✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एक्सेल एक्सेल - भाग १ - रकान्यांचं जाळं

व
वेल्लाभट यांनी
Wed, 05/25/2016 - 10:54  ·  लेख
लेख
नमस्कार, एक्सेल हे सॉफ्टवेअर आणि कॉम्प्युटर या दोघांची नाळ इतकी घट्ट आहे की एक्सेलशिवाय कॉम्प्युटरचा विचारही करता येत नाही. विशेषतः आमच्यासारख्या आकडेमोड करणार्‍यांना तर कॉम्प्युटरची प्रत्येक गोष्ट एक्सेलशीच खातात असं वाटतं. पण या सॉफ्टवेअरबद्दल बहुतेकवेळा प्रचंड बाऊ असतो अनेकांच्या मनात. मोठाले डेटा, लांबचलांब फॉर्म्युले हे सगळं काहीतरी अगम्य आहे असं मानून 'ते एक्सेल वगैरे मला जमत नाही' असं डिस्क्लेमर देऊन टाकतात बरीच मंडळी. हे एक्सेल माझ्या कुवतीनुसार, माहितीनुसार सोपं करण्याचा हा प्रयत्न जानेवारीपासून मी लोकमत वृत्तपत्रातून करतोय. दर सोमवारी ठाणे पुरवणीत मी एक्सेलबद्दल लिहितो. मिपाकरांपुढेही हे मांडावं, म्हणून ही लेखशृंखला सुरू करतोय. सल्ले, सुधारणांचं स्वागत आहे. 1 2 धन्यवाद.
  • एक्सेल एक्सेल - भाग २ - एक्सेलची तोंडओळख
  • एक्सेल एक्सेल - भाग ३ - उपयुक्त शॉर्टकट कीज
  • एक्सेल एक्सेल - भाग ४ - विशाल विश्वाचा उंबरठा
  • एक्सेल एक्सेल - भाग ५ - ऑर्गनाईज्ड इन्फॉर्मेशन
  • एक्सेल एक्सेल - भाग ६ - टक्केवारीचा फॉर्म्युला
  • एक्सेल एक्सेल - भाग ७ - कॉपी पेस्ट
  • एक्सेल एक्सेल - भाग ८ - इफ चा फॉर्म्युला
  • एक्सेल एक्सेल - भाग ९ - अक्षरांशी खेळ
  • एक्सेल एक्सेल - भाग १० - एक्सेलचे उपविश्व - चार्ट्स
  • एक्सेल एक्सेल - भाग ११ - कस्टमाइझिंग चार्ट्स
  • एक्सेल एक्सेल - भाग १२ - 'इफ' कुळातले फॉर्म्युले

Book traversal links for एक्सेल एक्सेल - भाग १ - रकान्यांचं जाळं

  • एक्सेल एक्सेल - भाग २ - एक्सेलची तोंडओळख ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
35731 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

अरे वा!

चांदणे संदीप
Wed, 05/25/2016 - 11:01 नवीन
आवडीचा विषय! एक्सेलमुळे, "तुझं माझं जमेना आणि तुझ्याविना करमेना" अशा अडचणीत सापडलेल्या लोकांसाठी हे अतिशय उपयोगी ठरेल यात शंका नाही! पुभाप्र, Sandy
  • Log in or register to post comments

+1

जव्हेरगंज
Wed, 05/25/2016 - 19:43 नवीन
वेगवेगळ्या formula चा वापर कसा करावा याविषयी उत्सुक! कोणता formula कधी वापरावा , कसा वापरावा, तोच का वापरावा, त्याला अजून काही पर्याय वगैरे माहीतीसाठी एक विशेष लेख होऊन जाऊ द्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

पुलेप्र

सुनील
Wed, 05/25/2016 - 11:03 नवीन
मला वाटतं यावर एक लेखमाला पूर्वी आली होती. तरीही या मालिकेची वाट पाहात आहे! कारण हपिसातील ९०% वेळ एक्सेलवरच जातो!!
  • Log in or register to post comments

लेखमालेचं मनःपुर्वक स्वागत!

