Skip to main content

काहीतरी निराळे सांगा

लेखक देशपांडे विनायक यांनी शुक्रवार, 27/05/2016 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझी नात Txtile Designer झाली [NIFT ] तिने स्पृहणीय यश मिळवले आहे तिचे presentation दिल्लीहून आलेल्या परीक्षकांना इतके आवडले कि त्यांनी त्यांचे visiting card तिला देऊन एकदा भेटण्यास सांगितले तिचे कौतक करूया असे मी सांगण्यापूर्वीच सौ म्हणाल्या '' तुम्ही पुस्तक वगैरे देत बसू नका . आता काळ बदलला आहे . काहीतरी निराळे करा '' सध्याच्या काळानुसार तरुण पिढीचे कौतुक आजी आजोबांनी कसे करावे ज्या मुळे त्यांचा आनंद वाढेल आणि आजी आजोबा काळानुरूप वागत आहेत असे त्यांना दिसेल यावर सूचना करण्याची आपणा सर्वास विनंती आहे

वाचने 1519
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

अभिनंदन नाती आणि आजोबा आजींचे. अगदी जवळ जव्हार येथे भटकवून आणा. दूरचे पाटण,भूज( गुजरात),पिपली ( ओडिशा),माहेश्वर ( मप्र) .अशा ठिकाणी भटकंती तिला लक्षात राहील.

काका तुमच्या नातीचे अभिनंदन !! अशा प्रसंगी मी भेट वस्तू दुकानदाराला भेटवस्तू का हवी आहे ते सांगतो आणि त्यांनाच काहीतरी सुचवायला सांगतो :)