अक्षय पावभाजी
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
ब्रेकफास्टला पावभाजी खाण्याची ही काही माझी पहिली वेळ नाही. आदल्या दिवशी घरात काही कार्यक्रम झाला आणि आलेल्या पाहूण्यांसाठी पावभाजीचा मेनु असेल तर पुढचे दोन दिवस सकाळ-दुपार-संध्याकाळ राहिलेली पावभाजी संपवण्याचा अनुभव मला अगदी लहानपणापासूनचा आहे. फक्त माझी आई किंवा बायकोच नाही... तर इतरही काही माता-भगिनींच्या बाबतीत मी हे होताना पाहिलं आहे. एकदा केलेली पावभाजी केलेल्या दिवशी संपली अथवा कमी पडली हे माझ्या तरी ऐकीवात नाही.
ह्या भाजीबरोबर खायला आणलेले पाव संपतात... मग चौकोनी ब्रेडच्या स्लाईसवर ह्या भाजीला साथ देण्याची जबाबदारी येते..! तेही दम तोडतात... तरीही टेबलावर ठेवलेल्या अक्षयपात्रातुन भाजी आपल्या तोंडाकडे बघत आव्हान देतच असते...! मग सारखा-सारखा ब्रेड नको म्हणून अगदी पोळीबरोबरसुद्धा ही संपवण्याचा प्रयत्न होतो...! कधी कधी रात्रीच्या दहीभाताला चव म्हणून ही पुरते...! ह्या सगळ्या प्रयासानंतर कित्येकदा रात्री मी ह्या भाजीवर ’सुलतानढवा’ देखिल करुन बघितला आहे. ’सुलतानढवा’ म्हणजे पुर्वी युद्धामध्ये सगळे प्रयत्न करुन झाले की शेवटचा एक जोरदार हल्ला करायचा... अगदी निकराचा... आणि निकालाचा...! एक तर तु नाहीतर मी...!! पण ह्याचे पर्यवसन मी रात्री-अपरात्री उठून जेल्युसील आणि थंड दुध पिण्यातच झाले आहे...!
कितीही लोक येऊन जावोत... ते कितीही मिटक्या मारत खावोत... गृहीतदेखिल न धरलेले पाहूणे येवोत... भाजीची कढई आपली जैसे थे...! ह्या पावभाजीच्या पात्राला द्रौपदीच्या अक्षय पात्रासारखं काहीतरी वरदान असावं...! कधीच न संपण्याचं...! मला वाटतं दुर्वास ऋषी आपले सहस्त्रावधी शिष्यगण अचानक पांडवांच्या कुटीरावर घेऊन आले होते त्या दिवशी द्रौपदीने नेमकी पावभाजी केली असावी. एकाचवेळी अगदी मुबलक प्रमाणात चविष्ट समाधान देणारा हा पदार्थ कितीहीवेळा खाल्ला तरी पुढच्यावेळी अगदी तेवढाच इंटरेस्टींग वाटतो हे मात्र खरं...! ’आज जरा काहीतरी वेगळं करुया’ ह्या उत्साही प्रपोजलला... ’आज पावभाजी करुयात का’ हे अतिउत्साही उत्तर अगदी सहज येतं...!!!
असो... येवढ्यावेळात तिकडे कालची पावभाजी गरम झाल्याचा घमघमाट घरभर पसरला आहे. ब्रेकफास्ट... लंच की डिनर हा प्रश्नच ह्या त्रिकालव्यापी खाद्यव्यंजनानी कालातीत करुन टाकला आहे. कुठल्यातरी क्षुधाशांतीची वेळ झाली येवढंच भान सध्या उरलं आहे...!!!
घाटी फ्लेमिंगो
प्रतिक्रिया
मुरलेली पावभाजी जास्त चांगली
अर्र्र ते माई मोड ऑन ऑफ घालून
अजून एक डु-आयडी उघडा पडला असं
एक?
ओ कायपण काय माई कुठे मी कुठे
जाऊ द्या
मुरलेली पावभाजी जास्त चांगली लागते
अगदी सहमत.. आमच्या घरीही हीच
छान छान,
पावभाजीचा लाल
रंग
चला ह्या रविवारच्या मेन्युचा
तुमच्या पैल्याच लेखाच्या वेळी
एक नंबर.
कड्डक ! आवडलं विचाररंजन
:)
माझी आवड खडा पावभाजी.
टॅबॅस्को साॅस.....
माहित नाय ब्वा
रात्री केलेली पावभाजी दुसऱ्या
मस्त
आयला....
..
खमन्ग
छान लिहिलय.
Lol
मी तर करतानाच मुद्दाम दोन
सही!!
पावभाजी चुकून हाॅटेलातही कधी
अपर्णा ताईंन्ची आठवण
ही घ्या लिंक
पावभाजीवर सुलतानढव्हा करायचं
आणि रात्री काय?
पावभाजी खानेवाले जळजळ से नही
प्रचंड अनुमोदन..
चियर्स
पावभाजीचा पुलाव नामक एक
धन्यवाद
खमंग लेख
पावभाजी फारशी आवडत नाही.पण
मस्त लेख आवडेश
धन्यवाद
सहमत आहे. पावभाजी ही अशीच
मी उरवून ठेवतो… तीच गत साध्या
लपवून ठेवता का काय...!?
रात्री मधेच दचकून जागा होऊन,
##काडी##
कमाले ब्वा...!!