तुषार काळभोर
Wed, 05/25/2016 - 11:10 नवीन
लेखमालेचं मनःपुर्वक स्वागत!
  • Log in or register to post comments

वा वा! मस्तच!

बोका-ए-आझम
Wed, 05/25/2016 - 11:20 नवीन
एक्सेल शिकण्याची इच्छा होतीच. पुभाप्र!
  • Log in or register to post comments

मस्तच

सुमीत
Wed, 05/25/2016 - 11:24 नवीन
मस्तच, अतिशय कामाची लेखमाला आणि ती पण ओघवत्या सहज शब्दांत
  • Log in or register to post comments

फारा वर्षापूर्वी

चौकटराजा
Wed, 05/25/2016 - 11:56 नवीन
फारा वर्षापूर्वी लोटस १२३ या नावाने एक स्प्रेडशीट वापरीत असू. त्याचाच हा सुधारित अवतार फार मस्त आहे. अर्थात बरेच लोक त्यात कंडीशनल इव्हॅलुएशनचा वापर न करता आपली हपीसातील साधी साधी स्टेटमेंट करण्यासाठीच अजूनही करीत असावीत असा कयास आहे. सॉर्ट ही सोय फार भन्नाट. निरनिराळे किचकट फॉर्मुले बनविताना वैताग आला तरी अंतिम फळ गोड. वा! अजून माहिती येऊ द्या.
  • Log in or register to post comments

++१

सुमीत
Wed, 05/25/2016 - 12:02 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

वा वा

कापूसकोन्ड्या
Wed, 05/25/2016 - 12:48 नवीन
लोटस १२३ मध्ये तर आम्ही लोळलो आहे. आणि मुळेच एक्सेल सोपे गेले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

एक्सेल मधले pivot टेबल

शाम भागवत
Wed, 05/25/2016 - 12:54 नवीन
एक्सेल मधले pivot टेबल बनवायचे जर शिकले तर काम बरेच सोपे होते. यात पडद्यामागे SQL वापरलेले असते. १२३ मधे ही प्रगत सोय नव्हती. मात्र त्यातले अ‍ॅप्रोच नावाचे सॉफ्टवेअर चांगले होते. पण लोक त्यातील लोटसस्क्रिप्ट वापरत नसत त्यामुळे त्याची सगळी ताकदच निघून जाई. पण प्रोग्रॅमिंग करायचे नसेल तर ओपन ऑफिसचे स्प्रेडशिट चांगले आहे. फुकट आहे. त्यातही pivot टेबलची सोय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

एक्सेल पिव्होट तर जादूच आहे.

कापूसकोन्ड्या
Wed, 05/25/2016 - 12:46 नवीन
एक्सेल शिवाय पान ही हलत नाही हे अगदी खरे आहे. विषय खुप मोठ्ठा आहे. पण कुणा मिपाकरांना एखादा फोकस्ड टॉपिक हवा असेल तर अवश्य कळवा. इथेच त्याचे समाधान करता येईल. एक्सेल पिव्होट तर जादूच आहे.
  • Log in or register to post comments

मला एक शिंपल इन्वाईसिंग फाइल

अभ्या..
Wed, 05/25/2016 - 13:15 नवीन
मला एक शिंपल इन्वाईसिंग फाइल हवीय. त्यात सुरुवातीला क्लायंट लिस्ट विथ नंबर्स अन डिटेल्स असेल. दुसर्‍या शीटवर आयटेम्स विथ कोड अँड रेट असतील. तेथून पुढे इन्वाइस प्रोड्युस होइल. क्लायंट डेटाबेसमधला नंबर घेईल, अपोआप नेक्स्ट इन्व्हाइस नंबर घेईल, करंट डेट घेईल. आयटेम्सची क्वांटीटी अन रेटनुसार टोटल मारेल, त्यावर सीएसटी बसवेल. ग्रांड टोटल करेल. ती इन वर्डस मेन्शन होइल. मुख्य म्हणजे नेक्स्ट इन्वाइसला नवीन पान विथ न्यु इन्वाइस नंबर ऑटोमॅटिक तयार असेल. हे सगळे एक्सेलात होइल काय? एका फाइलीत असे किती इन्वाईस बसू शकतील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कापूसकोन्ड्या

