पायावर की दुसर्याच्या?
दुसर्याच्या असेल तर ती व्यक्ती मोजा घालणार्याच्या उजव्या बाजुला बसली होती की डाव्या?
-मौजाबहाद्दर ध मा ल.
मौजे नवीन आहे ताणले जातातच
धुवून वापरुन होतिल सैल
बाकी शाळेत असतांना ची एन सि सि परेड आठवली
कदम ताल , १ २ १, १ २ १ , लेफ्ट राइट लेफ्ट .. .. लेफ्ट राइट लेफ्ट.... बाये मुड..
प्रतिक्रिया
नाही बुवा
नाना........
+१
अरे हो..कधी लक्ष दिले नाही...
ओढ्याकाठी
उजव्या
..
प्रश्न
डाव्या
मी ह्यावर फार विचार केला नाहीये
मी लेफ्टी
मी पण
मी
हम्म
अरे बापरे
"पण सॉकला
>>मोजा हा
असा प्रश्न
मी बहुतेक
अभिनंदन
लय भारी रे
मी
१+
अहो काय
वाश
एऽऽक नंबर!!!
बहुतेक लोक आधि डाव्या पायात पायमोजा घालतात व नंतर उजव्या....!
पण
सोप्प आहे!
पण पण
टॉस
काय चाललये ?
प्रकाश टाकावा
आपलेच पाय आणि आपलेच मोजे...
+१
+२
भन्नाट
+१
पायमोजा
पाय
????
उजवा मोजा पहिले घालतो
अजून एक
MALA MARATHI PADHE 2 TO
प्रयत्न
ह्या
आपल्याला
कमालच म्हणायची..!
आताशिक
मौजे नवीन