एका फाईलात दहा लाख Rows असतात

मोदक
Wed, 05/25/2016 - 13:26 नवीन
एका फाईलात दहा लाख Rows असतात. त्यानुसार एका इन्वाईसाला किती लाईन लागतात ते पघा आनि भागाकार करा. बाकी तुमची डिमांड लै सोपी आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

दादानू, एक्सेलात सगळ होतंय

चांदणे संदीप
Wed, 05/25/2016 - 13:27 नवीन
फक्त आटोम्याटीक नेक्स्ट इन्व्हाइस घेणे, इनवर्डस मेन्शन होणे, नेक्स्ट इन्व्हाइसला नवीन पान विथ न्यु इन्व्हाइस नंबर आटोम्याटीक तयार असणे यासाठी व्हीबीए चा सपोर्ट लागेल. व्हीबीए आल म्हणजे त्यासाठी कोड लिहावा लागेल. म्हणजेच काम्पुटर-सोफ्त्वारे वाला लागेल! :) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

नाय वो.. लगेच काम्पुटर

मोदक
Wed, 05/25/2016 - 13:28 नवीन
नाय वो.. लगेच काम्पुटर-सोफ्त्वारे वाला कशाला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

नाय का?

चांदणे संदीप
Wed, 05/25/2016 - 13:32 नवीन
आयला.... मला वाटल लै आवघड आहे ते! कोण देईल का गरिबाला. अर्थात मला वेगळ पाहिजे आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

मॅक्रो रेकॉर्ड करा संदीपभाऊ.

आदूबाळ
Wed, 05/25/2016 - 13:38 नवीन
मॅक्रो रेकॉर्ड करा संदीपभाऊ. आणि मग आल्ट्+एफ११ दाबून धडपडत, चुकतमाकत एडिट करायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

मॅक्रो??? आरारा... आवं आरचा

विंजिनेर
गुरुवार, 05/26/2016 - 01:54 नवीन
मॅक्रो??? आरारा... आवं आरचा वापर करा आनी निर्धास्त रावा. एकदम जंक्शन काम हाये पघा! अक्षी श्टीरॉईडवर चालनारी एक्क्षेल जनुं ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

हम्म. वैच प्रोब्लेम है.

अभ्या..
Wed, 05/25/2016 - 13:36 नवीन
हम्म. वैच प्रोब्लेम है. मोदकरावानुसार भर्पूर रो ज आहेत म्हणजे इन्व्हाइस भरपूर करता येतील पण एका पानावर एकच ना. तो पण कॉपी पेस्टून करतो. आम्हाला कोरलमुळे एका फाइलीत ३-४ च्या वर पाने करायची भीती वाटते. पेजमेकर, क्वार्क इन डिझाइन ला तसे नाही वाटत. प्रोग्रामिंग प्रकाराशी कोसोदूर आहोत आम्ही सो शिंपल काही असल्यास सांगणे. व्हीबीए वगैरे कोड्यात बोलू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

सो शिंपल काही असल्यास सांगणे

वेल्लाभट
Wed, 05/25/2016 - 13:39 नवीन
सो शिंपल काही असल्यास सांगणे
ही लेखमाला लैच बेसिक पासून असणार आहे बरं... त्यामुळे शिंपलच सगळं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

एका इन्व्हॉईसला एक नवीन पान

मोदक
Wed, 05/25/2016 - 13:42 नवीन
एका इन्व्हॉईसला एक नवीन पान हा प्रकार थोडा गैरसोयीचा वाटतो म्हणून हा अ‍ॅप्रोच दिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हा ना.

अभ्या..
Wed, 05/25/2016 - 13:44 नवीन
हा ना. एकाखाली एक असे नाही का येणार, पेज ब्रेक टाकून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

ऐका, फार कॉम्प्लेक्सिटी न

वेल्लाभट
Wed, 05/25/2016 - 13:45 नवीन
ऐका, फार कॉम्प्लेक्सिटी न वाढवता, सात-आठ व्यवस्थित लॉजिक्स लावलीत, डेटा कन्सिस्टंट असेल तरी प्रच्चंड काम वाचू शकतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

फक्त आटोम्याटीक नेक्स्ट

शाम भागवत
Wed, 05/25/2016 - 14:19 नवीन
फक्त आटोम्याटीक नेक्स्ट इन्व्हाइस घेणे,
max फोर्मुला वापरला की जमते. या फॉर्म्युलाने शेवटचा नंबर मिळतो व त्यात १ मिळवला की पुढचा नंबर मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

नेक्स्ट इन्व्हाइसला नवीन पान

शाम भागवत
Wed, 05/25/2016 - 14:24 नवीन
नेक्स्ट इन्व्हाइसला नवीन पान विथ न्यु इन्व्हाइस नंबर आटोम्याटीक तयार असणे यासाठी व्हीबीए चा सपोर्ट लागेल
व्हीबीए जरूर नाही. vlookup फॉर्म्युला वापरून हे करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

व्हीलूकअप

गॅरी ट्रुमन
Wed, 05/25/2016 - 14:39 नवीन
एकूणच मला व्हीलूकअप आवडत नाही. कारण मध्ये एखादा कॉलम घातला/काढला तर व्हीलूकअप मधील शेवटचा आकडा बदलावा लागतो. व्हीलूकअपसाठी शेवटच्या आकड्याच्या रेफरन्ससाठी सर्वात वर एक रो घेऊन त्यात संबंधित कॉलमचे आकडे लिहिले तरी मध्ये एखादा कॉलम घातला (किंवा काढून टाकला) तर तो आकडा पण बदलावा लागतो. या कारणामुळे मी शक्यतो व्हीलूकअप वापरणे टाळतो. जे काम व्हीलूकअप करू शकते तेच काम मॅच आणि इन्डेक्स या दोघांना एकत्र घेऊन करता येते. फॉर्म्युला थॉडा किचकट बनतो पण मध्ये कितीही रो, कॉलम घातले किंवा काढून टाकले तरी फॉर्म्युला प्रत्येकवेळी बदलावा लागत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

मॅच इन्डेक्स (थंब्सअप)

वेल्लाभट
Wed, 05/25/2016 - 14:41 नवीन
मॅच इन्डेक्स (थंब्सअप)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

वेल्ला वेल्ला,

अभ्या..
Wed, 05/25/2016 - 15:09 नवीन
वेल्ला वेल्ला, आपलं काय ठरलय? शिंपल शिंपल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

हाहाहा

वेल्लाभट
Wed, 05/25/2016 - 15:56 नवीन
हाहाहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

एकदम मान्य.

शाम भागवत
Wed, 05/25/2016 - 14:59 नवीन
एकदम मान्य. मॅच आणि इन्डेक्स हे फॉर्म्युले वापरता यायला लागले की मेंटेनन्स खूपच सोपे होते. इतकेच नव्हे तर डाटा व्हॅलिडेशनमधेही यांचा वापर करता यायला लागला की डाटा एन्ट्री पण खूप सोपी होऊन अचूकता वाढते हे पण मान्य. पण मी व्हीलूकअप ज्यांना सुचवतो आहे त्यांना मॅच आणि इन्डेक्स या संकल्पना सुरवातीलाच समजावून घेणे अवघड असावे असा माझा कयास आहे. एका शीटवर डाटाबेस व दुसर्‍या शीटवर इन्व्हाईसचा आराखडा ही संकल्पना प्रथम डोक्यात भरवून मग त्या इन्व्हाईसच्या आराखड्यात व्हीलूकअपचा समावेश ही मला वाटते पहिली पायरी म्हणून प्रयोग करणार्‍यांसाठी ठीक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

मॅच आणि इन्डेक्स ही काय भानगड

आदूबाळ
Wed, 05/25/2016 - 15:48 नवीन
मॅच आणि इन्डेक्स ही काय भानगड आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

व्हीलूकपची सवत आहे.

मोदक
Wed, 05/25/2016 - 16:10 नवीन
व्हीलूकपची सवत आहे. व्हीलूकप वापरणारे मॅच आणि इन्डेक्सच्या नावाने बोटे मोडतात आणि हे त्यांच्या.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

व्हीलूकअप ला उत्तम पर्याय.

शाम भागवत
Wed, 05/25/2016 - 16:17 नवीन
व्हीलूकअप ला उत्तम पर्याय. नियोजीत ओळीवर ऊजवीकडे तसेच डावीकडेही शोधता येते. खूपयच जलद. व्हीलूकअप फॉर्म्युलाची २५५ अक्षरांची मर्यादेवर उत्तम पर्याय. ऑफसेट फंक्शन वापरून अधिक ताकदवान फॉर्म्युले वापरता येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

शेवटचा आकडा बदलावा लागतो

नया है वह
Wed, 05/25/2016 - 17:34 नवीन
कारण तो Static असतो. तो जर Dynamic करता आला तर व्हीलूकअप सारखा super formula दुसरा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

शक्य आहे.

वेल्लाभट
Wed, 05/25/2016 - 13:30 नवीन
शक्य आहे. मी अशाच प्रकारे एका जिमच्या मॅनेजमेंट साठी, सोसायटीच्या अकाउंटिंगसाठी, घरातल्या फोनच्या डायरीला पर्याय म्हणून अगदी आज नाश्त्याला काय बनवायचं या प्रश्नाच्या उत्तरासाठीही युटिलिटी बनवलेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

होईल की.

आदूबाळ
Wed, 05/25/2016 - 13:37 नवीन
होईल की. पण अ‍ॅक्सेस २०१३ मध्ये "सर्व्हिसेस" असं रेडिमेड टेम्प्लेट आहे यासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हपिस २००७ वापरतो आम्ही चक्क.

अभ्या..
Wed, 05/25/2016 - 13:49 नवीन
हपिस २००७ वापरतो आम्ही चक्क. ते डिजीटल विषमता का कायतरी म्हणतात आम्हाला. सो दारिद्र्यरेषेखालील तळागाळातील लोकांचा विचार करुन उपाय आखावेत तरच भारताचे भविष्य उज्ज्वल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

लोल.

आदूबाळ
Wed, 05/25/2016 - 13:56 नवीन
लोल. ते टेम्प्लेट २००७ मध्ये पण चालेल. डाऊनवर्ड कम्प्याटेबिलिटी नसेल तर फाटकदादा पगार करत नाहीत पोरांचे. सर्चवून पाहणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

चालेल. पाहतो.

अभ्या..
Wed, 05/25/2016 - 13:59 नवीन
चालेल. पाहतो. फाटका थोर तुझे उपकार. इस्टमनास शिकिव हे प्रकार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

माझ्याकडे एक

रिम झिम
Wed, 05/25/2016 - 16:16 नवीन
माझ्याकडे एक Invoice Template आहे. जे मी माझ्या Client साठी बनवले होते. (जाहिरात :- मी एक्सेल ची कामे as a Freelancer करतो. पण मिपाकरांसांठी नक्किच मोफत करेन.) तुमची ईच्छा असेल तर व्यनि करा.. File पाठवून देईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मी के लेखमाला सुरू केली होती.

मोदक
Wed, 05/25/2016 - 13:28 नवीन
मी के लेखमाला सुरू केली होती. पण उत्साहाच्या अभावाने बंद पडली. तुमची लेखमाला वाचत आहे.. शक्य असल्यास जरूर भर घालेन.
  • Log in or register to post comments

ऐ नो!

वेल्लाभट
Wed, 05/25/2016 - 13:40 नवीन
ऐ नो! वाचत होतो ती मी. भारी चाललेली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

वाचत होतो ती मी. भारी चाललेली

शाम भागवत
Wed, 05/25/2016 - 14:11 नवीन
वाचत होतो ती मी. भारी चाललेली.
लिंक द्या की हो. मी पण वाचीन म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

windows app store वर एक

कंजूस
Wed, 05/25/2016 - 15:16 नवीन
windows app store वर एक ऑफलाइन अॅप होतं ते घेतलं आहे पण आता स्टोरवर दिसत नाहिये. २०१३ ,२०१६ च्या इक्सेलमध्ये फरक आहे का? आता लेटेस्ट कोणते चालू आहे?
  • Log in or register to post comments

मस्त मस्त लेखमाला आवडता विषय

मारवा
Wed, 05/25/2016 - 15:46 नवीन
एक्सेल ला एक्सप्लोअर करत राहण्यात मजा येते. मस्त प्रचंड उपयुक्त रोचक सॉफ्ट्वेअर आहे. एक गावठी शेअरींग आपल लैच बेसीक पण ज्याला माहीत नाही त्याला उपयोगात येत म्हणुन समजा पाच कॉलम मध्ये डेटा टाकलेला आहे ए बी सी डी इ त्यातले बी व डी हाइड केलेत आता फक्त एसीइ हे तीनच कॉलममधल्या फिगर्स कॉपी करुन दुसरीकडे पेस्ट करायच्या आहेत डायरेक केल तर सर्वच्या सर्व पाची कॉलम कॉपी होउन पेस्ट पाची चे पाच होतात म्हणुन सर्वात अगोदर तीन कॉलम सिलेक्ट करावेत मग एफ ५ दाबावा मग एक छोटी चौकट येते त्यात स्पेशल दिसत ते क्लीक करा मग तो सिलेक्ट म्हणुन अनेक पर्याय दाखवतो त्यातल उजवीकडच व्हीजीबल सेल्स ओन्ली क्लीक करायच मग पुन्हा एकदा आपले तीन कॉलम कंट्रोल सी करावेत. मग मुंग्यामुंग्या दिसु लागतात (नॉर्मल सिलेक्ट केल्यावर जितक्या मुंग्या दिसतात त्यापेक्षा थोड वेगळ काही दिसु लागत) ते दिसल की जिंकलो समजा मग पेस्ट करा मग पेस्ट केल तर तीनच कॉलम पेस्ट होणार हाइड केलेले इतर दोन कॉलम दिसत नाही. मोठा डेटा असेल व हाइड करुन ठराविकच व्हीजीबल डेटा कॉपी करायचा असेल तर हे बर पडत.
  • Log in or register to post comments

धन्यवाद...याची गरज होती.

असंका
Wed, 05/25/2016 - 16:30 नवीन
धन्यवाद...याची गरज होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

या एफ५ वगैरे ची शॉर्टकट की

वेल्लाभट
Wed, 05/25/2016 - 16:35 नवीन
या एफ५ वगैरे ची शॉर्टकट की सेल रेंज सिलेक्ट करा सगळी आणि ऑल्ट + सेमिकोलन दाबा. व्हिजिबल सेल्स सिलेक्ट होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

धन्यवाद.

शाम भागवत
Wed, 05/25/2016 - 16:44 नवीन
धन्यवाद. वेल्लाभट व मारवा यांना _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

नाय ब्वॉ!

तुषार काळभोर
Wed, 05/25/2016 - 16:35 नवीन
मी एक्सेल२००७ मध्ये आत्ता करून पाहिलं. ५ आडव्या सेल मध्ये a b c d e लिहिलं b अन् d लिहिलेले कॉलम्स हाईड केले. मग a c e लिहिलेले कॉलम्स कॉपी करून दुसरीकडे पेस्ट केले, तर तेव्ह्ढेच तीन झाले. (फक्त कंट्रोल सी अन् दुसरीकडे कंट्रोल व्ही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

खूप सोप्या भाषेत समजावल आहे.

शाम भागवत
Wed, 05/25/2016 - 16:36 नवीन
धन्यवाद. १२३ मधे हे आपोआप व्हायचे. त्यामुळे १२३ बंद झाल्यावर एक्सेलमधे फारच त्रास झाला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा